Settings
الۤرۚ كِتَـٰبٌ أُحۡكِمَتۡ ءَایَـٰتُهُۥ ثُمَّ فُصِّلَتۡ مِن لَّدُنۡ حَكِیمٍ خَبِیرٍ ﴿1﴾
१. अलिफ. लाम. रॉ . हा एक असा ग्रंथ आहे की याच्या आयती मजबूत केल्या गेल्या आहेत, मग सविस्तर सांगितल्या गेल्या आहेत एका हिकमतशाली, पूर्ण ज्ञान राखणाऱ्यातर्फे.
أَلَّا تَعۡبُدُوۤا۟ إِلَّا ٱللَّهَۚ إِنَّنِی لَكُم مِّنۡهُ نَذِیرࣱ وَبَشِیرࣱ ﴿2﴾
२. हे की अल्लाहशिवाय कोणाचीही उपासना करू नका. मी तुम्हाला अल्लाहतर्फे भय दाखविणारा आणि खूशखबर देणारा आहे.
وَأَنِ ٱسۡتَغۡفِرُوا۟ رَبَّكُمۡ ثُمَّ تُوبُوۤا۟ إِلَیۡهِ یُمَتِّعۡكُم مَّتَـٰعًا حَسَنًا إِلَىٰۤ أَجَلࣲ مُّسَمࣰّى وَیُؤۡتِ كُلَّ ذِی فَضۡلࣲ فَضۡلَهُۥۖ وَإِن تَوَلَّوۡا۟ فَإِنِّیۤ أَخَافُ عَلَیۡكُمۡ عَذَابَ یَوۡمࣲ كَبِیرٍ ﴿3﴾
३. आणि हे की तुम्ही आपल्या अपराधांना आपल्या पालनकर्त्याकडून माफ करवून घ्या, मग त्याच्याचकडे एकचित्त व्हा. तो तुम्हाला एका निर्धारीत वेळेपर्यंत (जीवन) सामुग्री देईल आणि प्रत्येक चांगले काम करणाऱ्यावर अधिक कृपा करील आणि जर तुम्ही लोक तोंड फिरवित राहिलात तर मला तुमच्याबाबत एका मोठ्या दिवसाच्या शिक्षेची चिंता वाटते.
إِلَى ٱللَّهِ مَرۡجِعُكُمۡۖ وَهُوَ عَلَىٰ كُلِّ شَیۡءࣲ قَدِیرٌ ﴿4﴾
४. तुम्हाला अल्लाहच्याच जवळ जायचे आहे आणि तो प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगतो.
أَلَاۤ إِنَّهُمۡ یَثۡنُونَ صُدُورَهُمۡ لِیَسۡتَخۡفُوا۟ مِنۡهُۚ أَلَا حِینَ یَسۡتَغۡشُونَ ثِیَابَهُمۡ یَعۡلَمُ مَا یُسِرُّونَ وَمَا یُعۡلِنُونَۚ إِنَّهُۥ عَلِیمُۢ بِذَاتِ ٱلصُّدُورِ ﴿5﴾
५. लक्षात ठेवा ते लोक आपल्या छातींना दुहेरी करून घेतात, यासाठी की आपल्या गोष्टी (बोलणे) अल्लाहपासून लपवू शकावे. लक्षात ठेवा की ते लोक ज्या वेळी आपले कपडे गुंडाळतात, त्या वेळीही तो सर्व काही जाणतो जे काही लपवितात (कानगोष्टी करतात) आणि जे काही साफ- स्पष्ट बोलतात. निःसंशय तो मनातल्या गोष्टीही जाणतो.
۞ وَمَا مِن دَاۤبَّةࣲ فِی ٱلۡأَرۡضِ إِلَّا عَلَى ٱللَّهِ رِزۡقُهَا وَیَعۡلَمُ مُسۡتَقَرَّهَا وَمُسۡتَوۡدَعَهَاۚ كُلࣱّ فِی كِتَـٰبࣲ مُّبِینࣲ ﴿6﴾
६. आणि जमिनीवर चालण्या-फिरणाऱ्या प्रत्येक सजीवाच्या अन्नसामुग्रीची जबाबदारी अल्लाहवर आहे. तोच त्यांच्या निवासाचे ठिकाणही जाणतो आणि त्यांना सोपविले जाण्याचे ठिकाणही. सर्व काही स्पष्ट ग्रंथात आहे.
وَهُوَ ٱلَّذِی خَلَقَ ٱلسَّمَـٰوَ ٰتِ وَٱلۡأَرۡضَ فِی سِتَّةِ أَیَّامࣲ وَكَانَ عَرۡشُهُۥ عَلَى ٱلۡمَاۤءِ لِیَبۡلُوَكُمۡ أَیُّكُمۡ أَحۡسَنُ عَمَلࣰاۗ وَلَىِٕن قُلۡتَ إِنَّكُم مَّبۡعُوثُونَ مِنۢ بَعۡدِ ٱلۡمَوۡتِ لَیَقُولَنَّ ٱلَّذِینَ كَفَرُوۤا۟ إِنۡ هَـٰذَاۤ إِلَّا سِحۡرࣱ مُّبِینࣱ ﴿7﴾
७. आणि तो (अल्लाहच) होय, ज्याने सहा दिवसांत आकाशांना आणि जमिनीला निर्माण केले आणि त्याचे सिंहासन (अर्श) पाण्यावर होते१ यासाठी की त्याने तुमची कसोटी घ्यावी की तुमच्यात सदाचारी कोण आहे? जर तुम्ही त्यांना सांगाल की तुम्हाला मेल्यानंतर पुन्हा जिवंत केले जाईल, तर इन्कारी लोक उत्तर देतील की ही केवळ उघड जादू आहे.
وَلَىِٕنۡ أَخَّرۡنَا عَنۡهُمُ ٱلۡعَذَابَ إِلَىٰۤ أُمَّةࣲ مَّعۡدُودَةࣲ لَّیَقُولُنَّ مَا یَحۡبِسُهُۥۤۗ أَلَا یَوۡمَ یَأۡتِیهِمۡ لَیۡسَ مَصۡرُوفًا عَنۡهُمۡ وَحَاقَ بِهِم مَّا كَانُوا۟ بِهِۦ یَسۡتَهۡزِءُونَ ﴿8﴾
८. आणि जर आम्ही काही मुदतीपर्यंत त्यांच्यावरील शिक्षा- यातना स्थगित केली तर हे निश्चित उद्गारतील की अज़ाबला कोणत्या गोष्टीने रोखले आहे, ऐका! ज्या दिवशी अज़ाब त्यांच्या जवळ येऊन पोहोचेल, मग तो त्यांच्यावरून टळणार नाही, मग तर ज्याची ते थट्टा उडवित होते, तोच त्यांच्यावर उलटून पडेल.
وَلَىِٕنۡ أَذَقۡنَا ٱلۡإِنسَـٰنَ مِنَّا رَحۡمَةࣰ ثُمَّ نَزَعۡنَـٰهَا مِنۡهُ إِنَّهُۥ لَیَـُٔوسࣱ كَفُورࣱ ﴿9﴾
९. आणि जर आम्ही माणसाला एखाद्या सुखाची गोडी चाखवून, मग ते त्याच्याकडून हिरावून घेतो, तेव्हा तो फार उदास आणि मोठा कृतघ्न बनतो.
وَلَىِٕنۡ أَذَقۡنَـٰهُ نَعۡمَاۤءَ بَعۡدَ ضَرَّاۤءَ مَسَّتۡهُ لَیَقُولَنَّ ذَهَبَ ٱلسَّیِّـَٔاتُ عَنِّیۤۚ إِنَّهُۥ لَفَرِحࣱ فَخُورٌ ﴿10﴾
१०. आणि जर आम्ही त्याला एखादे सुख पोहचवितो, त्या दुःखानंतर जे त्याला पोहोचले होते, तेव्हा तो म्हणू लागतो की आता माझ्या कष्ट-यातना दूर झाल्या १ निश्चितच तो खूप आनंदित होऊन घमेंड करू लागतो.
إِلَّا ٱلَّذِینَ صَبَرُوا۟ وَعَمِلُوا۟ ٱلصَّـٰلِحَـٰتِ أُو۟لَـٰۤىِٕكَ لَهُم مَّغۡفِرَةࣱ وَأَجۡرࣱ كَبِیرࣱ ﴿11﴾
११. त्यांच्याखेरीज, जे धीर-संयम राखतात आणि सत्कर्म करीत राहतात अशाच लोकांसाठी क्षमाही आहे आणि फार मोठा मोबदलाही.
فَلَعَلَّكَ تَارِكُۢ بَعۡضَ مَا یُوحَىٰۤ إِلَیۡكَ وَضَاۤىِٕقُۢ بِهِۦ صَدۡرُكَ أَن یَقُولُوا۟ لَوۡلَاۤ أُنزِلَ عَلَیۡهِ كَنزٌ أَوۡ جَاۤءَ مَعَهُۥ مَلَكٌۚ إِنَّمَاۤ أَنتَ نَذِیرࣱۚ وَٱللَّهُ عَلَىٰ كُلِّ شَیۡءࣲ وَكِیلٌ ﴿12﴾
१२. तर कदाचित तुम्ही त्या वहयी (ईश-संदेशा) चा एखादा भाग सोडून देणार आहात, जो तुमच्याकडे अवतरीत केला जातो आणि त्यामुळे तुमच्या मनात संकोच आहे केवळ त्यांच्या या बोलण्यावर की याच्यावर एखादा खजिना का नाही उतरविला गेला? किंवा याच्यासोबत एखादा फरिश्ता तरी आला असता. ऐका! तुम्ही तर केवळ भय दाखविणारेच आहात आणि प्रत्येक चीजवस्तूची देखरेख करणारा केवळ अल्लाह आहे.
أَمۡ یَقُولُونَ ٱفۡتَرَىٰهُۖ قُلۡ فَأۡتُوا۟ بِعَشۡرِ سُوَرࣲ مِّثۡلِهِۦ مُفۡتَرَیَـٰتࣲ وَٱدۡعُوا۟ مَنِ ٱسۡتَطَعۡتُم مِّن دُونِ ٱللَّهِ إِن كُنتُمۡ صَـٰدِقِینَ ﴿13﴾
१३. काय ते असे म्हणतात की या कुरआनाला त्याने आपल्या मनाने रचले आहे. तुम्ही उत्तर द्या की तुम्हीदेखील अशा दहा सूरह (अध्याय) मनाने रचून आणा आणि अल्लाहखेरीज वाटेल त्याला आपल्यासोबत सामील करून घ्या, जर तुम्ही सच्चे असाल.
فَإِلَّمۡ یَسۡتَجِیبُوا۟ لَكُمۡ فَٱعۡلَمُوۤا۟ أَنَّمَاۤ أُنزِلَ بِعِلۡمِ ٱللَّهِ وَأَن لَّاۤ إِلَـٰهَ إِلَّا هُوَۖ فَهَلۡ أَنتُم مُّسۡلِمُونَ ﴿14﴾
१४. मग जर ते तुमचे हे म्हणणे मान्य न करतील तर तुम्ही खात्रीपूर्वक जाणून घ्या की हा ग्रंथ (कुरआन) अल्लाहच्या ज्ञानासह अवतरित केला गेला आहे आणि हे की अल्लाहशिवाय कोणीही उपास्य नाही. तर काय तुम्ही मुस्लिम होता?
مَن كَانَ یُرِیدُ ٱلۡحَیَوٰةَ ٱلدُّنۡیَا وَزِینَتَهَا نُوَفِّ إِلَیۡهِمۡ أَعۡمَـٰلَهُمۡ فِیهَا وَهُمۡ فِیهَا لَا یُبۡخَسُونَ ﴿15﴾
१५. जो मनुष्य ऐहिक जीवन आणि शोभा- सजावटीवर आसक्त असेल तर अशांना आम्ही सर्व कर्मांचा (मोबदला) इथेच पूर्णतः देऊन टाकतो आणि इथे त्यांना कसलीही कमतरता ठेवली जात नाही.
أُو۟لَـٰۤىِٕكَ ٱلَّذِینَ لَیۡسَ لَهُمۡ فِی ٱلۡـَٔاخِرَةِ إِلَّا ٱلنَّارُۖ وَحَبِطَ مَا صَنَعُوا۟ فِیهَا وَبَـٰطِلࣱ مَّا كَانُوا۟ یَعۡمَلُونَ ﴿16﴾
१६. मात्र हेच ते लोक होत, ज्यांच्यासाठी आखिरतमध्ये आगीशिवाय दुसरे काहीही नाही आणि जे काही त्यांनी इथे केले असेल ते तिथे सर्व व्यर्थ आहे आणि जी काही त्यांची कर्मे होती, ती सर्व नाश पावणारी आहेत.
أَفَمَن كَانَ عَلَىٰ بَیِّنَةࣲ مِّن رَّبِّهِۦ وَیَتۡلُوهُ شَاهِدࣱ مِّنۡهُ وَمِن قَبۡلِهِۦ كِتَـٰبُ مُوسَىٰۤ إِمَامࣰا وَرَحۡمَةًۚ أُو۟لَـٰۤىِٕكَ یُؤۡمِنُونَ بِهِۦۚ وَمَن یَكۡفُرۡ بِهِۦ مِنَ ٱلۡأَحۡزَابِ فَٱلنَّارُ مَوۡعِدُهُۥۚ فَلَا تَكُ فِی مِرۡیَةࣲ مِّنۡهُۚ إِنَّهُ ٱلۡحَقُّ مِن رَّبِّكَ وَلَـٰكِنَّ أَكۡثَرَ ٱلنَّاسِ لَا یُؤۡمِنُونَ ﴿17﴾
१७. तो, जो आपल्या पालनकर्त्यातर्फे एका प्रमाणावर कायम असेल, आणि त्याच्यासोबत अल्लाहतर्फे साक्षी असेल, आणि त्याच्यापूर्वी मूसाचा ग्रंथ (साक्षी) असेल जो मार्गदर्शक आणि दया- कृपा आहे. (दुसऱ्यांप्रमाणे असू शकतो?) हेच लोक आहेत, जे त्यावर ईमान राखतात आणि सर्व समूहांपैकी, जोदेखील याचा इन्कारी असेल त्याच्या अंतिम वायद्याचे ठिकाण जहन्नम आहे.१ तेव्हा तुम्ही त्याबाबत कसल्याही संशयात पडू नका. निःसंशय हे तुमच्या पालनकर्त्यातर्फे पूर्णतः सत्य आहे. परंतु अधिकांश लोक ईमान बाळगणारे नसतात.
وَمَنۡ أَظۡلَمُ مِمَّنِ ٱفۡتَرَىٰ عَلَى ٱللَّهِ كَذِبًاۚ أُو۟لَـٰۤىِٕكَ یُعۡرَضُونَ عَلَىٰ رَبِّهِمۡ وَیَقُولُ ٱلۡأَشۡهَـٰدُ هَـٰۤؤُلَاۤءِ ٱلَّذِینَ كَذَبُوا۟ عَلَىٰ رَبِّهِمۡۚ أَلَا لَعۡنَةُ ٱللَّهِ عَلَى ٱلظَّـٰلِمِینَ ﴿18﴾
१८. आणि त्याहून अधिक अत्याचारी कोण असेल, जो अल्लाहबाबत खोटे रचेल. हे लोक आपल्या पालनकर्त्यासमोर सादर केले जातील आणि साक्ष देणारे सर्व म्हणतील की हे असे लोक आहेत ज्यांनी आपल्या पालनकर्त्याविषयी असत्य रचले. खबरदार! अल्लाहतर्फे धिक्काराचा मारा आहे अशा अत्याचारी लोकांवर.१
ٱلَّذِینَ یَصُدُّونَ عَن سَبِیلِ ٱللَّهِ وَیَبۡغُونَهَا عِوَجࣰا وَهُم بِٱلۡـَٔاخِرَةِ هُمۡ كَـٰفِرُونَ ﴿19﴾
१९. जे अल्लाहच्या मार्गापासून रोखतात आणि त्यात चुका शोधण्यामागे लागतात. हेच ते लोक होते, जे आखिरतचा इन्कार करतात.
أُو۟لَـٰۤىِٕكَ لَمۡ یَكُونُوا۟ مُعۡجِزِینَ فِی ٱلۡأَرۡضِ وَمَا كَانَ لَهُم مِّن دُونِ ٱللَّهِ مِنۡ أَوۡلِیَاۤءَۘ یُضَـٰعَفُ لَهُمُ ٱلۡعَذَابُۚ مَا كَانُوا۟ یَسۡتَطِیعُونَ ٱلسَّمۡعَ وَمَا كَانُوا۟ یُبۡصِرُونَ ﴿20﴾
२०. असे लोक ना या जगात अल्लाहला हरवू शकले, आणि ना त्यांचा कोणी मदतकर्ता अल्लाहखेरीज झाला. त्यांच्यासाठी शिक्षा दुप्पट केली जाईल ना ते ऐकण्याचे सामर्थ्य बाळगत होते आणि पाहातही नव्हते.
أُو۟لَـٰۤىِٕكَ ٱلَّذِینَ خَسِرُوۤا۟ أَنفُسَهُمۡ وَضَلَّ عَنۡهُم مَّا كَانُوا۟ یَفۡتَرُونَ ﴿21﴾
२१. हेच ते लोक होते ज्यांनी स्वतःच आपले नुकसान करून घेतले आणि त्यांच्याकडून त्यांनी रचलेले असत्य हरवले.
لَا جَرَمَ أَنَّهُمۡ فِی ٱلۡـَٔاخِرَةِ هُمُ ٱلۡأَخۡسَرُونَ ﴿22﴾
२२. निःसंशय हे लोक आखिरत (मरणोत्तर जीवना) मध्ये तोट्यात असतील.
إِنَّ ٱلَّذِینَ ءَامَنُوا۟ وَعَمِلُوا۟ ٱلصَّـٰلِحَـٰتِ وَأَخۡبَتُوۤا۟ إِلَىٰ رَبِّهِمۡ أُو۟لَـٰۤىِٕكَ أَصۡحَـٰبُ ٱلۡجَنَّةِۖ هُمۡ فِیهَا خَـٰلِدُونَ ﴿23﴾
२३. निःसंशय, ज्यांनी ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिले आणि आपल्या पालनकर्त्याकडे झुकतही राहिले, तेच लोक जन्नतमध्ये जाणार आहेत जिथे ते नेहमी नेहमी राहतील.
۞ مَثَلُ ٱلۡفَرِیقَیۡنِ كَٱلۡأَعۡمَىٰ وَٱلۡأَصَمِّ وَٱلۡبَصِیرِ وَٱلسَّمِیعِۚ هَلۡ یَسۡتَوِیَانِ مَثَلًاۚ أَفَلَا تَذَكَّرُونَ ﴿24﴾
२४. दोन्ही गटांचे उदाहरण असे आहे जणू एक आंधळा आणि बहिरा तर दुसरा डोळस आणि ऐकणारा. उदाहरणात काय हे दोन्ही समान आहेत? काय तरीही तुम्ही बोध प्राप्त करीत नाहीत?
وَلَقَدۡ أَرۡسَلۡنَا نُوحًا إِلَىٰ قَوۡمِهِۦۤ إِنِّی لَكُمۡ نَذِیرࣱ مُّبِینٌ ﴿25﴾
२५. आणि निःसंशय आम्ही नूह (अलै.) यांना त्यांच्या जनसमूहाकडे रसूल (संदेशवाहक) बनवून पाठविले की मी तुम्हाला स्पष्टपणे सचेत करणारा आहे?
أَن لَّا تَعۡبُدُوۤا۟ إِلَّا ٱللَّهَۖ إِنِّیۤ أَخَافُ عَلَیۡكُمۡ عَذَابَ یَوۡمٍ أَلِیمࣲ ﴿26﴾
२६. की तुम्ही फक्त अल्लाहचीच उपासना करा, मला तर तुमच्याविषयी दुःखदायक दिवसाच्या शिक्षा- यातनेचे भय वाटते.
فَقَالَ ٱلۡمَلَأُ ٱلَّذِینَ كَفَرُوا۟ مِن قَوۡمِهِۦ مَا نَرَىٰكَ إِلَّا بَشَرࣰا مِّثۡلَنَا وَمَا نَرَىٰكَ ٱتَّبَعَكَ إِلَّا ٱلَّذِینَ هُمۡ أَرَاذِلُنَا بَادِیَ ٱلرَّأۡیِ وَمَا نَرَىٰ لَكُمۡ عَلَیۡنَا مِن فَضۡلِۭ بَلۡ نَظُنُّكُمۡ كَـٰذِبِینَ ﴿27﴾
२७. त्यांच्या जनसमूहाच्या काफिर सरदारांनी उत्तर दिले की आम्ही तर तुम्हाला आपल्याचसारखे मनुष्य असल्याचे पाहतो आणि तुमच्या अनुयायींनाही पाहतो की स्पष्टतः खालच्या पातळीच्या लोकांखेरीज दुसरा कोणी नाही. (जे तुमचे अनुसरण करीत आहेत) आम्हाला तर तुम्ही कोणत्याही प्रकारे आमच्यापेक्षा श्रेष्ठ दिसत नाही, उलट आम्ही तर तुम्हाला खोटे समजतो.
قَالَ یَـٰقَوۡمِ أَرَءَیۡتُمۡ إِن كُنتُ عَلَىٰ بَیِّنَةࣲ مِّن رَّبِّی وَءَاتَىٰنِی رَحۡمَةࣰ مِّنۡ عِندِهِۦ فَعُمِّیَتۡ عَلَیۡكُمۡ أَنُلۡزِمُكُمُوهَا وَأَنتُمۡ لَهَا كَـٰرِهُونَ ﴿28﴾
२८. (नूह) म्हणाले, हे माझ्या जातीबांधवांनो! मला हे सांगा, जर मी आपल्या पालनकर्त्यातर्फे स्पष्ट निशाणीवर कामय असलेला आणि मला त्याने आपल्याकडून (एखादी चांगली) दया- कृपा प्रदान केली असेल, मग ती तुमच्या डोळ्यांत सामावली नाही तर काय जबरदस्तीने तिला तुमच्या गळ्यात टाकू, वास्तविक तुम्ही तिला इच्छित नाही.
وَیَـٰقَوۡمِ لَاۤ أَسۡـَٔلُكُمۡ عَلَیۡهِ مَالًاۖ إِنۡ أَجۡرِیَ إِلَّا عَلَى ٱللَّهِۚ وَمَاۤ أَنَا۠ بِطَارِدِ ٱلَّذِینَ ءَامَنُوۤا۟ۚ إِنَّهُم مُّلَـٰقُوا۟ رَبِّهِمۡ وَلَـٰكِنِّیۤ أَرَىٰكُمۡ قَوۡمࣰا تَجۡهَلُونَ ﴿29﴾
२९. हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! मी याच्या मोबदल्यात तुमच्याकडून कसलेही धन मागत नाही. माझा मोबदला तर केवळ सर्वश्रेष्ठ अल्लाहजवळ आहे, ना मी ईमानधारकांना आपल्या जवळून दूर करू शकतो, त्यांना आपल्या पालनकर्त्याशी भेटायचे आहे. परंतु मी असे पाहतो की तुम्ही लोक मूर्खपणा करीत आहात.
وَیَـٰقَوۡمِ مَن یَنصُرُنِی مِنَ ٱللَّهِ إِن طَرَدتُّهُمۡۚ أَفَلَا تَذَكَّرُونَ ﴿30﴾
३०. आणि हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! जर मी ईमानधारकांना आपल्यापासून दूर करेन, तर अल्लाहच्या विरोधात कोण माझी मदत करू शकतो, काय तुम्ही थोडादेखील विचार करीत नाहीत?
وَلَاۤ أَقُولُ لَكُمۡ عِندِی خَزَاۤىِٕنُ ٱللَّهِ وَلَاۤ أَعۡلَمُ ٱلۡغَیۡبَ وَلَاۤ أَقُولُ إِنِّی مَلَكࣱ وَلَاۤ أَقُولُ لِلَّذِینَ تَزۡدَرِیۤ أَعۡیُنُكُمۡ لَن یُؤۡتِیَهُمُ ٱللَّهُ خَیۡرًاۖ ٱللَّهُ أَعۡلَمُ بِمَا فِیۤ أَنفُسِهِمۡ إِنِّیۤ إِذࣰا لَّمِنَ ٱلظَّـٰلِمِینَ ﴿31﴾
३१. आणि मी तुम्हाला हे नाही सांगत की माझ्याजवळ अल्लाहचे खजिने आहेत. (ऐका!) मी अपरोक्षाचेही ज्ञान बाळगत नाही, ना मी हे सांगतो की मी फरिश्ता आहे. ना माझे असे म्हणणे आहे की ज्यांच्यावर तुमची नजर अपमानाने पडत आहे त्यांना अल्लाह एखादी भलाई देणारच नाही. त्यांच्या मनात जे काही आहे अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो. जर मी असे म्हणेन तर निश्चितच माझीही गणना अत्याचारी लोकांत होईल.
قَالُوا۟ یَـٰنُوحُ قَدۡ جَـٰدَلۡتَنَا فَأَكۡثَرۡتَ جِدَ ٰلَنَا فَأۡتِنَا بِمَا تَعِدُنَاۤ إِن كُنتَ مِنَ ٱلصَّـٰدِقِینَ ﴿32﴾
३२. (जनसमूहाचे लोक) म्हणाले, हे नूह! तू आमच्याशी खूप खूप वाद घातला आहेस. आता तर ज्या गोष्टीचे भय तू आम्हाला दाखवित आहेस तीच आमच्याजवळ आणून दाखव जर तू सच्चा आहेस.
قَالَ إِنَّمَا یَأۡتِیكُم بِهِ ٱللَّهُ إِن شَاۤءَ وَمَاۤ أَنتُم بِمُعۡجِزِینَ ﴿33﴾
३३. उत्तर दिले, तीदेखील अल्लाहच आणील जर तो इच्छिल, आणि होय! तुम्ही अल्लाहला विवश करू शकत नाही.
وَلَا یَنفَعُكُمۡ نُصۡحِیۤ إِنۡ أَرَدتُّ أَنۡ أَنصَحَ لَكُمۡ إِن كَانَ ٱللَّهُ یُرِیدُ أَن یُغۡوِیَكُمۡۚ هُوَ رَبُّكُمۡ وَإِلَیۡهِ تُرۡجَعُونَ ﴿34﴾
३४. आणि तुम्हाला माझा उपदेश काहीच लाभ पोहचवू शकत नाही, मग मी कितीही तुमचे भले इच्छिले तरीही. जर अल्लाहची मर्जी तुम्हाला भटकत ठेवण्याची असेल. तोच तुम्हा सर्वांचा पालनकर्ता आहे आणि त्याच्याचकडे तुम्ही परतून जाल.
أَمۡ یَقُولُونَ ٱفۡتَرَىٰهُۖ قُلۡ إِنِ ٱفۡتَرَیۡتُهُۥ فَعَلَیَّ إِجۡرَامِی وَأَنَا۠ بَرِیۤءࣱ مِّمَّا تُجۡرِمُونَ ﴿35﴾
३५. काय हे म्हणतात की हा ग्रंथ पैगंबराने स्वतः मनाने रचलेला आहे? तर तुम्ही उत्तर द्या की जर तो मी मनाने रचलेला असेल तर माझा गुन्हा माझ्यावर आहे आणि मी त्या अपराधांपासून वेगळा आहे, जे तुम्ही करीत आहात.
وَأُوحِیَ إِلَىٰ نُوحٍ أَنَّهُۥ لَن یُؤۡمِنَ مِن قَوۡمِكَ إِلَّا مَن قَدۡ ءَامَنَ فَلَا تَبۡتَىِٕسۡ بِمَا كَانُوا۟ یَفۡعَلُونَ ﴿36﴾
३६. आणि नूहकडे वहयी (ईशसंदेश) पाठविली गेली की तुमच्या जनसमूहामध्ये ज्यांनीदेखील ईमान राखले आहे, त्यांच्याखेरीज आता कोणीही ईमान राखणार नाही. तेव्हा त्यांच्या कर्मांबद्दल दुःखी होऊ नका.
وَٱصۡنَعِ ٱلۡفُلۡكَ بِأَعۡیُنِنَا وَوَحۡیِنَا وَلَا تُخَـٰطِبۡنِی فِی ٱلَّذِینَ ظَلَمُوۤا۟ إِنَّهُم مُّغۡرَقُونَ ﴿37﴾
३७. आणि एक नौका आमच्या डोळ्यांदेखत आणि आमच्या वहयीनुसार तयार करा आणि अत्याचारी लोकांविषयी आम्हाला काहीही बोलू नका, त्यांना पाण्यात बुडविले जाणार आहे.
وَیَصۡنَعُ ٱلۡفُلۡكَ وَكُلَّمَا مَرَّ عَلَیۡهِ مَلَأࣱ مِّن قَوۡمِهِۦ سَخِرُوا۟ مِنۡهُۚ قَالَ إِن تَسۡخَرُوا۟ مِنَّا فَإِنَّا نَسۡخَرُ مِنكُمۡ كَمَا تَسۡخَرُونَ ﴿38﴾
३८. ते (नूह) नाव बनवू लागले, त्यांच्या जनसमूहाचे ज्या ज्या गटाचे लोक त्यांच्या जवळून जात, त्यांची थट्टा उटवित. ते (नूह) म्हणत, जर तुम्ही आमची थट्टा उडवित असाल तर आम्हीदेखील एक दिवस तुमच्यावर हसणार जशी तुम्ही थट्टा करीत आहात.
فَسَوۡفَ تَعۡلَمُونَ مَن یَأۡتِیهِ عَذَابࣱ یُخۡزِیهِ وَیَحِلُّ عَلَیۡهِ عَذَابࣱ مُّقِیمٌ ﴿39﴾
३९. तुम्हाला लवकरच माहीत पडेल की कोणावर शिक्षा-यातना येणार आहे जी त्याला अपमानित करील आणि त्याच्यावर निरंतर अज़ाब उतरेल.
حَتَّىٰۤ إِذَا جَاۤءَ أَمۡرُنَا وَفَارَ ٱلتَّنُّورُ قُلۡنَا ٱحۡمِلۡ فِیهَا مِن كُلࣲّ زَوۡجَیۡنِ ٱثۡنَیۡنِ وَأَهۡلَكَ إِلَّا مَن سَبَقَ عَلَیۡهِ ٱلۡقَوۡلُ وَمَنۡ ءَامَنَۚ وَمَاۤ ءَامَنَ مَعَهُۥۤ إِلَّا قَلِیلࣱ ﴿40﴾
४०. येथेपर्यंत की जेव्हा आमचा आदेश येऊन पोहोचला आणि तंदूरमधून पाणी उचंबळू लागले, आम्ही सांगितले की या नौकेत प्रत्येक प्रकारच्या (नर व मादा अशा) जोड्या स्वार करून घ्या आणि आपल्या कुटुंबियांनाही, मात्र त्यांच्याखेरीज ज्यांच्याबद्दल आधीच फैसला झालेला आहे आणि सर्व ईमान राखणाऱ्यांनाही. थ्यांच्यासोबत ईमान राखणारे फारच कमी होते.
۞ وَقَالَ ٱرۡكَبُوا۟ فِیهَا بِسۡمِ ٱللَّهِ مَجۡرٜىٰهَا وَمُرۡسَىٰهَاۤۚ إِنَّ رَبِّی لَغَفُورࣱ رَّحِیمࣱ ﴿41﴾
४१. आणि नूह म्हणाले की या नौकेत स्वार व्हा अल्लाहच्याच नावाने हिचे चालणे आणि थांबणे आहे. निःसंशय, माझा पालनकर्ता मोठा माफ करणारा आणि दया करणारा आहे.
وَهِیَ تَجۡرِی بِهِمۡ فِی مَوۡجࣲ كَٱلۡجِبَالِ وَنَادَىٰ نُوحٌ ٱبۡنَهُۥ وَكَانَ فِی مَعۡزِلࣲ یَـٰبُنَیَّ ٱرۡكَب مَّعَنَا وَلَا تَكُن مَّعَ ٱلۡكَـٰفِرِینَ ﴿42﴾
४२. आणि तो नौका त्यांना पर्वतासमान लाटांमधून नेत होती आणि नूहने आपल्या पुत्राला, जो एका किनाऱ्यावर होता, हाक मारून म्हटले, हे माझ्या प्रिय पुत्रा! आमच्यासोबत स्वार हो आणि इन्कारी लोकांत सामील राहू नकोस.
قَالَ سَـَٔاوِیۤ إِلَىٰ جَبَلࣲ یَعۡصِمُنِی مِنَ ٱلۡمَاۤءِۚ قَالَ لَا عَاصِمَ ٱلۡیَوۡمَ مِنۡ أَمۡرِ ٱللَّهِ إِلَّا مَن رَّحِمَۚ وَحَالَ بَیۡنَهُمَا ٱلۡمَوۡجُ فَكَانَ مِنَ ٱلۡمُغۡرَقِینَ ﴿43﴾
४३. त्याने उत्तर दिले की मी एखाद्या उंच पर्वताच्या आश्रयाला जाईन, जो मला पाण्यापासून वाचवील. नूह म्हणाले, आज अल्लाहच्या हुकुमाने वाचविणारा कोणीही नाही. केवळ तेच वाचतील, ज्यांच्यावर अल्लाहची दया- कृपा होईल, त्याच क्षणी त्यांच्या दरम्यान एक लाट आली आणि तो बुडणाऱ्यांपैकी झाला.
وَقِیلَ یَـٰۤأَرۡضُ ٱبۡلَعِی مَاۤءَكِ وَیَـٰسَمَاۤءُ أَقۡلِعِی وَغِیضَ ٱلۡمَاۤءُ وَقُضِیَ ٱلۡأَمۡرُ وَٱسۡتَوَتۡ عَلَى ٱلۡجُودِیِّۖ وَقِیلَ بُعۡدࣰا لِّلۡقَوۡمِ ٱلظَّـٰلِمِینَ ﴿44﴾
४४. आणि फर्माविले गेले की, हे जमीन! आपले पाणी गिळून टाक, आणि हे आकाश! पुरे कर,थांब. त्याच वेळी पाणी सुकवले गेले आणि काम पूर्ण केले गेले आणि नौका जूदी नावाच्या पर्वताशी जाऊन थांबली आणि फर्माविले गेले अन्याय करणाऱ्यांवर धिक्काराचा वर्षाव होवो.
وَنَادَىٰ نُوحࣱ رَّبَّهُۥ فَقَالَ رَبِّ إِنَّ ٱبۡنِی مِنۡ أَهۡلِی وَإِنَّ وَعۡدَكَ ٱلۡحَقُّ وَأَنتَ أَحۡكَمُ ٱلۡحَـٰكِمِینَ ﴿45﴾
४५. आणि नूहने आपल्या पालनकर्त्यास पुकारले आणि म्हटले, हे माझ्या पालनकर्त्या! माझा पुत्र तर माझ्या कुटुंबियांपैकी आहे. निश्चितच तुझा वायदा पूर्णतः सच्चा आहे आणि तू समस्त शासकांपेक्षा उत्तम शासक आहे.
قَالَ یَـٰنُوحُ إِنَّهُۥ لَیۡسَ مِنۡ أَهۡلِكَۖ إِنَّهُۥ عَمَلٌ غَیۡرُ صَـٰلِحࣲۖ فَلَا تَسۡـَٔلۡنِ مَا لَیۡسَ لَكَ بِهِۦ عِلۡمٌۖ إِنِّیۤ أَعِظُكَ أَن تَكُونَ مِنَ ٱلۡجَـٰهِلِینَ ﴿46﴾
४६. (अल्लाहने) फर्माविले, हे नूह! खात्रीने तो तुझ्या कुटुंबियांपैकी नाही.१ त्याची कर्मे अगदी नापसंतीची आहेत. तू कधीही अशा गोष्टीची याचना करू नये, जिचे तुला किंचितही ज्ञान नसावे. मी तुला उपदेश करतो की तू अडाणी लोकांमध्ये आपली गणना करण्यापासून थांब.
قَالَ رَبِّ إِنِّیۤ أَعُوذُ بِكَ أَنۡ أَسۡـَٔلَكَ مَا لَیۡسَ لِی بِهِۦ عِلۡمࣱۖ وَإِلَّا تَغۡفِرۡ لِی وَتَرۡحَمۡنِیۤ أَكُن مِّنَ ٱلۡخَـٰسِرِینَ ﴿47﴾
४७. (नूह) म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! मी तुझेच शरण मागतो, या गोष्टीपासून की तुझ्याकडे अशा गोष्टीची याचना करावी, जिचे मला ज्ञानच नसावे जर तू मला माफ केले नाही आणि माझ्यावर दया केली नाही तर मी तोटा उचलणाऱ्यांपैकी होईन.
قِیلَ یَـٰنُوحُ ٱهۡبِطۡ بِسَلَـٰمࣲ مِّنَّا وَبَرَكَـٰتٍ عَلَیۡكَ وَعَلَىٰۤ أُمَمࣲ مِّمَّن مَّعَكَۚ وَأُمَمࣱ سَنُمَتِّعُهُمۡ ثُمَّ یَمَسُّهُم مِّنَّا عَذَابٌ أَلِیمࣱ ﴿48﴾
४८. फर्माविले गेले, हे नूह! आमच्यातर्फे सलामती आणि त्या समृद्धींसह उतर ज्या तुझ्यावर आहेत आणि तुझ्यासोबतच्या अनेक जनसमुदायांवर आणि अनेक समुदाय असे असतील, ज्यांना आम्ही लाभ तर निश्चित पोहोचवू, परंतु नंतर त्यांना आमच्यातर्फे दुःखदायक शिक्षाही पोहोचेल.
تِلۡكَ مِنۡ أَنۢبَاۤءِ ٱلۡغَیۡبِ نُوحِیهَاۤ إِلَیۡكَۖ مَا كُنتَ تَعۡلَمُهَاۤ أَنتَ وَلَا قَوۡمُكَ مِن قَبۡلِ هَـٰذَاۖ فَٱصۡبِرۡۖ إِنَّ ٱلۡعَـٰقِبَةَ لِلۡمُتَّقِینَ ﴿49﴾
४९. ही खबर परोक्षाच्या खबरींपैकी आहे, ज्यांची वहयी (अवतरण) आम्ही तुमच्याकडे करतो. यांना यापूर्वी ना तुम्ही जाणत होते, आणि ना तुमचा जनसमूह. यास्तव तुम्ही धीर- संयम राखा. निःसंशय, परिणाम अल्लाहचे भय राखून वागणाऱ्यांकरिताच आहे.
وَإِلَىٰ عَادٍ أَخَاهُمۡ هُودࣰاۚ قَالَ یَـٰقَوۡمِ ٱعۡبُدُوا۟ ٱللَّهَ مَا لَكُم مِّنۡ إِلَـٰهٍ غَیۡرُهُۥۤۖ إِنۡ أَنتُمۡ إِلَّا مُفۡتَرُونَ ﴿50﴾
५०. आणि आद जनसमूहाकडे त्यांचे भाऊ हूद यांना पाठविले. हूद म्हणाले, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! अल्लाहची उपासना करा, त्याच्याखेरीज कोणीही उपास्य नाही, तुम्ही तर केवळ असत्य रचत आहात.
یَـٰقَوۡمِ لَاۤ أَسۡـَٔلُكُمۡ عَلَیۡهِ أَجۡرًاۖ إِنۡ أَجۡرِیَ إِلَّا عَلَى ٱلَّذِی فَطَرَنِیۤۚ أَفَلَا تَعۡقِلُونَ ﴿51﴾
५१. हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! मी तुमच्याकडून याचा काही मोबदला मागत नाही. माझा मोबदला तर त्याच्याकडे आहे, ज्याने मला निर्माण केले आहे. तर काय तरीही तुम्ही अकलेचा वापर करीत नाही?
وَیَـٰقَوۡمِ ٱسۡتَغۡفِرُوا۟ رَبَّكُمۡ ثُمَّ تُوبُوۤا۟ إِلَیۡهِ یُرۡسِلِ ٱلسَّمَاۤءَ عَلَیۡكُم مِّدۡرَارࣰا وَیَزِدۡكُمۡ قُوَّةً إِلَىٰ قُوَّتِكُمۡ وَلَا تَتَوَلَّوۡا۟ مُجۡرِمِینَ ﴿52﴾
५२. आणि हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! तुम्ही आपल्या पालनकर्त्याजवळ आपल्या अपराधांची माफी मागा आणि त्याच्या दरबारात तौबा (क्षमा-याचना) करा. यासाठी की त्याने पाऊस पाडणारे ढग तुमच्यावर पाठवावेत. आणि तुमच्या शक्ती-सामर्थ्यात आणखी वाढ करावी आणि तुम्ही गुन्हेगार बनून तोंड फिरवू नका.
قَالُوا۟ یَـٰهُودُ مَا جِئۡتَنَا بِبَیِّنَةࣲ وَمَا نَحۡنُ بِتَارِكِیۤ ءَالِهَتِنَا عَن قَوۡلِكَ وَمَا نَحۡنُ لَكَ بِمُؤۡمِنِینَ ﴿53﴾
५३. जनसमूहाचे लोक म्हणाले, हे हूद! तू आमच्याजवळ एखादे प्रमाण तर आणले नाही, आणि आम्ही केवळ तुझ्या सांगण्यावरून आपल्या दैवतांना सोडणार नाहीत आणि ना आम्ही तुझ्यावर ईमान राखणार आहोत.
إِن نَّقُولُ إِلَّا ٱعۡتَرَىٰكَ بَعۡضُ ءَالِهَتِنَا بِسُوۤءࣲۗ قَالَ إِنِّیۤ أُشۡهِدُ ٱللَّهَ وَٱشۡهَدُوۤا۟ أَنِّی بَرِیۤءࣱ مِّمَّا تُشۡرِكُونَ ﴿54﴾
५४. किंबहुना आम्ही तर म्हणतो की तुला आमच्या एखाद्या दैवताने झपाटून टाकले आहे. हूद म्हणाले, मी अल्लाहला साक्षी बनवितो आणि तुम्हीदेखील साक्षी राहा की मी तर अल्लाहखेरीज त्या सर्वांपासून वेगळा आहे, ज्यांना तुम्ही (अल्लाहचा) सहभागी बनवित आहात.
مِن دُونِهِۦۖ فَكِیدُونِی جَمِیعࣰا ثُمَّ لَا تُنظِرُونِ ﴿55﴾
५५. ठीक, तुम्ही सर्व मिळून माझ्याविरूद्ध वाईट कारवाई करून टाका, आणि मला कधीही सवड देऊ नका.
إِنِّی تَوَكَّلۡتُ عَلَى ٱللَّهِ رَبِّی وَرَبِّكُمۚ مَّا مِن دَاۤبَّةٍ إِلَّا هُوَ ءَاخِذُۢ بِنَاصِیَتِهَاۤۚ إِنَّ رَبِّی عَلَىٰ صِرَ ٰطࣲ مُّسۡتَقِیمࣲ ﴿56﴾
५६. माझा भरोसा केवळ अल्लाहवरच आहे, जो माझा पालनकर्ता आणि तुम्हा सर्वांचा पालनकर्ता आहे. जेवढेदेखील चालणारे फिरणारे आहेत, त्या सर्वांचे मस्तिष्क (कपाळ) त्यानेच धरून ठेवले आहे. निःसंशय माझा पालनकर्ता अगदी सरळ मार्गावर आहे.
فَإِن تَوَلَّوۡا۟ فَقَدۡ أَبۡلَغۡتُكُم مَّاۤ أُرۡسِلۡتُ بِهِۦۤ إِلَیۡكُمۡۚ وَیَسۡتَخۡلِفُ رَبِّی قَوۡمًا غَیۡرَكُمۡ وَلَا تَضُرُّونَهُۥ شَیۡـًٔاۚ إِنَّ رَبِّی عَلَىٰ كُلِّ شَیۡءٍ حَفِیظࣱ ﴿57﴾
५७. तरीही तुम्ही तोंड फिरवित असाल तर फिरवा. मी तर तुम्हाला तो संदेश पोहचता केला, जो देऊन मला तुमच्याकडे पाठविले गेले होते. माझा पालनकर्ता तुमच्या जागी दुसऱ्या लोकांना आणील आणि तुम्ही त्याचे काहीच बिघडवू शकणार नाहीत. निःसंशय माझा पालनकर्ता प्रत्येक चीज वस्तूचा संरक्षक आहे.
وَلَمَّا جَاۤءَ أَمۡرُنَا نَجَّیۡنَا هُودࣰا وَٱلَّذِینَ ءَامَنُوا۟ مَعَهُۥ بِرَحۡمَةࣲ مِّنَّا وَنَجَّیۡنَـٰهُم مِّنۡ عَذَابٍ غَلِیظࣲ ﴿58﴾
५८. आणि जेव्हा आमचा आदेश येऊन पोहोचला, तेव्हा आम्ही हूदला आणि त्याच्या ईमानधारक साथीदारांना आपल्या खास दया-कृपेने सुटका प्रदान केली आणि आम्ही त्या सर्वांना भयंकर (सक्त) शिक्षा-यातनेपासून वाचविले.१
وَتِلۡكَ عَادࣱۖ جَحَدُوا۟ بِـَٔایَـٰتِ رَبِّهِمۡ وَعَصَوۡا۟ رُسُلَهُۥ وَٱتَّبَعُوۤا۟ أَمۡرَ كُلِّ جَبَّارٍ عَنِیدࣲ ﴿59﴾
५९. हा होता आदचा जनसमूह, ज्यांनी आपल्या पालनकर्त्याच्या आयतींचा इन्कार केला आणि त्याच्या पैगंबरांची अवज्ञा केली आणि प्रत्येक विद्रोही अवज्ञाकारीच्या आदेशांचे पालन केले.
وَأُتۡبِعُوا۟ فِی هَـٰذِهِ ٱلدُّنۡیَا لَعۡنَةࣰ وَیَوۡمَ ٱلۡقِیَـٰمَةِۗ أَلَاۤ إِنَّ عَادࣰا كَفَرُوا۟ رَبَّهُمۡۗ أَلَا بُعۡدࣰا لِّعَادࣲ قَوۡمِ هُودࣲ ﴿60﴾
६०. आणि या जगातही त्यांचा धिःक्कार व निर्भत्सना होत राहिली आणि कयामतच्या दिवशीही १ पाहा, आदच्या जनसमूहाने आपल्या पालनकर्त्याशी इन्कार केला. हूदचा जनसमूह आदचा धिःक्कार असो.
۞ وَإِلَىٰ ثَمُودَ أَخَاهُمۡ صَـٰلِحࣰاۚ قَالَ یَـٰقَوۡمِ ٱعۡبُدُوا۟ ٱللَّهَ مَا لَكُم مِّنۡ إِلَـٰهٍ غَیۡرُهُۥۖ هُوَ أَنشَأَكُم مِّنَ ٱلۡأَرۡضِ وَٱسۡتَعۡمَرَكُمۡ فِیهَا فَٱسۡتَغۡفِرُوهُ ثُمَّ تُوبُوۤا۟ إِلَیۡهِۚ إِنَّ رَبِّی قَرِیبࣱ مُّجِیبࣱ ﴿61﴾
६१. आणि समूदच्या जनसमूहाकडे त्यांचे भाऊ सॉलेह यांना पाठविले. सॉलेह म्हणाले, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! तुम्ही अल्लाहचीच भक्ती उपासना करा, त्याच्याखेरीज तुमचा कोणीही उपास्य नाही. त्यानेच तुम्हाला जमिनीपासून निर्माण केले आहे, आणि त्याने या धरतीवर तुम्हाला आबाद केले आहे. यास्तव तुम्ही त्याच्याजवळ माफी मागा आणि त्याच्याचकडे तौबा (क्षमा-याचना) करा. निःसंशय माझा पालनकर्ता तौबा कबूल करणारा समीप आहे.
قَالُوا۟ یَـٰصَـٰلِحُ قَدۡ كُنتَ فِینَا مَرۡجُوࣰّا قَبۡلَ هَـٰذَاۤۖ أَتَنۡهَىٰنَاۤ أَن نَّعۡبُدَ مَا یَعۡبُدُ ءَابَاۤؤُنَا وَإِنَّنَا لَفِی شَكࣲّ مِّمَّا تَدۡعُونَاۤ إِلَیۡهِ مُرِیبࣲ ﴿62﴾
६२. जनसमूहाचे लोक म्हणाले, हे सॉलेह! याच्या पूर्वी आम्ही तुमच्याकडून अनेक आशा अपेक्षा बाळगून होतो. काय तुम्ही आम्हाला त्यांच्या भक्तीपासून रोखता, ज्यांची भक्ती आराधना आमचे वाडवडील करत आले, आम्हाला तर या धर्माबाबत शंका आहे, ज्याकडे तुम्ही आम्हाला बोलावित आहात.
قَالَ یَـٰقَوۡمِ أَرَءَیۡتُمۡ إِن كُنتُ عَلَىٰ بَیِّنَةࣲ مِّن رَّبِّی وَءَاتَىٰنِی مِنۡهُ رَحۡمَةࣰ فَمَن یَنصُرُنِی مِنَ ٱللَّهِ إِنۡ عَصَیۡتُهُۥۖ فَمَا تَزِیدُونَنِی غَیۡرَ تَخۡسِیرࣲ ﴿63﴾
६३. सालेह म्हणाले, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! बरे हे सांगा, जर मी आपल्या पालनकर्त्यातर्फे एखाद्या खास प्रमाणावर असेल आणि त्याने मला आपल्या जवळून दया-कृपा प्रदान केली असेल, मग मी जर त्याची अवज्ञा केली तर असा कोण आहे, जो त्याच्यासमोर माझी मदत करेल? तुम्ही तर माझ्या नुकसानातच भर टाकत आहात.
وَیَـٰقَوۡمِ هَـٰذِهِۦ نَاقَةُ ٱللَّهِ لَكُمۡ ءَایَةࣰۖ فَذَرُوهَا تَأۡكُلۡ فِیۤ أَرۡضِ ٱللَّهِۖ وَلَا تَمَسُّوهَا بِسُوۤءࣲ فَیَأۡخُذَكُمۡ عَذَابࣱ قَرِیبࣱ ﴿64﴾
६४. आणि हे माझ्या जातीबांधवांनो! ही अल्लाहने पाठविलेली सांडणी आहे, जी तुमच्याकरिता अल्लाहचा एक चमत्कार आहे. आता तुम्ही तिला अल्लाहच्या धरतीवर चरण्यासाठी मोकळे सोडा आणि तिला कशाही प्रकारचा त्रास पोहचवू नका, अन्यथा लवकरच तुम्हाला अज़ाब येऊन धरेल.
فَعَقَرُوهَا فَقَالَ تَمَتَّعُوا۟ فِی دَارِكُمۡ ثَلَـٰثَةَ أَیَّامࣲۖ ذَ ٰلِكَ وَعۡدٌ غَیۡرُ مَكۡذُوبࣲ ﴿65﴾
६५. तरीही त्या लोकांनी त्या सांडणीचे पाय कापून (मारून टाकले). यावर सॉलेह म्हणाले, ठीक तर तुम्ही आपल्या घरांमध्ये तीन दिवस पर्यंत वास्तव्य करून घ्या, हा वायदा खोटा नाही.
فَلَمَّا جَاۤءَ أَمۡرُنَا نَجَّیۡنَا صَـٰلِحࣰا وَٱلَّذِینَ ءَامَنُوا۟ مَعَهُۥ بِرَحۡمَةࣲ مِّنَّا وَمِنۡ خِزۡیِ یَوۡمِىِٕذٍۚ إِنَّ رَبَّكَ هُوَ ٱلۡقَوِیُّ ٱلۡعَزِیزُ ﴿66﴾
६६. मग जेव्हा आमचा आदेश येऊन पोहोचला, आम्ही सॉलेह आणि त्यांच्यावर ईमान राखणाऱ्यांना आपल्या दया-कृपेने त्या (शिक्षे) पासूनही वाचविले आणि त्या दिवसाच्या अपमानापासूनही. निःसंशय तुमचा पालनकर्ता शक्तिशाली आणि जबरदस्त आहे.
وَأَخَذَ ٱلَّذِینَ ظَلَمُوا۟ ٱلصَّیۡحَةُ فَأَصۡبَحُوا۟ فِی دِیَـٰرِهِمۡ جَـٰثِمِینَ ﴿67﴾
६७. आणि अत्याचारी लोकांना मोठा भयंकर आवाजाने येऊन धरले, मग ते आपल्या घरांमध्ये तोंडघशी मरून पडलेले राहिले.
كَأَن لَّمۡ یَغۡنَوۡا۟ فِیهَاۤۗ أَلَاۤ إِنَّ ثَمُودَا۟ كَفَرُوا۟ رَبَّهُمۡۗ أَلَا بُعۡدࣰا لِّثَمُودَ ﴿68﴾
६८. अशा प्रकारे जणू ते त्या ठिकाणी कधी राहिलेच नव्हते. सावधान! समूदच्या जनसमूहाने आपल्या पालनकर्त्याचा इन्कार केला. ऐका! त्या समूदच्या लोकांवर धिःक्कार आहे.
وَلَقَدۡ جَاۤءَتۡ رُسُلُنَاۤ إِبۡرَ ٰهِیمَ بِٱلۡبُشۡرَىٰ قَالُوا۟ سَلَـٰمࣰاۖ قَالَ سَلَـٰمࣱۖ فَمَا لَبِثَ أَن جَاۤءَ بِعِجۡلٍ حَنِیذࣲ ﴿69﴾
६९. आणि आम्ही पाठिवलेले दूत इब्राहीमजवळ शुभ समाचार घेऊन पोहोचले आणि सलाम म्हणाले. त्यांनीदेखील सलामचे प्रत्युत्तर दिले आणि विनाविलंब भाजलेले वासरु घेऊन आले.
فَلَمَّا رَءَاۤ أَیۡدِیَهُمۡ لَا تَصِلُ إِلَیۡهِ نَكِرَهُمۡ وَأَوۡجَسَ مِنۡهُمۡ خِیفَةࣰۚ قَالُوا۟ لَا تَخَفۡ إِنَّاۤ أُرۡسِلۡنَاۤ إِلَىٰ قَوۡمِ لُوطࣲ ﴿70﴾
७०. आणि जेव्हा पाहिले की त्यांचे हातदेखील त्या (खाद्या) कडे पोहचत नाही, तर त्यांना अनोळखी जाणून मनातल्या मनात भयभीत होऊ लागले. दूत म्हणाले, भिऊ नका. आम्हाला तर लूतच्या जनसमूहाकडे पाठविले गेले आहे.
وَٱمۡرَأَتُهُۥ قَاۤىِٕمَةࣱ فَضَحِكَتۡ فَبَشَّرۡنَـٰهَا بِإِسۡحَـٰقَ وَمِن وَرَاۤءِ إِسۡحَـٰقَ یَعۡقُوبَ ﴿71﴾
७१. आणि त्यांची पत्नी, जी उभी होती, ती हसली, तेव्हा आम्ही तिला इसहाकचा आणि त्याच्यानंतर याकूबचा शुभ समाचार दिला.
قَالَتۡ یَـٰوَیۡلَتَىٰۤ ءَأَلِدُ وَأَنَا۠ عَجُوزࣱ وَهَـٰذَا بَعۡلِی شَیۡخًاۖ إِنَّ هَـٰذَا لَشَیۡءٌ عَجِیبࣱ ﴿72﴾
७२. ती म्हणू लागली, हाय रे दुर्दैव! मला मूलबाळ होऊ शकते? मी तर स्वतः म्हातारी आणि माझे पतीही खूप वयस्कर आहेत. निश्चितच ही मोठ्या आश्चर्याची गोष्ट होय.
قَالُوۤا۟ أَتَعۡجَبِینَ مِنۡ أَمۡرِ ٱللَّهِۖ رَحۡمَتُ ٱللَّهِ وَبَرَكَـٰتُهُۥ عَلَیۡكُمۡ أَهۡلَ ٱلۡبَیۡتِۚ إِنَّهُۥ حَمِیدࣱ مَّجِیدࣱ ﴿73﴾
७३. (फरिश्ते) म्हणाले, काय तुम्हाला अल्लाहच्या सामर्थ्याविषयी आश्चर्य वाटत आहे. या घराच्या लोकांनो! तुमच्यावर अल्लाहची दया-कृपा आणि त्याच्या बरकती (समृद्धी) अवतरीत होवो! निःसंशय समस्त स्तुती- प्रशंसा आणि शान- वैभव अल्लाहकरिताच आहे.
فَلَمَّا ذَهَبَ عَنۡ إِبۡرَ ٰهِیمَ ٱلرَّوۡعُ وَجَاۤءَتۡهُ ٱلۡبُشۡرَىٰ یُجَـٰدِلُنَا فِی قَوۡمِ لُوطٍ ﴿74﴾
७४. जेव्हा इब्राहीम यांची भीती नाहीशी झाली आणि त्यांना शुभ समाचारही कळला तेव्हा लूतच्या जनसमूहाबाबत आमच्याशी वादविवाद करू लागले.
إِنَّ إِبۡرَ ٰهِیمَ لَحَلِیمٌ أَوَّ ٰهࣱ مُّنِیبࣱ ﴿75﴾
७५. निःसंशय, इब्राहीम मोठे संयमशील आणि कोमल मनाचे आणि अल्लाहकडे झुकणारे होते.
یَـٰۤإِبۡرَ ٰهِیمُ أَعۡرِضۡ عَنۡ هَـٰذَاۤۖ إِنَّهُۥ قَدۡ جَاۤءَ أَمۡرُ رَبِّكَۖ وَإِنَّهُمۡ ءَاتِیهِمۡ عَذَابٌ غَیۡرُ مَرۡدُودࣲ ﴿76﴾
७६. हे इब्राहीम! हा इरादा सोडून द्या. तुमच्या पालनकर्त्याचा आदेश येऊन पोहोचला आहे, आणि त्यांच्यावर न परतविल्या जाणाऱ्या शिक्षा- यातना अवश्य येणार आहेत.
وَلَمَّا جَاۤءَتۡ رُسُلُنَا لُوطࣰا سِیۤءَ بِهِمۡ وَضَاقَ بِهِمۡ ذَرۡعࣰا وَقَالَ هَـٰذَا یَوۡمٌ عَصِیبࣱ ﴿77﴾
७७. आणि जेव्हा आम्ही पाठविलेले फरिश्ते लूतजवळ पोहोचले, तेव्हा त्यांच्या कारणाने ते फार दुःखी झाले आणि मनातल्या मनात दुःख करू लागले आणि म्हणू लागले, आजचा दिवस फार दुःखाचा दिवस आहे.
وَجَاۤءَهُۥ قَوۡمُهُۥ یُهۡرَعُونَ إِلَیۡهِ وَمِن قَبۡلُ كَانُوا۟ یَعۡمَلُونَ ٱلسَّیِّـَٔاتِۚ قَالَ یَـٰقَوۡمِ هَـٰۤؤُلَاۤءِ بَنَاتِی هُنَّ أَطۡهَرُ لَكُمۡۖ فَٱتَّقُوا۟ ٱللَّهَ وَلَا تُخۡزُونِ فِی ضَیۡفِیۤۖ أَلَیۡسَ مِنكُمۡ رَجُلࣱ رَّشِیدࣱ ﴿78﴾
७८. आणि त्याच्या जनसमूहाचे लोक त्यांच्याकडे धावत आले. ते तर आधीपासूनच वाईट कामात मग्न होते. (लूत) म्हणाले की, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! माझ्या या मुली आहेत, ज्या तुमच्यासाठी फार साफसुथऱ्या आहेत. अल्लाहचे भय राखा आणि मला माझ्या पाहुण्यांबाबत अपमानित करू नका. काय तुमच्यात एकही भला माणूस नाही?
قَالُوا۟ لَقَدۡ عَلِمۡتَ مَا لَنَا فِی بَنَاتِكَ مِنۡ حَقࣲّ وَإِنَّكَ لَتَعۡلَمُ مَا نُرِیدُ ﴿79﴾
७९. जनसमूहाच्या लोकांनी उत्तर दिले की तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे की आम्हाला तुमच्या मुलीवर कसलाही अधिकार नाही आणि तुम्ही आमची खरी इच्छा चांगल्या प्रकारे जाणून आहात.
قَالَ لَوۡ أَنَّ لِی بِكُمۡ قُوَّةً أَوۡ ءَاوِیۤ إِلَىٰ رُكۡنࣲ شَدِیدࣲ ﴿80﴾
८०. (लूत) म्हणाले, मला तुमच्याशी लढण्याची शक्ती असती तर फार बरे झाले असते किंवा मी एखाद्या मजबूत आश्रयाला असतो.
قَالُوا۟ یَـٰلُوطُ إِنَّا رُسُلُ رَبِّكَ لَن یَصِلُوۤا۟ إِلَیۡكَۖ فَأَسۡرِ بِأَهۡلِكَ بِقِطۡعࣲ مِّنَ ٱلَّیۡلِ وَلَا یَلۡتَفِتۡ مِنكُمۡ أَحَدٌ إِلَّا ٱمۡرَأَتَكَۖ إِنَّهُۥ مُصِیبُهَا مَاۤ أَصَابَهُمۡۚ إِنَّ مَوۡعِدَهُمُ ٱلصُّبۡحُۚ أَلَیۡسَ ٱلصُّبۡحُ بِقَرِیبࣲ ﴿81﴾
८१. आता (फरिश्ते) म्हणाले, हे लूत! आम्ही तुमच्या पालनकर्त्याचे पाठविलेले आहोत. अशक्य आहे की हे तुमच्यापर्यंत पोहचावेत. तेव्हा तुम्ही आपल्या कुटुंबियांना घेऊन थोडी रात्र बाकी राहताना निघून जा. तुमच्यापैकी कोणीही मागे वळून पाहू नये. मात्र तुमच्या पत्नीखेरीज, कारण तिलाही तेच पोहचणार आहे, जे सर्वांना पोहोचेल. निश्चितच त्यांच्या वायद्याची वेळ सकाळची आहे, तर काय सकाळ अगदी जवळ नाही?
فَلَمَّا جَاۤءَ أَمۡرُنَا جَعَلۡنَا عَـٰلِیَهَا سَافِلَهَا وَأَمۡطَرۡنَا عَلَیۡهَا حِجَارَةࣰ مِّن سِجِّیلࣲ مَّنضُودࣲ ﴿82﴾
८२. मग जेव्हा आमचा आदेश येऊन पोहोचला, आम्ही त्या वस्तीला उलथे पालथे करून टाकले. वरचा हिस्सा खाली केला आणि त्यांच्यावर खंगर दगडांचा वर्षाव केला जे थरावर थर होते.
مُّسَوَّمَةً عِندَ رَبِّكَۖ وَمَا هِیَ مِنَ ٱلظَّـٰلِمِینَ بِبَعِیدࣲ ﴿83﴾
८३. तुमच्या पालनकर्त्यातर्फे चिन्हांकित (निशाण असलेले) होते आणि ते त्या अत्याचारीपासून किंचितचही दूर नव्हते.
۞ وَإِلَىٰ مَدۡیَنَ أَخَاهُمۡ شُعَیۡبࣰاۚ قَالَ یَـٰقَوۡمِ ٱعۡبُدُوا۟ ٱللَّهَ مَا لَكُم مِّنۡ إِلَـٰهٍ غَیۡرُهُۥۖ وَلَا تَنقُصُوا۟ ٱلۡمِكۡیَالَ وَٱلۡمِیزَانَۖ إِنِّیۤ أَرَىٰكُم بِخَیۡرࣲ وَإِنِّیۤ أَخَافُ عَلَیۡكُمۡ عَذَابَ یَوۡمࣲ مُّحِیطࣲ ﴿84﴾
८४. आणि (आम्ही) मदयनच्या लोकांकडे त्यांचे भाऊ शुऐबला पाठविले. शुऐब म्हणाले, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! अल्लाहची उपासना करा, त्याच्याखेरीज तुमचा कोणीही उपास्य नाही. तुम्ही माप-तोल करण्यात कमी करू नका. मी तुम्हाला सुसंपन्न अवस्थेत पाहात आहे आणि मला तुमच्याबद्दल घेरून टाकणाऱ्या दिवसाच्या अज़ाब (शिक्षा-यातने) चे भयदेखील आहे.
وَیَـٰقَوۡمِ أَوۡفُوا۟ ٱلۡمِكۡیَالَ وَٱلۡمِیزَانَ بِٱلۡقِسۡطِۖ وَلَا تَبۡخَسُوا۟ ٱلنَّاسَ أَشۡیَاۤءَهُمۡ وَلَا تَعۡثَوۡا۟ فِی ٱلۡأَرۡضِ مُفۡسِدِینَ ﴿85﴾
८५. हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! माप-तोल न्यायपूर्वक करा, लोकांना त्यांच्या वस्तू कमी (करून) देऊ नका आणि धरतीत उत्पात आणि बिघाड माजवू नका.
بَقِیَّتُ ٱللَّهِ خَیۡرࣱ لَّكُمۡ إِن كُنتُم مُّؤۡمِنِینَۚ وَمَاۤ أَنَا۠ عَلَیۡكُم بِحَفِیظࣲ ﴿86﴾
८६. अल्लाहचा हलाल (वैध) केलेला बाकी फायदा तुमच्यासाठी फारच चांगला आहे, जर तुम्ही ईमान राखणारे असाल. मी काही तुमच्यावर देखरेख ठेवणारा नाही.
قَالُوا۟ یَـٰشُعَیۡبُ أَصَلَوٰتُكَ تَأۡمُرُكَ أَن نَّتۡرُكَ مَا یَعۡبُدُ ءَابَاۤؤُنَاۤ أَوۡ أَن نَّفۡعَلَ فِیۤ أَمۡوَ ٰلِنَا مَا نَشَـٰۤؤُا۟ۖ إِنَّكَ لَأَنتَ ٱلۡحَلِیمُ ٱلرَّشِیدُ ﴿87﴾
८७. जनसमूहाच्या लोकांनी उत्तर दिले, हे शुऐब! काय तुमची उपासना तुम्हाला हाच आदेश देते की आम्ही आपल्या वाडवडिलांच्या आराध्य दैवतांना सोडून द्यावे आणि आम्ही आपल्या धन-संपत्तीत जे काही करू इच्छितो, ते करणेही सोडून द्यावे. तुम्ही तर मोठे समंजस आणि सदाचारी आहात.
قَالَ یَـٰقَوۡمِ أَرَءَیۡتُمۡ إِن كُنتُ عَلَىٰ بَیِّنَةࣲ مِّن رَّبِّی وَرَزَقَنِی مِنۡهُ رِزۡقًا حَسَنࣰاۚ وَمَاۤ أُرِیدُ أَنۡ أُخَالِفَكُمۡ إِلَىٰ مَاۤ أَنۡهَىٰكُمۡ عَنۡهُۚ إِنۡ أُرِیدُ إِلَّا ٱلۡإِصۡلَـٰحَ مَا ٱسۡتَطَعۡتُۚ وَمَا تَوۡفِیقِیۤ إِلَّا بِٱللَّهِۚ عَلَیۡهِ تَوَكَّلۡتُ وَإِلَیۡهِ أُنِیبُ ﴿88﴾
८८. शुऐब म्हणाले, हे माझ्या जातीबांधवांनो! पाहा, जर मी आपल्या पालनकर्त्यातर्फे स्पष्ट प्रमाणासह आहे आणि त्याने आपल्याकडून चांगली रोजी (अन्नसामुग्री) देऊन ठेवली आहे. माझी कधीही ही इच्छा नाही की तुम्हाला मनाई करून स्वतः त्या गोष्टीकडे झुकावे जिच्यापासून तुम्हाला रोखत आहे. माझा इरादा तर आपल्या कुवतीनुसार सुधारणा करण्याचाच आहे, आणि माझी सुबुद्धी (तौफीक) अल्लाहच्याच मदतीने आहे. त्याच्यावरच माझा भरोसा आहे, आणि त्याच्याकडेच मला परतून जायचे आहे.
وَیَـٰقَوۡمِ لَا یَجۡرِمَنَّكُمۡ شِقَاقِیۤ أَن یُصِیبَكُم مِّثۡلُ مَاۤ أَصَابَ قَوۡمَ نُوحٍ أَوۡ قَوۡمَ هُودٍ أَوۡ قَوۡمَ صَـٰلِحࣲۚ وَمَا قَوۡمُ لُوطࣲ مِّنكُم بِبَعِیدࣲ ﴿89﴾
८९. आणि हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! कदाचित असे न व्हावे की तुम्ही माझ्या विरोधात येऊन त्या शिक्षा-यातनांना पात्र ठरावे ज्या नूहच्या जनसमूहावर आणि हूदच्या जनसमूहावर आणि सालेहच्या जनसमूहावर आल्या आणि लूतचा जनसमूह तर तुमच्यापासून किंचितही दूर नाही!
وَٱسۡتَغۡفِرُوا۟ رَبَّكُمۡ ثُمَّ تُوبُوۤا۟ إِلَیۡهِۚ إِنَّ رَبِّی رَحِیمࣱ وَدُودࣱ ﴿90﴾
९०. आणि तुम्ही आपल्या पालनकर्त्याजवळ माफी मागा आणि त्याच्याचकडे झुका. निश्चितच माझा पालनकर्ता अतिशय दयावान आणि खूप प्रेम करणारा आहे.
قَالُوا۟ یَـٰشُعَیۡبُ مَا نَفۡقَهُ كَثِیرࣰا مِّمَّا تَقُولُ وَإِنَّا لَنَرَىٰكَ فِینَا ضَعِیفࣰاۖ وَلَوۡلَا رَهۡطُكَ لَرَجَمۡنَـٰكَۖ وَمَاۤ أَنتَ عَلَیۡنَا بِعَزِیزࣲ ﴿91﴾
९१. ते (लोक) म्हणाले, हे शुऐब! तुमच्या बहुतेक गोष्टी आम्हाला समजत नाही आणि आम्ही तुम्हाला आपल्या दरम्यान खूप कमकुवत असल्याचे पाहतो. जर तुमच्या कबिल्याविषयी आदर नसता तर आम्ही तुमच्यावर दगडफेक केली असती आणि आम्ही तुम्हाला एखादा प्रतिष्ठित मनुष्य समजत नाही.
قَالَ یَـٰقَوۡمِ أَرَهۡطِیۤ أَعَزُّ عَلَیۡكُم مِّنَ ٱللَّهِ وَٱتَّخَذۡتُمُوهُ وَرَاۤءَكُمۡ ظِهۡرِیًّاۖ إِنَّ رَبِّی بِمَا تَعۡمَلُونَ مُحِیطࣱ ﴿92﴾
९२. शुऐब म्हणाले, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! काय तुमच्या दृष्टीने माझ्या कबिल्याचे लोक अल्लाहपेक्षा जास्त सन्मानित आहेत की (ज्यामुळे) तुम्ही त्याला पाठीमागे टाकले आहे. निःसंशय, तुम्ही जे काही करीत आहात, माझ्या पालनकर्त्याने ते सर्व घेरलेले आहे.
وَیَـٰقَوۡمِ ٱعۡمَلُوا۟ عَلَىٰ مَكَانَتِكُمۡ إِنِّی عَـٰمِلࣱۖ سَوۡفَ تَعۡلَمُونَ مَن یَأۡتِیهِ عَذَابࣱ یُخۡزِیهِ وَمَنۡ هُوَ كَـٰذِبࣱۖ وَٱرۡتَقِبُوۤا۟ إِنِّی مَعَكُمۡ رَقِیبࣱ ﴿93﴾
९३. आणि हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! आता तुम्ही आपल्या ठिकाणी काम करीत राहा, मीदेखील काम करीत आहे. लवकरच तुम्हाला माहीत पडेल की कोणाकडे तो अज़ाब येतो, जो त्याला अपमानित करून टाकील आणि असा कोण आहे जो खोटा आहे? तुम्ही प्रतिक्षा करा आणि मीदेखील तुमच्यासोबत प्रतिक्षा करीत आहे.
وَلَمَّا جَاۤءَ أَمۡرُنَا نَجَّیۡنَا شُعَیۡبࣰا وَٱلَّذِینَ ءَامَنُوا۟ مَعَهُۥ بِرَحۡمَةࣲ مِّنَّا وَأَخَذَتِ ٱلَّذِینَ ظَلَمُوا۟ ٱلصَّیۡحَةُ فَأَصۡبَحُوا۟ فِی دِیَـٰرِهِمۡ جَـٰثِمِینَ ﴿94﴾
९४. आणि जेव्हा आमचा आदेश (अज़ाब) येऊन पोहोचला, आम्ही शुऐबला आणि त्यांच्यासह समस्त ईमानधारकांना आपल्या खास कृपेने मुक्ती प्रदान केली आणि अत्याचारी लोकांना मोठ्या भयंकर आवाजाच्या अज़ाबाने येऊन धरले१ ज्यामुळे ते आपल्या घरांमध्ये पालथे पडून राहिले.
كَأَن لَّمۡ یَغۡنَوۡا۟ فِیهَاۤۗ أَلَا بُعۡدࣰا لِّمَدۡیَنَ كَمَا بَعِدَتۡ ثَمُودُ ﴿95﴾
९५. जणू काही ते त्या घरांमध्ये कधी राहिलेच नव्हते. सावध राहा! मदयनकरिताही तसाच दुरावा असो, जसा दुरावा समूदसाठी झाला.
وَلَقَدۡ أَرۡسَلۡنَا مُوسَىٰ بِـَٔایَـٰتِنَا وَسُلۡطَـٰنࣲ مُّبِینٍ ﴿96﴾
९६. आणि निःसंशय, आम्हीच मूसाला आपल्या आयती आणि स्पष्ट प्रमाणांसह पाठविले होते.
إِلَىٰ فِرۡعَوۡنَ وَمَلَإِی۟هِۦ فَٱتَّبَعُوۤا۟ أَمۡرَ فِرۡعَوۡنَۖ وَمَاۤ أَمۡرُ فِرۡعَوۡنَ بِرَشِیدࣲ ﴿97﴾
९७. फिरऔन आणि त्याच्या सरदारांकडे, तरीही त्या लोकांनी फिरऔनच्या आदेशांचे पालन केले आणि फिरऔनचा कोणताही आदेश उचित आणि रास्त नव्हता.
یَقۡدُمُ قَوۡمَهُۥ یَوۡمَ ٱلۡقِیَـٰمَةِ فَأَوۡرَدَهُمُ ٱلنَّارَۖ وَبِئۡسَ ٱلۡوِرۡدُ ٱلۡمَوۡرُودُ ﴿98﴾
९८. तो तर कयामतच्या दिवशी आपल्या जनसमूहाचा पुढाकार घेऊन त्या सर्वांना नरकात आणून उभा करील. तो मोठा वाईट घाट आहे जिथे हे लोक जाऊन पोहचतील.
وَأُتۡبِعُوا۟ فِی هَـٰذِهِۦ لَعۡنَةࣰ وَیَوۡمَ ٱلۡقِیَـٰمَةِۚ بِئۡسَ ٱلرِّفۡدُ ٱلۡمَرۡفُودُ ﴿99﴾
९९. आणि त्यांच्यावर या जगातही धिःक्कार (चा मारा) झाला आणि कयामतच्या दिवशीही. किती वाईट इनाम (बक्षीस) आहे, जे त्यांना दिले गेले.
ذَ ٰلِكَ مِنۡ أَنۢبَاۤءِ ٱلۡقُرَىٰ نَقُصُّهُۥ عَلَیۡكَۖ مِنۡهَا قَاۤىِٕمࣱ وَحَصِیدࣱ ﴿100﴾
१००. वस्त्यांचा हा काही समाचार, जो आम्ही तुमच्यासमोर निवेदन करीत आहोत, त्यांच्यापैकी काही अस्तित्वात आहेत आणि काही कापणी केलेल्या पिकांसारख्या झाल्या.
وَمَا ظَلَمۡنَـٰهُمۡ وَلَـٰكِن ظَلَمُوۤا۟ أَنفُسَهُمۡۖ فَمَاۤ أَغۡنَتۡ عَنۡهُمۡ ءَالِهَتُهُمُ ٱلَّتِی یَدۡعُونَ مِن دُونِ ٱللَّهِ مِن شَیۡءࣲ لَّمَّا جَاۤءَ أَمۡرُ رَبِّكَۖ وَمَا زَادُوهُمۡ غَیۡرَ تَتۡبِیبࣲ ﴿101﴾
१०१. आणि आम्ही त्यांच्यावर कोणताही जुलूम-अत्याचार केला नाही, किंबहुना त्यांनी स्वतःच आपल्यावर अत्याचार केला आणि त्यांना त्यांच्या आराध्य दैवतांनी कसलाही लाभ पोहचविला नाही, ज्यांना ते अल्लाहखेरीज पुकारत होते, वास्तविक तुमच्या पालनकर्त्याचा आदेश येऊन पोहोचला, किंबहुना त्यांनी त्यांच्या नुकसानात भरच घातली.
وَكَذَ ٰلِكَ أَخۡذُ رَبِّكَ إِذَاۤ أَخَذَ ٱلۡقُرَىٰ وَهِیَ ظَـٰلِمَةٌۚ إِنَّ أَخۡذَهُۥۤ أَلِیمࣱ شَدِیدٌ ﴿102﴾
१०२. आणि तुमच्या पालनकर्त्याच्या पकडीचा हाच नियम आहे, जेव्हा तो वस्त्यांमध्ये राहणाऱ्या अत्याचारी लोकांना तावडीत घेतो. निःसंशय अल्लाहची पकड दुःखदायक आणि अतिशय सक्त आहे.
إِنَّ فِی ذَ ٰلِكَ لَـَٔایَةࣰ لِّمَنۡ خَافَ عَذَابَ ٱلۡـَٔاخِرَةِۚ ذَ ٰلِكَ یَوۡمࣱ مَّجۡمُوعࣱ لَّهُ ٱلنَّاسُ وَذَ ٰلِكَ یَوۡمࣱ مَّشۡهُودࣱ ﴿103﴾
१०३. निश्चितच यात त्या लोकांसाठी बोध-उपदेश आहे, जे कयामतच्या भयंकर शिक्षा-यातनेचे भय राखतात. तो दिवस, ज्या दिवशी सर्व एकत्र केले जातील आणि तोच दिवशी सर्व एकत्र केले जातील आणि तोच दिवस की ज्या दिवशी सर्वांना हजर केले जाईल.
وَمَا نُؤَخِّرُهُۥۤ إِلَّا لِأَجَلࣲ مَّعۡدُودࣲ ﴿104﴾
१०४. आणि त्याला आम्ही जो विलंब करतो, तो फकत् एका निर्धारीत वेळेपर्यंतच आहे.
یَوۡمَ یَأۡتِ لَا تَكَلَّمُ نَفۡسٌ إِلَّا بِإِذۡنِهِۦۚ فَمِنۡهُمۡ شَقِیࣱّ وَسَعِیدࣱ ﴿105﴾
१०५. ज्या दिवशी ती (कयामत) येईल, कोणाला हिंमत होणार नाही की अल्लाहच्या अनुमतीविना काही बोलावे, तेव्हा त्यांच्यापैकी कोणी दुर्दैवी असेल आणि कोणी सुदैवी.
فَأَمَّا ٱلَّذِینَ شَقُوا۟ فَفِی ٱلنَّارِ لَهُمۡ فِیهَا زَفِیرࣱ وَشَهِیقٌ ﴿106﴾
१०६. तर जे दुर्दैवी असतील ते नरकात जातील, तिथे हळू आणि उंच स्वरात ओरडतील.
خَـٰلِدِینَ فِیهَا مَا دَامَتِ ٱلسَّمَـٰوَ ٰتُ وَٱلۡأَرۡضُ إِلَّا مَا شَاۤءَ رَبُّكَۚ إِنَّ رَبَّكَ فَعَّالࣱ لِّمَا یُرِیدُ ﴿107﴾
१०७. ते तिथे सदैवकाळ राहतील, जोपर्यंत आकाश व धरती कायम असतील. मात्र त्या वेळखेरीज, जी तुमच्या पालनकर्त्याची मर्जी असेल. निःसंशय, तुमचा पालनकर्ता जे काही इच्छितो ते करतोच.
۞ وَأَمَّا ٱلَّذِینَ سُعِدُوا۟ فَفِی ٱلۡجَنَّةِ خَـٰلِدِینَ فِیهَا مَا دَامَتِ ٱلسَّمَـٰوَ ٰتُ وَٱلۡأَرۡضُ إِلَّا مَا شَاۤءَ رَبُّكَۖ عَطَاۤءً غَیۡرَ مَجۡذُوذࣲ ﴿108﴾
१०८. आणि ज्यांना सुदैवी केले गेले ते जन्नत (स्वर्गा) मध्ये असतील जिथे ते नेहमीकरिता राहतील, जोपर्यंत आकाश व धरती बाकी राहील, परंतु जे तुमचा पालनकर्ता इच्छिल ही कधीही न संपणारी देणगी आहे.
فَلَا تَكُ فِی مِرۡیَةࣲ مِّمَّا یَعۡبُدُ هَـٰۤؤُلَاۤءِۚ مَا یَعۡبُدُونَ إِلَّا كَمَا یَعۡبُدُ ءَابَاۤؤُهُم مِّن قَبۡلُۚ وَإِنَّا لَمُوَفُّوهُمۡ نَصِیبَهُمۡ غَیۡرَ مَنقُوصࣲ ﴿109﴾
१०९. यास्तव तुम्ही त्या वस्तूंविषयी संशयग्रस्त राहू नका, ज्यांची हे लोक पूजा करीत आहेत. त्यांची उपासना तर अशा प्रकारे आहे, ज्या प्रकारे यांच्या पूर्वजांची यापूर्वी होती. आम्ही त्या सर्वांना पुरेपूर हिस्सा कमी न करता देणारच आहोत.
وَلَقَدۡ ءَاتَیۡنَا مُوسَى ٱلۡكِتَـٰبَ فَٱخۡتُلِفَ فِیهِۚ وَلَوۡلَا كَلِمَةࣱ سَبَقَتۡ مِن رَّبِّكَ لَقُضِیَ بَیۡنَهُمۡۚ وَإِنَّهُمۡ لَفِی شَكࣲّ مِّنۡهُ مُرِیبࣲ ﴿110﴾
११०. निःसंशय आम्ही मूसाला ग्रंथ प्रदान केला, मग त्यात मतभेद केला गेला जर या आधीच तुमच्या पालनकर्त्याचे फर्मान लागू झालेले नसते तर निश्चितच त्यांचा फैसला केला गेला असता. त्यांना तर यात संशय वाटत आहे (हे तर दुविधाग्रस्त आहेत).
وَإِنَّ كُلࣰّا لَّمَّا لَیُوَفِّیَنَّهُمۡ رَبُّكَ أَعۡمَـٰلَهُمۡۚ إِنَّهُۥ بِمَا یَعۡمَلُونَ خَبِیرࣱ ﴿111﴾
१११. आणि निःसंशय त्यांच्यापैकी प्रत्येकाला (जेव्हा त्याच्यासमोर जाईल तेव्हा) तुमचा पालनकर्ता त्याला त्याच्या कर्मांचा पुरेपूर मोबदला प्रदान करील. निःसंशय ते जे काही करीत आहेत, अल्लाह ते सर्वकाही जाणून आहे.
فَٱسۡتَقِمۡ كَمَاۤ أُمِرۡتَ وَمَن تَابَ مَعَكَ وَلَا تَطۡغَوۡا۟ۚ إِنَّهُۥ بِمَا تَعۡمَلُونَ بَصِیرࣱ ﴿112﴾
११२. तेव्हा तुम्ही अगदी अटळ राहा, जसा तुम्हाला आदेश दिला गेला आहे आणि ते लोकदेखील ज्यांनी तुमच्यासह क्षमा-याचना केली आहे. (खबरदार) तुम्ही मर्यादा पार करू नका. अल्लाह तुमच्या समस्त कर्मांना पाहत आहे.
وَلَا تَرۡكَنُوۤا۟ إِلَى ٱلَّذِینَ ظَلَمُوا۟ فَتَمَسَّكُمُ ٱلنَّارُ وَمَا لَكُم مِّن دُونِ ٱللَّهِ مِنۡ أَوۡلِیَاۤءَ ثُمَّ لَا تُنصَرُونَ ﴿113﴾
११३. आणि पाहा, अत्याचारी लोकांकडे कधीही झुकू नका. अन्यथा तुम्हालाही आगीचा दाह लागेल आणि अल्लाहखेरीज कोणी तुमच्या मदतीला उभा राहू शकणार नाही, आणि ना तुम्हाला मदत दिली जाईल.
وَأَقِمِ ٱلصَّلَوٰةَ طَرَفَیِ ٱلنَّهَارِ وَزُلَفࣰا مِّنَ ٱلَّیۡلِۚ إِنَّ ٱلۡحَسَنَـٰتِ یُذۡهِبۡنَ ٱلسَّیِّـَٔاتِۚ ذَ ٰلِكَ ذِكۡرَىٰ لِلذَّ ٰكِرِینَ ﴿114﴾
११४. आणि दिवसाच्या दोन्ही किनाऱ्यांवर नमाज कायम राखा, आणि रात्रीच्या काही भागातही.१ निःसंशय सत्कर्मे वाईट गोष्टींना दूर करतात.२ हा उपदेश आहे, बोध प्राप्त करणाऱ्यांकरिता.
وَٱصۡبِرۡ فَإِنَّ ٱللَّهَ لَا یُضِیعُ أَجۡرَ ٱلۡمُحۡسِنِینَ ﴿115﴾
११५. आणि तुम्ही धीर-संयम राखा. निःसंशय अल्लाह सत्कर्म करणाऱ्यांचा मोबदला वाया जाऊ देत नाही.
فَلَوۡلَا كَانَ مِنَ ٱلۡقُرُونِ مِن قَبۡلِكُمۡ أُو۟لُوا۟ بَقِیَّةࣲ یَنۡهَوۡنَ عَنِ ٱلۡفَسَادِ فِی ٱلۡأَرۡضِ إِلَّا قَلِیلࣰا مِّمَّنۡ أَنجَیۡنَا مِنۡهُمۡۗ وَٱتَّبَعَ ٱلَّذِینَ ظَلَمُوا۟ مَاۤ أُتۡرِفُوا۟ فِیهِ وَكَانُوا۟ مُجۡرِمِینَ ﴿116﴾
११६. जेव्हा तुमच्या पूर्वीच्या काळातील लोकांपैकी असे भलाई करणारे लोक का नाही झालेत, ज्यांनी धरतीवर फसाद (उत्पात) पसरविण्यास प्रतिबंध घातला असता, ज्या थोड्या लोकांखेरीज ज्यांना आम्ही त्यांच्यापैकी सुटका प्रदान केली होती. अत्यारारी लोक तर त्या गोष्टीच्या मागे लागले, ज्यात त्यांना सुसंपन्न केले गेले होते आणि ते दुराचारी होते.
وَمَا كَانَ رَبُّكَ لِیُهۡلِكَ ٱلۡقُرَىٰ بِظُلۡمࣲ وَأَهۡلُهَا مُصۡلِحُونَ ﴿117﴾
११७. तुमचा पालनकर्ता असा नाही की एखाद्या वस्तीला अत्याचारपूर्वक नष्ट करून टाकील, जेव्हा की तिथले लोक अल्लाहचे भय राखणारे असावेत.
وَلَوۡ شَاۤءَ رَبُّكَ لَجَعَلَ ٱلنَّاسَ أُمَّةࣰ وَ ٰحِدَةࣰۖ وَلَا یَزَالُونَ مُخۡتَلِفِینَ ﴿118﴾
११८. आणि जर तुमच्या पालनकर्त्याने इच्छिले असते तर समस्त लोकांना एका मार्गावर (चालणारा) एक जनसमुदाय बनविला असता. ते तर नेहमी विरोध करणारेच राहतील.
إِلَّا مَن رَّحِمَ رَبُّكَۚ وَلِذَ ٰلِكَ خَلَقَهُمۡۗ وَتَمَّتۡ كَلِمَةُ رَبِّكَ لَأَمۡلَأَنَّ جَهَنَّمَ مِنَ ٱلۡجِنَّةِ وَٱلنَّاسِ أَجۡمَعِینَ ﴿119﴾
११९. त्यांच्याखेरीज, ज्यांच्यावर तुमचा पालनकर्ता दया करील, त्यांना तर यासाठी निर्माण केले गेले आहे आणि तुमच्या पालनकर्त्याचे हे फर्मान पूर्ण झाल्याविना राहणार नाही की मी जहन्नमला जिन्न आणि मानव सर्वांनी भरून टाकीन.
وَكُلࣰّا نَّقُصُّ عَلَیۡكَ مِنۡ أَنۢبَاۤءِ ٱلرُّسُلِ مَا نُثَبِّتُ بِهِۦ فُؤَادَكَۚ وَجَاۤءَكَ فِی هَـٰذِهِ ٱلۡحَقُّ وَمَوۡعِظَةࣱ وَذِكۡرَىٰ لِلۡمُؤۡمِنِینَ ﴿120﴾
१२०. आणि पैगंबरांचे सर्व वृत्तांत आम्ही तुमच्यासमोर, तुमच्या मनाला शांती लाभावी यासाठी सांगत आहोत. तुमच्याजवळ या अध्यायातही सत्य पोहचले, जे ईमान राखणाऱ्यांकरिता बोध-उपदेश आहे.
وَقُل لِّلَّذِینَ لَا یُؤۡمِنُونَ ٱعۡمَلُوا۟ عَلَىٰ مَكَانَتِكُمۡ إِنَّا عَـٰمِلُونَ ﴿121﴾
१२१. आणि ईमान न राखणाऱ्यांना सांगून टाका की तुम्ही आपल्या ठिकाणी काम करीत राहा. आम्हीही कर्मांमध्ये मग्न आहोत.
وَٱنتَظِرُوۤا۟ إِنَّا مُنتَظِرُونَ ﴿122﴾
१२२. आणि तुम्हीही प्रतिक्षा करा, आम्हीही प्रतिक्षा करीत आहोत.
وَلِلَّهِ غَیۡبُ ٱلسَّمَـٰوَ ٰتِ وَٱلۡأَرۡضِ وَإِلَیۡهِ یُرۡجَعُ ٱلۡأَمۡرُ كُلُّهُۥ فَٱعۡبُدۡهُ وَتَوَكَّلۡ عَلَیۡهِۚ وَمَا رَبُّكَ بِغَـٰفِلٍ عَمَّا تَعۡمَلُونَ ﴿123﴾
१२३. आणि आकाशांचे व जमिनीचे परोक्ष ज्ञान केवळ अल्लाहला आहे. आणि समस्त कार्यांचे परतनेही त्याच्याचकडे आहे. यास्तव तुम्ही त्याचीच उपासना केली पाहिजे आणि त्याच्यावरच भरोसा राखला पाहिजे आणि तुम्ही जे काही करता, त्यापासून अल्लाह अनभिज्ञ नाही.