Main pages

Surah Stoneland, Rock city, Al-Hijr valley [Al-Hijr] in Marathi

Surah Stoneland, Rock city, Al-Hijr valley [Al-Hijr] Ayah 99 Location Makkah Number 15

الۤرۚ تِلۡكَ ءَایَـٰتُ ٱلۡكِتَـٰبِ وَقُرۡءَانࣲ مُّبِینࣲ ﴿1﴾

१. अलिफ. लाम. रॉ या (अल्लाहच्या) ग्रंथाच्या आयती आहेत आणि स्पष्ट अशा कुरआनाच्या.

رُّبَمَا یَوَدُّ ٱلَّذِینَ كَفَرُوا۟ لَوۡ كَانُوا۟ مُسۡلِمِینَ ﴿2﴾

२. अशीही वेळ येईल जेव्हा इन्कार करणारे आपल्या ईमानधारक होण्याची इच्छा करतील.

ذَرۡهُمۡ یَأۡكُلُوا۟ وَیَتَمَتَّعُوا۟ وَیُلۡهِهِمُ ٱلۡأَمَلُۖ فَسَوۡفَ یَعۡلَمُونَ ﴿3﴾

३. तुम्ही त्यांना खाण्यात, लाभ उचलण्यात आणि (खोट्या) अपेक्षा बाळगण्यात मग्न असलेले सोडा. ते स्वतः लवकरच जाणून घेतील.

وَمَاۤ أَهۡلَكۡنَا مِن قَرۡیَةٍ إِلَّا وَلَهَا كِتَابࣱ مَّعۡلُومࣱ ﴿4﴾

४. आणि कोणत्याही वस्तीला आम्ही नष्ट केले नाही, परंतु हे की तिच्याकरिता निश्चित असे लिखित होते.

مَّا تَسۡبِقُ مِنۡ أُمَّةٍ أَجَلَهَا وَمَا یَسۡتَـٔۡخِرُونَ ﴿5﴾

५. कोणताही जनसमूह आपल्या मृत्युपासून ना पुढे जाऊ शकतो, ना मागे राहू शकतो.१

وَقَالُوا۟ یَـٰۤأَیُّهَا ٱلَّذِی نُزِّلَ عَلَیۡهِ ٱلذِّكۡرُ إِنَّكَ لَمَجۡنُونࣱ ﴿6﴾

६. आणि ते म्हणाले, हे माणसा! ज्यावर कुरआन अवतरित केले गेले आहे निश्चितच तू एखादा वेडा आहे.

لَّوۡ مَا تَأۡتِینَا بِٱلۡمَلَـٰۤىِٕكَةِ إِن كُنتَ مِنَ ٱلصَّـٰدِقِینَ ﴿7﴾

७. जर तू अगदी सच्चा आहे तर मग आमच्याजवळ फरिश्त्यांना का नाही आणत?

مَا نُنَزِّلُ ٱلۡمَلَـٰۤىِٕكَةَ إِلَّا بِٱلۡحَقِّ وَمَا كَانُوۤا۟ إِذࣰا مُّنظَرِینَ ﴿8﴾

८. आम्ही फरिश्त्यांना सत्यासहच अवतरित करतो. आणि अशा वेळी त्यांना सवड दिली जात नाही.

إِنَّا نَحۡنُ نَزَّلۡنَا ٱلذِّكۡرَ وَإِنَّا لَهُۥ لَحَـٰفِظُونَ ﴿9﴾

९. निःसंशय आम्हीच या कुरआनाला अवतरित केले आहे आणि आम्हीच त्याचे संरक्षक आहोत.

وَلَقَدۡ أَرۡسَلۡنَا مِن قَبۡلِكَ فِی شِیَعِ ٱلۡأَوَّلِینَ ﴿10﴾

१०. आणि आम्ही तुमच्यापूर्वी होऊन गेलेल्या जनसमूहांमध्येही आपले पैगंबर पाठवित राहिलो.

وَمَا یَأۡتِیهِم مِّن رَّسُولٍ إِلَّا كَانُوا۟ بِهِۦ یَسۡتَهۡزِءُونَ ﴿11﴾

११. आणि (तथापि) जो पैगंबरदेखील त्यांच्याजवळ आला, त्याची ते थट्टाच उडवित राहिले.

كَذَ ٰ⁠لِكَ نَسۡلُكُهُۥ فِی قُلُوبِ ٱلۡمُجۡرِمِینَ ﴿12﴾

१२. अपराधी लोकांच्या मनात आम्ही अशाच प्रकारे हेच रचत असतो.

لَا یُؤۡمِنُونَ بِهِۦ وَقَدۡ خَلَتۡ سُنَّةُ ٱلۡأَوَّلِینَ ﴿13﴾

१३. ते याच्यावर ईमान राखत नाही आणि निःसंशय पूर्वीच्या लोकांची हीच पद्धत राहिली आहे.

وَلَوۡ فَتَحۡنَا عَلَیۡهِم بَابࣰا مِّنَ ٱلسَّمَاۤءِ فَظَلُّوا۟ فِیهِ یَعۡرُجُونَ ﴿14﴾

१४. आणि जर आम्ही त्यांच्यासाठी आकाशात (जाण्याचा) दरवाजाही उघडून दिला आणि ते तिथे चढूही लागले.

لَقَالُوۤا۟ إِنَّمَا سُكِّرَتۡ أَبۡصَـٰرُنَا بَلۡ نَحۡنُ قَوۡمࣱ مَّسۡحُورُونَ ﴿15﴾

१५. तरीही हेच म्हणतील की आमची नजरबंदी केली गेली आहे, किंबहुना आमच्यावर जादूटोणा केला गेला आहे.

وَلَقَدۡ جَعَلۡنَا فِی ٱلسَّمَاۤءِ بُرُوجࣰا وَزَیَّنَّـٰهَا لِلنَّـٰظِرِینَ ﴿16﴾

१६. आणि निःसंशय, आम्ही आकाशात बुरुज (राशी) बनविले आहेत आणि पाहणाऱ्यांकरिता याला सुशोभित केले आहे.

وَحَفِظۡنَـٰهَا مِن كُلِّ شَیۡطَـٰنࣲ رَّجِیمٍ ﴿17﴾

१७. आणि धिःक्कारलेल्या प्रत्येक सैतानापासून याला सुरक्षित ठेवले आहे.

إِلَّا مَنِ ٱسۡتَرَقَ ٱلسَّمۡعَ فَأَتۡبَعَهُۥ شِهَابࣱ مُّبِینࣱ ﴿18﴾

१८. तथापि, जो लपून छपून ऐकण्याचा प्रयत्न करतो, भडकत्या आगीचा निखारा त्याच्या पाठीशी लागतो.

وَٱلۡأَرۡضَ مَدَدۡنَـٰهَا وَأَلۡقَیۡنَا فِیهَا رَوَ ٰ⁠سِیَ وَأَنۢبَتۡنَا فِیهَا مِن كُلِّ شَیۡءࣲ مَّوۡزُونࣲ ﴿19﴾

१९. आणि जमिनीला आम्ही पसरवून दिले आहे आणि तिच्यावर पर्वत ठेवले आहेत आणि तिच्यात प्रत्येक वस्तू आम्ही निश्चित प्रमाणात उगविली आहे.

وَجَعَلۡنَا لَكُمۡ فِیهَا مَعَـٰیِشَ وَمَن لَّسۡتُمۡ لَهُۥ بِرَ ٰ⁠زِقِینَ ﴿20﴾

२०. आणि तिच्यातच आम्ही तुमच्या अन्न सामुग्रीची व्यवस्था केली आहे आणि (त्यांच्यासाठीही) ज्यांना रोजी देणारे तुम्ही नाहीत.

وَإِن مِّن شَیۡءٍ إِلَّا عِندَنَا خَزَاۤىِٕنُهُۥ وَمَا نُنَزِّلُهُۥۤ إِلَّا بِقَدَرࣲ مَّعۡلُومࣲ ﴿21﴾

२१. आणि जेवढ्या म्हणून चीज-वस्तू आहेत, त्या सर्वांचा खजिना आमच्याजवळ आहे, आणि आम्ही प्रत्येक वस्तू तिच्या निर्धारित प्रमाणात उतरवितो.

وَأَرۡسَلۡنَا ٱلرِّیَـٰحَ لَوَ ٰ⁠قِحَ فَأَنزَلۡنَا مِنَ ٱلسَّمَاۤءِ مَاۤءࣰ فَأَسۡقَیۡنَـٰكُمُوهُ وَمَاۤ أَنتُمۡ لَهُۥ بِخَـٰزِنِینَ ﴿22﴾

२२. आणि आम्ही वजनदार वाऱ्यांना पाठिवतो, मग आकाशातून पर्जन्य वृष्टी करून तुम्हाला तृप्त करतो आणि तुम्ही त्याचा संग्रह करून ठेवणारे नाहीत.

وَإِنَّا لَنَحۡنُ نُحۡیِۦ وَنُمِیتُ وَنَحۡنُ ٱلۡوَ ٰ⁠رِثُونَ ﴿23﴾

२३. आणि आम्हीच जीवन देतो आणि मृत्युही देतो आणि (शेवटी) आम्हीच वारस आहोत.

وَلَقَدۡ عَلِمۡنَا ٱلۡمُسۡتَقۡدِمِینَ مِنكُمۡ وَلَقَدۡ عَلِمۡنَا ٱلۡمُسۡتَـٔۡخِرِینَ ﴿24﴾

२४. आणि तुमच्यापैकी पुढे जाणाऱ्यांना आणि मागे राहणाऱ्यांनाही आम्ही चांगल्या प्रकारे जाणतो.

وَإِنَّ رَبَّكَ هُوَ یَحۡشُرُهُمۡۚ إِنَّهُۥ حَكِیمٌ عَلِیمࣱ ﴿25﴾

२५. आणि तुमचा पालनकर्ता समस्त लोकांना एकत्रित करेल. निःसंशय तो मोठा तत्त्वदर्शी, मोठा ज्ञानी आहे.

وَلَقَدۡ خَلَقۡنَا ٱلۡإِنسَـٰنَ مِن صَلۡصَـٰلࣲ مِّنۡ حَمَإࣲ مَّسۡنُونࣲ ﴿26﴾

२६. आणि निःसंशय, आम्ही मानवाला खनकणाऱ्या (कोरड्या) मातीपासून, जी सडलेल्या गाऱ्याची होती, निर्माण केले आहे.

وَٱلۡجَاۤنَّ خَلَقۡنَـٰهُ مِن قَبۡلُ مِن نَّارِ ٱلسَّمُومِ ﴿27﴾

२७. आणि त्याच्यापूर्वी जिन्नांना आम्ही अग्निशिखेपासून निर्माण केले.

وَإِذۡ قَالَ رَبُّكَ لِلۡمَلَـٰۤىِٕكَةِ إِنِّی خَـٰلِقُۢ بَشَرࣰا مِّن صَلۡصَـٰلࣲ مِّنۡ حَمَإࣲ مَّسۡنُونࣲ ﴿28﴾

२८. आणि जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने फरिश्त्यांना फर्माविले की मी एक मानव, काळ्या सडलेल्या, खनकणाऱ्या मातीपासून निर्माण करणार आहे.

فَإِذَا سَوَّیۡتُهُۥ وَنَفَخۡتُ فِیهِ مِن رُّوحِی فَقَعُوا۟ لَهُۥ سَـٰجِدِینَ ﴿29﴾

२९. तर जेव्हा मी त्याला पूर्ण बनवून घेईन आणि त्यात आपला आत्मा फुंकेन तेव्हा तुम्ही सर्व त्याला सजदा करा (त्याच्यापुढे माथा टेका)

فَسَجَدَ ٱلۡمَلَـٰۤىِٕكَةُ كُلُّهُمۡ أَجۡمَعُونَ ﴿30﴾

३०. यास्तव सर्वच्या सर्व फरिश्त्यांनी आपला माथा टेकला.

إِلَّاۤ إِبۡلِیسَ أَبَىٰۤ أَن یَكُونَ مَعَ ٱلسَّـٰجِدِینَ ﴿31﴾

३१. परंतु इब्लिसने सजदा करणाऱ्यांमध्ये सामील होण्यास इन्कार केला.

قَالَ یَـٰۤإِبۡلِیسُ مَا لَكَ أَلَّا تَكُونَ مَعَ ٱلسَّـٰجِدِینَ ﴿32﴾

३२. (अल्लाहने) फर्माविले, हे इब्लिस! तुला झाले तरी काय की तू सजदा करणाऱ्यांमध्ये सामील झाला नाही?

قَالَ لَمۡ أَكُن لِّأَسۡجُدَ لِبَشَرٍ خَلَقۡتَهُۥ مِن صَلۡصَـٰلࣲ مِّنۡ حَمَإࣲ مَّسۡنُونࣲ ﴿33﴾

३३. तो म्हणाला, मी असा नाही की या मानवाला सजदा करावा, ज्याला तू काळ्या आणि सडलेल्या खणखणणाऱ्या मातीपासून निर्माण केले आहे.

قَالَ فَٱخۡرُجۡ مِنۡهَا فَإِنَّكَ رَجِیمࣱ ﴿34﴾

३४. (अल्लाहने) फर्माविले, आता तू जन्नतमधून चालता हो कारण तू धिःक्कारलेला आहेस.

وَإِنَّ عَلَیۡكَ ٱللَّعۡنَةَ إِلَىٰ یَوۡمِ ٱلدِّینِ ﴿35﴾

३५. आणि तुझ्यावर कयामतच्या दिवसापर्यंत माझ्यातर्फे धिःक्कार आहे.

قَالَ رَبِّ فَأَنظِرۡنِیۤ إِلَىٰ یَوۡمِ یُبۡعَثُونَ ﴿36﴾

३६. तो म्हणाला, हे माझ्या पालनकर्त्या! मला त्या दिवसापर्यंत संधी प्रदान कर की लोकांना दुसऱ्यांदा (जिवंत करून) उठविले जाईल.

قَالَ فَإِنَّكَ مِنَ ٱلۡمُنظَرِینَ ﴿37﴾

३७. फर्माविले, (ठीक आहे) तू त्यांच्यापैकी आहेस, ज्यांना संधी दिली गेली आहे.

إِلَىٰ یَوۡمِ ٱلۡوَقۡتِ ٱلۡمَعۡلُومِ ﴿38﴾

३८. ठरलेल्या दिवसाच्या वेळेपर्यंतची.

قَالَ رَبِّ بِمَاۤ أَغۡوَیۡتَنِی لَأُزَیِّنَنَّ لَهُمۡ فِی ٱلۡأَرۡضِ وَلَأُغۡوِیَنَّهُمۡ أَجۡمَعِینَ ﴿39﴾

३९. (सैतान) म्हणाला, हे माझ्या पालनकर्त्या! तू मला मार्गभ्रष्ट केलेस तर मीदेखील शपथ घेतो की मी सुद्धा धरतीत त्यांच्यासाठी मोह माया निर्माण करीन आणि त्या सर्वांना बहकवून मार्गभ्रष्ट करीन.

إِلَّا عِبَادَكَ مِنۡهُمُ ٱلۡمُخۡلَصِینَ ﴿40﴾

४०. मात्र तुझ्या त्या दासांखेरीज, ज्यांना तू निवडून घेतले आहे.

قَالَ هَـٰذَا صِرَ ٰ⁠طٌ عَلَیَّ مُسۡتَقِیمٌ ﴿41﴾

४१. फर्माविले, हो. हाच माझ्यापर्यंत पोहचण्याचा सरळ मार्ग आहे.

إِنَّ عِبَادِی لَیۡسَ لَكَ عَلَیۡهِمۡ سُلۡطَـٰنٌ إِلَّا مَنِ ٱتَّبَعَكَ مِنَ ٱلۡغَاوِینَ ﴿42﴾

४२. माझ्या (निवडक) दासांवर तुझा कोणताही प्रभाव पडणार नाही, मात्र जे वाट चुकलेले लोक आहेत, तेच तुझे अनुसरण करतील.

وَإِنَّ جَهَنَّمَ لَمَوۡعِدُهُمۡ أَجۡمَعِینَ ﴿43﴾

४३. आणि निःसंशय, त्या सर्वांच्या वायद्याचे स्थान जहन्नम आहे.

لَهَا سَبۡعَةُ أَبۡوَ ٰ⁠بࣲ لِّكُلِّ بَابࣲ مِّنۡهُمۡ جُزۡءࣱ مَّقۡسُومٌ ﴿44﴾

४४. ज्याला सात दरवाजे आहेत. प्रत्येक दारासाठी त्यांचा एक हिस्सा विभाजित आहे.

إِنَّ ٱلۡمُتَّقِینَ فِی جَنَّـٰتࣲ وَعُیُونٍ ﴿45﴾

४५. निःसंशय, अल्लाहचे भय राखून दुराचारापासून दूर राहणारे लोक बागांमध्ये आणि झऱ्यां (प्रवाहां) मध्ये असतील.

ٱدۡخُلُوهَا بِسَلَـٰمٍ ءَامِنِینَ ﴿46﴾

४६. (त्यांना सांगितले जाईल) सलामती आणि शांतीपूर्वक यात दाखल व्हा.

وَنَزَعۡنَا مَا فِی صُدُورِهِم مِّنۡ غِلٍّ إِخۡوَ ٰ⁠نًا عَلَىٰ سُرُرࣲ مُّتَقَـٰبِلِینَ ﴿47﴾

४७. आणि त्यांच्या मनात जी काही वैर- द्वेष भावना होती आम्ही ती सर्व दूर करू. ते भाऊ-भाऊ बनून एकमेकांसमोर सिंहासनावर बसलेले असतील.

لَا یَمَسُّهُمۡ فِیهَا نَصَبࣱ وَمَا هُم مِّنۡهَا بِمُخۡرَجِینَ ﴿48﴾

४८. त्यांना तिथे ना एखादे दुःख स्पर्श करू शकते आणि ना ते तिथून कधी काढले जातील.

۞ نَبِّئۡ عِبَادِیۤ أَنِّیۤ أَنَا ٱلۡغَفُورُ ٱلرَّحِیمُ ﴿49﴾

४९. माझ्या दासांना सांगा की मी मोठा माफ करणारा आणि खूप खूप दया करणारा आहे.

وَأَنَّ عَذَابِی هُوَ ٱلۡعَذَابُ ٱلۡأَلِیمُ ﴿50﴾

५०. आणि त्याचबरोबर माझी शिक्षा यातनाही मोठी दुःखदायक आहे.

وَنَبِّئۡهُمۡ عَن ضَیۡفِ إِبۡرَ ٰ⁠هِیمَ ﴿51﴾

५१. आणि त्यांना इब्राहीमच्या अतिथींचा वृत्तांत ऐकवा.

إِذۡ دَخَلُوا۟ عَلَیۡهِ فَقَالُوا۟ سَلَـٰمࣰا قَالَ إِنَّا مِنكُمۡ وَجِلُونَ ﴿52﴾

५२. की जेव्हा त्यांनी इब्राहीमजवळ येऊन सलाम केला, तेव्हा ते म्हणाले की आम्हाला तुमचे भय वाटते.१

قَالُوا۟ لَا تَوۡجَلۡ إِنَّا نُبَشِّرُكَ بِغُلَـٰمٍ عَلِیمࣲ ﴿53﴾

५३. फरिश्ते म्हणाले, भिऊ नका, आम्ही तुम्हाला एका ज्ञानी पुत्राची शुभ वार्ता देतो.

قَالَ أَبَشَّرۡتُمُونِی عَلَىٰۤ أَن مَّسَّنِیَ ٱلۡكِبَرُ فَبِمَ تُبَشِّرُونَ ﴿54﴾

५४. इब्राहीम म्हणाले, काय या वृद्धावस्थेने स्पर्श केल्यानंतर तुम्ही मला ही शुभ वार्ता देता! ही आनंदाची बातमी तुम्ही कशी काय देत आहात?

قَالُوا۟ بَشَّرۡنَـٰكَ بِٱلۡحَقِّ فَلَا تَكُن مِّنَ ٱلۡقَـٰنِطِینَ ﴿55﴾

५५. फरिश्ते म्हणाले, आम्ही तुम्हाला अगदी खरी शुभवार्ता ऐकवित आहोत. तुम्ही निराश लोकांमध्ये सामील होऊ नका.

قَالَ وَمَن یَقۡنَطُ مِن رَّحۡمَةِ رَبِّهِۦۤ إِلَّا ٱلضَّاۤلُّونَ ﴿56﴾

५६. म्हणाले, आपल्या पालनकर्त्याच्या दया कृपेपासून केवळ ते (मार्गभ्रष्ट आणि) बहकलेले लोकच निराश होतात.

قَالَ فَمَا خَطۡبُكُمۡ أَیُّهَا ٱلۡمُرۡسَلُونَ ﴿57﴾

५७. (इब्राहीम यांनी) विचारले, हे अल्लाहतर्फे पाठविण्यात आलेल्या (फरिश्त्यां) नो! तुमचे असे काय खास काम आहे?

قَالُوۤا۟ إِنَّاۤ أُرۡسِلۡنَاۤ إِلَىٰ قَوۡمࣲ مُّجۡرِمِینَ ﴿58﴾

५८. फरिश्त्यांनी उत्तर दिले, आम्हाला अपराधी लोकांकडे पाठविले गेले आहे.

إِلَّاۤ ءَالَ لُوطٍ إِنَّا لَمُنَجُّوهُمۡ أَجۡمَعِینَ ﴿59﴾

५९. परंतु लूतचे कुटुंब की आम्ही त्या सर्वांना अवश्य वाचवू.

إِلَّا ٱمۡرَأَتَهُۥ قَدَّرۡنَاۤ إِنَّهَا لَمِنَ ٱلۡغَـٰبِرِینَ ﴿60﴾

६०. मात्र लूतच्या पत्नीखेरीज की आम्ही तिला थांबणाऱ्या व मागे राहणाऱ्यांमध्ये निश्चित केले आहे.

فَلَمَّا جَاۤءَ ءَالَ لُوطٍ ٱلۡمُرۡسَلُونَ ﴿61﴾

६१. जेव्हा पाठविलेले फरिश्ते लूतच्या कुटुंबाजवळ पोहोचले.

قَالَ إِنَّكُمۡ قَوۡمࣱ مُّنكَرُونَ ﴿62﴾

६२. तेव्हा लूत म्हणाले, तुम्ही लोक तर काहीसे अनोळखी वाटतात.

قَالُوا۟ بَلۡ جِئۡنَـٰكَ بِمَا كَانُوا۟ فِیهِ یَمۡتَرُونَ ﴿63﴾

६३. ते म्हणाले, (नाही) किंबहुना आम्ही तुमच्याजवळ ती वस्तू घेऊन आलो आहोत, जिच्या बाबतीत हे लोक संशय करीत आहेत.

وَأَتَیۡنَـٰكَ بِٱلۡحَقِّ وَإِنَّا لَصَـٰدِقُونَ ﴿64﴾

६४. आणि आम्ही तर तुझ्याजवळ (उघड) सत्य घेऊन आलो आहोत, आणि आम्ही आहोतही पुरेपुरे सच्चे!

فَأَسۡرِ بِأَهۡلِكَ بِقِطۡعࣲ مِّنَ ٱلَّیۡلِ وَٱتَّبِعۡ أَدۡبَـٰرَهُمۡ وَلَا یَلۡتَفِتۡ مِنكُمۡ أَحَدࣱ وَٱمۡضُوا۟ حَیۡثُ تُؤۡمَرُونَ ﴿65﴾

६५. आता तुम्ही आपल्या कुटुंबासह या रात्रीच्या एखाद्या भागात निघून जा. तुम्ही स्वतः त्यांच्या मागे राहा (आणि सावधान!) तुमच्यापैकी कोणीही मागे वळून पाहू नये आणि ज्या ठिकाणी जायचा तुम्हाला आदेश दिला जात आहे, तिथे चालत जा.

وَقَضَیۡنَاۤ إِلَیۡهِ ذَ ٰ⁠لِكَ ٱلۡأَمۡرَ أَنَّ دَابِرَ هَـٰۤؤُلَاۤءِ مَقۡطُوعࣱ مُّصۡبِحِینَ ﴿66﴾

६६. आणि आम्ही त्याच्याकडे या गोष्टीचा फैसला केला की सकाळ होता होताच त्या सर्वांची मुळे कापली जातील.

وَجَاۤءَ أَهۡلُ ٱلۡمَدِینَةِ یَسۡتَبۡشِرُونَ ﴿67﴾

६७. आणि शहरी लोक मोठा आनंद साजरा करीत आले.

قَالَ إِنَّ هَـٰۤؤُلَاۤءِ ضَیۡفِی فَلَا تَفۡضَحُونِ ﴿68﴾

६८. (लूत) म्हणाले, हे लोक माझे अतिथी आहेत, तेव्हा तुम्ही मला अपमानित करू नका.

وَٱتَّقُوا۟ ٱللَّهَ وَلَا تُخۡزُونِ ﴿69﴾

६९. आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहचे भय राखा आणि मला अपमानित करू नका.

قَالُوۤا۟ أَوَلَمۡ نَنۡهَكَ عَنِ ٱلۡعَـٰلَمِینَ ﴿70﴾

७०. ते म्हणाले, काय आम्ही तुम्हाला साऱ्या जगाचा ठेका घेण्यापासून मनाई केली नव्हती?

قَالَ هَـٰۤؤُلَاۤءِ بَنَاتِیۤ إِن كُنتُمۡ فَـٰعِلِینَ ﴿71﴾

७१. (लूत) म्हणाले, जर तुम्हाला काही करायचेच आहे तर या माझ्या मुली हजर आहेत१

لَعَمۡرُكَ إِنَّهُمۡ لَفِی سَكۡرَتِهِمۡ یَعۡمَهُونَ ﴿72﴾

७२. तुमच्या आयुष्याची शपथ! ते तर आपल्या नशेत धुंद फिरत होते.

فَأَخَذَتۡهُمُ ٱلصَّیۡحَةُ مُشۡرِقِینَ ﴿73﴾

७३. मग सूर्योदय होता होता त्यांना एका भयंकर स्फोटाच्या आवाजाने येऊन धरले.

فَجَعَلۡنَا عَـٰلِیَهَا سَافِلَهَا وَأَمۡطَرۡنَا عَلَیۡهِمۡ حِجَارَةࣰ مِّن سِجِّیلٍ ﴿74﴾

७४. शेवटी आम्ही त्या (शहरा) ला उलथेपालथे करून टाकले आणि त्या लोकांवर कंकर पाषाणांचा वर्षाव केला.

إِنَّ فِی ذَ ٰ⁠لِكَ لَـَٔایَـٰتࣲ لِّلۡمُتَوَسِّمِینَ ﴿75﴾

७५. निःसंशय, प्रत्येक बोध प्राप्त करणाऱ्याकरिता यात अनेक निशाण्या आहेत.

وَإِنَّهَا لَبِسَبِیلࣲ مُّقِیمٍ ﴿76﴾

७६. आणि ही वस्ती अशा मार्गावर आहे, ज्यावर सतत ये-जा होत असते.

إِنَّ فِی ذَ ٰ⁠لِكَ لَـَٔایَةࣰ لِّلۡمُؤۡمِنِینَ ﴿77﴾

७७. आणि यात ईमान राखणाऱ्यांसाठी मोठी निशाणी आहे.

وَإِن كَانَ أَصۡحَـٰبُ ٱلۡأَیۡكَةِ لَظَـٰلِمِینَ ﴿78﴾

७८. आणि अयका वस्तीचे राहणारे लोकही मोठे अत्याचारी होते.

فَٱنتَقَمۡنَا مِنۡهُمۡ وَإِنَّهُمَا لَبِإِمَامࣲ مُّبِینࣲ ﴿79﴾

७९. ज्यांच्याशी शेवटी आम्ही सूड घेतलाच. ही दोन्ही शहरे खुल्या मार्गावर आहेत.

وَلَقَدۡ كَذَّبَ أَصۡحَـٰبُ ٱلۡحِجۡرِ ٱلۡمُرۡسَلِینَ ﴿80﴾

८०. आणि हिज्रवाल्यांनीही पैगंबरांना खोटे ठरविले.

وَءَاتَیۡنَـٰهُمۡ ءَایَـٰتِنَا فَكَانُوا۟ عَنۡهَا مُعۡرِضِینَ ﴿81﴾

८१. आणि त्यांना आम्ही आपल्या निशाण्या प्रदान केल्या होत्या, परंतु तरी देखील ते त्या निशाण्यांपासून माना फिरवितच राहिले.

وَكَانُوا۟ یَنۡحِتُونَ مِنَ ٱلۡجِبَالِ بُیُوتًا ءَامِنِینَ ﴿82﴾

८२. आणि हे लोक आपली घरे पर्वतांना कोरून बनवित असत, भय न राखता.

فَأَخَذَتۡهُمُ ٱلصَّیۡحَةُ مُصۡبِحِینَ ﴿83﴾

८३. शेवटी त्यांनाही सकाळ होता होता भयंकर चित्काराने येऊन गाठले.

فَمَاۤ أَغۡنَىٰ عَنۡهُم مَّا كَانُوا۟ یَكۡسِبُونَ ﴿84﴾

८४. यास्तव त्यांच्या कोणत्याही युक्ती कौशल्याने आणि कामगिरीने त्यांना कसलाही लाभ पोहचविला नाही.

وَمَا خَلَقۡنَا ٱلسَّمَـٰوَ ٰ⁠تِ وَٱلۡأَرۡضَ وَمَا بَیۡنَهُمَاۤ إِلَّا بِٱلۡحَقِّۗ وَإِنَّ ٱلسَّاعَةَ لَـَٔاتِیَةࣱۖ فَٱصۡفَحِ ٱلصَّفۡحَ ٱلۡجَمِیلَ ﴿85﴾

८५. आणि आम्ही आकाशांना आणि धरतीला आणि त्यांच्या दरम्यानच्या समस्त वस्तूंना सत्यासहच बनविले आहे आणि कयामत अवश्य येणार आहे, तेव्हा तुम्ही भल्या रीतीने सहन करून घ्या.

إِنَّ رَبَّكَ هُوَ ٱلۡخَلَّـٰقُ ٱلۡعَلِیمُ ﴿86﴾

८६. निःसंशय, तुमचा पालनकर्ताच निर्माण करणारा आणि जाणणारा आहे.

وَلَقَدۡ ءَاتَیۡنَـٰكَ سَبۡعࣰا مِّنَ ٱلۡمَثَانِی وَٱلۡقُرۡءَانَ ٱلۡعَظِیمَ ﴿87﴾

८७. निःसंशय आम्ही तुम्हाला सात आयती प्रदान केल्या आहेत ज्यांची पुनरावृत्ती केली जाते, आणि महान कुरआन देखील प्रदान केला आहे.

لَا تَمُدَّنَّ عَیۡنَیۡكَ إِلَىٰ مَا مَتَّعۡنَا بِهِۦۤ أَزۡوَ ٰ⁠جࣰا مِّنۡهُمۡ وَلَا تَحۡزَنۡ عَلَیۡهِمۡ وَٱخۡفِضۡ جَنَاحَكَ لِلۡمُؤۡمِنِینَ ﴿88﴾

८८. तुम्ही कधीही आपली नजर त्या गोष्टीवर टाकू नका, जिला आम्ही, त्यांच्यापैकी अनेक प्रकारच्या लोकांना प्रदान केले आहे. त्यांच्याबद्दल तुम्ही दुःखही करू नका आणि ईमान राखणाऱ्यांसाठी आपल्या बाजू झुकवा (त्यांना मोठ्या स्नेहाची वागणूक द्या).

وَقُلۡ إِنِّیۤ أَنَا ٱلنَّذِیرُ ٱلۡمُبِینُ ﴿89﴾

८९. आणि सांगा की मी उघडपणे भय दाखविणारा आहे.

كَمَاۤ أَنزَلۡنَا عَلَى ٱلۡمُقۡتَسِمِینَ ﴿90﴾

९०. ज्याप्रमाणे आम्ही त्या विभाजन करणाऱ्यांवर उतरविला.

ٱلَّذِینَ جَعَلُوا۟ ٱلۡقُرۡءَانَ عِضِینَ ﴿91﴾

९१. ज्यांनी या कुरआनचे तुकडे तुकडे करून टाकले.

فَوَرَبِّكَ لَنَسۡـَٔلَنَّهُمۡ أَجۡمَعِینَ ﴿92﴾

९२. शपथ आहे तुमच्या पालनकर्त्याची! आम्ही त्या सर्वांना अवश्य विचारू.

عَمَّا كَانُوا۟ یَعۡمَلُونَ ﴿93﴾

९३. त्या प्रत्येक गोष्टीबाबत जी ते करीत होते.

فَٱصۡدَعۡ بِمَا تُؤۡمَرُ وَأَعۡرِضۡ عَنِ ٱلۡمُشۡرِكِینَ ﴿94﴾

९४. तेव्हा तुम्ही हा आदेश, जो तुम्हाला दिला जात आहे, स्पष्टतः ऐकवा, आणि अनेकेश्वरवाद्यांपासून तोंड फिरवून घ्या.

إِنَّا كَفَیۡنَـٰكَ ٱلۡمُسۡتَهۡزِءِینَ ﴿95﴾

९५. तुमच्याशी ते लोक थट्टा मस्करी करतात त्यांच्या (शिक्षे) करिता आम्ही पर्याप्त आहोत.

ٱلَّذِینَ یَجۡعَلُونَ مَعَ ٱللَّهِ إِلَـٰهًا ءَاخَرَۚ فَسَوۡفَ یَعۡلَمُونَ ﴿96﴾

९६. जे लोक अल्लाहच्या सोबत आणखी इतर उपास्ये बनवितात, त्यांना लवकरच माहीत पडेल.

وَلَقَدۡ نَعۡلَمُ أَنَّكَ یَضِیقُ صَدۡرُكَ بِمَا یَقُولُونَ ﴿97﴾

९७. आणि आम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे की त्यांच्या बोलण्याने तुमच्या मनाला ठेच पोहचते.

فَسَبِّحۡ بِحَمۡدِ رَبِّكَ وَكُن مِّنَ ٱلسَّـٰجِدِینَ ﴿98﴾

९८. तुम्ही आपल्या पालनकर्त्याची महानता आणि स्तुती प्रशंसाचे वर्णन करीत राहा आणि नतमस्तक होणाऱ्यांमध्ये सामील व्हा.

وَٱعۡبُدۡ رَبَّكَ حَتَّىٰ یَأۡتِیَكَ ٱلۡیَقِینُ ﴿99﴾

९९. आणि आपल्या पालनकर्त्याची उपासना करीत राहा, येथेपर्यंत की तुम्हाला मरण यावे.