Main pages

كۤهیعۤصۤ ﴿1﴾

१. काफ. हा. या. एैन. श्वाद.

ذِكۡرُ رَحۡمَتِ رَبِّكَ عَبۡدَهُۥ زَكَرِیَّاۤ ﴿2﴾

२. हा उल्लेख आहे तुमच्या पालनकर्त्याच्या त्या कृपेचा, जी त्याने आपले दास जकरियावर केली होती.

إِذۡ نَادَىٰ رَبَّهُۥ نِدَاۤءً خَفِیࣰّا ﴿3﴾

३. जेव्हा त्यांनी आपल्या पालनकर्त्याजवळ गुपचुप रित्या प्रार्थना केली

قَالَ رَبِّ إِنِّی وَهَنَ ٱلۡعَظۡمُ مِنِّی وَٱشۡتَعَلَ ٱلرَّأۡسُ شَیۡبࣰا وَلَمۡ أَكُنۢ بِدُعَاۤىِٕكَ رَبِّ شَقِیࣰّا ﴿4﴾

४. म्हणाले हे माझ्या पालनकर्त्या माझी हाडे कमकुवत झाली आहेत आणि डोके म्हातारपणामुळे भडकले आहे, परंतु मी कधीही तुझ्याजवळ दुआ (प्रार्थना) करून वंचित राहिलो नाही.

وَإِنِّی خِفۡتُ ٱلۡمَوَ ٰ⁠لِیَ مِن وَرَاۤءِی وَكَانَتِ ٱمۡرَأَتِی عَاقِرࣰا فَهَبۡ لِی مِن لَّدُنكَ وَلِیࣰّا ﴿5﴾

५. आणि मला आपल्या (मृत्यु) नंतर, आपल्या जवळच्या नातेवाईकांचे भय आहे. माझी पत्नी देखील वांझ आहे, पण तरीही तू मला आपल्यातर्फे वारस प्रदान कर.

یَرِثُنِی وَیَرِثُ مِنۡ ءَالِ یَعۡقُوبَۖ وَٱجۡعَلۡهُ رَبِّ رَضِیࣰّا ﴿6﴾

६. जो माझाही वारस असेल आणि याकूबच्या वंशाचाही वारस, आणि हे माझ्या पालनकर्त्या! तू त्याला आपला आवडता दास बनव.

یَـٰزَكَرِیَّاۤ إِنَّا نُبَشِّرُكَ بِغُلَـٰمٍ ٱسۡمُهُۥ یَحۡیَىٰ لَمۡ نَجۡعَل لَّهُۥ مِن قَبۡلُ سَمِیࣰّا ﴿7﴾

७. हे जकरिया! आम्ही तुम्हाला एका पुत्रा (च्या प्राप्ती) ची खूशखबर देतो, ज्याचे नाव यहया आहे. आम्ही त्यांच्यापूर्वी या नावासारखे नाव कोणालाही दिले नाही.

قَالَ رَبِّ أَنَّىٰ یَكُونُ لِی غُلَـٰمࣱ وَكَانَتِ ٱمۡرَأَتِی عَاقِرࣰا وَقَدۡ بَلَغۡتُ مِنَ ٱلۡكِبَرِ عِتِیࣰّا ﴿8﴾

८. (जकरिया) म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! मला पुत्र कसा बरे होईल, माझी पत्नी वांझ आणि मी स्वतः म्हातारपणाच्या अतिशय कमकुवत अवस्थेस पोहोचलो आहे.

قَالَ كَذَ ٰ⁠لِكَ قَالَ رَبُّكَ هُوَ عَلَیَّ هَیِّنࣱ وَقَدۡ خَلَقۡتُكَ مِن قَبۡلُ وَلَمۡ تَكُ شَیۡـࣰٔا ﴿9﴾

९. आदेश झाला की (वायदा) अशाच प्रकारे पूर्ण झाला. तुमच्या पालनकर्त्याने फर्माविले आहे की माझ्याकरिता तर हे अगदी सोपे आहे आणि तुम्ही स्वतः जेव्हा काहीच नव्हता, मी तुम्हाला निर्माण केले आहे.

قَالَ رَبِّ ٱجۡعَل لِّیۤ ءَایَةࣰۖ قَالَ ءَایَتُكَ أَلَّا تُكَلِّمَ ٱلنَّاسَ ثَلَـٰثَ لَیَالࣲ سَوِیࣰّا ﴿10﴾

१०. (जकरिया) म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! माझ्यासाठी एखादी निशाणी निर्धारीत कर, आदेश दिला की तुमच्यासाठी निशाणी ही की प्रकृती धडधाकट असतानाही तुम्ही तीन रात्री पर्यंत कोणत्याही माणसाशी बोलू शकणार नाहीत.

فَخَرَجَ عَلَىٰ قَوۡمِهِۦ مِنَ ٱلۡمِحۡرَابِ فَأَوۡحَىٰۤ إِلَیۡهِمۡ أَن سَبِّحُوا۟ بُكۡرَةࣰ وَعَشِیࣰّا ﴿11﴾

११. आता जकरिया आपल्या खोली (हुजऱ्या) च्या बाहेर येऊन आपल्या जनसमूहाजवळ येऊन त्यांना इशारा करतात की तुम्ही सकाळ-संध्याकाळ अल्लाहची पवित्रता वर्णन करा.

یَـٰیَحۡیَىٰ خُذِ ٱلۡكِتَـٰبَ بِقُوَّةࣲۖ وَءَاتَیۡنَـٰهُ ٱلۡحُكۡمَ صَبِیࣰّا ﴿12﴾

१२. हे यहया! (माझ्या) ग्रंथावर आपली पकड मजबूत राखा आणि आम्ही यहयाला बालपणापासूनच ज्ञान प्रदान केले.

وَحَنَانࣰا مِّن لَّدُنَّا وَزَكَوٰةࣰۖ وَكَانَ تَقِیࣰّا ﴿13﴾

१३. आणि आपल्याकडून दया-कृपा आणि पवित्रता देखील, तो अल्लाहचे भय राखून वागणारा मनुष्य होता.

وَبَرَّۢا بِوَ ٰ⁠لِدَیۡهِ وَلَمۡ یَكُن جَبَّارًا عَصِیࣰّا ﴿14﴾

१४. आणि आपल्या माता-पित्याशी नेक-सदाचारी होता, तो कठोर आणि गुन्हेगार नव्हता.

وَسَلَـٰمٌ عَلَیۡهِ یَوۡمَ وُلِدَ وَیَوۡمَ یَمُوتُ وَیَوۡمَ یُبۡعَثُ حَیࣰّا ﴿15﴾

१५. त्याच्यावर सलामती आहे, ज्या दिवशी त्याने जन्म घेतला आणि ज्या दिवशी तो मरण पावेल, आणि ज्या दिवशी तो जिवंत करून उठविला जाईल.

وَٱذۡكُرۡ فِی ٱلۡكِتَـٰبِ مَرۡیَمَ إِذِ ٱنتَبَذَتۡ مِنۡ أَهۡلِهَا مَكَانࣰا شَرۡقِیࣰّا ﴿16﴾

१६. या ग्रंथात मरियमच्या वृत्तांताचाही उल्लेख करा, जेव्हा त्यांनी आपल्या कुटुंबाच्या लोकांपासून वेगळे होऊन पूर्वेकडे एकांतवास पत्करला.

فَٱتَّخَذَتۡ مِن دُونِهِمۡ حِجَابࣰا فَأَرۡسَلۡنَاۤ إِلَیۡهَا رُوحَنَا فَتَمَثَّلَ لَهَا بَشَرࣰا سَوِیࣰّا ﴿17﴾

१७. आणि त्या लोकांपासून आड-पडदा केला, मग आम्ही तिच्याजवळ आपला आत्मा (जिब्रील अले.) पाठविला, तर तो तिच्यासमोर संपूर्ण मानव रूपात प्रकट झाला.

قَالَتۡ إِنِّیۤ أَعُوذُ بِٱلرَّحۡمَـٰنِ مِنكَ إِن كُنتَ تَقِیࣰّا ﴿18﴾

१८. ती म्हणाली, मी तुझ्यापासून रहमान (दयावान अल्लाह) चे शरण मागते, जर तू थोडासाही अल्लाहचे भय राखणारा आहेस.

قَالَ إِنَّمَاۤ أَنَا۠ رَسُولُ رَبِّكِ لِأَهَبَ لَكِ غُلَـٰمࣰا زَكِیࣰّا ﴿19﴾

१९. तो म्हणाला, मी अल्लाहतर्फे पाठविला गेलेला रसूल (प्रेषित) आहे, तुला एक पवित्र पुत्र देण्यासाठी आलो आहे.

قَالَتۡ أَنَّىٰ یَكُونُ لِی غُلَـٰمࣱ وَلَمۡ یَمۡسَسۡنِی بَشَرࣱ وَلَمۡ أَكُ بَغِیࣰّا ﴿20﴾

२०. ती म्हणाली, मला पुत्र कसा बरे होऊ शकतो? मला तर एखाद्या पुरुषाचा हात देखील लागला नाही, आणि ना मी दुराचारी आहे.

قَالَ كَذَ ٰ⁠لِكِ قَالَ رَبُّكِ هُوَ عَلَیَّ هَیِّنࣱۖ وَلِنَجۡعَلَهُۥۤ ءَایَةࣰ لِّلنَّاسِ وَرَحۡمَةࣰ مِّنَّاۚ وَكَانَ أَمۡرࣰا مَّقۡضِیࣰّا ﴿21﴾

२१. तो म्हणाला, फर्मान तर हेच आहे. (परंतु) तुमच्या पालनकर्त्याचा आदेश आहे की ते माझ्यासाठी फारच सोपे आहे. आम्ही तर त्याला लोकांसाठी एक निशाणी१ बनवू आणि आपली खास दया ही तर एक निश्चित अशी गोष्ट आहे.

۞ فَحَمَلَتۡهُ فَٱنتَبَذَتۡ بِهِۦ مَكَانࣰا قَصِیࣰّا ﴿22﴾

२२. मग ती गर्भवती झाली आणि याच कारणास्तव ती एकाग्रचित्त होऊन एका दूरच्या ठिकाणी निघून गेली.

فَأَجَاۤءَهَا ٱلۡمَخَاضُ إِلَىٰ جِذۡعِ ٱلنَّخۡلَةِ قَالَتۡ یَـٰلَیۡتَنِی مِتُّ قَبۡلَ هَـٰذَا وَكُنتُ نَسۡیࣰا مَّنسِیࣰّا ﴿23﴾

२३. मग प्रसव-पीडा तिला एका खजूरीच्या झाडाखाली घेऊन आली आणि तिच्या तोंडून निघाले, अरेरे! मी यापूर्वी मेली असती आणि लोकांना माझा अगदी विसर पडला असता.

فَنَادَىٰهَا مِن تَحۡتِهَاۤ أَلَّا تَحۡزَنِی قَدۡ جَعَلَ رَبُّكِ تَحۡتَكِ سَرِیࣰّا ﴿24﴾

२४. तेवढ्यात तिला उताराकडून हाक ऐकू आली की, निराश होऊ नकोस, तुझ्या पालनकर्त्याने तुझ्या पायाखाली एक झरा प्रवाहीत केला आहे.

وَهُزِّیۤ إِلَیۡكِ بِجِذۡعِ ٱلنَّخۡلَةِ تُسَـٰقِطۡ عَلَیۡكِ رُطَبࣰا جَنِیࣰّا ﴿25﴾

२५. आणि त्या खजुरीच्या झाडाच्या फांदीला आपल्याकडे हलव. ती तुझ्यासमोर ताज्या पिकलेल्या खजुरी पाडील.

فَكُلِی وَٱشۡرَبِی وَقَرِّی عَیۡنࣰاۖ فَإِمَّا تَرَیِنَّ مِنَ ٱلۡبَشَرِ أَحَدࣰا فَقُولِیۤ إِنِّی نَذَرۡتُ لِلرَّحۡمَـٰنِ صَوۡمࣰا فَلَنۡ أُكَلِّمَ ٱلۡیَوۡمَ إِنسِیࣰّا ﴿26﴾

२६. आता निर्धास्त होऊन खा आणि पी आणि डोळे थंड राख, जर तुला एखादा मनुष्य दिसला तर सांग की मी दयावान अल्लाहच्या नावाने रोजा (उपवास) ठेवला आहे. आज मी कोणत्याही माणसाशी बोलणार नाही.

فَأَتَتۡ بِهِۦ قَوۡمَهَا تَحۡمِلُهُۥۖ قَالُوا۟ یَـٰمَرۡیَمُ لَقَدۡ جِئۡتِ شَیۡـࣰٔا فَرِیࣰّا ﴿27﴾

२७. आता (हजरत ईसा) यांना घेऊन ती आपल्या लोकांमध्ये आली. सर्वजण म्हणाले, मरियम, तू मोठे वाईट कृत्य केलेस.

یَـٰۤأُخۡتَ هَـٰرُونَ مَا كَانَ أَبُوكِ ٱمۡرَأَ سَوۡءࣲ وَمَا كَانَتۡ أُمُّكِ بَغِیࣰّا ﴿28﴾

२८. हे हारुनच्या बहिणी! ना तर तुझा पिता वाईट माणूस होता, आणि ना तुझी आई दुराचारी होती.

فَأَشَارَتۡ إِلَیۡهِۖ قَالُوا۟ كَیۡفَ نُكَلِّمُ مَن كَانَ فِی ٱلۡمَهۡدِ صَبِیࣰّا ﴿29﴾

२९. (मरियमने) आपल्या बाळाकडे इशारा केला, सर्व म्हणू लागले, आता कुशीत असलेल्या बाळाशी आम्ही बोलणार तरी कसे.

قَالَ إِنِّی عَبۡدُ ٱللَّهِ ءَاتَىٰنِیَ ٱلۡكِتَـٰبَ وَجَعَلَنِی نَبِیࣰّا ﴿30﴾

३०. (बाळ) उद्‌गारले, मी सर्वश्रेष्ठ अल्लाहचा दास आहे. त्याने मला ग्रंथ प्रदान केला आहे आणि मला आपला पैगंबर (दूत) बनविले आहे.

وَجَعَلَنِی مُبَارَكًا أَیۡنَ مَا كُنتُ وَأَوۡصَـٰنِی بِٱلصَّلَوٰةِ وَٱلزَّكَوٰةِ مَا دُمۡتُ حَیࣰّا ﴿31﴾

३१. आणि त्याने मला शुभ मंगलदायी बनविले आहे, जिथे देखील मी राहीन आणि जोपर्यंत मी जिवंत राहीन तोपर्यंत त्याने मला नमाज आणि जकातचा आदेश दिला आहे.

وَبَرَّۢا بِوَ ٰ⁠لِدَتِی وَلَمۡ یَجۡعَلۡنِی جَبَّارࣰا شَقِیࣰّا ﴿32﴾

३२. आणि त्याने मला आपल्या मातेचा सेवक बनविले आहे आणि मला कठोर आणि दुर्दैवी केले नाही.

وَٱلسَّلَـٰمُ عَلَیَّ یَوۡمَ وُلِدتُّ وَیَوۡمَ أَمُوتُ وَیَوۡمَ أُبۡعَثُ حَیࣰّا ﴿33﴾

३३. आणि माझ्यावर माझ्या जन्माच्या दिवशी आणि माझ्या मृत्युच्या दिवशी आणि ज्या दिवशी मी दुसऱ्यांदा उभा केला जाईन, माझ्यावर शांती-सलामती आहे.

ذَ ٰ⁠لِكَ عِیسَى ٱبۡنُ مَرۡیَمَۖ قَوۡلَ ٱلۡحَقِّ ٱلَّذِی فِیهِ یَمۡتَرُونَ ﴿34﴾

३४. ही आहे सच्ची कहाणी मरियमचा पुत्र ईसाची. हीच ती सत्य गोष्टहोय, ज्याबाबत लोक संशयात पडले आहेत.

مَا كَانَ لِلَّهِ أَن یَتَّخِذَ مِن وَلَدࣲۖ سُبۡحَـٰنَهُۥۤۚ إِذَا قَضَىٰۤ أَمۡرࣰا فَإِنَّمَا یَقُولُ لَهُۥ كُن فَیَكُونُ ﴿35﴾

३५. अल्लाहकरिता संतती असणे उचित नाही तो तर अतिशय पवित्र आहे तो जेव्हा एखाद्या कामाचा संकल्प करतो तेव्हा त्यासाठी म्हणतो होऊन जा आणि त्या क्षणी ते घडून येते.

وَإِنَّ ٱللَّهَ رَبِّی وَرَبُّكُمۡ فَٱعۡبُدُوهُۚ هَـٰذَا صِرَ ٰ⁠طࣱ مُّسۡتَقِیمࣱ ﴿36﴾

३६. आणि माझा आणि तुम्हा सर्वांचा पालनकर्ता अल्लाहच आहे. तेव्हा तुम्ही सर्व त्याचीच उपासना करा, हाच सरळ मार्ग आहे.

فَٱخۡتَلَفَ ٱلۡأَحۡزَابُ مِنۢ بَیۡنِهِمۡۖ فَوَیۡلࣱ لِّلَّذِینَ كَفَرُوا۟ مِن مَّشۡهَدِ یَوۡمٍ عَظِیمٍ ﴿37﴾

३७. मग (हे) गट आपसात मतभेद करू लागले. तथापि काफिरांसाठी दुःख आहे एका भयंकर दिवसाच्या येण्याने.

أَسۡمِعۡ بِهِمۡ وَأَبۡصِرۡ یَوۡمَ یَأۡتُونَنَاۖ لَـٰكِنِ ٱلظَّـٰلِمُونَ ٱلۡیَوۡمَ فِی ضَلَـٰلࣲ مُّبِینࣲ ﴿38﴾

३८. किती चांगले पाहणारे ऐकणारे असतील त्या दिवशी, जेव्हा आमच्यासमोर हजर होतील, परंतु आज तर हे अत्याचारी लोक उघड अशा मार्गभ्रष्टतेत पडले आहेत.

وَأَنذِرۡهُمۡ یَوۡمَ ٱلۡحَسۡرَةِ إِذۡ قُضِیَ ٱلۡأَمۡرُ وَهُمۡ فِی غَفۡلَةࣲ وَهُمۡ لَا یُؤۡمِنُونَ ﴿39﴾

३९. आणि तुम्ही त्यांना या दुःख आणि निराशेच्या दिवसाचे भय ऐकवा जेव्हा कार्य पूर्णत्वास पोहचविले जाईल आणि हे लोक गफलतीत आणि बेईमानीतच पडून राहतील.

إِنَّا نَحۡنُ نَرِثُ ٱلۡأَرۡضَ وَمَنۡ عَلَیۡهَا وَإِلَیۡنَا یُرۡجَعُونَ ﴿40﴾

४०. निःसंशय, धरतीचे आणि धरतीवर राहणाऱ्यांचे वारस आम्हीच असणार आणि समस्त लोक आमच्याचकडे परतवून आणले जातील.

وَٱذۡكُرۡ فِی ٱلۡكِتَـٰبِ إِبۡرَ ٰ⁠هِیمَۚ إِنَّهُۥ كَانَ صِدِّیقࣰا نَّبِیًّا ﴿41﴾

४१. या ग्रंथात इब्राहीम (च्या वृत्तांता) चा उल्लेख करा. निःसंशय ते मोठे सच्चे पैगंबर (ईशदूत) होते.

إِذۡ قَالَ لِأَبِیهِ یَـٰۤأَبَتِ لِمَ تَعۡبُدُ مَا لَا یَسۡمَعُ وَلَا یُبۡصِرُ وَلَا یُغۡنِی عَنكَ شَیۡـࣰٔا ﴿42﴾

४२. जेव्हा ते आपल्या पित्यास म्हणाले, हे पिता! तुम्ही अशांची उपासना का करीत आहात जे ना ऐकू शकतील, ना पाहू शकतील आणि ना तुम्हाला कसलाही लाभ पोहचवू शकतील.

یَـٰۤأَبَتِ إِنِّی قَدۡ جَاۤءَنِی مِنَ ٱلۡعِلۡمِ مَا لَمۡ یَأۡتِكَ فَٱتَّبِعۡنِیۤ أَهۡدِكَ صِرَ ٰ⁠طࣰا سَوِیࣰّا ﴿43﴾

४३. हे (माझ्या प्रिय) पिता! (तुम्ही पाहा) माझ्याजवळ ते ज्ञान आले आहे जे तुमच्याजवळ आलेच नाही, तेव्हा तुम्ही माझेच म्हणणे मान्य करा मी अगदी सरळ मार्गाकडे तुमचे मार्गदर्शन करीन.

یَـٰۤأَبَتِ لَا تَعۡبُدِ ٱلشَّیۡطَـٰنَۖ إِنَّ ٱلشَّیۡطَـٰنَ كَانَ لِلرَّحۡمَـٰنِ عَصِیࣰّا ﴿44﴾

४४. हे माझ्या पित्या! तुम्ही सैतानाची उपासना करण्यापासून थांबा सैतान तर दयाळू आणि कृपाळू अल्लाहची खूप अवज्ञा करणारा आहे.

یَـٰۤأَبَتِ إِنِّیۤ أَخَافُ أَن یَمَسَّكَ عَذَابࣱ مِّنَ ٱلرَّحۡمَـٰنِ فَتَكُونَ لِلشَّیۡطَـٰنِ وَلِیࣰّا ﴿45﴾

४५. हे पिता! मला भय वाटते की कदाचित तुमच्यावर अल्लाहची एखादी शिक्षा यातना न येऊन कोसळावी की (ज्यामुळे) तुम्ही सैतानाचे मित्र बनावे.

قَالَ أَرَاغِبٌ أَنتَ عَنۡ ءَالِهَتِی یَـٰۤإِبۡرَ ٰ⁠هِیمُۖ لَىِٕن لَّمۡ تَنتَهِ لَأَرۡجُمَنَّكَۖ وَٱهۡجُرۡنِی مَلِیࣰّا ﴿46﴾

४६. (पित्याने) उत्तर दिले, हे इब्राहीम! काय तू आमच्या उपास्यांपासून तोंड फिरवित आहेस? (ऐक) जर तू असे करणे थांबविले नाही तर मी तुला दगडांनी (ठेचून) मारुन टाकीन, जा एका दीर्घ मुदतापर्यंत माझ्यापासून वेगळाच राहा.

قَالَ سَلَـٰمٌ عَلَیۡكَۖ سَأَسۡتَغۡفِرُ لَكَ رَبِّیۤۖ إِنَّهُۥ كَانَ بِی حَفِیࣰّا ﴿47﴾

४७. (इब्राहीम) म्हणाले, ठीक आहे. सलाम असो तुमच्यावर मी तर आपल्या पालनकर्त्याजवळ तुमच्यासाठी माफीची दुआ (प्रार्थना) करीत राहीन. तो माझ्यावर अतिशय जास्त मेहरबानी करीत आहे.

وَأَعۡتَزِلُكُمۡ وَمَا تَدۡعُونَ مِن دُونِ ٱللَّهِ وَأَدۡعُوا۟ رَبِّی عَسَىٰۤ أَلَّاۤ أَكُونَ بِدُعَاۤءِ رَبِّی شَقِیࣰّا ﴿48﴾

४८. आणि मी तर तुम्हालाही आणि ज्यांना ज्यांना तुम्ही अल्लाहशिवाय पुकारता त्यांना (सर्वांना) ही सोडत आहे. मी फक्त आपल्या पालनकर्त्याला पुकारित राहीन. मला पूर्ण विश्वास आहे की मी आपल्या पालनकर्त्याजवळ दुआ (प्रार्थना) करण्यात असफल राहणार नाही.

فَلَمَّا ٱعۡتَزَلَهُمۡ وَمَا یَعۡبُدُونَ مِن دُونِ ٱللَّهِ وَهَبۡنَا لَهُۥۤ إِسۡحَـٰقَ وَیَعۡقُوبَۖ وَكُلࣰّا جَعَلۡنَا نَبِیࣰّا ﴿49﴾

४९. जेव्हा (इब्राहीम यांनी) त्या सर्वांचा आणि अल्लाहशिवाय त्यांच्या सर्व उपास्यांचा त्याग केला, तेव्हा आम्ही त्यांना इसहाक आणि याकूब प्रदान केले आणि प्रत्येकाला पैगंबर बनविले.

وَوَهَبۡنَا لَهُم مِّن رَّحۡمَتِنَا وَجَعَلۡنَا لَهُمۡ لِسَانَ صِدۡقٍ عَلِیࣰّا ﴿50﴾

५०. आणि त्या सर्वांना आम्ही आपली भरपूर दया-कृपा प्रदान केली आणि आम्ही त्यांच्या सच्चा वायद्याला बुलंद दर्जा दिला.

وَٱذۡكُرۡ فِی ٱلۡكِتَـٰبِ مُوسَىٰۤۚ إِنَّهُۥ كَانَ مُخۡلَصࣰا وَكَانَ رَسُولࣰا نَّبِیࣰّا ﴿51﴾

५१. या ग्रंथात मूसाचाही उल्लेख करा, जो निवडलेला आणि रसूल आणि नबी (पैगंबर) होता.

وَنَـٰدَیۡنَـٰهُ مِن جَانِبِ ٱلطُّورِ ٱلۡأَیۡمَنِ وَقَرَّبۡنَـٰهُ نَجِیࣰّا ﴿52﴾

५२. आम्ही त्यांना (मूसाला) तूर पर्वताच्या उजव्या किनाऱ्याकडून पुकारले आणि कानगोष्टी करीत त्यांना जवळ केले.

وَوَهَبۡنَا لَهُۥ مِن رَّحۡمَتِنَاۤ أَخَاهُ هَـٰرُونَ نَبِیࣰّا ﴿53﴾

५३. आणि आपल्या विशेष दया-कृपेने त्यांचा भाऊ हारुन यांनाही पैगंबर पद प्रदान केले.

وَٱذۡكُرۡ فِی ٱلۡكِتَـٰبِ إِسۡمَـٰعِیلَۚ إِنَّهُۥ كَانَ صَادِقَ ٱلۡوَعۡدِ وَكَانَ رَسُولࣰا نَّبِیࣰّا ﴿54﴾

५४. आणि या ग्रंथात इस्माईल (च्या वृत्तांता) चाही उल्लेख करा. ते वायद्याचे मोठे पक्के होते आणि ते देखील रसूल आणि नबी होते.

وَكَانَ یَأۡمُرُ أَهۡلَهُۥ بِٱلصَّلَوٰةِ وَٱلزَّكَوٰةِ وَكَانَ عِندَ رَبِّهِۦ مَرۡضِیࣰّا ﴿55﴾

५५. आणि ते आपल्या कुटुंबियांना सतत नमाज आणि जकात (धर्मदाना) चा आदेश देत असत आणि ते आपल्या पालनकर्त्याच्या दरबारात प्रिय आणि पसंत केले गेलेले होते.

وَٱذۡكُرۡ فِی ٱلۡكِتَـٰبِ إِدۡرِیسَۚ إِنَّهُۥ كَانَ صِدِّیقࣰا نَّبِیࣰّا ﴿56﴾

५६. आणि या ग्रंथात इदरीसचाही उल्लेख करा ते देखील एक सच्चे पैगंबर होते.

وَرَفَعۡنَـٰهُ مَكَانًا عَلِیًّا ﴿57﴾

५७. आम्ही त्यांना मोठे उच्च स्थान प्रदान केले.

أُو۟لَـٰۤىِٕكَ ٱلَّذِینَ أَنۡعَمَ ٱللَّهُ عَلَیۡهِم مِّنَ ٱلنَّبِیِّـۧنَ مِن ذُرِّیَّةِ ءَادَمَ وَمِمَّنۡ حَمَلۡنَا مَعَ نُوحࣲ وَمِن ذُرِّیَّةِ إِبۡرَ ٰ⁠هِیمَ وَإِسۡرَ ٰ⁠ۤءِیلَ وَمِمَّنۡ هَدَیۡنَا وَٱجۡتَبَیۡنَاۤۚ إِذَا تُتۡلَىٰ عَلَیۡهِمۡ ءَایَـٰتُ ٱلرَّحۡمَـٰنِ خَرُّوا۟ سُجَّدࣰا وَبُكِیࣰّا ۩ ﴿58﴾

५८. हेच ते पैगंबर होते, ज्यांच्यावर सर्वश्रेष्ठ अल्लाहने दया आणि कृपा केली, जे आदमच्या संततीपैकी आहेत आणि त्या लोकांचे वंशज आहेत, ज्यांना आम्ही नूह यांच्यासोबत नौकेत स्वार केले होते आणि इब्राहीम आणि याकूबच्या संततीपैकी आणि आमच्यातर्फे मार्गदर्शन लाभलेले आणि आमच्या प्रिय लोकांपैकी. यांच्यासमोर जेव्हा अतिशय दयावान अल्लाहच्या आयतींचे पठण केले जात असे, ते सजदा करीत आणि खूप रडत व गयावया करीत खाली पडत असत.

۞ فَخَلَفَ مِنۢ بَعۡدِهِمۡ خَلۡفٌ أَضَاعُوا۟ ٱلصَّلَوٰةَ وَٱتَّبَعُوا۟ ٱلشَّهَوَ ٰ⁠تِۖ فَسَوۡفَ یَلۡقَوۡنَ غَیًّا ﴿59﴾

५९. पुढे त्यांच्यानंतर असे कुपुत्र जन्मास आले की त्यांनी नमाज बरबाद केली आणि मनाच्या इच्छा-आकांक्षांच्या मागे लागले. यास्तव त्यांचे नुकसान त्यांच्यासमोर येईल.

إِلَّا مَن تَابَ وَءَامَنَ وَعَمِلَ صَـٰلِحࣰا فَأُو۟لَـٰۤىِٕكَ یَدۡخُلُونَ ٱلۡجَنَّةَ وَلَا یُظۡلَمُونَ شَیۡـࣰٔا ﴿60﴾

६०. मात्र त्यांच्याखेरीज, जे माफी मागतील आणि ईमान राखतील आणि सत्कर्मे करतील असे लोक जन्नतमध्ये दाखल होतील आणि त्यांच्या हक्कांना किंचितही नुकसान पोहचविले जाणार नाही.

جَنَّـٰتِ عَدۡنٍ ٱلَّتِی وَعَدَ ٱلرَّحۡمَـٰنُ عِبَادَهُۥ بِٱلۡغَیۡبِۚ إِنَّهُۥ كَانَ وَعۡدُهُۥ مَأۡتِیࣰّا ﴿61﴾

६१. नेहमी कायम राहणाऱ्या जन्नतींमध्ये ज्यांच्या अपरोक्ष वायदा दयावान अल्लाहने आपल्या दासांना दिला आहे. निःसंशय, त्याचा वायदा पूर्ण झाल्याविना राहणार नाही.

لَّا یَسۡمَعُونَ فِیهَا لَغۡوًا إِلَّا سَلَـٰمࣰاۖ وَلَهُمۡ رِزۡقُهُمۡ فِیهَا بُكۡرَةࣰ وَعَشِیࣰّا ﴿62﴾

६२. त्यांना तिथे कोणतीही व्यर्थ गोष्ट ऐकायला मिळणार नाही, ते फक्त सलामच, सलाम ऐकतील त्यांच्यासाठी सकाळ-संध्याकाळ त्यांची रोजी (अन्न-सामुग्री) असेल.१

تِلۡكَ ٱلۡجَنَّةُ ٱلَّتِی نُورِثُ مِنۡ عِبَادِنَا مَن كَانَ تَقِیࣰّا ﴿63﴾

६३. ही आहे ती जन्नत जिचा वारस आम्ही आपल्या दासांपैकी अशांना बनवितो, जे अल्लाहचे भय बाळगतात.

وَمَا نَتَنَزَّلُ إِلَّا بِأَمۡرِ رَبِّكَۖ لَهُۥ مَا بَیۡنَ أَیۡدِینَا وَمَا خَلۡفَنَا وَمَا بَیۡنَ ذَ ٰ⁠لِكَۚ وَمَا كَانَ رَبُّكَ نَسِیࣰّا ﴿64﴾

६४. आम्ही तुमच्या पालनकर्त्याच्या आदेशाविना उतरुच शकत नाही, आमच्या पुढे-मागे आणि त्या दरम्यानच्या समस्त वस्तू त्याच्याच अधिकारात आहेत आणि तुमचा पालनकर्ता विसरणारा नाही.

رَّبُّ ٱلسَّمَـٰوَ ٰ⁠تِ وَٱلۡأَرۡضِ وَمَا بَیۡنَهُمَا فَٱعۡبُدۡهُ وَٱصۡطَبِرۡ لِعِبَـٰدَتِهِۦۚ هَلۡ تَعۡلَمُ لَهُۥ سَمِیࣰّا ﴿65﴾

६५. आकाशांचा आणि जमिनीचा आणि जे काही त्यांच्या दरम्यान आहे त्या सर्वांचा तोच स्वामी आणि पानलहार आहे. तुम्ही त्याचीच उपासना करा आणि त्याच्या उपासनेवर दृढ-मजबूत व्हा. काय तुमच्या माहितीत त्याच्यासारखे नाव असलेला (आणि बरोबरीचा) आणखी कोणी आहे?

وَیَقُولُ ٱلۡإِنسَـٰنُ أَءِذَا مَا مِتُّ لَسَوۡفَ أُخۡرَجُ حَیًّا ﴿66﴾

६६. आणि मनुष्य म्हणतो की जेव्हा मी मरण पावेल, तर काय पुन्हा जिवंत करून बाहेर काढला जाईन?

أَوَلَا یَذۡكُرُ ٱلۡإِنسَـٰنُ أَنَّا خَلَقۡنَـٰهُ مِن قَبۡلُ وَلَمۡ یَكُ شَیۡـࣰٔا ﴿67﴾

६७. काय हा मनुष्य एवढेही स्मरणात राखत नाही की आम्ही त्याला याच्यापूर्वी निर्माण केले, वास्तविक तो काहीच नव्हता.

فَوَرَبِّكَ لَنَحۡشُرَنَّهُمۡ وَٱلشَّیَـٰطِینَ ثُمَّ لَنُحۡضِرَنَّهُمۡ حَوۡلَ جَهَنَّمَ جِثِیࣰّا ﴿68﴾

६८. तुमच्या पालनकर्त्याची शपथ! आम्ही त्यांना आणि सैतानांना एकत्रित करून निश्चितच जहन्नमच्या चोहीबाजूला गुडघे टेकलेल्या अवस्थेत हजर करू.

ثُمَّ لَنَنزِعَنَّ مِن كُلِّ شِیعَةٍ أَیُّهُمۡ أَشَدُّ عَلَى ٱلرَّحۡمَـٰنِ عِتِیࣰّا ﴿69﴾

६९. मग आम्ही प्रत्येक समूहापासून त्यांना वेगळे काढून उभे करू, जे अतिशय दयावान अल्लाहपासून मोठी अकड दाखवित फिरत होते.

ثُمَّ لَنَحۡنُ أَعۡلَمُ بِٱلَّذِینَ هُمۡ أَوۡلَىٰ بِهَا صِلِیࣰّا ﴿70﴾

७०. मग आम्ही त्यांनाही चांगल्या प्रकारे जाणतो, जे जहन्नममध्ये दाखल होण्यास जास्त पात्र आहेत.

وَإِن مِّنكُمۡ إِلَّا وَارِدُهَاۚ كَانَ عَلَىٰ رَبِّكَ حَتۡمࣰا مَّقۡضِیࣰّا ﴿71﴾

७१. आणि तुमच्यापैकी प्रत्येकजण तिथे निश्चित हजर होणार आहे. हा तुमच्या पालनकर्त्याचा अगदी अटळ फैसला आहे.

ثُمَّ نُنَجِّی ٱلَّذِینَ ٱتَّقَوا۟ وَّنَذَرُ ٱلظَّـٰلِمِینَ فِیهَا جِثِیࣰّا ﴿72﴾

७२. मग आम्ही, आमचे भय राखून दुराचारापासून दूर राहणाऱ्यांना वाचवून घेऊ आणि जुलूम अत्याचार करणाऱ्यांना त्यातच गुडघे टेकलेल्या अवस्थेत खाली पडलेले सोडू.१

وَإِذَا تُتۡلَىٰ عَلَیۡهِمۡ ءَایَـٰتُنَا بَیِّنَـٰتࣲ قَالَ ٱلَّذِینَ كَفَرُوا۟ لِلَّذِینَ ءَامَنُوۤا۟ أَیُّ ٱلۡفَرِیقَیۡنِ خَیۡرࣱ مَّقَامࣰا وَأَحۡسَنُ نَدِیࣰّا ﴿73﴾

७३. आणि जेव्हा त्यांच्यासमोर आमच्या साफ आणि स्पष्ट आयतींचे पठण केले जाते, तेव्हा काफिर लोक मुसलमानांना म्हणतात, (सांगा) आमच्या-तुमच्यात कोणाचा मान-मर्तबा मोठा आहे आणि कोणाची सभा शानदार आहे?

وَكَمۡ أَهۡلَكۡنَا قَبۡلَهُم مِّن قَرۡنٍ هُمۡ أَحۡسَنُ أَثَـٰثࣰا وَرِءۡیࣰا ﴿74﴾

७४. आणि आम्ही तर त्यांच्यापूर्वी अनेक जनसमूहांना नष्ट केले आहे जे साधनसामुग्री आणि नावलौकिकात यांच्याहून खूप मोठे होते.

قُلۡ مَن كَانَ فِی ٱلضَّلَـٰلَةِ فَلۡیَمۡدُدۡ لَهُ ٱلرَّحۡمَـٰنُ مَدًّاۚ حَتَّىٰۤ إِذَا رَأَوۡا۟ مَا یُوعَدُونَ إِمَّا ٱلۡعَذَابَ وَإِمَّا ٱلسَّاعَةَ فَسَیَعۡلَمُونَ مَنۡ هُوَ شَرࣱّ مَّكَانࣰا وَأَضۡعَفُ جُندࣰا ﴿75﴾

७५. सांगा, जो मार्गभ्रष्टतेत असतो, दयावान अल्लाह त्याला खूप दीर्घ संधी देतो, येथपर्यंत की त्याने त्या गोष्टी पाहून घ्याव्यात, ज्यांच्याविषयी वायदे केले जात आहेत, अर्थात अल्लाहतर्फे शिक्षा-यातना किंवा कयामतला त्या वेळी त्यांना चांगल्या प्रकारे कळून येईल की कोण वाईट पदाचा आहे आणि कोणाचा जथा(समूह) कमकुवत आहे.

وَیَزِیدُ ٱللَّهُ ٱلَّذِینَ ٱهۡتَدَوۡا۟ هُدࣰىۗ وَٱلۡبَـٰقِیَـٰتُ ٱلصَّـٰلِحَـٰتُ خَیۡرٌ عِندَ رَبِّكَ ثَوَابࣰا وَخَیۡرࣱ مَّرَدًّا ﴿76﴾

७६. आणि मार्गदर्शन लाभलेल्या लोकांच्या मार्गदर्शनात अल्लाह आणखी भर टाकतो, आणि बाकी राहणारी नेकी (सत्कर्म) तुमच्या पालनकर्त्याजवळ मोबदल्याच्या दृष्टीने आणि परिणामाच्या दृष्टीने फारच चांगली आहे.

أَفَرَءَیۡتَ ٱلَّذِی كَفَرَ بِـَٔایَـٰتِنَا وَقَالَ لَأُوتَیَنَّ مَالࣰا وَوَلَدًا ﴿77﴾

७७. काय तुम्ही त्यालाही पाहिले, ज्याने आमच्या आयतींशी कुप्र (इन्कार) केला आणि म्हणाला की मला तर धन आणि संतती अवश्य दिली जाईल.

أَطَّلَعَ ٱلۡغَیۡبَ أَمِ ٱتَّخَذَ عِندَ ٱلرَّحۡمَـٰنِ عَهۡدࣰا ﴿78﴾

७८. काय तो अपरोक्ष ज्ञान राखतो किंवा अल्लाहकडून त्याने एखादे वचन घेतले आहे?

كَلَّاۚ سَنَكۡتُبُ مَا یَقُولُ وَنَمُدُّ لَهُۥ مِنَ ٱلۡعَذَابِ مَدࣰّا ﴿79﴾

७९. मुळीच नाही हा जे काही बोलत आहे, ते आम्ही अवश्य लिहून घेऊ आणि त्यांच्यासाठी अज़ाब (शिक्षा-यातना) वाढवत जाऊ.

وَنَرِثُهُۥ مَا یَقُولُ وَیَأۡتِینَا فَرۡدࣰا ﴿80﴾

८०. आणि हा ज्या वस्तूंबाबत बोलत आहे, त्या आम्ही त्याच्या पश्चात घेऊन टाकू आणि हा एकटाच आमच्या समोर हजर होईल.

وَٱتَّخَذُوا۟ مِن دُونِ ٱللَّهِ ءَالِهَةࣰ لِّیَكُونُوا۟ لَهُمۡ عِزࣰّا ﴿81﴾

८१. त्यांनी अल्लाहखेरीज इतर देवता (उपास्ये) बनवून ठेवली आहेत की ते त्यांच्यासाठी सन्मानाचे कारण ठरोत.

كَلَّاۚ سَیَكۡفُرُونَ بِعِبَادَتِهِمۡ وَیَكُونُونَ عَلَیۡهِمۡ ضِدًّا ﴿82﴾

८२. असे कदापि होणार नाही. ते तर यांच्या उपासनेचाच इन्कार करतील आणि उलट यांचे शत्रू बनतील.

أَلَمۡ تَرَ أَنَّاۤ أَرۡسَلۡنَا ٱلشَّیَـٰطِینَ عَلَى ٱلۡكَـٰفِرِینَ تَؤُزُّهُمۡ أَزࣰّا ﴿83﴾

८३. काय तुम्ही नाही पाहिले की आम्ही काफिरांजवळ सैतानांना पाठवितो जे त्यांना खूप प्रेरित करतात.

فَلَا تَعۡجَلۡ عَلَیۡهِمۡۖ إِنَّمَا نَعُدُّ لَهُمۡ عَدࣰّا ﴿84﴾

८४. तुम्ही त्यांच्या बाबतीत घाई करू नका. आम्ही तर स्वतःच त्यांची कालगणना करीत आहोत.

یَوۡمَ نَحۡشُرُ ٱلۡمُتَّقِینَ إِلَى ٱلرَّحۡمَـٰنِ وَفۡدࣰا ﴿85﴾

८५. ज्या दिवशी आम्ही, अल्लाहचे भय राखून दुराचारापासून अलिप्त राहणाऱ्यांना, दयावान अल्लाहचा अतिथी बनवून एकत्र करू.

وَنَسُوقُ ٱلۡمُجۡرِمِینَ إِلَىٰ جَهَنَّمَ وِرۡدࣰا ﴿86﴾

८६. आणि अपराधी लोकांना (अतिशय तहान लागलेल्या अवस्थेत) जहन्नमकडे हाकलत घेऊन जाऊ.

لَّا یَمۡلِكُونَ ٱلشَّفَـٰعَةَ إِلَّا مَنِ ٱتَّخَذَ عِندَ ٱلرَّحۡمَـٰنِ عَهۡدࣰا ﴿87﴾

८७. कोणालाही शिफारस करण्याचा अधिकार नसेल, मात्र त्या लोकांखेरीज, ज्यांनी सर्वश्रेष्ठ अल्लाहकडून एखादे वचन घेऊन ठेवले आहे.

وَقَالُوا۟ ٱتَّخَذَ ٱلرَّحۡمَـٰنُ وَلَدࣰا ﴿88﴾

८८. आणि त्यांचे म्हणणे तर असे आहे की दयावान अल्लाहने देखील संतती करून ठेवली आहे.

لَّقَدۡ جِئۡتُمۡ شَیۡـًٔا إِدࣰّا ﴿89﴾

८९. निःसंशय तुम्ही मोठी (वाईट आणि) भयंकर गोष्ट आणली आहे.

تَكَادُ ٱلسَّمَـٰوَ ٰ⁠تُ یَتَفَطَّرۡنَ مِنۡهُ وَتَنشَقُّ ٱلۡأَرۡضُ وَتَخِرُّ ٱلۡجِبَالُ هَدًّا ﴿90﴾

९०. शक्य आहे की या कथनामुळे आकाश फाटून जाईल आणि धरती दुभंगून जाईल आणि पर्वताचे कण कण होतील.

أَن دَعَوۡا۟ لِلرَّحۡمَـٰنِ وَلَدࣰا ﴿91﴾

९१. की ते रहमान (अल्लाह) ची संतती साबीत करण्यास बसले आहेत.

وَمَا یَنۢبَغِی لِلرَّحۡمَـٰنِ أَن یَتَّخِذَ وَلَدًا ﴿92﴾

९२. आणि रहमान (अल्लाह) साठी हे योग्य नाही की त्याने संतती राखावी.

إِن كُلُّ مَن فِی ٱلسَّمَـٰوَ ٰ⁠تِ وَٱلۡأَرۡضِ إِلَّاۤ ءَاتِی ٱلرَّحۡمَـٰنِ عَبۡدࣰا ﴿93﴾

९३. आकाशांमध्ये आणि जमिनीवर जे काही आहे, सर्व अल्लाहचे दास बनूनच येणार आहेत.

لَّقَدۡ أَحۡصَىٰهُمۡ وَعَدَّهُمۡ عَدࣰّا ﴿94﴾

९४. त्या सर्वांना त्याने घेरून ठेवले आहे आणि सर्वांची पूर्णतः गणनाही करून ठेवली आहे.

وَكُلُّهُمۡ ءَاتِیهِ یَوۡمَ ٱلۡقِیَـٰمَةِ فَرۡدًا ﴿95﴾

९५. हे सर्वच्या सर्व कयामतच्या दिवशी एकटे त्याच्यासमोर हजर होणार आहेत.

إِنَّ ٱلَّذِینَ ءَامَنُوا۟ وَعَمِلُوا۟ ٱلصَّـٰلِحَـٰتِ سَیَجۡعَلُ لَهُمُ ٱلرَّحۡمَـٰنُ وُدࣰّا ﴿96﴾

९६. निःसंशय, ज्या लोकांनी ईमान राखले आहे आणि ज्यांनी सत्कर्मे केली आहेत, त्यांच्याकरिता दयावान अल्लाह प्रेम निर्माण करील.

فَإِنَّمَا یَسَّرۡنَـٰهُ بِلِسَانِكَ لِتُبَشِّرَ بِهِ ٱلۡمُتَّقِینَ وَتُنذِرَ بِهِۦ قَوۡمࣰا لُّدࣰّا ﴿97﴾

९७. आणि (कुरआनाला) तुमच्या भाषेत फार सोपे केले आहे की तुम्ही त्याच्याद्वारे नेक- सदाचारी लोकांना खूशखबर द्यावी आणि भांडखोर लोकांना खबरदार करावे.

وَكَمۡ أَهۡلَكۡنَا قَبۡلَهُم مِّن قَرۡنٍ هَلۡ تُحِسُّ مِنۡهُم مِّنۡ أَحَدٍ أَوۡ تَسۡمَعُ لَهُمۡ رِكۡزَۢا ﴿98﴾

९८. आणि आम्ही याच्यापूर्वी अनेक जमातींना नष्ट केले आहे, काय त्यांच्यापैकी कोणा एकाचाही चाहूल तुम्हाला ऐकू येते किंवा त्यांचा किंचित आवाजही तुमच्या कानी पडतो?