Main pages

یَـٰۤأَیُّهَا ٱلنَّاسُ ٱتَّقُوا۟ رَبَّكُمۡۚ إِنَّ زَلۡزَلَةَ ٱلسَّاعَةِ شَیۡءٌ عَظِیمࣱ ﴿1﴾

१. लोक हो! आपल्या पालनकर्त्याचे भय राखा, निःसंशय कयामतचा भूकंप फार जबरदस्त गोष्ट आहे.

یَوۡمَ تَرَوۡنَهَا تَذۡهَلُ كُلُّ مُرۡضِعَةٍ عَمَّاۤ أَرۡضَعَتۡ وَتَضَعُ كُلُّ ذَاتِ حَمۡلٍ حَمۡلَهَا وَتَرَى ٱلنَّاسَ سُكَـٰرَىٰ وَمَا هُم بِسُكَـٰرَىٰ وَلَـٰكِنَّ عَذَابَ ٱللَّهِ شَدِیدࣱ ﴿2﴾

२. ज्या दिवशी तुम्ही तो पाहाल, प्रत्येक दूध पाजणारी माता आपल्या दूध पिणाऱ्या बाळाला विसरेल आणि सर्व गर्भवती स्त्रियांचा गर्भपात होईल, आणि तुम्ही पाहाल की लोक मदहोश दिसून येतील, वास्तविक मदहोश नसतील, परंतु अल्लाहचा अज़ाब (शिक्षा- यातना) मोठा कठोर आहे.

وَمِنَ ٱلنَّاسِ مَن یُجَـٰدِلُ فِی ٱللَّهِ بِغَیۡرِ عِلۡمࣲ وَیَتَّبِعُ كُلَّ شَیۡطَـٰنࣲ مَّرِیدࣲ ﴿3﴾

३. आणि काही लोक अल्लाहविषयी अज्ञानपूर्ण गोष्टी बोलतात, आणि प्रत्येक उदंड सैतानाचे अनुसरण करतात.

كُتِبَ عَلَیۡهِ أَنَّهُۥ مَن تَوَلَّاهُ فَأَنَّهُۥ یُضِلُّهُۥ وَیَهۡدِیهِ إِلَىٰ عَذَابِ ٱلسَّعِیرِ ﴿4﴾

४. ज्याच्याबद्दल अल्लाहचा फैसला लिहिला गेला आहे की जो कोणी त्याच्याशी दोस्ती करेल, तो त्याला मार्गभ्रष्ट करेल आणि त्याला आगीच्या शिक्षा-यातनेकडे नेईल.

یَـٰۤأَیُّهَا ٱلنَّاسُ إِن كُنتُمۡ فِی رَیۡبࣲ مِّنَ ٱلۡبَعۡثِ فَإِنَّا خَلَقۡنَـٰكُم مِّن تُرَابࣲ ثُمَّ مِن نُّطۡفَةࣲ ثُمَّ مِنۡ عَلَقَةࣲ ثُمَّ مِن مُّضۡغَةࣲ مُّخَلَّقَةࣲ وَغَیۡرِ مُخَلَّقَةࣲ لِّنُبَیِّنَ لَكُمۡۚ وَنُقِرُّ فِی ٱلۡأَرۡحَامِ مَا نَشَاۤءُ إِلَىٰۤ أَجَلࣲ مُّسَمࣰّى ثُمَّ نُخۡرِجُكُمۡ طِفۡلࣰا ثُمَّ لِتَبۡلُغُوۤا۟ أَشُدَّكُمۡۖ وَمِنكُم مَّن یُتَوَفَّىٰ وَمِنكُم مَّن یُرَدُّ إِلَىٰۤ أَرۡذَلِ ٱلۡعُمُرِ لِكَیۡلَا یَعۡلَمَ مِنۢ بَعۡدِ عِلۡمࣲ شَیۡـࣰٔاۚ وَتَرَى ٱلۡأَرۡضَ هَامِدَةࣰ فَإِذَاۤ أَنزَلۡنَا عَلَیۡهَا ٱلۡمَاۤءَ ٱهۡتَزَّتۡ وَرَبَتۡ وَأَنۢبَتَتۡ مِن كُلِّ زَوۡجِۭ بَهِیجࣲ ﴿5﴾

५. लोकांनो! जर तुम्हाला मेल्यानंतर (पुन्हा) जिवंत होण्याबाबत शंका आहे, तर विचार करा, आम्ही तुम्हाला मातीपासून निर्माण केले, मग वीर्यापासून, मग जमलेल्या रक्तापासून, आणि मांसाच्या तुकड्यापासून जे रूप दिले गेले होते आणि विनारूपही होते. हे आम्ही तुमच्यावर स्पष्ट करतो आणि आम्ही ज्याला इच्छितो एका निर्धारित अवधीपर्यंत मातेच्या उदरात ठेवतो, मग तुम्हाला बाळाच्या रूपाने या जगात आणतो मग यासाठी की तुम्ही आपल्या पूर्ण तरुणपणास पोहचावे, तुमच्यापैकी काही असे आहेत जे मरण पावतात आणि काही जीर्ण वयाकडे पुन्हा परतविले जातात की ते एका गोष्टीशी परिचित झाल्यानंतर दुसऱ्यांदा अनभिज्ञ व्हावेत. तुम्ही पाहता की जमीन नापीक आणि कोरडी आहे, मग जेव्हा आम्ही तिच्यावर पाऊस पाडतो तेव्हा ती चेतनामय होते आणि फुगते आणि प्रत्येक प्रकारची सुंदर वनस्पती उगविते.

ذَ ٰ⁠لِكَ بِأَنَّ ٱللَّهَ هُوَ ٱلۡحَقُّ وَأَنَّهُۥ یُحۡیِ ٱلۡمَوۡتَىٰ وَأَنَّهُۥ عَلَىٰ كُلِّ شَیۡءࣲ قَدِیرࣱ ﴿6﴾

६. हे अशासाठी की अल्लाहच सत्य आहे आणि तोच मेलेल्यांना जिवंत करतो आणि तो प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगतो.

وَأَنَّ ٱلسَّاعَةَ ءَاتِیَةࣱ لَّا رَیۡبَ فِیهَا وَأَنَّ ٱللَّهَ یَبۡعَثُ مَن فِی ٱلۡقُبُورِ ﴿7﴾

७. आणि हे की कयामत निश्चितच येणार आहे, ज्याबाबत कसलीही शंका नाही आणि अगदी खात्रीने अल्लाह कबरीत असलेल्यांना दुसऱ्यांदा जिवंत करेल.

وَمِنَ ٱلنَّاسِ مَن یُجَـٰدِلُ فِی ٱللَّهِ بِغَیۡرِ عِلۡمࣲ وَلَا هُدࣰى وَلَا كِتَـٰبࣲ مُّنِیرࣲ ﴿8﴾

८. आणि काही लोक अल्लाहविषयी ज्ञानाविना, आणि मार्गदर्शनाविना आणि कोणत्याही दिव्य ग्रंथाविना वाद घालतात.

ثَانِیَ عِطۡفِهِۦ لِیُضِلَّ عَن سَبِیلِ ٱللَّهِۖ لَهُۥ فِی ٱلدُّنۡیَا خِزۡیࣱۖ وَنُذِیقُهُۥ یَوۡمَ ٱلۡقِیَـٰمَةِ عَذَابَ ٱلۡحَرِیقِ ﴿9﴾

९. आपला पैलू वळवून घेणारा बनून (ताठरपणे) यासाठी की अल्लाहच्या मार्गापासून भ्रष्ट करावे तो या जगातही अपमानित होईल, आणि कयामतच्या दिवशीही आम्ही त्याला जहन्नमच्या आगीत जळण्याची शिक्षा - यातना चाखवू.

ذَ ٰ⁠لِكَ بِمَا قَدَّمَتۡ یَدَاكَ وَأَنَّ ٱللَّهَ لَیۡسَ بِظَلَّـٰمࣲ لِّلۡعَبِیدِ ﴿10﴾

१०. हे त्या कर्मांपायी, जी तुझ्या हातांनी पुढे पाठविली होती, मात्र विश्वास राखा की अल्लाह आपल्या दासांवर अत्याचार करणारा नाही.

وَمِنَ ٱلنَّاسِ مَن یَعۡبُدُ ٱللَّهَ عَلَىٰ حَرۡفࣲۖ فَإِنۡ أَصَابَهُۥ خَیۡرٌ ٱطۡمَأَنَّ بِهِۦۖ وَإِنۡ أَصَابَتۡهُ فِتۡنَةٌ ٱنقَلَبَ عَلَىٰ وَجۡهِهِۦ خَسِرَ ٱلدُّنۡیَا وَٱلۡـَٔاخِرَةَۚ ذَ ٰ⁠لِكَ هُوَ ٱلۡخُسۡرَانُ ٱلۡمُبِینُ ﴿11﴾

११. आणि काही लोक असेही आहेत, जे एका किनाऱ्याला राहून अल्लाहची उपासना करतात, जर काही लाभ झाला तर समाधानी होतात, आणि जर एखादे दुःख वाट्याला आले तर त्याच क्षणी माघारी फिरतात. त्यांनी इहलोक आणि परलोक दोघांचे नुकसान उचलले. वस्तुतः हेच उघड नुकसान आहे.

یَدۡعُوا۟ مِن دُونِ ٱللَّهِ مَا لَا یَضُرُّهُۥ وَمَا لَا یَنفَعُهُۥۚ ذَ ٰ⁠لِكَ هُوَ ٱلضَّلَـٰلُ ٱلۡبَعِیدُ ﴿12﴾

१२. ते अल्लाहखेरीज त्यांना पुकारतात जे ना नुकसान पोहचवू शकतात ना फायदा. हीच ती दूरची मार्गभ्रष्टता आहे.

یَدۡعُوا۟ لَمَن ضَرُّهُۥۤ أَقۡرَبُ مِن نَّفۡعِهِۦۚ لَبِئۡسَ ٱلۡمَوۡلَىٰ وَلَبِئۡسَ ٱلۡعَشِیرُ ﴿13﴾

१३. अशाला पुकारतात ज्यांचे नुकसान, लाभापेक्षा अधिक जवळ आहे निःसंशय मोठे वाईट संरक्षक आहेत आणि वाईट दोस्त.

إِنَّ ٱللَّهَ یُدۡخِلُ ٱلَّذِینَ ءَامَنُوا۟ وَعَمِلُوا۟ ٱلصَّـٰلِحَـٰتِ جَنَّـٰتࣲ تَجۡرِی مِن تَحۡتِهَا ٱلۡأَنۡهَـٰرُۚ إِنَّ ٱللَّهَ یَفۡعَلُ مَا یُرِیدُ ﴿14﴾

१४. निःसंशय, ईमान (राखून) सत्कर्म करणाऱ्यांना अल्लाह, अशा जन्नतमध्ये दाखल करील जिच्या खाली प्रवाह वाहत असतील. अल्लाह जे इच्छितो ते निश्चित करतो.

مَن كَانَ یَظُنُّ أَن لَّن یَنصُرَهُ ٱللَّهُ فِی ٱلدُّنۡیَا وَٱلۡـَٔاخِرَةِ فَلۡیَمۡدُدۡ بِسَبَبٍ إِلَى ٱلسَّمَاۤءِ ثُمَّ لۡیَقۡطَعۡ فَلۡیَنظُرۡ هَلۡ یُذۡهِبَنَّ كَیۡدُهُۥ مَا یَغِیظُ ﴿15﴾

१५. ज्याला हे वाटत असेल की अल्लाह आपल्या पैगंबरांची मदत दोन्ही लोकात (इहलोक आणि परलोक) करणार नाही, तर त्याने उंच जागी एक दोर बांधून (आपल्या गळ्यात फास टाकून घ्यावा) आणि गळा घोटून घ्यावा, मग पाहावे की त्याच्या चतुराईने ती गोष्ट दूर होते जी त्याला कासाविस करीत आहे.

وَكَذَ ٰ⁠لِكَ أَنزَلۡنَـٰهُ ءَایَـٰتِۭ بَیِّنَـٰتࣲ وَأَنَّ ٱللَّهَ یَهۡدِی مَن یُرِیدُ ﴿16﴾

१६. आणि आम्ही अशआच प्रकारे या कुरआनाला स्पष्ट आयतींमध्ये अवतरित केले आहे आणि अल्लाह ज्याला इच्छितो, मार्गदर्शन करतो.

إِنَّ ٱلَّذِینَ ءَامَنُوا۟ وَٱلَّذِینَ هَادُوا۟ وَٱلصَّـٰبِـِٔینَ وَٱلنَّصَـٰرَىٰ وَٱلۡمَجُوسَ وَٱلَّذِینَ أَشۡرَكُوۤا۟ إِنَّ ٱللَّهَ یَفۡصِلُ بَیۡنَهُمۡ یَوۡمَ ٱلۡقِیَـٰمَةِۚ إِنَّ ٱللَّهَ عَلَىٰ كُلِّ شَیۡءࣲ شَهِیدٌ ﴿17﴾

१७. ईमान राखणारे, आणि यहूदी (ज्यू) आणि विधर्मी आणि ख्रिश्चन आणि अग्नीपूजक आणि अनेकेश्वरवादी या सर्वांच्या दरम्यान अल्लाह स्वतः निर्णय करील. अल्लाह प्रत्येक गोष्टीस साक्षी आहे.

أَلَمۡ تَرَ أَنَّ ٱللَّهَ یَسۡجُدُ لَهُۥ مَن فِی ٱلسَّمَـٰوَ ٰ⁠تِ وَمَن فِی ٱلۡأَرۡضِ وَٱلشَّمۡسُ وَٱلۡقَمَرُ وَٱلنُّجُومُ وَٱلۡجِبَالُ وَٱلشَّجَرُ وَٱلدَّوَاۤبُّ وَكَثِیرࣱ مِّنَ ٱلنَّاسِۖ وَكَثِیرٌ حَقَّ عَلَیۡهِ ٱلۡعَذَابُۗ وَمَن یُهِنِ ٱللَّهُ فَمَا لَهُۥ مِن مُّكۡرِمٍۚ إِنَّ ٱللَّهَ یَفۡعَلُ مَا یَشَاۤءُ ۩ ﴿18﴾

१८. काय तुम्ही नाही पाहात की अल्लाहच्या समोरच सजदा करतात जे आकाशात आहेत आणि जमिनीवर आहेत. त्याचप्रमाणे सूर्य, चंद्र, तारे, पर्वत, वृक्ष, पशू आणि सजीव१ आणि अनेक मानव देखील. होय बहुतेक असेही आहेत, ज्यांना (अल्लाहची) शिक्षा- यातना लागू झाली आहे आणि ज्याला अल्लाह अपमानित करेल, त्याला मान-प्रतिष्ठा देणारा कोणी नाही, अल्लाह जे इच्छितो ते करतो.

۞ هَـٰذَانِ خَصۡمَانِ ٱخۡتَصَمُوا۟ فِی رَبِّهِمۡۖ فَٱلَّذِینَ كَفَرُوا۟ قُطِّعَتۡ لَهُمۡ ثِیَابࣱ مِّن نَّارࣲ یُصَبُّ مِن فَوۡقِ رُءُوسِهِمُ ٱلۡحَمِیمُ ﴿19﴾

१९. हे दोन्ही आपल्या पालनकर्त्याविषयी मतभेद राखणारे आहेत, तेव्हा इन्कारी लोकांकरिता आगीचे कपडे, माप घेऊन कापले जातील, आणि त्यांच्या डोक्यांवर उकळत्या पाण्याची धार सोडली जाईल.

یُصۡهَرُ بِهِۦ مَا فِی بُطُونِهِمۡ وَٱلۡجُلُودُ ﴿20﴾

२०. ज्याद्वारे त्याच्या पोटातील सर्व वस्तू आणि चामडी वगैरे गळून पडेल.

وَلَهُم مَّقَـٰمِعُ مِنۡ حَدِیدࣲ ﴿21﴾

२१. आणि त्यांना शिक्षा- यातना देण्यासाठी लोखंडी हातोडे आहेत.

كُلَّمَاۤ أَرَادُوۤا۟ أَن یَخۡرُجُوا۟ مِنۡهَا مِنۡ غَمٍّ أُعِیدُوا۟ فِیهَا وَذُوقُوا۟ عَذَابَ ٱلۡحَرِیقِ ﴿22﴾

२२. हे जेव्हा जेव्हा तिथल्या दुःख-यातनेपासून पळ काढण्याचा इरादा करतील, तिथे (पुन्हा) परतविले जातील आणि (त्यांना सांगितले जाईल) जळण्याच्या शिक्षेची गोडी चाखा.

إِنَّ ٱللَّهَ یُدۡخِلُ ٱلَّذِینَ ءَامَنُوا۟ وَعَمِلُوا۟ ٱلصَّـٰلِحَـٰتِ جَنَّـٰتࣲ تَجۡرِی مِن تَحۡتِهَا ٱلۡأَنۡهَـٰرُ یُحَلَّوۡنَ فِیهَا مِنۡ أَسَاوِرَ مِن ذَهَبࣲ وَلُؤۡلُؤࣰاۖ وَلِبَاسُهُمۡ فِیهَا حَرِیرࣱ ﴿23﴾

२३. निःसंशय, ईमान राखणाऱ्या आणि सत्कर्म करणाऱ्यांना अल्लाह अशा जन्नतमध्ये दाखल करील, ज्यांच्या खाली प्रवाह वाहत आहेत. जिथे त्यांना सोन्याची कांकणे घातली जातील आणि अस्सल मोतीही, त्या ठिकाणी त्यांचे वस्त्र निर्भेळ रेशमाचे असेल.

وَهُدُوۤا۟ إِلَى ٱلطَّیِّبِ مِنَ ٱلۡقَوۡلِ وَهُدُوۤا۟ إِلَىٰ صِرَ ٰ⁠طِ ٱلۡحَمِیدِ ﴿24﴾

२४. आणि त्यांना पवित्र वचनाचा मार्ग दाखविला गेला आणि प्रशंसनीय (अल्लाहचे) मार्गदर्शन दिले गेले.

إِنَّ ٱلَّذِینَ كَفَرُوا۟ وَیَصُدُّونَ عَن سَبِیلِ ٱللَّهِ وَٱلۡمَسۡجِدِ ٱلۡحَرَامِ ٱلَّذِی جَعَلۡنَـٰهُ لِلنَّاسِ سَوَاۤءً ٱلۡعَـٰكِفُ فِیهِ وَٱلۡبَادِۚ وَمَن یُرِدۡ فِیهِ بِإِلۡحَادِۭ بِظُلۡمࣲ نُّذِقۡهُ مِنۡ عَذَابٍ أَلِیمࣲ ﴿25﴾

२५. ज्या लोकांनी कुप्र (इन्कार) केला, आणि अल्लाहच्या मार्गापासून रोखू लागले आणि त्या आदरणीय मस्जिदीपासूनही, जिला आम्ही समस्त लोकांकरिता एकसमान केले आहे, मग तिथले रहिवाशी असोत किंवा बाहेरून आलेले असोत, जो देखील अत्याचारपूर्वक त्या ठिकाणी मार्गभ्रष्ट होण्याचा विचार करील, आम्ही त्याला दुःखदायक अज़ाब (शिक्षा-यातने) ची गोडी चाखवू.

وَإِذۡ بَوَّأۡنَا لِإِبۡرَ ٰ⁠هِیمَ مَكَانَ ٱلۡبَیۡتِ أَن لَّا تُشۡرِكۡ بِی شَیۡـࣰٔا وَطَهِّرۡ بَیۡتِیَ لِلطَّاۤىِٕفِینَ وَٱلۡقَاۤىِٕمِینَ وَٱلرُّكَّعِ ٱلسُّجُودِ ﴿26﴾

२६. आणि जेव्हा आम्ही इब्राहीमकरिता काबागृहाचे स्थान निश्चित केले (या अटीवर) की माझ्यासोबत दुसऱ्या कोणाला सामील करू नका आणि माझ्या घराला तवाफ (प्रदक्षिणा) करणाऱ्या, उभे राहणाऱ्या, रुकूअ आणि सजदा करणाऱ्यांकरिता स्वच्छ- शुद्ध राखा.

وَأَذِّن فِی ٱلنَّاسِ بِٱلۡحَجِّ یَأۡتُوكَ رِجَالࣰا وَعَلَىٰ كُلِّ ضَامِرࣲ یَأۡتِینَ مِن كُلِّ فَجٍّ عَمِیقࣲ ﴿27﴾

२७. आणि लोकांमध्ये हजचे ऐलान करा, लोक तुमच्याजवळ पायी चालतही येतील आणि दुबळ्या रोडावलेल्या उंटावरही दूरदूरच्या सर्व मार्गांनी येतील.

لِّیَشۡهَدُوا۟ مَنَـٰفِعَ لَهُمۡ وَیَذۡكُرُوا۟ ٱسۡمَ ٱللَّهِ فِیۤ أَیَّامࣲ مَّعۡلُومَـٰتٍ عَلَىٰ مَا رَزَقَهُم مِّنۢ بَهِیمَةِ ٱلۡأَنۡعَـٰمِۖ فَكُلُوا۟ مِنۡهَا وَأَطۡعِمُوا۟ ٱلۡبَاۤىِٕسَ ٱلۡفَقِیرَ ﴿28﴾

२८. यासाठी की त्यांनी आपला लाभ प्राप्त करून घेण्यासाठी यावे आणि त्या निर्धारीत दिवसामध्ये अल्लाहचे नामःस्मरण करावे त्या चार पायांच्या पाळीव पशूंवर, तेव्हा तुम्ही स्वतः देखील खा आणि उपाशीपोटी असलेल्या गरीबांनाही खाऊ घाला.

ثُمَّ لۡیَقۡضُوا۟ تَفَثَهُمۡ وَلۡیُوفُوا۟ نُذُورَهُمۡ وَلۡیَطَّوَّفُوا۟ بِٱلۡبَیۡتِ ٱلۡعَتِیقِ ﴿29﴾

२९. मग त्यांनी आपला मळ- घाण दूर करावी आणि आपला नवस पूर्ण करावा आणि अल्लाहच्या जुन्या घराला प्रदक्षिणा करावी.

ذَ ٰ⁠لِكَۖ وَمَن یُعَظِّمۡ حُرُمَـٰتِ ٱللَّهِ فَهُوَ خَیۡرࣱ لَّهُۥ عِندَ رَبِّهِۦۗ وَأُحِلَّتۡ لَكُمُ ٱلۡأَنۡعَـٰمُ إِلَّا مَا یُتۡلَىٰ عَلَیۡكُمۡۖ فَٱجۡتَنِبُوا۟ ٱلرِّجۡسَ مِنَ ٱلۡأَوۡثَـٰنِ وَٱجۡتَنِبُوا۟ قَوۡلَ ٱلزُّورِ ﴿30﴾

३०. हे आहेत (हजचे धार्मिक विधी) आणि जो, अल्लाहने निर्धारित केलेल्या प्रतिष्ठापूर्ण गोष्टींचा आदर राखेल तर हे त्याच्या पालनकर्त्याजवळ त्याच्याकरिता उत्तम आहे आणि तुमच्यासाठी गुरे-ढोरे हलाल (वैध) ठरविले गेले आहेत, मात्र त्यांच्याखेरीज, ज्यांचा आदेश तुम्हाला ऐकविला गेला आहे, यास्तव मूर्तींच्या मलीनतेपासून दूर राहा, आणि खोटे बोलण्यापासूनही अलिप्त राहा.

حُنَفَاۤءَ لِلَّهِ غَیۡرَ مُشۡرِكِینَ بِهِۦۚ وَمَن یُشۡرِكۡ بِٱللَّهِ فَكَأَنَّمَا خَرَّ مِنَ ٱلسَّمَاۤءِ فَتَخۡطَفُهُ ٱلطَّیۡرُ أَوۡ تَهۡوِی بِهِ ٱلرِّیحُ فِی مَكَانࣲ سَحِیقࣲ ﴿31﴾

३१. अल्लाहच्या तौहीद (एकेश्वरवादा) ला मान्य करीत, त्याच्यासोबत दुसऱ्या कुणाला सहभागी न ठरवित. (ऐका) अल्लाहचा सहभागी ठरविणारा जणू आकाशातून खाली कोसळला, आता एक तर त्याला पक्षी उचलून नेतील किंवा हवा एखाद्या दूरच्या ठिकाणी फेकून देईल.

ذَ ٰ⁠لِكَۖ وَمَن یُعَظِّمۡ شَعَـٰۤىِٕرَ ٱللَّهِ فَإِنَّهَا مِن تَقۡوَى ٱلۡقُلُوبِ ﴿32﴾

३२. (ही आहे वस्तुस्थिती) तेव्हा जो कोणी अल्लाहच्या निशाण्यांचा (प्रतीकांचा) आदर-सन्मान राखेल, तर त्याच्या मनातील अल्लाहच्या भयाचे हेच कारण आहे.

لَكُمۡ فِیهَا مَنَـٰفِعُ إِلَىٰۤ أَجَلࣲ مُّسَمࣰّى ثُمَّ مَحِلُّهَاۤ إِلَى ٱلۡبَیۡتِ ٱلۡعَتِیقِ ﴿33﴾

३३. त्यांच्यात तुमच्यासाठी एका निर्धारित अवधीपर्यंत लाभ आहे, मग त्यांच्या कुर्बानी (बळी चढविण्या) ची जागा काबागृहात आहे.

وَلِكُلِّ أُمَّةࣲ جَعَلۡنَا مَنسَكࣰا لِّیَذۡكُرُوا۟ ٱسۡمَ ٱللَّهِ عَلَىٰ مَا رَزَقَهُم مِّنۢ بَهِیمَةِ ٱلۡأَنۡعَـٰمِۗ فَإِلَـٰهُكُمۡ إِلَـٰهࣱ وَ ٰ⁠حِدࣱ فَلَهُۥۤ أَسۡلِمُوا۟ۗ وَبَشِّرِ ٱلۡمُخۡبِتِینَ ﴿34﴾

३४. आणि प्रत्येक जनसमूहाकरिता आम्ही कुर्बानीची एक पद्धत निश्चित केली आहे, यासाठी की त्यांनी त्या चतुष्पाद पशूंवर अल्लाहचे नाव घ्यावे, जे अल्लाहने त्यांना प्रदान करून ठेवले आहेत. (लक्षात घ्या) तुम्हा सर्वांचा खराखुरा उपास्य (आराध्य दैवत) फक्त एकच आहे, तुम्ही त्याच्या अधीन आणि आज्ञाधारक व्हा, विनम्रता अंगिकारणाऱ्यांना खूशखबरी द्या.

ٱلَّذِینَ إِذَا ذُكِرَ ٱللَّهُ وَجِلَتۡ قُلُوبُهُمۡ وَٱلصَّـٰبِرِینَ عَلَىٰ مَاۤ أَصَابَهُمۡ وَٱلۡمُقِیمِی ٱلصَّلَوٰةِ وَمِمَّا رَزَقۡنَـٰهُمۡ یُنفِقُونَ ﴿35﴾

३५. त्यांची अवस्था अशी आहे की जेव्हा त्यांच्या समोर अल्लाहचे नामःस्मरण केले जाते, तेव्हा त्यांच्या हृदयाचा थरकाप होतो, जेव्हा त्याच्यावर संकट येते तेव्हा त्या संकटात धीर- संयम राखतात, ते नमाज कायम करणारे आहेत, आणि जे काही आम्ही त्यांना देऊन ठेवले आहे त्यातून देत ही राहतात .

وَٱلۡبُدۡنَ جَعَلۡنَـٰهَا لَكُم مِّن شَعَـٰۤىِٕرِ ٱللَّهِ لَكُمۡ فِیهَا خَیۡرࣱۖ فَٱذۡكُرُوا۟ ٱسۡمَ ٱللَّهِ عَلَیۡهَا صَوَاۤفَّۖ فَإِذَا وَجَبَتۡ جُنُوبُهَا فَكُلُوا۟ مِنۡهَا وَأَطۡعِمُوا۟ ٱلۡقَانِعَ وَٱلۡمُعۡتَرَّۚ كَذَ ٰ⁠لِكَ سَخَّرۡنَـٰهَا لَكُمۡ لَعَلَّكُمۡ تَشۡكُرُونَ ﴿36﴾

३६. कुर्बानीच्या उंटाला आम्ही तुमच्यासाठी अल्लाहच्या निशाण्यांपैकी ठरविले आहे. त्यांच्यात तुमच्यासाठी लाभ आहे, तेव्हा त्यांना उभे करून त्यांच्यावर अल्लाहचे नाव घ्या, मग जेव्हा त्यांचे अंग जमिनीला लागेल तेव्हा ते तुम्हीही खा आणि गोरगरीब व याचकांना आणि जो याचक नसेल त्यालाही खाऊ घाला. अशा प्रकारे आम्ही चतुष्पाद (पाळीव) पशूंना तुमच्या अधीन केले आहे, यासाठी की तुम्ही कृतज्ञता व्यक्त करावी.

لَن یَنَالَ ٱللَّهَ لُحُومُهَا وَلَا دِمَاۤؤُهَا وَلَـٰكِن یَنَالُهُ ٱلتَّقۡوَىٰ مِنكُمۡۚ كَذَ ٰ⁠لِكَ سَخَّرَهَا لَكُمۡ لِتُكَبِّرُوا۟ ٱللَّهَ عَلَىٰ مَا هَدَىٰكُمۡۗ وَبَشِّرِ ٱلۡمُحۡسِنِینَ ﴿37﴾

३७. अल्लाहला कुर्बानीच्या जनावरांचे ना मांस पोहचते ना त्यांचे रक्त किंबहुना त्याला तुमच्या मनात असलेले अल्लाहचे भय पोहोचते, त्याचप्रमाणे अल्लाहने त्या जनावरांना तुमचे आज्ञाधारक (ताबेदार) बनविले आहे, यासाठी की तुम्ही त्याच्या मार्गदर्शना (च्या आभारा) त त्याची महानता वर्णन करावी आणि सत्कर्म करणाऱ्यांना खूशखबरी ऐकवा.

۞ إِنَّ ٱللَّهَ یُدَ ٰ⁠فِعُ عَنِ ٱلَّذِینَ ءَامَنُوۤا۟ۗ إِنَّ ٱللَّهَ لَا یُحِبُّ كُلَّ خَوَّانࣲ كَفُورٍ ﴿38﴾

३८. निःसंशय, सच्चा ईमानधारकांच्या शत्रूंना अल्लाह स्वतः हटवितो, कोणताही विश्वासघातकी कृतघ्न अल्लाहला पसत नाही.

أُذِنَ لِلَّذِینَ یُقَـٰتَلُونَ بِأَنَّهُمۡ ظُلِمُوا۟ۚ وَإِنَّ ٱللَّهَ عَلَىٰ نَصۡرِهِمۡ لَقَدِیرٌ ﴿39﴾

३९. ज्या (मुसलमानां) शी (काफिर) लढाई करीत आहेत त्यांना देखील लढण्याची अनुमती दिली कारण ते अत्याचारपीडित आहेत. निःसंशय त्यांच्या मदतीकरिता अल्लाह परिपूर्ण सामर्थ्य राखतो.

ٱلَّذِینَ أُخۡرِجُوا۟ مِن دِیَـٰرِهِم بِغَیۡرِ حَقٍّ إِلَّاۤ أَن یَقُولُوا۟ رَبُّنَا ٱللَّهُۗ وَلَوۡلَا دَفۡعُ ٱللَّهِ ٱلنَّاسَ بَعۡضَهُم بِبَعۡضࣲ لَّهُدِّمَتۡ صَوَ ٰ⁠مِعُ وَبِیَعࣱ وَصَلَوَ ٰ⁠تࣱ وَمَسَـٰجِدُ یُذۡكَرُ فِیهَا ٱسۡمُ ٱللَّهِ كَثِیرࣰاۗ وَلَیَنصُرَنَّ ٱللَّهُ مَن یَنصُرُهُۥۤۚ إِنَّ ٱللَّهَ لَقَوِیٌّ عَزِیزٌ ﴿40﴾

४०. हे असे लोक आहेत, ज्यांना विनाकारण आपल्या घराबाहेर काढले गेले केवळ त्यांच्या या बोलण्यावर की आमचा स्वामी व पालनकर्ता अल्लाह आहे. जर अल्लाह लोकांना आपसात एकमेकांद्वारे हटवित राहिला नसता तर उपासनास्थळ आणि चर्च आणि मशीदी, आणि यहूदी लोकांची प्रार्थनास्थळे आणि त्या मशीदी देखील केव्हाच पाडल्या गेल्या असत्या जिथे फार मोठ्या प्रमाणात अल्लाहचे नामःस्मरण केले जाते. जो अल्लाहची मदत करेल अल्लाह देखील त्याची मदत अवश्य करेल. िंनिःसंशय अल्लाह मोठा शक्तिशाली आणि वर्चस्वशाली आहे.

ٱلَّذِینَ إِن مَّكَّنَّـٰهُمۡ فِی ٱلۡأَرۡضِ أَقَامُوا۟ ٱلصَّلَوٰةَ وَءَاتَوُا۟ ٱلزَّكَوٰةَ وَأَمَرُوا۟ بِٱلۡمَعۡرُوفِ وَنَهَوۡا۟ عَنِ ٱلۡمُنكَرِۗ وَلِلَّهِ عَـٰقِبَةُ ٱلۡأُمُورِ ﴿41﴾

४१. हे लोक आहेत की जर आम्ही यांचे पाय जमिनीवर मजबूत केले (अर्थात चांगले स्थैर्य प्रदान केले) तर हे नित्यनेमाने नमाज अदा करतील आणि जकात देतील आणि चांगल्या कामांचा आदेश देतील आणि वाईट कामांची मनाई करतील आणि सर्व कामांचा परिणाम अल्लाहच्या अधिकारकक्षेत आहे.

وَإِن یُكَذِّبُوكَ فَقَدۡ كَذَّبَتۡ قَبۡلَهُمۡ قَوۡمُ نُوحࣲ وَعَادࣱ وَثَمُودُ ﴿42﴾

४२. आणि जर हे लोक तुम्हाला खोटे ठरवतील (तर आश्चर्याची बाब नव्हे) तर यांच्यापूर्वी नूहचा जनसमूह आणि आद व समूद

وَقَوۡمُ إِبۡرَ ٰ⁠هِیمَ وَقَوۡمُ لُوطࣲ ﴿43﴾

४३. आणि इब्राहीमचा जनसमूह आणि लूतचा जनसमूह.

وَأَصۡحَـٰبُ مَدۡیَنَۖ وَكُذِّبَ مُوسَىٰۖ فَأَمۡلَیۡتُ لِلۡكَـٰفِرِینَ ثُمَّ أَخَذۡتُهُمۡۖ فَكَیۡفَ كَانَ نَكِیرِ ﴿44﴾

४४. आणि मदयनच्या लोकांनीही आपल्या आपल्या पैगंबरांना खोटे ठरविले आहे. मूसा यांनाही खोटे ठरविले गेले आहे, तेव्हा मी इन्कारी लोकांना थोडी संधी दिली, मग त्यांना पकडले. मग पाहा कशी होती माझी शिक्षा- यातना!

فَكَأَیِّن مِّن قَرۡیَةٍ أَهۡلَكۡنَـٰهَا وَهِیَ ظَالِمَةࣱ فَهِیَ خَاوِیَةٌ عَلَىٰ عُرُوشِهَا وَبِئۡرࣲ مُّعَطَّلَةࣲ وَقَصۡرࣲ مَّشِیدٍ ﴿45﴾

४५. अशा अनेक वस्त्या आहेत, ज्यांना आम्ही नष्ट करून टाकले यासाठी की त्या अत्याचारी होत्या, तेव्हा त्या आपल्या छतांसह पालथ्या पडल्या आहेत आणि बहुतेक आबाद विहीरी निकामी पडल्या आहेत आणि कितीतरी पक्के उंच किल्ले ओसाड पडले आहेत.

أَفَلَمۡ یَسِیرُوا۟ فِی ٱلۡأَرۡضِ فَتَكُونَ لَهُمۡ قُلُوبࣱ یَعۡقِلُونَ بِهَاۤ أَوۡ ءَاذَانࣱ یَسۡمَعُونَ بِهَاۖ فَإِنَّهَا لَا تَعۡمَى ٱلۡأَبۡصَـٰرُ وَلَـٰكِن تَعۡمَى ٱلۡقُلُوبُ ٱلَّتِی فِی ٱلصُّدُورِ ﴿46﴾

४६. काय त्यांनी धरतीवर हिंडून फिरून पाहिले नाही की त्यांच्या हृदयांनी या गोष्टी समजून घेतल्या असत्या किंवा कानांनी या (घटना) ऐकल्या असत्या. खरी गोष्ट अशी की केवळ डोळेच आंधळे नसतात किंबहुना ती हृदये (सुद्धा) आंधळी असतात, जी उरात आहेत.

وَیَسۡتَعۡجِلُونَكَ بِٱلۡعَذَابِ وَلَن یُخۡلِفَ ٱللَّهُ وَعۡدَهُۥۚ وَإِنَّ یَوۡمًا عِندَ رَبِّكَ كَأَلۡفِ سَنَةࣲ مِّمَّا تَعُدُّونَ ﴿47﴾

४७. आणि ते तुमच्याजवळ अल्लाहच्या शिक्षा- यातनेची घाई करीत आहेत. अल्लाह आपले वचन कदापि टाळणार नाही. निःसंशय, तुमच्या पालनकर्त्याजवळ एक दिवस, तुमच्या (काल) गणनेनुसार एक हजार वर्षांचा आहे.

وَكَأَیِّن مِّن قَرۡیَةٍ أَمۡلَیۡتُ لَهَا وَهِیَ ظَالِمَةࣱ ثُمَّ أَخَذۡتُهَا وَإِلَیَّ ٱلۡمَصِیرُ ﴿48﴾

४८. आणि कित्येक अत्याचारी वस्तींना आम्ही ढील (सूट) दिली मग शेवटी त्यांना पकडीत घेतले आणि माझ्याचकडे परतून यायचे आहे.

قُلۡ یَـٰۤأَیُّهَا ٱلنَّاسُ إِنَّمَاۤ أَنَا۠ لَكُمۡ نَذِیرࣱ مُّبِینࣱ ﴿49﴾

४९. ऐलान करा की, लोक हो! मी तुम्हाला उघडरित्या सावधान करणारा आहे.

فَٱلَّذِینَ ءَامَنُوا۟ وَعَمِلُوا۟ ٱلصَّـٰلِحَـٰتِ لَهُم مَّغۡفِرَةࣱ وَرِزۡقࣱ كَرِیمࣱ ﴿50﴾

५०. तेव्हा ज्या लोकांनी ई्‌मान राखले आहे आणि सत्कर्मे केली आहेत त्यांच्यासाठी मोक्षप्राप्ती आहे आणि मान-सन्मानपूर्ण आजिविका.

وَٱلَّذِینَ سَعَوۡا۟ فِیۤ ءَایَـٰتِنَا مُعَـٰجِزِینَ أُو۟لَـٰۤىِٕكَ أَصۡحَـٰبُ ٱلۡجَحِیمِ ﴿51﴾

५१. आणि जे लोक आमच्या आयतींचा अवमान करण्यामागे लागेले आहेत, तेच जहन्नमी आहेत.

وَمَاۤ أَرۡسَلۡنَا مِن قَبۡلِكَ مِن رَّسُولࣲ وَلَا نَبِیٍّ إِلَّاۤ إِذَا تَمَنَّىٰۤ أَلۡقَى ٱلشَّیۡطَـٰنُ فِیۤ أُمۡنِیَّتِهِۦ فَیَنسَخُ ٱللَّهُ مَا یُلۡقِی ٱلشَّیۡطَـٰنُ ثُمَّ یُحۡكِمُ ٱللَّهُ ءَایَـٰتِهِۦۗ وَٱللَّهُ عَلِیمٌ حَكِیمࣱ ﴿52﴾

५२. आणि आम्ही तुमच्यापूर्वी जो रसूल आणि नबी पाठविला (त्याच्यासोबत हे हमखास घडले की) जेव्हा तो आपल्या मनात एखादी इच्छा धरू लागला, सैतानाने त्याच्या मनोकामनेत काही मिसळून दिले तेव्हा सैतानाच्या भेसळीला अल्लाह दूर करतो, मग आपल्या वचनांना मजबूत करतो. सर्वश्रेष्ठ अल्लाह सर्व काही जाणणारा, किमत बाळगणारा आहे.

لِّیَجۡعَلَ مَا یُلۡقِی ٱلشَّیۡطَـٰنُ فِتۡنَةࣰ لِّلَّذِینَ فِی قُلُوبِهِم مَّرَضࣱ وَٱلۡقَاسِیَةِ قُلُوبُهُمۡۗ وَإِنَّ ٱلظَّـٰلِمِینَ لَفِی شِقَاقِۭ بَعِیدࣲ ﴿53﴾

५३. हे यासाठी की सैतानाच्या भेसळीला अल्लाहने त्या लोकांच्या कसोटीची सामुग्री बनवावे, ज्यांच्या मनात रोग आहे आणि ज्यांची मने कठोर आहेत. निःसंशय अत्याचारी लोक सक्त विरोधात आहेत.

وَلِیَعۡلَمَ ٱلَّذِینَ أُوتُوا۟ ٱلۡعِلۡمَ أَنَّهُ ٱلۡحَقُّ مِن رَّبِّكَ فَیُؤۡمِنُوا۟ بِهِۦ فَتُخۡبِتَ لَهُۥ قُلُوبُهُمۡۗ وَإِنَّ ٱللَّهَ لَهَادِ ٱلَّذِینَ ءَامَنُوۤا۟ إِلَىٰ صِرَ ٰ⁠طࣲ مُّسۡتَقِیمࣲ ﴿54﴾

५४. आणि यासाठीही की ज्यांना ज्ञान प्रदान केले गेले आहे, त्यांनी विश्वास करून घ्यावा की हे तुमच्या पालनकर्त्याच्याच तर्फे पूर्ण सत्य आहे, मग त्यांनी त्यावर ईमान राखावे आणि त्यांची हृदये त्याकडे झुकावित. निःसंशय अल्लाह ईमान राखणाऱ्यांना सत्य मार्गाकडे मार्गदर्शन करणारच आहे.

وَلَا یَزَالُ ٱلَّذِینَ كَفَرُوا۟ فِی مِرۡیَةࣲ مِّنۡهُ حَتَّىٰ تَأۡتِیَهُمُ ٱلسَّاعَةُ بَغۡتَةً أَوۡ یَأۡتِیَهُمۡ عَذَابُ یَوۡمٍ عَقِیمٍ ﴿55﴾

५५. आणि इन्कारी (काफिर) लोक अल्लाहच्या वहयीबाबत नेहमी संशयग्रस्तच राहतील, येथपर्यंत की अचानक त्यांच्या डोक्यावर कयामत येऊन पोहचावी किंवा त्यांच्याजवळ त्या दिवसाची शिक्षा- यातना येऊन पोहचावी, ज्यात किंचितही भलाई नाही.

ٱلۡمُلۡكُ یَوۡمَىِٕذࣲ لِّلَّهِ یَحۡكُمُ بَیۡنَهُمۡۚ فَٱلَّذِینَ ءَامَنُوا۟ وَعَمِلُوا۟ ٱلصَّـٰلِحَـٰتِ فِی جَنَّـٰتِ ٱلنَّعِیمِ ﴿56﴾

५६. त्या दिवशी केवळ अल्लाहचीच राज्यसत्ता असेल, तोच त्यांच्या दरम्यान फैसला करेल. ईमान राखणारे आणि नेक-सदाचारी लोक तर अल्लाहच्या देण्यांनी युक्त अशा जन्नतमध्ये असतील.

وَٱلَّذِینَ كَفَرُوا۟ وَكَذَّبُوا۟ بِـَٔایَـٰتِنَا فَأُو۟لَـٰۤىِٕكَ لَهُمۡ عَذَابࣱ مُّهِینࣱ ﴿57﴾

५७. आणि ज्या लोकांनी कुप्र (इन्कार) केला आणि आमच्या आयतींना खोटे ठरविले, त्यांच्यासाठी अपमानदायक शिक्षा यातना आहे.

وَٱلَّذِینَ هَاجَرُوا۟ فِی سَبِیلِ ٱللَّهِ ثُمَّ قُتِلُوۤا۟ أَوۡ مَاتُوا۟ لَیَرۡزُقَنَّهُمُ ٱللَّهُ رِزۡقًا حَسَنࣰاۚ وَإِنَّ ٱللَّهَ لَهُوَ خَیۡرُ ٱلرَّ ٰ⁠زِقِینَ ﴿58﴾

५८. आणि ज्यांनी अल्लाहच्या मार्गात देशत्याग केला, मग ते शहीद केले गेले किंवा मरण पावले, अल्लाह त्यांना उत्तम रोजी (आजिविका) प्रदान करेल आणि निःसंशय अल्लाह सर्वोत्तम रोजी प्रदान करणारा आहे.

لَیُدۡخِلَنَّهُم مُّدۡخَلࣰا یَرۡضَوۡنَهُۥۚ وَإِنَّ ٱللَّهَ لَعَلِیمٌ حَلِیمࣱ ﴿59﴾

५९. अल्लाहा त्यांना अशा ठिकाणी पोहचविल की ते त्या ठिकाणाने आनंदित होतील. निःसंशय अल्लाह सर्व काही जाणणारा आणि सहनशील आहे.

۞ ذَ ٰ⁠لِكَۖ وَمَنۡ عَاقَبَ بِمِثۡلِ مَا عُوقِبَ بِهِۦ ثُمَّ بُغِیَ عَلَیۡهِ لَیَنصُرَنَّهُ ٱللَّهُۚ إِنَّ ٱللَّهَ لَعَفُوٌّ غَفُورࣱ ﴿60﴾

६०. हा आहे (त्या लोकांचा मोबदला) आणि एखाद्याने त्याच प्रकारे बदला घ्यावा, ज्या प्रकारे त्याच्याशी केले गेले, मात्र जर त्याच्यावर अतिरेक झाला असेल तर निःसंशय अल्लाह स्वतः त्याची मदत करेल. निश्चितच अल्लाह माफ करणारा आणि क्षमाशील आहे.

ذَ ٰ⁠لِكَ بِأَنَّ ٱللَّهَ یُولِجُ ٱلَّیۡلَ فِی ٱلنَّهَارِ وَیُولِجُ ٱلنَّهَارَ فِی ٱلَّیۡلِ وَأَنَّ ٱللَّهَ سَمِیعُۢ بَصِیرࣱ ﴿61﴾

६१. हे अशासाठी की अल्लाह रात्रीला दिवसात दाखल करतो, आणि दिवसाला रात्रीत नेतो आणि निःसंशय अल्लाह ऐकणारा, पाहणारा आहे.

ذَ ٰ⁠لِكَ بِأَنَّ ٱللَّهَ هُوَ ٱلۡحَقُّ وَأَنَّ مَا یَدۡعُونَ مِن دُونِهِۦ هُوَ ٱلۡبَـٰطِلُ وَأَنَّ ٱللَّهَ هُوَ ٱلۡعَلِیُّ ٱلۡكَبِیرُ ﴿62﴾

६२. हे सर्व यासाठी की अल्लाहच सत्य आहे आणि त्याच्याखेरीज ज्याला देखील हे पुकारतात ते असत्य (मिथ्या) आहे आणि निःसंशय, अल्लाह अतिउच्च महानता बाळगणारा आहे.

أَلَمۡ تَرَ أَنَّ ٱللَّهَ أَنزَلَ مِنَ ٱلسَّمَاۤءِ مَاۤءࣰ فَتُصۡبِحُ ٱلۡأَرۡضُ مُخۡضَرَّةًۚ إِنَّ ٱللَّهَ لَطِیفٌ خَبِیرࣱ ﴿63﴾

६३. काय तुम्ही नाही पाहिले की अल्लाह आकाशातून पाणी वर्षवितो तेव्हा धरती हिरवी टवटवीत होते. निःसंशय अल्लाह मोठा मेहेरबान आणि जाणणारा आहे.

لَّهُۥ مَا فِی ٱلسَّمَـٰوَ ٰ⁠تِ وَمَا فِی ٱلۡأَرۡضِۚ وَإِنَّ ٱللَّهَ لَهُوَ ٱلۡغَنِیُّ ٱلۡحَمِیدُ ﴿64﴾

६४. आकाशांमध्ये व धरतीत जे काही आहे सर्व त्याचेच आहे आणि निःसंशय अल्लाह अगदी निःस्पृह, गुणवैशिट्यांनी युक्त, आणि प्रशंसनीय आहे.

أَلَمۡ تَرَ أَنَّ ٱللَّهَ سَخَّرَ لَكُم مَّا فِی ٱلۡأَرۡضِ وَٱلۡفُلۡكَ تَجۡرِی فِی ٱلۡبَحۡرِ بِأَمۡرِهِۦ وَیُمۡسِكُ ٱلسَّمَاۤءَ أَن تَقَعَ عَلَى ٱلۡأَرۡضِ إِلَّا بِإِذۡنِهِۦۤۚ إِنَّ ٱللَّهَ بِٱلنَّاسِ لَرَءُوفࣱ رَّحِیمࣱ ﴿65﴾

६५. काही तुम्ही नाही पाहिले की अल्लाहनेच धरतीच्या समस्त वस्तू तुमच्या अधीन केल्या आहेत आणि त्याच्या आदेशाने समुद्रात चालणाऱ्या नौका देखील. त्यानेच आकाशाला सावरून ठेवले आहे की धरतीवर त्याच्या हुकुमाविना कोसळून न पडावे. निःसंशय अल्लाह, लोकांसाठी मोठा स्नेहशील, दया करणारा आहे.

وَهُوَ ٱلَّذِیۤ أَحۡیَاكُمۡ ثُمَّ یُمِیتُكُمۡ ثُمَّ یُحۡیِیكُمۡۗ إِنَّ ٱلۡإِنسَـٰنَ لَكَفُورࣱ ﴿66﴾

६६. आणि त्यानेच तुम्हाला जिवंत केले, मग तोच तुम्हाला मृत्यु देईल, मग तोच तुम्हाला (पुन्हा) जिवंत करील. यात शंका नाही की मनुष्य मोठा कृतघ्न आहे.

لِّكُلِّ أُمَّةࣲ جَعَلۡنَا مَنسَكًا هُمۡ نَاسِكُوهُۖ فَلَا یُنَـٰزِعُنَّكَ فِی ٱلۡأَمۡرِۚ وَٱدۡعُ إِلَىٰ رَبِّكَۖ إِنَّكَ لَعَلَىٰ هُدࣰى مُّسۡتَقِیمࣲ ﴿67﴾

६७. प्रत्येक जनसमूहाकरिता आम्ही उपासनेची एक पद्धत निर्धारित केली आहे, जिचे ते पालन करणारे आहेत, तेव्हा त्यांनी तुमच्याशी या संदर्भात वाद घालू नये. तुम्ही आपल्या पालनकर्त्याकडे लोकांना बोलवा. निःसंशय, तुम्ही सरळ, सत्य मार्गावर आहात.

وَإِن جَـٰدَلُوكَ فَقُلِ ٱللَّهُ أَعۡلَمُ بِمَا تَعۡمَلُونَ ﴿68﴾

६८. आणि तरीही जर हे लोक तुमच्याशी वाद घालू लागतील तर तुम्ही सांगा की तुमच्या कर्मांना अल्लाह चांगल्या प्रकारे जाणून आहे.

ٱللَّهُ یَحۡكُمُ بَیۡنَكُمۡ یَوۡمَ ٱلۡقِیَـٰمَةِ فِیمَا كُنتُمۡ فِیهِ تَخۡتَلِفُونَ ﴿69﴾

६९. तुमच्या समस्त मतभेदांचा फैसला कयामतच्या दिवशी अल्लाह स्वतः करेल.

أَلَمۡ تَعۡلَمۡ أَنَّ ٱللَّهَ یَعۡلَمُ مَا فِی ٱلسَّمَاۤءِ وَٱلۡأَرۡضِۚ إِنَّ ذَ ٰ⁠لِكَ فِی كِتَـٰبٍۚ إِنَّ ذَ ٰ⁠لِكَ عَلَى ٱللَّهِ یَسِیرࣱ ﴿70﴾

७०. काय तुम्ही नाही जाणले की आकाश आणि धरतीच्या प्रत्येक वस्तूचे अल्लाहला ज्ञान आहे, हे सर्व एका लिखित ग्रंथात सुरक्षित आहे. सर्वश्रेष्ठ अल्लाहकरिता हे काम फार सोपे आहे.

وَیَعۡبُدُونَ مِن دُونِ ٱللَّهِ مَا لَمۡ یُنَزِّلۡ بِهِۦ سُلۡطَـٰنࣰا وَمَا لَیۡسَ لَهُم بِهِۦ عِلۡمࣱۗ وَمَا لِلظَّـٰلِمِینَ مِن نَّصِیرࣲ ﴿71﴾

७१. आणि हे अल्लाहखेरीज अशांची उपासना करीत आहेत, ज्यांच्याकरिता अल्लाहने कोणतेही प्रमाण अवतरित केले नाही आणि ना ते स्वतः याचे काही ज्ञान बाळगतात, अत्याचारींचा कोणी सहाय्यक नाही.

وَإِذَا تُتۡلَىٰ عَلَیۡهِمۡ ءَایَـٰتُنَا بَیِّنَـٰتࣲ تَعۡرِفُ فِی وُجُوهِ ٱلَّذِینَ كَفَرُوا۟ ٱلۡمُنكَرَۖ یَكَادُونَ یَسۡطُونَ بِٱلَّذِینَ یَتۡلُونَ عَلَیۡهِمۡ ءَایَـٰتِنَاۗ قُلۡ أَفَأُنَبِّئُكُم بِشَرࣲّ مِّن ذَ ٰ⁠لِكُمُۚ ٱلنَّارُ وَعَدَهَا ٱللَّهُ ٱلَّذِینَ كَفَرُوا۟ۖ وَبِئۡسَ ٱلۡمَصِیرُ ﴿72﴾

७२. आणि जेव्हा त्यांच्यासमोर आमच्या वाणीच्या स्पष्ट आयतींचे पठण केले जाते, तेव्हा तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावर नाराजीची लक्षणे स्पष्टपणे पाहता. ते तर आमच्या आयती ऐकणाऱ्यांवर हल्ला करण्याच्या बेतात असतात. सांगा, काय मी तुम्हाला याहून वाईट बातमी सांगू. ती आग आहे, जिचा वायदा अल्लाहने इन्कारी लोकांशी करून ठेवला आहे आणि ते मोठे वाईट ठिकाण आहे.

یَـٰۤأَیُّهَا ٱلنَّاسُ ضُرِبَ مَثَلࣱ فَٱسۡتَمِعُوا۟ لَهُۥۤۚ إِنَّ ٱلَّذِینَ تَدۡعُونَ مِن دُونِ ٱللَّهِ لَن یَخۡلُقُوا۟ ذُبَابࣰا وَلَوِ ٱجۡتَمَعُوا۟ لَهُۥۖ وَإِن یَسۡلُبۡهُمُ ٱلذُّبَابُ شَیۡـࣰٔا لَّا یَسۡتَنقِذُوهُ مِنۡهُۚ ضَعُفَ ٱلطَّالِبُ وَٱلۡمَطۡلُوبُ ﴿73﴾

७३. लोक हो! एक उदाहरण दिले जात आहे, जरा लक्षपूर्वक ऐका. अल्लाहखेरीज तुम्ही ज्यांना ज्यांना (उपास्य समजून) पुकारत राहिला आहात, ते एक माशी देखील निर्माण करू शकत नाही. जर सर्वच्या सर्व एकत्र होतील, किंबहुना जर माशी यांच्याकडून एखादी वस्तू घेऊन पळेल तर हे त्या वस्तूला तिच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. मोठा कमकुवत आहे मागणारा आणि खूप दुबळा आहे तो ज्याच्याकडे मागितले जात आहे.

مَا قَدَرُوا۟ ٱللَّهَ حَقَّ قَدۡرِهِۦۤۚ إِنَّ ٱللَّهَ لَقَوِیٌّ عَزِیزٌ ﴿74﴾

७४. त्यांनी अल्लाहच्या महानतेनुसार त्याचे महत्त्व जाणलेच नाही, निःसंशय अल्लाह मोठा जबरदस्त आणि वर्चस्वशाली आहे.

ٱللَّهُ یَصۡطَفِی مِنَ ٱلۡمَلَـٰۤىِٕكَةِ رُسُلࣰا وَمِنَ ٱلنَّاسِۚ إِنَّ ٱللَّهَ سَمِیعُۢ بَصِیرࣱ ﴿75﴾

७५. फरिश्त्यांमधून आणि मानवांमधून रसूल (संदेशवाहक) अल्लाहच निवडतो. निःसंशय अल्लाह ऐकणारा, पाहणारा आहे.

یَعۡلَمُ مَا بَیۡنَ أَیۡدِیهِمۡ وَمَا خَلۡفَهُمۡۚ وَإِلَى ٱللَّهِ تُرۡجَعُ ٱلۡأُمُورُ ﴿76﴾

७६. तो चांगल्या प्रकारे जाणतो जे काही त्यांच्या पुढे आहे आणि जे काही त्यांच्या मागे आहे आणि अल्लाहच्याचकडे सर्व व्यवहार परतविले जातात.

یَـٰۤأَیُّهَا ٱلَّذِینَ ءَامَنُوا۟ ٱرۡكَعُوا۟ وَٱسۡجُدُوا۟ وَٱعۡبُدُوا۟ رَبَّكُمۡ وَٱفۡعَلُوا۟ ٱلۡخَیۡرَ لَعَلَّكُمۡ تُفۡلِحُونَ ۩ ﴿77﴾

७७. हे ईमान राखणाऱ्यांनो! रुकुअ, सजदा करीत राहा आणि आपल्या पालनकर्त्याची उपासना करीत राहा आणि सत्कर्म करीत राहा, यासाठी की तुम्ही सफल व्हावे.

وَجَـٰهِدُوا۟ فِی ٱللَّهِ حَقَّ جِهَادِهِۦۚ هُوَ ٱجۡتَبَىٰكُمۡ وَمَا جَعَلَ عَلَیۡكُمۡ فِی ٱلدِّینِ مِنۡ حَرَجࣲۚ مِّلَّةَ أَبِیكُمۡ إِبۡرَ ٰ⁠هِیمَۚ هُوَ سَمَّىٰكُمُ ٱلۡمُسۡلِمِینَ مِن قَبۡلُ وَفِی هَـٰذَا لِیَكُونَ ٱلرَّسُولُ شَهِیدًا عَلَیۡكُمۡ وَتَكُونُوا۟ شُهَدَاۤءَ عَلَى ٱلنَّاسِۚ فَأَقِیمُوا۟ ٱلصَّلَوٰةَ وَءَاتُوا۟ ٱلزَّكَوٰةَ وَٱعۡتَصِمُوا۟ بِٱللَّهِ هُوَ مَوۡلَىٰكُمۡۖ فَنِعۡمَ ٱلۡمَوۡلَىٰ وَنِعۡمَ ٱلنَّصِیرُ ﴿78﴾

७८. आणि अल्लाहच्या मार्गात तसेच जिहाद (धर्मयुद्ध) करा, जसा जिहादचा हक्क आहे. त्याने तुम्हाला निवडले आहे आणि तुमच्यावर दीन (धर्मा) संदर्भात कसलीही कमतरता राखली नाही. तुमचे पिता इब्राहीमचा दीन (धर्म कायम राखा) त्याच (अल्लाहने) ने तुमचे नाव मुस्लिम ठेवले आहे. या (कुरआना) पूर्वी आणि याच्यातही, यासाठी की पैगंबर तुमच्यावर साक्षी असावा आणि तुम्ही लोकांवर साक्षी व्हावे. तेव्हा तुमचे हे कर्तव्य ठरते की नमाज कायम करा आणि जकात (धर्मदान) अदा करीत राहा आणि अल्लाहला दृढतापूर्वक धरा, तोच तुमचा संरक्षक आणि स्वामी आहे, तेव्हा किती चांगला स्वामी आणि किती चांगला सहाय्य करणारा.