Main pages

طسۤۚ تِلۡكَ ءَایَـٰتُ ٱلۡقُرۡءَانِ وَكِتَابࣲ مُّبِینٍ ﴿1﴾

१. ता - सीन या आयती आहेत कुरआनच्या (अर्थात स्पष्ट) आणि दिव्य ग्रंथाच्या.

هُدࣰى وَبُشۡرَىٰ لِلۡمُؤۡمِنِینَ ﴿2﴾

२. मार्गदर्शन आणि खूशखबर, ईमान राखणाऱ्यांकरिता.

ٱلَّذِینَ یُقِیمُونَ ٱلصَّلَوٰةَ وَیُؤۡتُونَ ٱلزَّكَوٰةَ وَهُم بِٱلۡـَٔاخِرَةِ هُمۡ یُوقِنُونَ ﴿3﴾

३. जे नमाज कायम करतात आणि जकात अदा करतात आणि आखिरतवर ईमान राखतात.

إِنَّ ٱلَّذِینَ لَا یُؤۡمِنُونَ بِٱلۡـَٔاخِرَةِ زَیَّنَّا لَهُمۡ أَعۡمَـٰلَهُمۡ فَهُمۡ یَعۡمَهُونَ ﴿4﴾

४. जे लोक कयामतवर ईमान राखत नाही, आम्ही त्यांच्यासाठी त्यांची कर्मे सुशोभित करून दाखविली आहेत, यास्तव ते भटकत फिरतात.

أُو۟لَـٰۤىِٕكَ ٱلَّذِینَ لَهُمۡ سُوۤءُ ٱلۡعَذَابِ وَهُمۡ فِی ٱلۡـَٔاخِرَةِ هُمُ ٱلۡأَخۡسَرُونَ ﴿5﴾

५. हेच ते लोक होत, ज्यांच्यासाठी मोठी वाईट शिक्षा- यातना आहे, आणि आखिरतमध्येही ते मोठे नुकसान उचलणारे आहेत.

وَإِنَّكَ لَتُلَقَّى ٱلۡقُرۡءَانَ مِن لَّدُنۡ حَكِیمٍ عَلِیمٍ ﴿6﴾

६. आणि निःसंशय तुम्हाला कुरआन शिकविला जात आहे, हिकमतशाली आणि सर्वकाही जाणणाऱ्या अल्लाहतर्फे.

إِذۡ قَالَ مُوسَىٰ لِأَهۡلِهِۦۤ إِنِّیۤ ءَانَسۡتُ نَارࣰا سَـَٔاتِیكُم مِّنۡهَا بِخَبَرٍ أَوۡ ءَاتِیكُم بِشِهَابࣲ قَبَسࣲ لَّعَلَّكُمۡ تَصۡطَلُونَ ﴿7﴾

७. जेव्हा मूसा आपल्या कुटुंबियांना म्हणाले, मी आग पाहिली आहे. मी तेथून एक तर काही बातमी घेऊन येईन किंवा आगीचा एखादा धगधगता विस्तव घेऊन लगेच तुमच्याजवळ येईन, यासाठी की तुम्ही शेकून घ्यावे.

فَلَمَّا جَاۤءَهَا نُودِیَ أَنۢ بُورِكَ مَن فِی ٱلنَّارِ وَمَنۡ حَوۡلَهَا وَسُبۡحَـٰنَ ٱللَّهِ رَبِّ ٱلۡعَـٰلَمِینَ ﴿8﴾

८. जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा त्यांना हाक दिली गेली की शुभ आहे तो, जो त्या आगीत आहे आणि शुभ आहे तो जो तिच्याजवळ पास आहे आणि मोठा पवित्र आहे अल्लाह, सर्व विश्वांचा स्वामी व पालनकर्ता.

یَـٰمُوسَىٰۤ إِنَّهُۥۤ أَنَا ٱللَّهُ ٱلۡعَزِیزُ ٱلۡحَكِیمُ ﴿9﴾

९. मूसा (ऐका) खरी गोष्ट ही की मीच अल्लाह आहे जबरदस्त आणि हिकमत (बुद्धीकौशल्य) बाळगणारा.

وَأَلۡقِ عَصَاكَۚ فَلَمَّا رَءَاهَا تَهۡتَزُّ كَأَنَّهَا جَاۤنࣱّ وَلَّىٰ مُدۡبِرࣰا وَلَمۡ یُعَقِّبۡۚ یَـٰمُوسَىٰ لَا تَخَفۡ إِنِّی لَا یَخَافُ لَدَیَّ ٱلۡمُرۡسَلُونَ ﴿10﴾

१०. आणि तुम्ही आपली काठी खाली टाका. (हजरत मूसा यांनी) जेव्हा तिला हालचाल करताना पाहिले अशा प्रकारे की जणू साप आहे, तेव्हा तोंड फिरवून पाठ वळवून पळाले आणि मागे वळूनही पाहिले नाही. हे मूसा! भिऊ नका. माझ्यासमोर पैगंबर भित नसतात.

إِلَّا مَن ظَلَمَ ثُمَّ بَدَّلَ حُسۡنَۢا بَعۡدَ سُوۤءࣲ فَإِنِّی غَفُورࣱ رَّحِیمࣱ ﴿11﴾

११. परंतु जे लोक अत्याचार करतील, मग त्यास नेकी (सत्कर्मा) ने बदलतील त्या दुराचारानंतर तर मी देखील माफ करणारा, दया करणारा आहे.

وَأَدۡخِلۡ یَدَكَ فِی جَیۡبِكَ تَخۡرُجۡ بَیۡضَاۤءَ مِنۡ غَیۡرِ سُوۤءࣲۖ فِی تِسۡعِ ءَایَـٰتٍ إِلَىٰ فِرۡعَوۡنَ وَقَوۡمِهِۦۤۚ إِنَّهُمۡ كَانُوا۟ قَوۡمࣰا فَـٰسِقِینَ ﴿12﴾

१२. आणि आपला हात आपल्या गळपट्टीत टाका तो शुभ्र (आणि तेजस्वी) होऊन निघेल, कसल्याही व्याधीविना. (तुम्ही) नऊ निशाण्या घेऊन फिरऔन आणि त्याच्या अनुयायींजवळ (जा) निःसंशय तो दुराचारी लोकांचा समूह आहे.

فَلَمَّا جَاۤءَتۡهُمۡ ءَایَـٰتُنَا مُبۡصِرَةࣰ قَالُوا۟ هَـٰذَا سِحۡرࣱ مُّبِینࣱ ﴿13﴾

१३. यास्तव, जेव्हा त्यांच्याजवळ डोळे उघडविणारे आमचे चमत्कार (मोजिजे) पोहोचले, तेव्हा ते म्हणू लागले की ही तर उघड जादू आहे.

وَجَحَدُوا۟ بِهَا وَٱسۡتَیۡقَنَتۡهَاۤ أَنفُسُهُمۡ ظُلۡمࣰا وَعُلُوࣰّاۚ فَٱنظُرۡ كَیۡفَ كَانَ عَـٰقِبَةُ ٱلۡمُفۡسِدِینَ ﴿14﴾

१४. आणि त्यांनी इन्कार केला, वास्तिवक त्यांच्या मनात विश्वास बसला होता केवळ अत्याचार व घमेंडीमुळे (त्यांनी इन्कार केला) तर पाहा, त्या दुराचारी लोकांचा काय शेवट झाला!

وَلَقَدۡ ءَاتَیۡنَا دَاوُۥدَ وَسُلَیۡمَـٰنَ عِلۡمࣰاۖ وَقَالَا ٱلۡحَمۡدُ لِلَّهِ ٱلَّذِی فَضَّلَنَا عَلَىٰ كَثِیرࣲ مِّنۡ عِبَادِهِ ٱلۡمُؤۡمِنِینَ ﴿15﴾

१५. आणि निःसंशय, आम्ही दाऊद आणि सुलेमानला ज्ञान प्रदान केले होते आणि दोघे म्हणाले, सर्व प्रशंसा त्या अल्लाहकरिता आहे, ज्याने आम्हाला आपल्या अनेक ईमानधारक दासांवर श्रेष्ठत्व प्रदान केले आहे.

وَوَرِثَ سُلَیۡمَـٰنُ دَاوُۥدَۖ وَقَالَ یَـٰۤأَیُّهَا ٱلنَّاسُ عُلِّمۡنَا مَنطِقَ ٱلطَّیۡرِ وَأُوتِینَا مِن كُلِّ شَیۡءٍۖ إِنَّ هَـٰذَا لَهُوَ ٱلۡفَضۡلُ ٱلۡمُبِینُ ﴿16﴾

१६. आणि दाऊदचे वारस सुलेमान झाले आणि म्हणाले, लोकांनो! आम्हाला पक्ष्यांची बोली (भाषा) शिकिवली गेली आहे. आणि आम्हाला सर्व काही दिले गेले आहेे. निःसंशय हा (अल्लाहचा) मोठा उघड उपकार आहे.

وَحُشِرَ لِسُلَیۡمَـٰنَ جُنُودُهُۥ مِنَ ٱلۡجِنِّ وَٱلۡإِنسِ وَٱلطَّیۡرِ فَهُمۡ یُوزَعُونَ ﴿17﴾

१७. आणि सुलेमानच्या समोर त्यांचे सर्व सैन्य जिन्न आणि मनुष्य आणि पक्षी जमा केले गेले (प्रत्येक प्रकाराला) वेगवेगळे उभे केले गेले.

حَتَّىٰۤ إِذَاۤ أَتَوۡا۟ عَلَىٰ وَادِ ٱلنَّمۡلِ قَالَتۡ نَمۡلَةࣱ یَـٰۤأَیُّهَا ٱلنَّمۡلُ ٱدۡخُلُوا۟ مَسَـٰكِنَكُمۡ لَا یَحۡطِمَنَّكُمۡ سُلَیۡمَـٰنُ وَجُنُودُهُۥ وَهُمۡ لَا یَشۡعُرُونَ ﴿18﴾

१८. जेव्हा ते मुंग्यांच्या मैदानात पोहोचले, तेव्हा एक मुंगी म्हणाली, हे मुंग्यानो! आपापल्या बिळात पटकन घुसा (असे न व्हावे की) असावधानीमुळे सुलेमान आणि त्यांच्या सैन्याने तुम्हाला पायाखाली तुडवावे.

فَتَبَسَّمَ ضَاحِكࣰا مِّن قَوۡلِهَا وَقَالَ رَبِّ أَوۡزِعۡنِیۤ أَنۡ أَشۡكُرَ نِعۡمَتَكَ ٱلَّتِیۤ أَنۡعَمۡتَ عَلَیَّ وَعَلَىٰ وَ ٰ⁠لِدَیَّ وَأَنۡ أَعۡمَلَ صَـٰلِحࣰا تَرۡضَىٰهُ وَأَدۡخِلۡنِی بِرَحۡمَتِكَ فِی عِبَادِكَ ٱلصَّـٰلِحِینَ ﴿19﴾

१९. तिच्या या बोलण्यावर (हजरत सुलेमान) यांनी स्मितहास्य केले आणि दुआ (प्रार्थना) करू लागले की हे माझ्या पालनकर्त्या! तू मला तौफिक (सुबुद्धी) प्रदान कर की मी तुझ्या या देणग्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी, ज्या तू माझ्यावर केल्या आहेत आणि माझ्या माता-पित्यांवर आणि मी अशी सत्कर्मे करीत राहावे, ज्यामुळे तू प्रसन्न राहावे आणि मला आपल्या दया- कृपेने आपल्या नेक- सदाचारी दासांमध्ये सामील कर.

وَتَفَقَّدَ ٱلطَّیۡرَ فَقَالَ مَا لِیَ لَاۤ أَرَى ٱلۡهُدۡهُدَ أَمۡ كَانَ مِنَ ٱلۡغَاۤىِٕبِینَ ﴿20﴾

२०. आणि त्यांनी पक्ष्यांचे निरीक्षण केले व म्हणाले, काय गोष्ट आहे की मला हुद हुद दिसून येत नाही? काय खरोखर तो हजर नाही?

لَأُعَذِّبَنَّهُۥ عَذَابࣰا شَدِیدًا أَوۡ لَأَا۟ذۡبَحَنَّهُۥۤ أَوۡ لَیَأۡتِیَنِّی بِسُلۡطَـٰنࣲ مُّبِینࣲ ﴿21﴾

२१. निःसंशय मी त्याला कठोर दंड देईन किंवा त्याला कापून टाकीन किंवा त्याने माझ्यासमोर योग्य कारण सादर करावे.

فَمَكَثَ غَیۡرَ بَعِیدࣲ فَقَالَ أَحَطتُ بِمَا لَمۡ تُحِطۡ بِهِۦ وَجِئۡتُكَ مِن سَبَإِۭ بِنَبَإࣲ یَقِینٍ ﴿22﴾

२२. काही जास्त वेळ झाला नव्हता, तेवढ्यात तो (येऊन) म्हणाला, मी अशा गोष्टीची खबर आणली आहे की ज्याविषयी तुम्ही जाणतच नाही. मी ‘सबा’ची अगदी विश्वसनीय बातमी घेऊन तुमच्याजवळ आलो आहे.

إِنِّی وَجَدتُّ ٱمۡرَأَةࣰ تَمۡلِكُهُمۡ وَأُوتِیَتۡ مِن كُلِّ شَیۡءࣲ وَلَهَا عَرۡشٌ عَظِیمࣱ ﴿23﴾

२३. मी पाहिले की एक स्त्री त्यांच्यावर राज्य करीत आहे, जिला सर्व प्रकारच्या वस्तूंपैकी काही न काही प्रदान केले गेले आहे आणि तिचे सिंहासन देखील मोठे भव्य आहे.

وَجَدتُّهَا وَقَوۡمَهَا یَسۡجُدُونَ لِلشَّمۡسِ مِن دُونِ ٱللَّهِ وَزَیَّنَ لَهُمُ ٱلشَّیۡطَـٰنُ أَعۡمَـٰلَهُمۡ فَصَدَّهُمۡ عَنِ ٱلسَّبِیلِ فَهُمۡ لَا یَهۡتَدُونَ ﴿24﴾

२४. मी तिला आणि तिच्या जनसमूहाच्या लोकांना अल्लाहऐवजी सूर्याला सजदा करताना पाहिले. सैतानाने त्याची कर्मे त्यांना भले चांगले असल्याचे दाखवून सत्य मार्गापासून त्यांना रोखले आहे, यास्तव त्यांना सन्मार्ग प्राप्त होत नाही.

أَلَّا یَسۡجُدُوا۟ لِلَّهِ ٱلَّذِی یُخۡرِجُ ٱلۡخَبۡءَ فِی ٱلسَّمَـٰوَ ٰ⁠تِ وَٱلۡأَرۡضِ وَیَعۡلَمُ مَا تُخۡفُونَ وَمَا تُعۡلِنُونَ ﴿25﴾

२५. की केवळ त्याच अल्लाहला सजदा करावा, जो आकाशांच्या आणि धरतीच्या लपलेल्या वस्तूंना बाहेर काढतो, आणि जे काही तुम्ही लपवून ठेवता आणि जाहीर करता तो ते सर्व काही जाणतो.

ٱللَّهُ لَاۤ إِلَـٰهَ إِلَّا هُوَ رَبُّ ٱلۡعَرۡشِ ٱلۡعَظِیمِ ۩ ﴿26﴾

२६. (अर्थात) अल्लाह! त्याच्याखेरीज कोणीही उपासनीय नाही. तोच महान अर्श (ईश-सिंहासनां) चा स्वामी आहे.

۞ قَالَ سَنَنظُرُ أَصَدَقۡتَ أَمۡ كُنتَ مِنَ ٱلۡكَـٰذِبِینَ ﴿27﴾

२७. (सुलेमान) म्हणाले, आता आम्ही पाहतो की तू खरे बोललास की तू खोटा आहे.

ٱذۡهَب بِّكِتَـٰبِی هَـٰذَا فَأَلۡقِهۡ إِلَیۡهِمۡ ثُمَّ تَوَلَّ عَنۡهُمۡ فَٱنظُرۡ مَاذَا یَرۡجِعُونَ ﴿28﴾

२८. माझे हे पत्र नेऊन त्यांना दे, मग त्यांच्यापासून दूर होऊन पाहा की ते काय उत्तर देतात.

قَالَتۡ یَـٰۤأَیُّهَا ٱلۡمَلَؤُا۟ إِنِّیۤ أُلۡقِیَ إِلَیَّ كِتَـٰبࣱ كَرِیمٌ ﴿29﴾

२९. ती म्हणाली, हे सरदारांनो! माझ्याजवळ एक महत्त्वपूर्ण पत्र टाकले गेले आहे.

إِنَّهُۥ مِن سُلَیۡمَـٰنَ وَإِنَّهُۥ بِسۡمِ ٱللَّهِ ٱلرَّحۡمَـٰنِ ٱلرَّحِیمِ ﴿30﴾

३०. जे सुलेमानतर्फे आहे आणि ज्याचा आरंभ अतिशय दयावान, मोठ्या मेहरबान अल्लाहच्या नावाने आहे.

أَلَّا تَعۡلُوا۟ عَلَیَّ وَأۡتُونِی مُسۡلِمِینَ ﴿31﴾

३१. हे की तुम्ही माझ्यासमोर विद्रोह करू नका आणि मुस्लिम होऊन माझ्याजवळ या.

قَالَتۡ یَـٰۤأَیُّهَا ٱلۡمَلَؤُا۟ أَفۡتُونِی فِیۤ أَمۡرِی مَا كُنتُ قَاطِعَةً أَمۡرًا حَتَّىٰ تَشۡهَدُونِ ﴿32﴾

३२. ती (राणी) म्हणाली, हे माझ्या दरबारी लोकांनो! तुम्ही माझ्या या समस्येबाबत मला सल्ला द्या. मी कोणत्याही गोष्टीचा अंतिम फैसला, जोपर्यंत तुमची उपिस्थती आणि मत नसेल, करत नसते.

قَالُوا۟ نَحۡنُ أُو۟لُوا۟ قُوَّةࣲ وَأُو۟لُوا۟ بَأۡسࣲ شَدِیدࣲ وَٱلۡأَمۡرُ إِلَیۡكِ فَٱنظُرِی مَاذَا تَأۡمُرِینَ ﴿33﴾

३३. त्या सर्वांनी उत्तर दिले, आम्ही मोठे मजबूत आणि शक्तिशाली आणि खूप लढवय्ये आहोत. आता यापुढे तुमचा अधिकार आहे. तुम्ही स्वतःच विचार करा की तुम्ही आम्हाला कोणता आदेश देता.

قَالَتۡ إِنَّ ٱلۡمُلُوكَ إِذَا دَخَلُوا۟ قَرۡیَةً أَفۡسَدُوهَا وَجَعَلُوۤا۟ أَعِزَّةَ أَهۡلِهَاۤ أَذِلَّةࣰۚ وَكَذَ ٰ⁠لِكَ یَفۡعَلُونَ ﴿34﴾

३४. ती (राणी) म्हणाली, बादशाह (राजे-महाराजे) जेव्हा एखाद्या वस्तीत प्रवेश करतात, तेव्हा तिला ओसाड करून टाकतात आणि तिथल्या प्रतिष्ठित लोकांना अपमानित करतात तेव्हा लोक देखील असेच करतील.

وَإِنِّی مُرۡسِلَةٌ إِلَیۡهِم بِهَدِیَّةࣲ فَنَاظِرَةُۢ بِمَ یَرۡجِعُ ٱلۡمُرۡسَلُونَ ﴿35﴾

३५. आणि मी त्यांना एक नजराणा पाठविणार आहे, मग पाहते की दूत काय उत्तर घेऊन परत येतात.

فَلَمَّا جَاۤءَ سُلَیۡمَـٰنَ قَالَ أَتُمِدُّونَنِ بِمَالࣲ فَمَاۤ ءَاتَىٰنِۦَ ٱللَّهُ خَیۡرࣱ مِّمَّاۤ ءَاتَىٰكُمۚ بَلۡ أَنتُم بِهَدِیَّتِكُمۡ تَفۡرَحُونَ ﴿36﴾

३६. यास्तव (राजदूत) जेव्हा (हजरत) सुलेमानजवळ पोहोचला, तेव्हा सुलेमान म्हणाले, काय तुम्ही लोक धन देऊन माझी मदत करू इच्छिता? मला तर माझ्या पालनकर्त्याने याहून खूप जास्त देऊन ठेवले आहे, जे त्याने तुम्हाला दिले आहे. तेव्हा आपल्या नजराण्याने तुम्हीच खूश राहा.

ٱرۡجِعۡ إِلَیۡهِمۡ فَلَنَأۡتِیَنَّهُم بِجُنُودࣲ لَّا قِبَلَ لَهُم بِهَا وَلَنُخۡرِجَنَّهُم مِّنۡهَاۤ أَذِلَّةࣰ وَهُمۡ صَـٰغِرُونَ ﴿37﴾

३७. जा, परत जा, त्यांच्याकडे आम्ही त्यांच्यावर असे सैन्य पाठवू की ज्याचा सामना करण्याची त्यांच्यात ताकत नाही आणि आम्ही त्यांना अपमानित व पराभूत करून तिथून बाहेर घालवू.

قَالَ یَـٰۤأَیُّهَا ٱلۡمَلَؤُا۟ أَیُّكُمۡ یَأۡتِینِی بِعَرۡشِهَا قَبۡلَ أَن یَأۡتُونِی مُسۡلِمِینَ ﴿38﴾

३८. (सुलेमान) म्हणाले, हे सरदारांनो! तुमच्यापैकी कोणी असा आहे, जो त्यांचे मुस्लिम होऊन पोहचण्यापूर्वीच, तिचे सिंहासन माझ्याजवळ आणून देईल.

قَالَ عِفۡرِیتࣱ مِّنَ ٱلۡجِنِّ أَنَا۠ ءَاتِیكَ بِهِۦ قَبۡلَ أَن تَقُومَ مِن مَّقَامِكَۖ وَإِنِّی عَلَیۡهِ لَقَوِیٌّ أَمِینࣱ ﴿39﴾

३९. एक बलाढ्य जिन्न म्हणाला, तुम्ही आपल्या जागेवरून उठण्यापूर्वीच मी ते तुमच्याजवळ आणतो. विश्वास राखा, मी याचे सामर्थ्य राखतो. आणि मी अमानतदार (विस्वस्त) ही आहे.

قَالَ ٱلَّذِی عِندَهُۥ عِلۡمࣱ مِّنَ ٱلۡكِتَـٰبِ أَنَا۠ ءَاتِیكَ بِهِۦ قَبۡلَ أَن یَرۡتَدَّ إِلَیۡكَ طَرۡفُكَۚ فَلَمَّا رَءَاهُ مُسۡتَقِرًّا عِندَهُۥ قَالَ هَـٰذَا مِن فَضۡلِ رَبِّی لِیَبۡلُوَنِیۤ ءَأَشۡكُرُ أَمۡ أَكۡفُرُۖ وَمَن شَكَرَ فَإِنَّمَا یَشۡكُرُ لِنَفۡسِهِۦۖ وَمَن كَفَرَ فَإِنَّ رَبِّی غَنِیࣱّ كَرِیمࣱ ﴿40﴾

४०. ज्याच्याजवळ ग्रंथाचे ज्ञान होते, तो म्हणाले, की तुमची पापणी लवण्यापूर्वीच मी त्यास तुमच्याजवळ पोहचवू शकतो. जेव्हा पैगंबर (सुलेमान) ने ते (सिंहासन) आपल्याजवळ हजर असलेले पाहिले, तेव्हा म्हणाले, हा माझ्या पालनकर्त्याचा उपकार आहे. यासाठी की त्याने माझी कसोटी घ्यावी की मी कृतज्ञता दर्शवितो की कृतघ्नता. कृतज्ञता व्यक्त करणारा आपल्या फायद्यासाठीच कृतज्ञता व्यक्त करतो. आणि जो कृतघ्नता दर्शवील तर माझा पालनकर्ता मोठा निःस्पृह आणि मोठा मेहेरबान आहे.

قَالَ نَكِّرُوا۟ لَهَا عَرۡشَهَا نَنظُرۡ أَتَهۡتَدِیۤ أَمۡ تَكُونُ مِنَ ٱلَّذِینَ لَا یَهۡتَدُونَ ﴿41﴾

४१. (हजरत सुलेमानने) आदेश दिला की राणीच्या सिंहासनाचे स्वरूप काहीसे बदलून टाका. मग पाहू या, ती मार्गदर्शन प्राप्त करते की त्या लोकांपैकी ठरते जे मार्गदर्शन प्राप्त करीत नाही.

فَلَمَّا جَاۤءَتۡ قِیلَ أَهَـٰكَذَا عَرۡشُكِۖ قَالَتۡ كَأَنَّهُۥ هُوَۚ وَأُوتِینَا ٱلۡعِلۡمَ مِن قَبۡلِهَا وَكُنَّا مُسۡلِمِینَ ﴿42﴾

४२. मग जेव्हा ती हजर झाली तेव्हा तिला विचारले गेले की तुमचे सिंहासन असेच आहे? तिने उत्तर दिले, हे जणू तेच आहे आम्हाला याच्यापूर्वीच ज्ञान दिले गेले होते आणि आम्ही मुस्लिम होतो.

وَصَدَّهَا مَا كَانَت تَّعۡبُدُ مِن دُونِ ٱللَّهِۖ إِنَّهَا كَانَتۡ مِن قَوۡمࣲ كَـٰفِرِینَ ﴿43﴾

४३. आणि तिला त्यांनी रोखून ठेवले होते, ज्यांची ती अल्लाहखेरीज उपासना करीत राहिली, निःसंशय ती काफिर लोकांपैकी होती.

قِیلَ لَهَا ٱدۡخُلِی ٱلصَّرۡحَۖ فَلَمَّا رَأَتۡهُ حَسِبَتۡهُ لُجَّةࣰ وَكَشَفَتۡ عَن سَاقَیۡهَاۚ قَالَ إِنَّهُۥ صَرۡحࣱ مُّمَرَّدࣱ مِّن قَوَارِیرَۗ قَالَتۡ رَبِّ إِنِّی ظَلَمۡتُ نَفۡسِی وَأَسۡلَمۡتُ مَعَ سُلَیۡمَـٰنَ لِلَّهِ رَبِّ ٱلۡعَـٰلَمِینَ ﴿44﴾

४४. तिला सांगितले गेले की महालात प्रवेश करा. जेव्हा तिने पाहिले तेव्हा तिला असे वाटले की हा जलाशय (हौद) आहे, तिने आपल्या पोटऱ्या उघड्या केल्या (सुलेमान) म्हणाले, हा तर काचेचा बनलेला आहे. ती म्हणाली, हे माझ्या पालनकर्त्या! मी आपल्या प्राणावर अत्याचार केला. आता मी सुलेमानसोबत, सर्व विश्वांच्या पालनकर्त्या अल्लाहची आज्ञाधारक बनते.

وَلَقَدۡ أَرۡسَلۡنَاۤ إِلَىٰ ثَمُودَ أَخَاهُمۡ صَـٰلِحًا أَنِ ٱعۡبُدُوا۟ ٱللَّهَ فَإِذَا هُمۡ فَرِیقَانِ یَخۡتَصِمُونَ ﴿45﴾

४५. आणि निःसंशय, आम्ही ‘समूद’कडे त्यांचा भाऊ ‘स्वालेह’ला पाठविले (या संदेशासह) की तुम्ही सर्व अल्लाहची उपासना करा. तरीही ते दोन गट बनून आपसात भांडणतंटा करू लागले.

قَالَ یَـٰقَوۡمِ لِمَ تَسۡتَعۡجِلُونَ بِٱلسَّیِّئَةِ قَبۡلَ ٱلۡحَسَنَةِۖ لَوۡلَا تَسۡتَغۡفِرُونَ ٱللَّهَ لَعَلَّكُمۡ تُرۡحَمُونَ ﴿46﴾

४६. (पैगंबर स्वालेह) म्हणाले, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! तुम्ही भलेपणाच्या आदी वाईट गोष्टीची घाई का माजवित आहात. तुम्ही अल्लाहजवळ माफी का नाही मागत? यासाठी की तुमच्यावर दया केली जावी.

قَالُوا۟ ٱطَّیَّرۡنَا بِكَ وَبِمَن مَّعَكَۚ قَالَ طَـٰۤىِٕرُكُمۡ عِندَ ٱللَّهِۖ بَلۡ أَنتُمۡ قَوۡمࣱ تُفۡتَنُونَ ﴿47﴾

४७. (ते) म्हणाले की आम्ही तर तुम्हाला आणि तुमच्या साथीदारांना अपशकुनी समजतो (पैगंबरानी) उत्तर दिले, तुमचा अपशकून अल्लाहजवळ आहे. किंबहुना तुम्ही तर कसोटीत पडलेले लोक आहात.

وَكَانَ فِی ٱلۡمَدِینَةِ تِسۡعَةُ رَهۡطࣲ یُفۡسِدُونَ فِی ٱلۡأَرۡضِ وَلَا یُصۡلِحُونَ ﴿48﴾

४८. या शहरात नऊ (प्रमुख) माणसे होती, जे धरतीत उत्पात (फसाद) पसरवित होते आणि सुधारणेचे काम करीत नव्हते.

قَالُوا۟ تَقَاسَمُوا۟ بِٱللَّهِ لَنُبَیِّتَنَّهُۥ وَأَهۡلَهُۥ ثُمَّ لَنَقُولَنَّ لِوَلِیِّهِۦ مَا شَهِدۡنَا مَهۡلِكَ أَهۡلِهِۦ وَإِنَّا لَصَـٰدِقُونَ ﴿49﴾

४९. त्यांनी आपसात अल्लाहची शपथ घेऊन प्रतिज्ञा केली की रात्रीतूनच ‘स्वालेह’ आणि त्यांच्या कुटुंबियांवर हल्ला चढवू आणि त्यांच्या वारसदाराला सांगू की आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या हत्येच्या वेळी हजर नव्हतो आणि आम्ही खरे बोलत आहोत.

وَمَكَرُوا۟ مَكۡرࣰا وَمَكَرۡنَا مَكۡرࣰا وَهُمۡ لَا یَشۡعُرُونَ ﴿50﴾

५०. आणि त्यांनी डाव खेळा आणि आम्ही देखील आणि ते त्यास समजतच नव्हते.

فَٱنظُرۡ كَیۡفَ كَانَ عَـٰقِبَةُ مَكۡرِهِمۡ أَنَّا دَمَّرۡنَـٰهُمۡ وَقَوۡمَهُمۡ أَجۡمَعِینَ ﴿51﴾

५१. आता पाहा, त्यांच्या कट-कारस्थानाचा काय परिणाम झाला? आम्ही त्यांना आणि त्यांच्या जनसमूहाला, सर्वांनाच नष्ट करून टाकले.

فَتِلۡكَ بُیُوتُهُمۡ خَاوِیَةَۢ بِمَا ظَلَمُوۤا۟ۚ إِنَّ فِی ذَ ٰ⁠لِكَ لَـَٔایَةࣰ لِّقَوۡمࣲ یَعۡلَمُونَ ﴿52﴾

५२. ही त्यांची घरे आहेत, जी त्यांच्या अत्याचारामुळे ओसाड पडली आहेत. जे लोक ज्ञान बाळगतात, त्यांच्यासाठी त्यात मोठी निशाणी आहे.

وَأَنجَیۡنَا ٱلَّذِینَ ءَامَنُوا۟ وَكَانُوا۟ یَتَّقُونَ ﴿53﴾

५३. आणि आम्ही त्यांना, ज्यांनी ईमान राखले होते आणि जे सत्कर्म करीत होते, पूर्णपणे वाचविले.

وَلُوطًا إِذۡ قَالَ لِقَوۡمِهِۦۤ أَتَأۡتُونَ ٱلۡفَـٰحِشَةَ وَأَنتُمۡ تُبۡصِرُونَ ﴿54﴾

५४. आणि लूतचा (उल्लेख करा) जेव्हा ते आपल्या जनसमूहाला म्हणाले, की जाणूनबुजूनही तुम्ही कुकर्म (पुरुष सहवास) करता?

أَىِٕنَّكُمۡ لَتَأۡتُونَ ٱلرِّجَالَ شَهۡوَةࣰ مِّن دُونِ ٱلنِّسَاۤءِۚ بَلۡ أَنتُمۡ قَوۡمࣱ تَجۡهَلُونَ ﴿55﴾

५५. ही काय गोष्ट आहे? की तुम्ही स्त्रियांना सोडून पुरुषांजवळ कामवासनापूर्तीसाठी येता? खरी गोष्टी अशी की तुम्ही मोठे अज्ञान पूर्ण काम करीत आहात.

۞ فَمَا كَانَ جَوَابَ قَوۡمِهِۦۤ إِلَّاۤ أَن قَالُوۤا۟ أَخۡرِجُوۤا۟ ءَالَ لُوطࣲ مِّن قَرۡیَتِكُمۡۖ إِنَّهُمۡ أُنَاسࣱ یَتَطَهَّرُونَ ﴿56﴾

५६. त्यांच्या जनसमूहाचे उत्तर या बोलण्याव्यतिरिक्त दुसरे काही नव्हते की लूतच्या कुटुंबियांना आपल्या शहरातून बाहेर घालवा, हे लोक मोठी पवित्रतता (सत्शीलता) दाखवित आहेत.

فَأَنجَیۡنَـٰهُ وَأَهۡلَهُۥۤ إِلَّا ٱمۡرَأَتَهُۥ قَدَّرۡنَـٰهَا مِنَ ٱلۡغَـٰبِرِینَ ﴿57﴾

५७. आणि आम्ही त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला, त्याच्या पत्नीखेरीज सर्वांना वाचिवले. याचे अनुमान(र्तक) तर मागे राहणाऱ्यांमध्ये आम्ही लावलेच होते.

وَأَمۡطَرۡنَا عَلَیۡهِم مَّطَرࣰاۖ فَسَاۤءَ مَطَرُ ٱلۡمُنذَرِینَ ﴿58﴾

५८. आणि त्यांच्यावर एक (विशेष प्रकारचा) पाऊस पाडला. यास्तव त्या खबरदार केल्या गेलेल्या लोकांवर वाईट पाऊस पडला.

قُلِ ٱلۡحَمۡدُ لِلَّهِ وَسَلَـٰمٌ عَلَىٰ عِبَادِهِ ٱلَّذِینَ ٱصۡطَفَىٰۤۗ ءَاۤللَّهُ خَیۡرٌ أَمَّا یُشۡرِكُونَ ﴿59﴾

५९. तेव्हा तुम्ही सांगा की समस्त प्रशंसा अल्लाहकरिताच आहे आणि त्याच्या निवडक दासांवर सलाम (शांति) आहे. काय अल्लाह अधिक चांगला आहे की ते, ज्यांना हे लोक (अल्लाहचा) सहभागी बनवत आहेत.

أَمَّنۡ خَلَقَ ٱلسَّمَـٰوَ ٰ⁠تِ وَٱلۡأَرۡضَ وَأَنزَلَ لَكُم مِّنَ ٱلسَّمَاۤءِ مَاۤءࣰ فَأَنۢبَتۡنَا بِهِۦ حَدَاۤىِٕقَ ذَاتَ بَهۡجَةࣲ مَّا كَانَ لَكُمۡ أَن تُنۢبِتُوا۟ شَجَرَهَاۤۗ أَءِلَـٰهࣱ مَّعَ ٱللَّهِۚ بَلۡ هُمۡ قَوۡمࣱ یَعۡدِلُونَ ﴿60﴾

६०. (बरे हे सांगा) आकाशांना आणि जमिनीला कोणी निर्माण केले? कोणी आकाशातून पाऊस पाडला? मग त्याद्वारे हिरव्या टवटवीत सुंदर बागा कोणी उगविल्या ? या बागांचे वृक्ष तुम्ही कधीही उगवू शकत नाही. काय अल्लाहखेरीज दुसरा कोणी उपासना करण्यायोग्य आहे? किंबहुना हे लोक (सरळ मार्गापासून) दूर होतात.

أَمَّن جَعَلَ ٱلۡأَرۡضَ قَرَارࣰا وَجَعَلَ خِلَـٰلَهَاۤ أَنۡهَـٰرࣰا وَجَعَلَ لَهَا رَوَ ٰ⁠سِیَ وَجَعَلَ بَیۡنَ ٱلۡبَحۡرَیۡنِ حَاجِزًاۗ أَءِلَـٰهࣱ مَّعَ ٱللَّهِۚ بَلۡ أَكۡثَرُهُمۡ لَا یَعۡلَمُونَ ﴿61﴾

६१. काय तो, ज्याने धरतीला निवासस्थान बनविले, तिच्या दरम्यान नद्या प्रवाहित केल्या, तिच्यासाठी पर्वत बनविले आणि दोन समुद्रांच्या दरम्यान आड पडदा घातला, काय अल्लाहसोबत दुसरा कोणी उपासना करण्यायोग्य आहे? किंबहुना त्यांच्यापैकी बहुतेक लोक जाणतच नाहीत.

أَمَّن یُجِیبُ ٱلۡمُضۡطَرَّ إِذَا دَعَاهُ وَیَكۡشِفُ ٱلسُّوۤءَ وَیَجۡعَلُكُمۡ خُلَفَاۤءَ ٱلۡأَرۡضِۗ أَءِلَـٰهࣱ مَّعَ ٱللَّهِۚ قَلِیلࣰا مَّا تَذَكَّرُونَ ﴿62﴾

६२. विवश आणि अगतिक व्यक्तीचे आर्जव, जेव्हा तो पुकारतो, कोण स्वीकारून त्याच्या त्रास- यातनेस दूर करतो, आणि तुम्हाला धरतीचा खलीफ़ा (सत्ताधिकारी) बनवितो. काय अल्लाहसोबत दुसरा कोणी उपासना करण्यायोग्य आहे? तुम्ही लोक फार कमी बोध ग्रहण करतात.

أَمَّن یَهۡدِیكُمۡ فِی ظُلُمَـٰتِ ٱلۡبَرِّ وَٱلۡبَحۡرِ وَمَن یُرۡسِلُ ٱلرِّیَـٰحَ بُشۡرَۢا بَیۡنَ یَدَیۡ رَحۡمَتِهِۦۤۗ أَءِلَـٰهࣱ مَّعَ ٱللَّهِۚ تَعَـٰلَى ٱللَّهُ عَمَّا یُشۡرِكُونَ ﴿63﴾

६३. असा कोण आहे, जो तुम्हाला खुष्की आणि समुद्राच्या अंधारात मार्ग दाखवितो आणि जो आपल्या कृपेच्या (येण्या) पूर्वीच खूशखबर देणारी हवा (वारे) पाठवितो. काय अल्लाहसोबत दुसरे एखादे आराध्या दैवतही आहे? ज्यांना हे (अल्लाहचा) सहभागी ठरवितात, त्या सर्वांपेक्षा अल्लाह अति उच्च आहे.

أَمَّن یَبۡدَؤُا۟ ٱلۡخَلۡقَ ثُمَّ یُعِیدُهُۥ وَمَن یَرۡزُقُكُم مِّنَ ٱلسَّمَاۤءِ وَٱلۡأَرۡضِۗ أَءِلَـٰهࣱ مَّعَ ٱللَّهِۚ قُلۡ هَاتُوا۟ بُرۡهَـٰنَكُمۡ إِن كُنتُمۡ صَـٰدِقِینَ ﴿64﴾

६४. असा कोण आहे जो सृष्टीनिर्मितीला पहिल्यांदा निर्माण करतो, मग तिला पुन्हा निर्माण करील जो तुम्हाला आकाश आणि जमिनितून आजिविका प्रदान करीत आहे. काय अल्लाहसोबत दुसराही कोणी उपास्य आहे? सांगा, सच्चे असाल तर आपले प्रमाण (पुरावा) आणा.

قُل لَّا یَعۡلَمُ مَن فِی ٱلسَّمَـٰوَ ٰ⁠تِ وَٱلۡأَرۡضِ ٱلۡغَیۡبَ إِلَّا ٱللَّهُۚ وَمَا یَشۡعُرُونَ أَیَّانَ یُبۡعَثُونَ ﴿65﴾

६५. सांगा की आकाशवाल्यांपैकी आणि धरतीवाल्यांपैकी, अल्लाहखेरीज कोणीही परोक्ष ज्ञान बाळगत नाही१ ते तर हे देखील जाणत नाहीत की त्यांना दुसऱ्यांदा केव्हा जिवंत केले जाईल?

بَلِ ٱدَّ ٰ⁠رَكَ عِلۡمُهُمۡ فِی ٱلۡـَٔاخِرَةِۚ بَلۡ هُمۡ فِی شَكࣲّ مِّنۡهَاۖ بَلۡ هُم مِّنۡهَا عَمُونَ ﴿66﴾

६६. किंबहुना आखिरत (मरणोत्तर जीवना) विषयी त्यांचे ज्ञान संपुष्टात आले आहे, किंबहुना हे त्या संदर्भात संशयग्रस्त आहेत, एवढेच नव्हे तर हे त्यापासून आंधळे आहेत.

وَقَالَ ٱلَّذِینَ كَفَرُوۤا۟ أَءِذَا كُنَّا تُرَ ٰ⁠بࣰا وَءَابَاۤؤُنَاۤ أَىِٕنَّا لَمُخۡرَجُونَ ﴿67﴾

६७. काफिर (सत्य-विरोधक) म्हणाले, काय जेव्हा आम्ही माती होऊन जाऊ आणि आमचे वाडवडीलही, काय आम्ही पुन्हा बाहेर काढले जाऊ?

لَقَدۡ وُعِدۡنَا هَـٰذَا نَحۡنُ وَءَابَاۤؤُنَا مِن قَبۡلُ إِنۡ هَـٰذَاۤ إِلَّاۤ أَسَـٰطِیرُ ٱلۡأَوَّلِینَ ﴿68﴾

६८. आम्हाला आणि आमच्या पूर्वजांना फार पूर्वीपासून हे वायदे दिले जात राहिले. काही नाही, या तर पूर्वी होऊन गेलेल्या लोकांच्या काल्पनिक कथा मात्र आहेत.

قُلۡ سِیرُوا۟ فِی ٱلۡأَرۡضِ فَٱنظُرُوا۟ كَیۡفَ كَانَ عَـٰقِبَةُ ٱلۡمُجۡرِمِینَ ﴿69﴾

६९. सांगा की, जमिनीवर जरा हिंडून फिरून पाहा की अपराधी लोकांचा काय परिणाम झाला?

وَلَا تَحۡزَنۡ عَلَیۡهِمۡ وَلَا تَكُن فِی ضَیۡقࣲ مِّمَّا یَمۡكُرُونَ ﴿70﴾

७०. आणि तुम्ही त्यांच्याविषयी चिंताग्रस्त होऊ नका आणि त्यांच्या कट-कारस्थानांमुळे मन संकुचित करू नका.

وَیَقُولُونَ مَتَىٰ هَـٰذَا ٱلۡوَعۡدُ إِن كُنتُمۡ صَـٰدِقِینَ ﴿71﴾

७१. आणि म्हणतात की हा वायदा केव्हा पूर्ण होईल, सच्चे असाल तर सांगा.

قُلۡ عَسَىٰۤ أَن یَكُونَ رَدِفَ لَكُم بَعۡضُ ٱلَّذِی تَسۡتَعۡجِلُونَ ﴿72﴾

७२. त्यांना उत्तर द्या की कदाचित काही अशा गोष्टी, ज्यांची तुम्ही एवढी घाई माजवित आहात, तुमच्या खूप जवळ येऊन ठेपल्या आहेत.

وَإِنَّ رَبَّكَ لَذُو فَضۡلٍ عَلَى ٱلنَّاسِ وَلَـٰكِنَّ أَكۡثَرَهُمۡ لَا یَشۡكُرُونَ ﴿73﴾

७३. आणि निःसंशय, तुमचा पालनकर्ता समस्त लोकांवर मोठा कृपावान आहे, परंतु अधिकांश लोक कृतज्ञता दाखवित नाही.

وَإِنَّ رَبَّكَ لَیَعۡلَمُ مَا تُكِنُّ صُدُورُهُمۡ وَمَا یُعۡلِنُونَ ﴿74﴾

७४. आणि निःसंशय, तुमचा पालनकर्ता, त्या गोष्टींनाही जाणतो, ज्यांना ते आपल्या मनात लपवित आहेत, आणि ज्यांना व्यक्त करीत आहेत.

وَمَا مِنۡ غَاۤىِٕبَةࣲ فِی ٱلسَّمَاۤءِ وَٱلۡأَرۡضِ إِلَّا فِی كِتَـٰبࣲ مُّبِینٍ ﴿75﴾

७५. आकाश आणि धरतीची कोणतीही लपलेली गोष्ट अशी नाही, जी दिव्य स्पष्ट ग्रंथात सामील नसावी.

إِنَّ هَـٰذَا ٱلۡقُرۡءَانَ یَقُصُّ عَلَىٰ بَنِیۤ إِسۡرَ ٰ⁠ۤءِیلَ أَكۡثَرَ ٱلَّذِی هُمۡ فِیهِ یَخۡتَلِفُونَ ﴿76﴾

७६. निःसंशय हा कुरआन इस्राईलच्या संततीसमोर अधिक तर त्या गोष्टींचे निवेदन करीत आहे, ज्यात हे मतभेद करतात.१

وَإِنَّهُۥ لَهُدࣰى وَرَحۡمَةࣱ لِّلۡمُؤۡمِنِینَ ﴿77﴾

७७. आणि हा (कुरआन) ईमान राखणाऱ्यांकरिता निश्चितच मार्गदर्शन आणि दया- कृपा आहे.

إِنَّ رَبَّكَ یَقۡضِی بَیۡنَهُم بِحُكۡمِهِۦۚ وَهُوَ ٱلۡعَزِیزُ ٱلۡعَلِیمُ ﴿78﴾

७८. तुमचा पालनकर्ता त्यांच्या दरम्यान आपल्या आदेशाने (सर्व) फैसला करील. तो मोठा वर्चस्वशाली आणि ज्ञान राखणारा आहे.

فَتَوَكَّلۡ عَلَى ٱللَّهِۖ إِنَّكَ عَلَى ٱلۡحَقِّ ٱلۡمُبِینِ ﴿79﴾

७९. तेव्हा, तुम्ही अल्लाहवरच भरवसा राखा. निःसंशय, तुम्ही सत्य आणि उघड अशा दीन (धर्मा) वर आहात.

إِنَّكَ لَا تُسۡمِعُ ٱلۡمَوۡتَىٰ وَلَا تُسۡمِعُ ٱلصُّمَّ ٱلدُّعَاۤءَ إِذَا وَلَّوۡا۟ مُدۡبِرِینَ ﴿80﴾

८०. निःसंशय, तुम्ही ना मृतांना ऐकवू शकता आणि ना बहिऱ्यांना आपली पुकार (हाक) ऐकवू शकता, जेव्हा ते पाठ फिरवून विमुख होत असतील.

وَمَاۤ أَنتَ بِهَـٰدِی ٱلۡعُمۡیِ عَن ضَلَـٰلَتِهِمۡۖ إِن تُسۡمِعُ إِلَّا مَن یُؤۡمِنُ بِـَٔایَـٰتِنَا فَهُم مُّسۡلِمُونَ ﴿81﴾

८१. आणि ना तुम्ही आंधळ्यांना त्यांच्या मार्गभ्रष्टतेपासून हटवून, सन्मार्गाला लावू शकता, तुम्ही तर केवळ त्यांना ऐकवू शकता, ज्यांनी आमच्या आयतींवर ईमान राखले आहे, मग ते आज्ञाधारक होतात.

۞ وَإِذَا وَقَعَ ٱلۡقَوۡلُ عَلَیۡهِمۡ أَخۡرَجۡنَا لَهُمۡ دَاۤبَّةࣰ مِّنَ ٱلۡأَرۡضِ تُكَلِّمُهُمۡ أَنَّ ٱلنَّاسَ كَانُوا۟ بِـَٔایَـٰتِنَا لَا یُوقِنُونَ ﴿82﴾

८२. आणि जेव्हा त्यांच्यावर शिक्षा- यातने (अज़ाब) चा वायदा लागू होईल, आम्ही जमिनीतून त्यांच्यासाठी एक जनावर बाहेर काढू, जे त्यांच्याशी बोलत असेल की लोक आमच्या आयतींवर विश्वास ठेवत नव्हते.१

وَیَوۡمَ نَحۡشُرُ مِن كُلِّ أُمَّةࣲ فَوۡجࣰا مِّمَّن یُكَذِّبُ بِـَٔایَـٰتِنَا فَهُمۡ یُوزَعُونَ ﴿83﴾

८३. आणि ज्या दिवशी आम्ही प्रत्येक जनसमूहामधून, अशा लोकांचे समूह, जे आमच्या आयतींना खोटे ठरवित होते, घेरून आणू, मग ते सर्वच्या सर्व वेगळे केले जातील.

حَتَّىٰۤ إِذَا جَاۤءُو قَالَ أَكَذَّبۡتُم بِـَٔایَـٰتِی وَلَمۡ تُحِیطُوا۟ بِهَا عِلۡمًا أَمَّاذَا كُنتُمۡ تَعۡمَلُونَ ﴿84﴾

८४. जेव्हा सर्वच्या सर्व येऊन पोहचतील तेव्हा अल्लाह फर्माविल की तुम्ही माझ्या आयतींना, यानंतरही की तुम्हाला त्यांचे पूर्ण ज्ञान नव्हते, का खोटे ठरविले? आणि हेही सांगा की तुम्ही काय (कर्म) करीत राहिलात?

وَوَقَعَ ٱلۡقَوۡلُ عَلَیۡهِم بِمَا ظَلَمُوا۟ فَهُمۡ لَا یَنطِقُونَ ﴿85﴾

८५. आणि याचे कारण हे की त्यांनी अत्याचार केला होता, त्यामुळे आमचे फर्मान त्याच्यावर लागू होईल आणि ते काहीच बोलू शकणार नाहीत.

أَلَمۡ یَرَوۡا۟ أَنَّا جَعَلۡنَا ٱلَّیۡلَ لِیَسۡكُنُوا۟ فِیهِ وَٱلنَّهَارَ مُبۡصِرًاۚ إِنَّ فِی ذَ ٰ⁠لِكَ لَـَٔایَـٰتࣲ لِّقَوۡمࣲ یُؤۡمِنُونَ ﴿86﴾

८६. काय ते पाहत नाहीत की आम्ही रात्र अशासाठी बनविली आहे की त्यांनी तिच्यात आराम करू शकावे आणि दिवसाला आम्ही दाखविणारा बनविले आहे. निःसंशय यात त्या लोकांकरिता निशाण्या आहेत, जे ईमान राखतात.

وَیَوۡمَ یُنفَخُ فِی ٱلصُّورِ فَفَزِعَ مَن فِی ٱلسَّمَـٰوَ ٰ⁠تِ وَمَن فِی ٱلۡأَرۡضِ إِلَّا مَن شَاۤءَ ٱللَّهُۚ وَكُلٌّ أَتَوۡهُ دَ ٰ⁠خِرِینَ ﴿87﴾

८७. आणि ज्या दिवशी सूर फुंकला जाईल तेव्हा ते सर्वच्या सर्व, जे आकाशांमध्ये आणि जमिनीवर आहेत घाबरून उठतील,१ परंतु ज्याला अल्लाह इच्छिल (सुरक्षित ठेवील) आणि सर्वच्या सर्व विवश, लाचार होऊन त्याच्यासमोर हजर होतील.

وَتَرَى ٱلۡجِبَالَ تَحۡسَبُهَا جَامِدَةࣰ وَهِیَ تَمُرُّ مَرَّ ٱلسَّحَابِۚ صُنۡعَ ٱللَّهِ ٱلَّذِیۤ أَتۡقَنَ كُلَّ شَیۡءٍۚ إِنَّهُۥ خَبِیرُۢ بِمَا تَفۡعَلُونَ ﴿88﴾

८८. आणि तुम्ही पर्वतांना आपल्या जागी निश्चित व स्थिर समजता, परंतु ते देखील ढगासारखे उडत फिरतील. ही निर्मिती (कार्यकुशलता) आहे अल्लाहची, ज्याने प्रत्येक वस्तू मजबूत बनविली आहे. तुम्ही जे काही करता, अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो.

مَن جَاۤءَ بِٱلۡحَسَنَةِ فَلَهُۥ خَیۡرࣱ مِّنۡهَا وَهُم مِّن فَزَعࣲ یَوۡمَىِٕذٍ ءَامِنُونَ ﴿89﴾

८९. जो मनुष्य सत्कर्म घेऊन येईल, त्याला त्याहून चांगला मोबदला मिळेल आणि असे लोक त्या दिवसाच्या दहशतीपासून निर्धास्त असतील.

وَمَن جَاۤءَ بِٱلسَّیِّئَةِ فَكُبَّتۡ وُجُوهُهُمۡ فِی ٱلنَّارِ هَلۡ تُجۡزَوۡنَ إِلَّا مَا كُنتُمۡ تَعۡمَلُونَ ﴿90﴾

९०. आणि जे लोक दुष्कर्म घेऊन येतील त्यांना अधोमुखी (जहन्नमच्या) आगीत झोकले जाईल. तुम्हाला केवळ त्याचाच मोबदला दिला जाईल, जे तुम्ही करीत राहिले.

إِنَّمَاۤ أُمِرۡتُ أَنۡ أَعۡبُدَ رَبَّ هَـٰذِهِ ٱلۡبَلۡدَةِ ٱلَّذِی حَرَّمَهَا وَلَهُۥ كُلُّ شَیۡءࣲۖ وَأُمِرۡتُ أَنۡ أَكُونَ مِنَ ٱلۡمُسۡلِمِینَ ﴿91﴾

९१. मला तर केवळ हाच आदेश दिला गेला आहे की मी या शहराच्या पालनकर्त्याची उपासना करीत राहावे, ज्याने यास आदर सन्मानपूर्ण बनविले आहे आणि जो प्रत्येक वस्तूचा स्वामी आहे आणि मला हा आदेशही दिला गेला आहे की मी मुस्लमान (आज्ञाधारकां) पैकी व्हावे.

وَأَنۡ أَتۡلُوَا۟ ٱلۡقُرۡءَانَۖ فَمَنِ ٱهۡتَدَىٰ فَإِنَّمَا یَهۡتَدِی لِنَفۡسِهِۦۖ وَمَن ضَلَّ فَقُلۡ إِنَّمَاۤ أَنَا۠ مِنَ ٱلۡمُنذِرِینَ ﴿92﴾

९२. आणि मी कुरआनाचे पठण करीत राहावे, तेव्हा जो मार्गदर्शन अंगीकारील, आणि जो मार्गभ्रष्ट होईल तर सांगा, मी केवळ सावधान करणाऱ्यांपैकी आहे.

وَقُلِ ٱلۡحَمۡدُ لِلَّهِ سَیُرِیكُمۡ ءَایَـٰتِهِۦ فَتَعۡرِفُونَهَاۚ وَمَا رَبُّكَ بِغَـٰفِلٍ عَمَّا تَعۡمَلُونَ ﴿93﴾

९३. आणि सांगा, समस्त प्रशंसा अल्लाहकरिताच आहे. तो लवकरच तुम्हाला आपल्या निशाण्या दाखविल, ज्या तुम्ही स्वतः ओळखून घ्याल, आणि जे काही तुम्ही करीत आहात, तुमचा पालनकर्ता त्यापासून अनभिज्ञ (अजाण) नाही.