Main pages

Surah The Coalition [Al-Ahzab] in Marathi

Surah The Coalition [Al-Ahzab] Ayah 73 Location Makkah Number 33

یَـٰۤأَیُّهَا ٱلنَّبِیُّ ٱتَّقِ ٱللَّهۚ وَلَا تُطِعِ ٱلۡكَـٰفِرِینَ وَٱلۡمُنَـٰفِقِینَۗ إِنَّ ٱللَّهَ كَانَ عَلِیمًا حَكِیمࣰا ﴿1﴾

१. हे पैगंबर! अल्लाहचे भय बाळगून राहा आणि काफिर आणि मुनाफिक (दांभिक ईमानधारक) लोकांचे म्हणणे मानू नका. अल्लाह मोठा ज्ञान बाळगणारा, मोठा बुद्धिकौशल्य बाळगणारा आहे.

وَٱتَّبِعۡ مَا یُوحَىٰۤ إِلَیۡكَ مِن رَّبِّكَۚ إِنَّ ٱللَّهَ كَانَ بِمَا تَعۡمَلُونَ خَبِیرࣰا ﴿2﴾

२. आणि जे काही तुमच्याकडे, तुमच्या पालनकर्त्यातर्फे वहयी (प्रकाशना) केली जाते, तिचे अनुसरण करा (विश्वास करा), कारण अल्लाह तुमच्या प्रत्येक कर्माशी परिचित आहे.

وَتَوَكَّلۡ عَلَى ٱللَّهِۚ وَكَفَىٰ بِٱللَّهِ وَكِیلࣰا ﴿3﴾

३. आणि तुम्ही अल्लाहवरच भरवसा राखा, अल्लाह काम बनविण्याकरिता पुरेसा आहे.

مَّا جَعَلَ ٱللَّهُ لِرَجُلࣲ مِّن قَلۡبَیۡنِ فِی جَوۡفِهِۦۚ وَمَا جَعَلَ أَزۡوَ ٰ⁠جَكُمُ ٱلَّـٰۤـِٔی تُظَـٰهِرُونَ مِنۡهُنَّ أُمَّهَـٰتِكُمۡۚ وَمَا جَعَلَ أَدۡعِیَاۤءَكُمۡ أَبۡنَاۤءَكُمۡۚ ذَ ٰ⁠لِكُمۡ قَوۡلُكُم بِأَفۡوَ ٰ⁠هِكُمۡۖ وَٱللَّهُ یَقُولُ ٱلۡحَقَّ وَهُوَ یَهۡدِی ٱلسَّبِیلَ ﴿4﴾

४. कोणत्याही माणसाच्या छातीत अल्लाहने दोन हृदय ठेवली नाहीत. आणि आपल्या ज्या पत्न्यांना तुम्ही माता म्हणून संबोधून बसता, त्यांना अल्लाहने तुमच्या (खऱ्याखुऱ्या) माता बनविले नाही आणि ना तुमच्या दत्तक घेतलेल्या बालकांना (वस्तुतः) तुमचे पुत्र बनविले आहे. या तर तुमच्या तोंडच्या गोष्टी आहेत. अल्लाह सत्य गोष्टी सांगतो आणि तोच सरळ मार्ग दाखवितो.

ٱدۡعُوهُمۡ لِـَٔابَاۤىِٕهِمۡ هُوَ أَقۡسَطُ عِندَ ٱللَّهِۚ فَإِن لَّمۡ تَعۡلَمُوۤا۟ ءَابَاۤءَهُمۡ فَإِخۡوَ ٰ⁠نُكُمۡ فِی ٱلدِّینِ وَمَوَ ٰ⁠لِیكُمۡۚ وَلَیۡسَ عَلَیۡكُمۡ جُنَاحࣱ فِیمَاۤ أَخۡطَأۡتُم بِهِۦ وَلَـٰكِن مَّا تَعَمَّدَتۡ قُلُوبُكُمۡۚ وَكَانَ ٱللَّهُ غَفُورࣰا رَّحِیمًا ﴿5﴾

५. दत्तक घेतलेल्या मुलांना त्यांच्या (खऱ्या) पित्यांच्या संबंधाने हाक मारा. अल्लाहजवळ पूर्ण न्याय हाच आहे. मग जर तुम्हाला त्यांचे (खरे) पिता माहीत नसतील तर ते तुमचे धर्म-बांधव आणि मित्र आहेत.१ तुमच्याकडून भूलचूक म्हणून काही घडल्यास त्याबाबत तुमच्यावर कसलाही गुन्हा नाही, परंतु गुन्हा तो आहे, ज्याचा तुम्ही इरादा कराल आणि इरादा मनापासून कराल. अल्लाह मोठा माफ करणारा, दया करणारा आहे.

ٱلنَّبِیُّ أَوۡلَىٰ بِٱلۡمُؤۡمِنِینَ مِنۡ أَنفُسِهِمۡۖ وَأَزۡوَ ٰ⁠جُهُۥۤ أُمَّهَـٰتُهُمۡۗ وَأُو۟لُوا۟ ٱلۡأَرۡحَامِ بَعۡضُهُمۡ أَوۡلَىٰ بِبَعۡضࣲ فِی كِتَـٰبِ ٱللَّهِ مِنَ ٱلۡمُؤۡمِنِینَ وَٱلۡمُهَـٰجِرِینَ إِلَّاۤ أَن تَفۡعَلُوۤا۟ إِلَىٰۤ أَوۡلِیَاۤىِٕكُم مَّعۡرُوفࣰاۚ كَانَ ذَ ٰ⁠لِكَ فِی ٱلۡكِتَـٰبِ مَسۡطُورࣰا ﴿6﴾

६. पैगंबर, ईमान राखणाऱ्यांवर स्वतः त्यांच्यापेक्षाही अधिक हक्क राखणारे आहेत आणि पैगंबराच्या पत्न्या ईमानधारकांच्या माता आहेत आणि नातेवाईक, अल्लाहच्या ग्रंथाच्या आधारावर इतर ईमानधारक आणि स्वदेशत्याग केलेल्यांच्या तुलनेत जास्त हक्कदार आहेत. (तथापि) तुम्हाला आपल्या मित्रांशी सद्‌व्यवहार करण्याची अनुमती आहे. हा आदेश ‘सुरिक्षत ग्रंथा’ (लौहे महफूज) मध्ये लिहिलेला आहे.

وَإِذۡ أَخَذۡنَا مِنَ ٱلنَّبِیِّـۧنَ مِیثَـٰقَهُمۡ وَمِنكَ وَمِن نُّوحࣲ وَإِبۡرَ ٰ⁠هِیمَ وَمُوسَىٰ وَعِیسَى ٱبۡنِ مَرۡیَمَۖ وَأَخَذۡنَا مِنۡهُم مِّیثَـٰقًا غَلِیظࣰا ﴿7﴾

७. आणि जेव्हा आम्ही समस्त पैगंबरांकडून वचन घेतले (विशेषतः) तुमच्याकडून आणि नूहकडून आणि इब्राहीमकडून आणि मूसाकडून आणि मरियमचे पुत्र ईसाकडून आणि आम्ही त्या सर्वांकडून पक्के वचन घेतले होते.

لِّیَسۡـَٔلَ ٱلصَّـٰدِقِینَ عَن صِدۡقِهِمۡۚ وَأَعَدَّ لِلۡكَـٰفِرِینَ عَذَابًا أَلِیمࣰا ﴿8﴾

८. यासाठी की अल्लाहने सच्चा लोकांना त्यांच्या सच्चेपणाविषयी विचारणा करावी आणि न मानणाऱ्यांकरिता आम्ही दुःखदायक अज़ाब (शिक्षा-यातना) तयार करून ठेवला आहे.

یَـٰۤأَیُّهَا ٱلَّذِینَ ءَامَنُوا۟ ٱذۡكُرُوا۟ نِعۡمَةَ ٱللَّهِ عَلَیۡكُمۡ إِذۡ جَاۤءَتۡكُمۡ جُنُودࣱ فَأَرۡسَلۡنَا عَلَیۡهِمۡ رِیحࣰا وَجُنُودࣰا لَّمۡ تَرَوۡهَاۚ وَكَانَ ٱللَّهُ بِمَا تَعۡمَلُونَ بَصِیرًا ﴿9﴾

९. हे ईमान राखणाऱ्यांनो! अल्लाहने जो उपकार तुमच्यावर केला आहे, त्याचे स्मरण करा जेव्हा तुमचा सामना करण्याकरिता सैन्यांवर सैन्ये आली मग आम्ही त्यांच्यावर वेगवान वादळ आणि असे सैन्य पाठविले, जे तुम्ही पाहिलेच नाही आणि तुम्ही जे काही करता अल्लाह ते सर्व पाहतो.

إِذۡ جَاۤءُوكُم مِّن فَوۡقِكُمۡ وَمِنۡ أَسۡفَلَ مِنكُمۡ وَإِذۡ زَاغَتِ ٱلۡأَبۡصَـٰرُ وَبَلَغَتِ ٱلۡقُلُوبُ ٱلۡحَنَاجِرَ وَتَظُنُّونَ بِٱللَّهِ ٱلظُّنُونَا۠ ﴿10﴾

१०. जेव्हा (शत्रू) तुमच्या वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने चालून आले आणि जेव्हा डोळे निश्चल झाले आणि काळीज तोंडाशी आले, आणि तुम्ही अल्लाहविषयी विभिन्न विचार करू लागले.

هُنَالِكَ ٱبۡتُلِیَ ٱلۡمُؤۡمِنُونَ وَزُلۡزِلُوا۟ زِلۡزَالࣰا شَدِیدࣰا ﴿11﴾

११. इथेच ईमान राखणाऱ्यांची कसोटी घेतली गेली आणि पूर्णतः ते हलवून सोडले गेले.

وَإِذۡ یَقُولُ ٱلۡمُنَـٰفِقُونَ وَٱلَّذِینَ فِی قُلُوبِهِم مَّرَضࣱ مَّا وَعَدَنَا ٱللَّهُ وَرَسُولُهُۥۤ إِلَّا غُرُورࣰا ﴿12﴾

१२. आणि त्या वेळी दांभिक (मुनाफिक) आणि मनात रोग बाळगणारे म्हणू लागले की अल्लाह आणि त्याच्या पैगंबराने आमच्याशी केवळ धोक्याचेच वायदे केले होते.

وَإِذۡ قَالَت طَّاۤىِٕفَةࣱ مِّنۡهُمۡ یَـٰۤأَهۡلَ یَثۡرِبَ لَا مُقَامَ لَكُمۡ فَٱرۡجِعُوا۟ۚ وَیَسۡتَـٔۡذِنُ فَرِیقࣱ مِّنۡهُمُ ٱلنَّبِیَّ یَقُولُونَ إِنَّ بُیُوتَنَا عَوۡرَةࣱ وَمَا هِیَ بِعَوۡرَةٍۖ إِن یُرِیدُونَ إِلَّا فِرَارࣰا ﴿13﴾

१३. आणि त्यांच्याच एका गटाने पुकारुन म्हटले, हे यासरिबच्या लोकानो! तुमच्या थांबण्याचे हे स्थान नाही, परत निघा आणि त्यांचा एक दुसरा गट, पैगंबराजवळ ही अनुमती मागू लागला की आमची घरे खाली (उघडी) आणि असुरक्षित आहेत. वास्तविक ती (उघडी) असुरक्षित नव्हती, (परंतु) त्यांनी पळ काढण्याचा पक्का इरादा केला होता.

وَلَوۡ دُخِلَتۡ عَلَیۡهِم مِّنۡ أَقۡطَارِهَا ثُمَّ سُىِٕلُوا۟ ٱلۡفِتۡنَةَ لَـَٔاتَوۡهَا وَمَا تَلَبَّثُوا۟ بِهَاۤ إِلَّا یَسِیرࣰا ﴿14﴾

१४. आणि जर मदीनेच्या चोहीबाजूंनी त्यांच्यावर (सैन्ये) दाखल केली गेली असती, मग त्यांच्याशी उत्पात (फसाद) ची मागणी केली गेली असती, तर त्यांनी उत्पात अवश्य माजविला असता. आणि काही लढलेही असते पण थोडेसे.

وَلَقَدۡ كَانُوا۟ عَـٰهَدُوا۟ ٱللَّهَ مِن قَبۡلُ لَا یُوَلُّونَ ٱلۡأَدۡبَـٰرَۚ وَكَانَ عَهۡدُ ٱللَّهِ مَسۡـُٔولࣰا ﴿15﴾

१५. आणि याच्यापूर्वी तर त्यांनी अल्लाहशी वायदा केला होता की पाठ फिरविणार नाही आणि अल्लाहशी केल्या गेलेल्या वायद्याची विचारपूस निश्चितच होईल.

قُل لَّن یَنفَعَكُمُ ٱلۡفِرَارُ إِن فَرَرۡتُم مِّنَ ٱلۡمَوۡتِ أَوِ ٱلۡقَتۡلِ وَإِذࣰا لَّا تُمَتَّعُونَ إِلَّا قَلِیلࣰا ﴿16﴾

१६. त्यांना सांगा, जर तुम्ही मृत्युच्या किंवा हत्येच्या भयाने पळ काढाल तर हे पळ काढणे तुमच्या काहीच उपयोगी पडणार नाही आणि त्या वेळी तुम्ही फार कमी लाभान्वित केले जाल.

قُلۡ مَن ذَا ٱلَّذِی یَعۡصِمُكُم مِّنَ ٱللَّهِ إِنۡ أَرَادَ بِكُمۡ سُوۤءًا أَوۡ أَرَادَ بِكُمۡ رَحۡمَةࣰۚ وَلَا یَجِدُونَ لَهُم مِّن دُونِ ٱللَّهِ وَلِیࣰّا وَلَا نَصِیرࣰا ﴿17﴾

१७. त्यांना विचारा की जर अल्लाह तुम्हाला काही हानि पोहचवू इच्छिल किंवा तुमच्यावर एखादी दया कृपा करू इच्छिल तर असा कोण आहे जो तुम्हाला वाचवू शकेल (किंवा तुमच्यापासून रोखू शकेल) (अल्लाहच्या विरोधात) आपल्याकरिता, अल्लाहखेरीज त्यांना ना कोणी मित्र आढळून येईल ना कोणी सहाय्यक.

۞ قَدۡ یَعۡلَمُ ٱللَّهُ ٱلۡمُعَوِّقِینَ مِنكُمۡ وَٱلۡقَاۤىِٕلِینَ لِإِخۡوَ ٰ⁠نِهِمۡ هَلُمَّ إِلَیۡنَاۖ وَلَا یَأۡتُونَ ٱلۡبَأۡسَ إِلَّا قَلِیلًا ﴿18﴾

१८. अल्लाह तुमच्यापैकी त्यांना (चांगल्या प्रकारे) जाणतो, जे दुसऱ्यांना रोखतात आणि आपल्या बांधवांना सांगतात की आमच्याजवळ या आणि कधीतरी युद्धात सहभाग घेतात.

أَشِحَّةً عَلَیۡكُمۡۖ فَإِذَا جَاۤءَ ٱلۡخَوۡفُ رَأَیۡتَهُمۡ یَنظُرُونَ إِلَیۡكَ تَدُورُ أَعۡیُنُهُمۡ كَٱلَّذِی یُغۡشَىٰ عَلَیۡهِ مِنَ ٱلۡمَوۡتِۖ فَإِذَا ذَهَبَ ٱلۡخَوۡفُ سَلَقُوكُم بِأَلۡسِنَةٍ حِدَادٍ أَشِحَّةً عَلَى ٱلۡخَیۡرِۚ أُو۟لَـٰۤىِٕكَ لَمۡ یُؤۡمِنُوا۟ فَأَحۡبَطَ ٱللَّهُ أَعۡمَـٰلَهُمۡۚ وَكَانَ ذَ ٰ⁠لِكَ عَلَى ٱللَّهِ یَسِیرࣰا ﴿19﴾

१९. तुमची मदत करण्यात (पूर्णपणे) कंजूस आहेत, मग जेव्हा भय - दहशतीचा प्रसंग येतो तेव्हा तुम्ही त्यांना पाहाल की ते तुमच्याकडे दृष्टी केंद्रित करतात आणि त्यांचे डोळे अशा प्रकारे गरगरा फिरू लागतात, त्या माणसासारखे, ज्याच्यावर मृत्युची मुर्छा आलेली असावी, मग जेव्हा भीती नाहीशी होते, तेव्हा तुमच्याशी आपल्या तीक्ष्ण जीभेने मोठमोठ्या गोष्टी बोलू लागतात. धनाचे मोठे लोभी आहेत. या लोकांनी ईमान राखलेच नाही. अल्लाहने त्यांची सर्व कर्मे वाया घालविली आहेत आणि असे करणे अल्लाहकरिता फार सोपे आहे.

یَحۡسَبُونَ ٱلۡأَحۡزَابَ لَمۡ یَذۡهَبُوا۟ۖ وَإِن یَأۡتِ ٱلۡأَحۡزَابُ یَوَدُّوا۟ لَوۡ أَنَّهُم بَادُونَ فِی ٱلۡأَعۡرَابِ یَسۡـَٔلُونَ عَنۡ أَنۢبَاۤىِٕكُمۡۖ وَلَوۡ كَانُوا۟ فِیكُم مَّا قَـٰتَلُوۤا۟ إِلَّا قَلِیلࣰا ﴿20﴾

२०. हे लोक समजतात की सैन्ये अद्याप गेली नाहीत आणि जर सैन्ये परत आली तर हे अशी इच्छा बाळगतात की ते वनात राहणाऱ्यांमध्ये वनवासी लोकांसोबत असते तर बरे झाले असते यासाठी की तुमची खबर बात घेत राहिले असते. जर ते तुमच्यात हजर असते (तरीदेखील?) उगाच बोलण्याचा मान राखण्यासाठी थोडेसे लढले असते.

لَّقَدۡ كَانَ لَكُمۡ فِی رَسُولِ ٱللَّهِ أُسۡوَةٌ حَسَنَةࣱ لِّمَن كَانَ یَرۡجُوا۟ ٱللَّهَ وَٱلۡیَوۡمَ ٱلۡـَٔاخِرَ وَذَكَرَ ٱللَّهَ كَثِیرࣰا ﴿21﴾

२१. निःसंशय, तुमच्यासाठी अल्लाहच्या पैगंबरामध्ये उत्तम नमुना आहे१ त्या प्रत्येक माणसाकरिता जो अल्लाहची आणि कयामतच्या दिवसाची आशा बाळगतो आणि अल्लाहचे अत्याधिक स्मरण करतो.

وَلَمَّا رَءَا ٱلۡمُؤۡمِنُونَ ٱلۡأَحۡزَابَ قَالُوا۟ هَـٰذَا مَا وَعَدَنَا ٱللَّهُ وَرَسُولُهُۥ وَصَدَقَ ٱللَّهُ وَرَسُولُهُۥۚ وَمَا زَادَهُمۡ إِلَّاۤ إِیمَـٰنࣰا وَتَسۡلِیمࣰا ﴿22﴾

२२. आणि जेव्हा ईमानधारकांनी (काफिरांची) सैन्ये पाहिली, तेव्हा (अचानक) उद्‌गारले की याचाच वायदा आम्हाला अल्लाहने आणि त्याच्या पैगंबराने दिला होता आणि अल्लाह आणि त्याचे पैगंबर सच्चे आहेत आणि त्या (गोष्टी) ने त्यांच्या ईमानात आणि आज्ञापालनात आणखी जास्त वाढ केली.

مِّنَ ٱلۡمُؤۡمِنِینَ رِجَالࣱ صَدَقُوا۟ مَا عَـٰهَدُوا۟ ٱللَّهَ عَلَیۡهِۖ فَمِنۡهُم مَّن قَضَىٰ نَحۡبَهُۥ وَمِنۡهُم مَّن یَنتَظِرُۖ وَمَا بَدَّلُوا۟ تَبۡدِیلࣰا ﴿23﴾

२३. ईमान राखणाऱ्यांमध्ये (असे) लोकही आहेत, ज्यांनी अल्लाहशी जो वायदा केला होता तो खरा करून दाखविला.१ काहींनी तर आपला वायदा पूर्ण केला आणि काही (संधीची) प्रतीक्षा करीत आहेत. आणि त्यांनी कसलाही बदल केला नाही.

لِّیَجۡزِیَ ٱللَّهُ ٱلصَّـٰدِقِینَ بِصِدۡقِهِمۡ وَیُعَذِّبَ ٱلۡمُنَـٰفِقِینَ إِن شَاۤءَ أَوۡ یَتُوبَ عَلَیۡهِمۡۚ إِنَّ ٱللَّهَ كَانَ غَفُورࣰا رَّحِیمࣰا ﴿24﴾

२४. यासाठी की अल्लाहने सच्चा लोकांना त्यांच्या खरेपणाचा मोबदला प्रदान करावा आणि इच्छिल्यास मुनाफिक (दांभिक) लोकांना शिक्षा-यातना द्यावी किंवा त्यांचीही क्षमा- याचना कबूल करावी. अल्लाह मोठा क्षमाशील आणि मोठा दयावान आहे.

وَرَدَّ ٱللَّهُ ٱلَّذِینَ كَفَرُوا۟ بِغَیۡظِهِمۡ لَمۡ یَنَالُوا۟ خَیۡرࣰاۚ وَكَفَى ٱللَّهُ ٱلۡمُؤۡمِنِینَ ٱلۡقِتَالَۚ وَكَانَ ٱللَّهُ قَوِیًّا عَزِیزࣰا ﴿25﴾

२५. आणि अल्लाहने काफिरांना क्रोधाने भारावलेल्या अवस्थेतच (असफल) परतविले, ज्यामुळे त्यांची कोणतीही इच्छा पूर्ण झाली नाही आणि त्या युद्धात अल्लाह स्वतःच ईमान राखणाऱ्यांसाठी पुरेसा ठरला. अल्लाह मोठा शक्तिशाली आणि वर्चस्वशाली आहे.

وَأَنزَلَ ٱلَّذِینَ ظَـٰهَرُوهُم مِّنۡ أَهۡلِ ٱلۡكِتَـٰبِ مِن صَیَاصِیهِمۡ وَقَذَفَ فِی قُلُوبِهِمُ ٱلرُّعۡبَ فَرِیقࣰا تَقۡتُلُونَ وَتَأۡسِرُونَ فَرِیقࣰا ﴿26﴾

२६. आणि ज्या ग्रंथधारकांनी, त्यांच्याशी लागेबांधे जुळवून घेतले होते त्यांनाही अल्लाहने त्यांच्या किल्ल्यांमधून बाहेर काढले आणि त्यांच्या मनात असा धाक बसविला की तुम्ही एका समूहास ठार करीत राहिले आणि एका समूहाला कैदी बनवित राहिले.

وَأَوۡرَثَكُمۡ أَرۡضَهُمۡ وَدِیَـٰرَهُمۡ وَأَمۡوَ ٰ⁠لَهُمۡ وَأَرۡضࣰا لَّمۡ تَطَـُٔوهَاۚ وَكَانَ ٱللَّهُ عَلَىٰ كُلِّ شَیۡءࣲ قَدِیرࣰا ﴿27﴾

२७. आणि त्याने तुम्हाला त्यांच्या जमिनीचे आणि त्याच्या घरांचे आणि धन-संपत्तीचे मालक बनविले आणि त्या जमिनीचेही जिच्यावर तुम्ही अद्याप पाऊलही ठेवले नाही. अल्लाह सर्व काही करण्याचे सामर्थ्य राखतो.

یَـٰۤأَیُّهَا ٱلنَّبِیُّ قُل لِّأَزۡوَ ٰ⁠جِكَ إِن كُنتُنَّ تُرِدۡنَ ٱلۡحَیَوٰةَ ٱلدُّنۡیَا وَزِینَتَهَا فَتَعَالَیۡنَ أُمَتِّعۡكُنَّ وَأُسَرِّحۡكُنَّ سَرَاحࣰا جَمِیلࣰا ﴿28﴾

२८. हे पैगंबर! आपल्या पत्नींना सांगा की ऐहिक जीवनाची आणि ऐहिक शोभा सजावटीची इच्छा बाळगत असाल तर या मी तुम्हाला काही देऊन सवरून चांगल्या रितीने सोडून द्यावे.

وَإِن كُنتُنَّ تُرِدۡنَ ٱللَّهَ وَرَسُولَهُۥ وَٱلدَّارَ ٱلۡـَٔاخِرَةَ فَإِنَّ ٱللَّهَ أَعَدَّ لِلۡمُحۡسِنَـٰتِ مِنكُنَّ أَجۡرًا عَظِیمࣰا ﴿29﴾

२९. आणि जर तुमची इच्छा अल्लाह आणि त्याचा रसूल (पैगंबर) आणि आखिरतचे घर आहे तर (विश्वास ठेवा की) तुमच्यापैकी सत्कर्म करणारींकरिता अल्लाहने फार चांगला मोबदला तयार करून ठेवला आहे.

یَـٰنِسَاۤءَ ٱلنَّبِیِّ مَن یَأۡتِ مِنكُنَّ بِفَـٰحِشَةࣲ مُّبَیِّنَةࣲ یُضَـٰعَفۡ لَهَا ٱلۡعَذَابُ ضِعۡفَیۡنِۚ وَكَانَ ذَ ٰ⁠لِكَ عَلَى ٱللَّهِ یَسِیرࣰا ﴿30﴾

३०. हे पैगंबरांच्या पत्नींनो! तुमच्यापैकी जी (पत्नी) देखील उघडपणे निर्लज्जतेचे कृत्य करील तर तिला दुप्पट अज़ाब दिला जाईल. अल्लाहकरिता ही फार सोपी गोष्ट आहे.

۞ وَمَن یَقۡنُتۡ مِنكُنَّ لِلَّهِ وَرَسُولِهِۦ وَتَعۡمَلۡ صَـٰلِحࣰا نُّؤۡتِهَاۤ أَجۡرَهَا مَرَّتَیۡنِ وَأَعۡتَدۡنَا لَهَا رِزۡقࣰا كَرِیمࣰا ﴿31﴾

३१. आणि तुमच्यापैकी जो कोणी अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचे आज्ञापालन करील आणि सत्कर्म करील तर आम्ही तिला दुप्पट मोबदला प्रदान करू आणि तिच्यासाठी आम्ही अति उत्तम आजिविका तयार करून ठेवली आहे.

یَـٰنِسَاۤءَ ٱلنَّبِیِّ لَسۡتُنَّ كَأَحَدࣲ مِّنَ ٱلنِّسَاۤءِ إِنِ ٱتَّقَیۡتُنَّۚ فَلَا تَخۡضَعۡنَ بِٱلۡقَوۡلِ فَیَطۡمَعَ ٱلَّذِی فِی قَلۡبِهِۦ مَرَضࣱ وَقُلۡنَ قَوۡلࣰا مَّعۡرُوفࣰا ﴿32﴾

३२. हे पैगंबरांच्या पत्नींनो! तुम्ही सर्वसाधारण स्त्रियांसारख्या नाहीत. जर तुम्ही अल्लाहचे भय राखणाऱ्या असाल तर कोमल स्वरात बोलत जाऊ नका की (ज्यामुळे) ज्याच्या मनात रोग असेल त्याने एखादा वाईट इरादा करावा, तथापि नियमाला अनुसरून बोलत राहा.

وَقَرۡنَ فِی بُیُوتِكُنَّ وَلَا تَبَرَّجۡنَ تَبَرُّجَ ٱلۡجَـٰهِلِیَّةِ ٱلۡأُولَىٰۖ وَأَقِمۡنَ ٱلصَّلَوٰةَ وَءَاتِینَ ٱلزَّكَوٰةَ وَأَطِعۡنَ ٱللَّهَ وَرَسُولَهُۥۤۚ إِنَّمَا یُرِیدُ ٱللَّهُ لِیُذۡهِبَ عَنكُمُ ٱلرِّجۡسَ أَهۡلَ ٱلۡبَیۡتِ وَیُطَهِّرَكُمۡ تَطۡهِیرࣰا ﴿33﴾

३३. आणि आपल्या घरांमध्ये स्थैर्यपूर्वक राहा, आणि पूर्वीच्या अज्ञानकाळाप्रमाणे आपल्या शृंगारा (सौंदर्या) चे प्रदर्शन करू नका आणि नमाज नियिमतपणे अदा करीत राहा आणि जकात (धर्मदान) देत राहा, आणि अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या आदेशाचे पालन करा. अल्लाह हेच इच्छितो की हे पैगंबरांच्या पत्नींनो! तुमच्यापासून त्याने प्रत्येक (प्रकारची) अपवित्रता दूर करावी, आणि तुम्हाला खूप पवित्र करावे.

وَٱذۡكُرۡنَ مَا یُتۡلَىٰ فِی بُیُوتِكُنَّ مِنۡ ءَایَـٰتِ ٱللَّهِ وَٱلۡحِكۡمَةِۚ إِنَّ ٱللَّهَ كَانَ لَطِیفًا خَبِیرًا ﴿34﴾

३४. आणि तुमच्या घरांमध्ये अल्लाहच्या ज्या आयती आणि पैगंबरांची वचने (हदीस) वाचली जातात, त्या स्मरणात असू द्या. निःसंशय अल्लाह मोठा सूक्ष्मदर्शी, माहितगार आहे.

إِنَّ ٱلۡمُسۡلِمِینَ وَٱلۡمُسۡلِمَـٰتِ وَٱلۡمُؤۡمِنِینَ وَٱلۡمُؤۡمِنَـٰتِ وَٱلۡقَـٰنِتِینَ وَٱلۡقَـٰنِتَـٰتِ وَٱلصَّـٰدِقِینَ وَٱلصَّـٰدِقَـٰتِ وَٱلصَّـٰبِرِینَ وَٱلصَّـٰبِرَ ٰ⁠تِ وَٱلۡخَـٰشِعِینَ وَٱلۡخَـٰشِعَـٰتِ وَٱلۡمُتَصَدِّقِینَ وَٱلۡمُتَصَدِّقَـٰتِ وَٱلصَّـٰۤىِٕمِینَ وَٱلصَّـٰۤىِٕمَـٰتِ وَٱلۡحَـٰفِظِینَ فُرُوجَهُمۡ وَٱلۡحَـٰفِظَـٰتِ وَٱلذَّ ٰ⁠كِرِینَ ٱللَّهَ كَثِیرࣰا وَٱلذَّ ٰ⁠كِرَ ٰ⁠تِ أَعَدَّ ٱللَّهُ لَهُم مَّغۡفِرَةࣰ وَأَجۡرًا عَظِیمࣰا ﴿35﴾

३५. निःसंशय, मुस्लिम पुरुष आणि मुस्लिम स्त्रिया, ईमान राखणारे पुरुष आणि ईमान राखणाऱ्या स्त्रिया, आज्ञापालन करणारे पुरुष आणि आज्ञापालन करणाऱ्या स्त्रिया, सत्यवचनी पुरुष आणि सत्यवचनी स्त्रिया, सहनशीलता राखणारे पुरुष आणि सहनशीलता राखणाऱ्या स्त्रिया (अल्लाहला) विनंती करणारे पुरुष आणि विनंती करणाऱ्या स्त्रिया, दान (सदका) करणारे पुरुष आणि दान करणाऱ्या स्त्रिया, रोजा (उपवास-व्रत) करणारे पुरुष आणि रोजा राखणाऱ्या स्त्रिया, आपल्या लज्जास्थाना (गुप्तांगा) चे रक्षण करणारे पुरुष आणि आपल्या लज्जास्थानाचे रक्षण करणाऱ्या स्त्रिया, अल्लाहचे अत्याधिक स्मरण करणारे पुरुष आणि अत्याधिक स्मरण करणाऱ्या स्त्रिया, या सर्वांसाठी अल्लाहने मोठी क्षमा आणि महान मोबदला तयार करून ठेवला आहे.

وَمَا كَانَ لِمُؤۡمِنࣲ وَلَا مُؤۡمِنَةٍ إِذَا قَضَى ٱللَّهُ وَرَسُولُهُۥۤ أَمۡرًا أَن یَكُونَ لَهُمُ ٱلۡخِیَرَةُ مِنۡ أَمۡرِهِمۡۗ وَمَن یَعۡصِ ٱللَّهَ وَرَسُولَهُۥ فَقَدۡ ضَلَّ ضَلَـٰلࣰا مُّبِینࣰا ﴿36﴾

३६. आणि (लक्षात ठेवा) कोणत्याही ईमान राखणाऱ्या पुरुषाला आणि स्त्रीला, अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या फैसल्यानंतर आपल्या एखाद्या गोष्टीचा कसलाही अधिकार बाकी राहत नाही (लक्षात ठेवा) अल्लाह आणि त्याच्या पैगंबराची जो कोणी अवज्ञा करील, तो उघड मार्गभ्रष्टतेत जाऊन पडेल.

وَإِذۡ تَقُولُ لِلَّذِیۤ أَنۡعَمَ ٱللَّهُ عَلَیۡهِ وَأَنۡعَمۡتَ عَلَیۡهِ أَمۡسِكۡ عَلَیۡكَ زَوۡجَكَ وَٱتَّقِ ٱللَّهَ وَتُخۡفِی فِی نَفۡسِكَ مَا ٱللَّهُ مُبۡدِیهِ وَتَخۡشَى ٱلنَّاسَ وَٱللَّهُ أَحَقُّ أَن تَخۡشَىٰهُۖ فَلَمَّا قَضَىٰ زَیۡدࣱ مِّنۡهَا وَطَرࣰا زَوَّجۡنَـٰكَهَا لِكَیۡ لَا یَكُونَ عَلَى ٱلۡمُؤۡمِنِینَ حَرَجࣱ فِیۤ أَزۡوَ ٰ⁠جِ أَدۡعِیَاۤىِٕهِمۡ إِذَا قَضَوۡا۟ مِنۡهُنَّ وَطَرࣰاۚ وَكَانَ أَمۡرُ ٱللَّهِ مَفۡعُولࣰا ﴿37﴾

३७. आणि (स्मरण करा) जेव्हा तुम्ही त्या माणसाला सांगत होते , ज्यावर अल्लाहने अनुग्रह केला आणि तु्‌म्ही देखील की आपल्या पत्नीला आपल्या जवळ ठेवा, आणि अल्लाहचे भय बाळगा आणि तुम्ही आपल्या मनात ही गोष्ट लपवून ठेवली होती जिला अल्लाह उघड करणार होता, आणि तुम्ही लोकांचे भय बाळगत होता, वास्तिवक अल्लाह या गोष्टीचा अधिक हक्क राखत होता की तुम्ही त्याचे भय बाळगावे, मग जेव्हा जैदने त्या स्त्रीकडून आपली गरज पूर्ण करून घेतली, तेव्हा तिला आम्ही तुमच्या विवाहात दिले. यासाठी की ईमान राखणाऱ्या लोकांना, त्यांच्या दत्तक पुत्रांच्या पत्नींबाबत कसल्याही प्रकारचा संकोच राहू नये, जेव्हा ते त्यांच्याकडून आपली गरज पूर्ण करून घेतील, अल्लाहचा हा आदेश कार्यान्वित होणारच होता.

مَّا كَانَ عَلَى ٱلنَّبِیِّ مِنۡ حَرَجࣲ فِیمَا فَرَضَ ٱللَّهُ لَهُۥۖ سُنَّةَ ٱللَّهِ فِی ٱلَّذِینَ خَلَوۡا۟ مِن قَبۡلُۚ وَكَانَ أَمۡرُ ٱللَّهِ قَدَرࣰا مَّقۡدُورًا ﴿38﴾

३८. ज्या गोष्टी अल्लाहने आपल्या पैगंबराकरिता उचित (मान्य) केल्या आहेत, त्यांच्या बाबतीत पैगंबरावर काही हरकत नाही. अल्लाहचा हाच नियम त्यां (पैगंबरां) च्याबाबतही राहिला जे पूर्वी होऊन गेले आणि अल्लाहची कामे अनुमानाने निर्धारित केलेले असतात.

ٱلَّذِینَ یُبَلِّغُونَ رِسَـٰلَـٰتِ ٱللَّهِ وَیَخۡشَوۡنَهُۥ وَلَا یَخۡشَوۡنَ أَحَدًا إِلَّا ٱللَّهَۗ وَكَفَىٰ بِٱللَّهِ حَسِیبࣰا ﴿39﴾

३९. ते सर्व असे होते की अल्लाहचे आदेश पोहचवित नसत आणि अल्लाहचेच भय बाळगत आणि अल्लाहखेरीज कोणाचेही भय बाळगत नस, आणि अल्लाह हिशोब घेण्यासाठी पुरेसा आहे.

مَّا كَانَ مُحَمَّدٌ أَبَاۤ أَحَدࣲ مِّن رِّجَالِكُمۡ وَلَـٰكِن رَّسُولَ ٱللَّهِ وَخَاتَمَ ٱلنَّبِیِّـۧنَۗ وَكَانَ ٱللَّهُ بِكُلِّ شَیۡءٍ عَلِیمࣰا ﴿40﴾

४०. लोकांनो! तुमच्या पुरुषांपैकी मुहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) कोणाचेही पिता नाहीत, तथापि ते अल्लाहचे रसूल (पैगंबर) आहेत आणि समस्त पैगंबरांमध्ये अंतिम पैगंबर आहेत,१ आणि अल्लाह प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे जाणणारा आहे.

یَـٰۤأَیُّهَا ٱلَّذِینَ ءَامَنُوا۟ ٱذۡكُرُوا۟ ٱللَّهَ ذِكۡرࣰا كَثِیرࣰا ﴿41﴾

४१. हे ईमान राखणाऱ्यांनो! अल्लाहचे अत्याधिक स्मरण करा.

وَسَبِّحُوهُ بُكۡرَةࣰ وَأَصِیلًا ﴿42﴾

४२. आणि सकाळ संध्याकाळ त्याची पवित्रता वर्णन करीत राहा.

هُوَ ٱلَّذِی یُصَلِّی عَلَیۡكُمۡ وَمَلَـٰۤىِٕكَتُهُۥ لِیُخۡرِجَكُم مِّنَ ٱلظُّلُمَـٰتِ إِلَى ٱلنُّورِۚ وَكَانَ بِٱلۡمُؤۡمِنِینَ رَحِیمࣰا ﴿43﴾

४३. तोच आहे, जो तुमच्यावर आपली दया - कृपा पाठवितो आणि त्याचे फरिश्ते (तुमच्यासाठी दया याचनेची प्रार्थना करतात) यासाठी की त्याने तुम्हाला अंधारातून काढून प्रकाशाकडे न्यावे, आणि अल्लाह ईमान राखणाऱ्यांवर मोठा दया करणारा आहे.

تَحِیَّتُهُمۡ یَوۡمَ یَلۡقَوۡنَهُۥ سَلَـٰمࣱۚ وَأَعَدَّ لَهُمۡ أَجۡرࣰا كَرِیمࣰا ﴿44﴾

४४. ज्या दिवशी हे अल्लाहला भेटतील, त्यांचे स्वागत सलामद्वारे होईल, त्यांच्यासाठी अल्लाहने मान-सन्मानपूर्ण मोबदला तयार करून ठेवला आहे.

یَـٰۤأَیُّهَا ٱلنَّبِیُّ إِنَّاۤ أَرۡسَلۡنَـٰكَ شَـٰهِدࣰا وَمُبَشِّرࣰا وَنَذِیرࣰا ﴿45﴾

४५. हे पैगंबर! निःसंशय, आम्हीच तुम्हाला (रसूल) साक्षी, खूशखबर देणारा आणि खबरदार करणारा बनवून पाठविले आहे.

وَدَاعِیًا إِلَى ٱللَّهِ بِإِذۡنِهِۦ وَسِرَاجࣰا مُّنِیرࣰا ﴿46﴾

४६. आणि अल्लाहच्या आदेशाने त्याच्याकडे बोलविणारा आणि उज्ज्वल (प्रकाशमान) दीप बनवून.

وَبَشِّرِ ٱلۡمُؤۡمِنِینَ بِأَنَّ لَهُم مِّنَ ٱللَّهِ فَضۡلࣰا كَبِیرࣰا ﴿47﴾

४७. आणि तुम्ही ईमान राखणाऱ्या लोकांना ही शुभवार्ता ऐकवा की त्यांच्याकरिता अल्लाहकडून फार मोठा अनुग्रह आहे.

وَلَا تُطِعِ ٱلۡكَـٰفِرِینَ وَٱلۡمُنَـٰفِقِینَ وَدَعۡ أَذَىٰهُمۡ وَتَوَكَّلۡ عَلَى ٱللَّهِۚ وَكَفَىٰ بِٱللَّهِ وَكِیلࣰا ﴿48﴾

४८. आणि काफिरांचे व ढोंगी मुसलमानांचे म्हणणे मानू नका, आणि जे दुःख (त्यांच्याकडून) पोहोचेल त्याची चिंता करू नका. अल्लाहवर भरवसा राखा, अल्लाह काम बनविण्यासाठी पुरेसा आहे.

یَـٰۤأَیُّهَا ٱلَّذِینَ ءَامَنُوۤا۟ إِذَا نَكَحۡتُمُ ٱلۡمُؤۡمِنَـٰتِ ثُمَّ طَلَّقۡتُمُوهُنَّ مِن قَبۡلِ أَن تَمَسُّوهُنَّ فَمَا لَكُمۡ عَلَیۡهِنَّ مِنۡ عِدَّةࣲ تَعۡتَدُّونَهَاۖ فَمَتِّعُوهُنَّ وَسَرِّحُوهُنَّ سَرَاحࣰا جَمِیلࣰا ﴿49﴾

४९. हे ईमान राखणाऱ्यांनो! जेव्हा तुम्ही ईमान राखणाऱ्या स्त्रियांशी विवाह कराल, मग त्यांना हात लावण्यापूर्वी तलाक (घटस्फोट) द्याल, तर त्यांच्यावर तुमचा कसलाही (अधिकार) इद्दत (तलाकनंतर निर्धारित वेळेपर्यंतची प्रतिबंधित मुदती) चा नाही, जिची तुम्ही गणना करावी.१ तेव्हा तुम्ही त्यांना काही न काही द्या आणि भल्या रितीने त्यांना निरोप द्या.

یَـٰۤأَیُّهَا ٱلنَّبِیُّ إِنَّاۤ أَحۡلَلۡنَا لَكَ أَزۡوَ ٰ⁠جَكَ ٱلَّـٰتِیۤ ءَاتَیۡتَ أُجُورَهُنَّ وَمَا مَلَكَتۡ یَمِینُكَ مِمَّاۤ أَفَاۤءَ ٱللَّهُ عَلَیۡكَ وَبَنَاتِ عَمِّكَ وَبَنَاتِ عَمَّـٰتِكَ وَبَنَاتِ خَالِكَ وَبَنَاتِ خَـٰلَـٰتِكَ ٱلَّـٰتِی هَاجَرۡنَ مَعَكَ وَٱمۡرَأَةࣰ مُّؤۡمِنَةً إِن وَهَبَتۡ نَفۡسَهَا لِلنَّبِیِّ إِنۡ أَرَادَ ٱلنَّبِیُّ أَن یَسۡتَنكِحَهَا خَالِصَةࣰ لَّكَ مِن دُونِ ٱلۡمُؤۡمِنِینَۗ قَدۡ عَلِمۡنَا مَا فَرَضۡنَا عَلَیۡهِمۡ فِیۤ أَزۡوَ ٰ⁠جِهِمۡ وَمَا مَلَكَتۡ أَیۡمَـٰنُهُمۡ لِكَیۡلَا یَكُونَ عَلَیۡكَ حَرَجࣱۗ وَكَانَ ٱللَّهُ غَفُورࣰا رَّحِیمࣰا ﴿50﴾

५०. हे पैगंबर (स.)! आम्ही तुमच्यासाठी तुमच्या त्या पत्न्या हलाल (वैध) केल्या आहेत, ज्यांना तुम्ही त्यांचे महर (स्त्रीधन) देऊन टाकले आहे आणि त्या दासी देखील, ज्यांना अल्लाहने युद्धात तुम्हाला प्रदान केल्या आहेत आणि तुमच्या काकाच्या कन्या, आत्याच्या कन्या, तुमच्या मामाच्या कन्या आणि तुमच्या मावशीच्या कन्या देखील, ज्यांनी तुमच्यासोबत हिजरत (स्वदेशत्याग) केली आहे आणि ती ईमानधारक स्त्री जी स्वतःला पैगंबरांना दान करील, हे त्या स्थितीत की स्वतः जर पैगंबरही तिच्याशी विवाह करू इच्छितील. हे विशेषतः तुमच्यासाठीच आहे आणि इतर ईमानधारकांसाठी नाही. आम्ही त्याला चांगल्या प्रकारे जाणतो जे आम्ही त्यांच्यावर त्यांच्या पत्न्या आणि दासींविषयी (चे आदेश) निर्धारित केले आहेत. हे यासाठी की तुमच्यावर एखादी अडचण उद्‌भवू नये. अल्लाह मोठा माफ करणारा आणि मोठा दया करणारा आहे.

۞ تُرۡجِی مَن تَشَاۤءُ مِنۡهُنَّ وَتُـٔۡوِیۤ إِلَیۡكَ مَن تَشَاۤءُۖ وَمَنِ ٱبۡتَغَیۡتَ مِمَّنۡ عَزَلۡتَ فَلَا جُنَاحَ عَلَیۡكَۚ ذَ ٰ⁠لِكَ أَدۡنَىٰۤ أَن تَقَرَّ أَعۡیُنُهُنَّ وَلَا یَحۡزَنَّ وَیَرۡضَیۡنَ بِمَاۤ ءَاتَیۡتَهُنَّ كُلُّهُنَّۚ وَٱللَّهُ یَعۡلَمُ مَا فِی قُلُوبِكُمۡۚ وَكَانَ ٱللَّهُ عَلِیمًا حَلِیمࣰا ﴿51﴾

५१. त्यांच्यापैकी जिला तुम्ही इच्छित असाल दूर राखा आणि जिला इच्छित असाल आपल्या जवळ ठेवा आणि जर तुम्ही त्यांच्यापैकी एखादीला आपल्या जवळ बोलावून घ्याल, ज्यांना तुम्ही वेगळे करून ठेवले होते, तर यात तुम्हाला काही हरकत नाही. याद्वारे या गोष्टीची अधिक आशा बाळगली जाऊ शकते की या (स्त्रियां) चे नेत्र शितल राहावेत आणि त्या दुःखी न व्हाव्यात आणि तुम्ही जे काही त्यांना द्याल त्यावर त्या सर्व राजी खुशी राहतील. तुमच्या मनात जे काही आहे ते अल्लाह चांगल्या प्रकारे जाणतो. अल्लाह मोठा ज्ञान बाळगणारा सहनशील आहे.

لَّا یَحِلُّ لَكَ ٱلنِّسَاۤءُ مِنۢ بَعۡدُ وَلَاۤ أَن تَبَدَّلَ بِهِنَّ مِنۡ أَزۡوَ ٰ⁠جࣲ وَلَوۡ أَعۡجَبَكَ حُسۡنُهُنَّ إِلَّا مَا مَلَكَتۡ یَمِینُكَۗ وَكَانَ ٱللَّهُ عَلَىٰ كُلِّ شَیۡءࣲ رَّقِیبࣰا ﴿52﴾

५२. यानंतर इतर स्त्रिया तुमच्याकरिता हलाल (वैध) नाहीत आणि ना हे (उचित आहे) की त्यांना सोडून दुसऱ्या स्त्रियांशी (विवाह करावा) जरी त्यांचे रूप (सौंदर्य) कितीही चांगले वाटत असेल. परंतु तुमच्या दासीखेरीज, अल्लाह प्रत्येक गोष्टीवर देखरेख करणारा आहे.

یَـٰۤأَیُّهَا ٱلَّذِینَ ءَامَنُوا۟ لَا تَدۡخُلُوا۟ بُیُوتَ ٱلنَّبِیِّ إِلَّاۤ أَن یُؤۡذَنَ لَكُمۡ إِلَىٰ طَعَامٍ غَیۡرَ نَـٰظِرِینَ إِنَىٰهُ وَلَـٰكِنۡ إِذَا دُعِیتُمۡ فَٱدۡخُلُوا۟ فَإِذَا طَعِمۡتُمۡ فَٱنتَشِرُوا۟ وَلَا مُسۡتَـٔۡنِسِینَ لِحَدِیثٍۚ إِنَّ ذَ ٰ⁠لِكُمۡ كَانَ یُؤۡذِی ٱلنَّبِیَّ فَیَسۡتَحۡیِۦ مِنكُمۡۖ وَٱللَّهُ لَا یَسۡتَحۡیِۦ مِنَ ٱلۡحَقِّۚ وَإِذَا سَأَلۡتُمُوهُنَّ مَتَـٰعࣰا فَسۡـَٔلُوهُنَّ مِن وَرَاۤءِ حِجَابࣲۚ ذَ ٰ⁠لِكُمۡ أَطۡهَرُ لِقُلُوبِكُمۡ وَقُلُوبِهِنَّۚ وَمَا كَانَ لَكُمۡ أَن تُؤۡذُوا۟ رَسُولَ ٱللَّهِ وَلَاۤ أَن تَنكِحُوۤا۟ أَزۡوَ ٰ⁠جَهُۥ مِنۢ بَعۡدِهِۦۤ أَبَدًاۚ إِنَّ ذَ ٰ⁠لِكُمۡ كَانَ عِندَ ٱللَّهِ عَظِیمًا ﴿53﴾

५३. हे ईमान राखणाऱ्या लोकांनो! जोपर्यंत तुम्हाला (आत येण्याची) अनुमती दिली जात नाही, तोपर्यंत तुम्ही पैगंबराच्या घरात प्रवेश करू नका. भोजनाकरिता अशा वेळी की भोजन तयार होण्याची प्रतीक्षा करीत राहावे, किंबहुना जेव्हा बोलाविले जाईल, तेव्हा जा आणि जेव्हा भोजन करू घ्याल तेव्हा निघण्याची तयारी करा. तिथेच (बसून) गप्पा गोष्टीत मग्न होऊ नका. पैगंबराना तुमच्या या कामाचा त्रास होतो, परंतु ते तुमचा आदर (संकोच) करतात, आणि अल्लाह सत्य गोष्ट सांगण्यात कोणाचीही पर्वा करीत नाही, आणि जेव्हा तुम्ही पैगंबराच्या पत्नींकडून एखादी वस्तू मागाल तर पडद्याआडून मागा. तुमच्या आणि त्यांच्या हृदयांकरिता पुर्ण पवित्रता हीच आहे. तुमच्यासाठी हे योग्य नव्हे की तुम्ही अल्लाहच्या पैगंबरास त्रास द्यावा आणि ना तुमच्यासाठी हे उचित आहे की पैगंबर (स.) यांच्यानंतर त्यांच्या पत्नींशी विवाह करावा (लक्षात ठेवा) अल्लाहजवळ हे महाभयंकर (पाप) आहे.

إِن تُبۡدُوا۟ شَیۡـًٔا أَوۡ تُخۡفُوهُ فَإِنَّ ٱللَّهَ كَانَ بِكُلِّ شَیۡءٍ عَلِیمࣰا ﴿54﴾

५४. तुम्ही एखादी गोष्ट जाहीर करा किंवा लपवून ठेवा, अल्लाह प्रत्येक गोष्टीचे चांगल्या प्रकारे ज्ञान राखणारा आहे.

لَّا جُنَاحَ عَلَیۡهِنَّ فِیۤ ءَابَاۤىِٕهِنَّ وَلَاۤ أَبۡنَاۤىِٕهِنَّ وَلَاۤ إِخۡوَ ٰ⁠نِهِنَّ وَلَاۤ أَبۡنَاۤءِ إِخۡوَ ٰ⁠نِهِنَّ وَلَاۤ أَبۡنَاۤءِ أَخَوَ ٰ⁠تِهِنَّ وَلَا نِسَاۤىِٕهِنَّ وَلَا مَا مَلَكَتۡ أَیۡمَـٰنُهُنَّۗ وَٱتَّقِینَ ٱللَّهَۚ إِنَّ ٱللَّهَ كَانَ عَلَىٰ كُلِّ شَیۡءࣲ شَهِیدًا ﴿55﴾

५५. त्या स्त्रियांवर कसलाही गुन्हा नाही त्या आपल्या पित्यांच्या, आपल्या पुत्रांच्या आणि भावांच्या, आपल्या पुतण्यांच्या, भाच्यांच्या आणि आपल्या (परिचित) स्त्रियांच्या आणि ज्यांच्या त्या मालक आहेत त्यां (दास दासीं) च्या समोर असाव्यात.१ स्त्रियांनो! अल्लाहचे भय बाळगत राहा, अल्लाह निःसंशय, प्रत्येक गोष्टीवर साक्षी आहे.

إِنَّ ٱللَّهَ وَمَلَـٰۤىِٕكَتَهُۥ یُصَلُّونَ عَلَى ٱلنَّبِیِّۚ یَـٰۤأَیُّهَا ٱلَّذِینَ ءَامَنُوا۟ صَلُّوا۟ عَلَیۡهِ وَسَلِّمُوا۟ تَسۡلِیمًا ﴿56﴾

५६. अल्लाह आणि त्याचे फरिश्ते या पैगंबरावर दरुद पाठवितात. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुम्ही (देखील) यांच्यावर दरुद पाठवा आणि जास्त सलाम (ही) पाठवत राहा. १

إِنَّ ٱلَّذِینَ یُؤۡذُونَ ٱللَّهَ وَرَسُولَهُۥ لَعَنَهُمُ ٱللَّهُ فِی ٱلدُّنۡیَا وَٱلۡـَٔاخِرَةِ وَأَعَدَّ لَهُمۡ عَذَابࣰا مُّهِینࣰا ﴿57﴾

५७. जे लोक अल्लाह आणि त्याच्या पैगंबराला दुःख- त्रास देतात, त्यांच्यावर या जगात व आखिरतमध्ये अल्लाहतर्फे धिःक्कार आहे आणि त्यांच्यासाठी मोठा अपमानित करणारा अज़ाब (शिक्षा-यातना) आहे.

وَٱلَّذِینَ یُؤۡذُونَ ٱلۡمُؤۡمِنِینَ وَٱلۡمُؤۡمِنَـٰتِ بِغَیۡرِ مَا ٱكۡتَسَبُوا۟ فَقَدِ ٱحۡتَمَلُوا۟ بُهۡتَـٰنࣰا وَإِثۡمࣰا مُّبِینࣰا ﴿58﴾

५८. आणि जे लोक ईमान राखणाऱ्या पुरुष व स्त्रियांना अशा एखाद्या अपराधाबद्दल दुःख - त्रास देतात, जो त्यांच्याकडून घडला नसेल तर ते फार मोठा आरोप आणि खुल्या अपराधाचे ओझे उचलतात.

یَـٰۤأَیُّهَا ٱلنَّبِیُّ قُل لِّأَزۡوَ ٰ⁠جِكَ وَبَنَاتِكَ وَنِسَاۤءِ ٱلۡمُؤۡمِنِینَ یُدۡنِینَ عَلَیۡهِنَّ مِن جَلَـٰبِیبِهِنَّۚ ذَ ٰ⁠لِكَ أَدۡنَىٰۤ أَن یُعۡرَفۡنَ فَلَا یُؤۡذَیۡنَۗ وَكَانَ ٱللَّهُ غَفُورࣰا رَّحِیمࣰا ﴿59﴾

५९. हे पैगंबर! आपल्या पत्नींना आणि आपल्या कन्यांना आणि ईमान राखणाऱ्यांच्या स्त्रियांना सांगा की त्यांनी आपल्या अंगावर आपल्या चादरी टाकून घेत जावे. अशाने त्या त्वरित ओळखल्या जातील, मग त्यांना त्रास पोहचविला जाणार नाही, आणि अल्लाह मोठा माफ करणारा आणि दया करणारा आहे.

۞ لَّىِٕن لَّمۡ یَنتَهِ ٱلۡمُنَـٰفِقُونَ وَٱلَّذِینَ فِی قُلُوبِهِم مَّرَضࣱ وَٱلۡمُرۡجِفُونَ فِی ٱلۡمَدِینَةِ لَنُغۡرِیَنَّكَ بِهِمۡ ثُمَّ لَا یُجَاوِرُونَكَ فِیهَاۤ إِلَّا قَلِیلࣰا ﴿60﴾

६०. जर (अजूनही) हे मुनाफिक (ईमानधारक असल्याचे ढोंग करणारे) आणि ते, ज्यांच्या मनात रोग आहे आणि मदीनाचे ते रहिवाशी जे खोट्या अफवा उडवितात, थांबले नाहीत तर आम्ही तुम्हाला त्यांच्या (नाशा) वर लावून देऊ, मग तर ते काही दिवसच तुमच्यासोबत या (शहरा) त राहू शकतील.

مَّلۡعُونِینَۖ أَیۡنَمَا ثُقِفُوۤا۟ أُخِذُوا۟ وَقُتِّلُوا۟ تَقۡتِیلࣰا ﴿61﴾

६१. त्यांच्यावर धिःक्काराचा वर्षाव केला गेला, ज्या ज्या ठिकाणी सापडावेत, धरले जावेत आणि खूप तुकडे तुकडे केले जावेत.

سُنَّةَ ٱللَّهِ فِی ٱلَّذِینَ خَلَوۡا۟ مِن قَبۡلُۖ وَلَن تَجِدَ لِسُنَّةِ ٱللَّهِ تَبۡدِیلࣰا ﴿62﴾

६२. त्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांसाठीही अल्लाहचा हाच नियम लागू राहिला आणि तुम्हाला अल्लाहच्या विधी-नियमात केव्हाही बदल आढळणार नाही.

یَسۡـَٔلُكَ ٱلنَّاسُ عَنِ ٱلسَّاعَةِۖ قُلۡ إِنَّمَا عِلۡمُهَا عِندَ ٱللَّهِۚ وَمَا یُدۡرِیكَ لَعَلَّ ٱلسَّاعَةَ تَكُونُ قَرِیبًا ﴿63﴾

६३. लोक तुम्हाला कयामत (च्या वेळे) विषयी विचारतात. (तुम्ही) सांगा, याचे ज्ञान तर केवळ अल्लाहलाच आहे, तुम्हाला काय माहीत, फार संभव आहे की कयामत अगदी जवळ येऊन ठेपली असेल.

إِنَّ ٱللَّهَ لَعَنَ ٱلۡكَـٰفِرِینَ وَأَعَدَّ لَهُمۡ سَعِیرًا ﴿64﴾

६४. अल्लाहने काफिरांचा धिःक्कार केलेला आहे आणि त्यांच्यासाठी धगधगणारी आग तयार करून ठेवली आहे.

خَـٰلِدِینَ فِیهَاۤ أَبَدࣰاۖ لَّا یَجِدُونَ وَلِیࣰّا وَلَا نَصِیرࣰا ﴿65﴾

६५. जिच्यात ते सदैवकाळ राहतील, त्यांना ना कोणी पाठीराखा मित्र लाभेल आणि ना कोणी मदत करणारा.

یَوۡمَ تُقَلَّبُ وُجُوهُهُمۡ فِی ٱلنَّارِ یَقُولُونَ یَـٰلَیۡتَنَاۤ أَطَعۡنَا ٱللَّهَ وَأَطَعۡنَا ٱلرَّسُولَا۠ ﴿66﴾

६६. त्या दिवशी त्यांचे चेहरे आगीत उलट पालट केले जातील (ते मोठ्या पश्चात्तापाने आणि दुःखाने) म्हणतील की आम्ही अल्लाहचे आणि पैगंबरांचे आज्ञापालन केले असते तर बरे झाले असते!

وَقَالُوا۟ رَبَّنَاۤ إِنَّاۤ أَطَعۡنَا سَادَتَنَا وَكُبَرَاۤءَنَا فَأَضَلُّونَا ٱلسَّبِیلَا۠ ﴿67﴾

६७. आणि ते म्हणतील, हे आमच्या पालनकर्त्या! आम्ही आपल्या प्रमुखांचे आणि थोरा-मोठ्यांचे म्हणणे ऐकले (मानले) ज्यांनी आम्हाला सरळ मार्गापासून विचलित केले.

رَبَّنَاۤ ءَاتِهِمۡ ضِعۡفَیۡنِ مِنَ ٱلۡعَذَابِ وَٱلۡعَنۡهُمۡ لَعۡنࣰا كَبِیرࣰا ﴿68﴾

६८. हे आमच्या पालनकर्त्या! तू त्यांना दुप्पट अज़ाब (शिक्षा-यातना) दे आणि त्यांच्यावर फार मोठा धिःक्कार (लानत) पाठव.

یَـٰۤأَیُّهَا ٱلَّذِینَ ءَامَنُوا۟ لَا تَكُونُوا۟ كَٱلَّذِینَ ءَاذَوۡا۟ مُوسَىٰ فَبَرَّأَهُ ٱللَّهُ مِمَّا قَالُوا۟ۚ وَكَانَ عِندَ ٱللَّهِ وَجِیهࣰا ﴿69﴾

६९. हे ईमान राखणाऱ्यांनो! त्या लोकांसारखे होऊ नका, ज्यांनी मूसाला क्लेश - यातना दिली, तर जी गोष्ट त्यांनी सांगितली होती अल्लाहने त्यांना त्या गोष्टीपासून मुक्त केले आणि अल्लाहजवळ मूसा प्रतिष्ठित होते.

یَـٰۤأَیُّهَا ٱلَّذِینَ ءَامَنُوا۟ ٱتَّقُوا۟ ٱللَّهَ وَقُولُوا۟ قَوۡلࣰا سَدِیدࣰا ﴿70﴾

७०. हे ईमान राखणाऱ्यांनो! अल्लाहचे भय राखा आणि सरळ सरळ (सत्य) गोष्टी बोलत जा.

یُصۡلِحۡ لَكُمۡ أَعۡمَـٰلَكُمۡ وَیَغۡفِرۡ لَكُمۡ ذُنُوبَكُمۡۗ وَمَن یُطِعِ ٱللَّهَ وَرَسُولَهُۥ فَقَدۡ فَازَ فَوۡزًا عَظِیمًا ﴿71﴾

७१. यासाठी की अल्लाहने तुमच्या आचरणात सुधारणा करावी आणि तुमचे अपराध माफ करावेत आणि जो मनुष्य देखील अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या आदेशाचे पालन करील, त्याने फार मोठी सफलता प्राप्त करून घेतली.

إِنَّا عَرَضۡنَا ٱلۡأَمَانَةَ عَلَى ٱلسَّمَـٰوَ ٰ⁠تِ وَٱلۡأَرۡضِ وَٱلۡجِبَالِ فَأَبَیۡنَ أَن یَحۡمِلۡنَهَا وَأَشۡفَقۡنَ مِنۡهَا وَحَمَلَهَا ٱلۡإِنسَـٰنُۖ إِنَّهُۥ كَانَ ظَلُومࣰا جَهُولࣰا ﴿72﴾

७२. आम्ही आपल्या अमानतीला आकाशांच्या आणि जमिनीच्या आणि पर्वतांच्या समोर सादर केले (परंतु) सर्वांनी ती उचलण्याबाबत इन्कार केला आणि तिच्यापासून भयभित झाले (तथापि) मानवाने तिला उचलून घेतले, निःसंशय तो मोठा अत्याचारी आणि अडाणी आहे.

لِّیُعَذِّبَ ٱللَّهُ ٱلۡمُنَـٰفِقِینَ وَٱلۡمُنَـٰفِقَـٰتِ وَٱلۡمُشۡرِكِینَ وَٱلۡمُشۡرِكَـٰتِ وَیَتُوبَ ٱللَّهُ عَلَى ٱلۡمُؤۡمِنِینَ وَٱلۡمُؤۡمِنَـٰتِۗ وَكَانَ ٱللَّهُ غَفُورࣰا رَّحِیمَۢا ﴿73﴾

७३. (हे अशासाठी) की अल्लाहने मुनाफिक पुरुष आणि मुनाफिक स्त्रिया आणि अनेकेश्वरवादी पुरुष आणि अनेकेश्वरवादी स्त्रियांना सजा द्यावी आणि ईमान राखणाऱ्या पुरुषांची आणि ईमान राखणाऱ्या स्त्रियांची तौबा (क्षमा-याचना) कबूल करावी, आणि अल्लाह मोठा माफ करणारा आणि दया करणारा आहे.