Main pages

Surah The Hypocrites [Al-Munafiqoon] in Marathi

Surah The Hypocrites [Al-Munafiqoon] Ayah 11 Location Madinah Number 63

إِذَا جَاۤءَكَ ٱلۡمُنَـٰفِقُونَ قَالُوا۟ نَشۡهَدُ إِنَّكَ لَرَسُولُ ٱللَّهِۗ وَٱللَّهُ یَعۡلَمُ إِنَّكَ لَرَسُولُهُۥ وَٱللَّهُ یَشۡهَدُ إِنَّ ٱلۡمُنَـٰفِقِینَ لَكَـٰذِبُونَ ﴿1﴾

१. दांभिक (मुनाफिक) जेव्हा तुमच्याजवळ येतात, तेव्हा म्हणतात की आम्ही या गोष्टीस साक्ष आहोत की निःसंशय, तुम्ही अल्लाहचे रसूल (पैगंबर) आहात आणि अल्लाह जाणतो की तुम्ही निःसंशय त्याचे रसूल आहात. आणि अल्लाह साक्ष देतो की हे मुनाफिक (दांभिक) निश्चितपणे खोटारडे आहेत.

ٱتَّخَذُوۤا۟ أَیۡمَـٰنَهُمۡ جُنَّةࣰ فَصَدُّوا۟ عَن سَبِیلِ ٱللَّهِۚ إِنَّهُمۡ سَاۤءَ مَا كَانُوا۟ یَعۡمَلُونَ ﴿2﴾

२. त्यांनी आपल्या शपथांना ढाल बनवून ठेवले आहे, तर अल्लाहच्या मार्गापासून थांबले, निःसंशय फार वाईट आहे ता काम जे हे करीत आहेत.

ذَ ٰ⁠لِكَ بِأَنَّهُمۡ ءَامَنُوا۟ ثُمَّ كَفَرُوا۟ فَطُبِعَ عَلَىٰ قُلُوبِهِمۡ فَهُمۡ لَا یَفۡقَهُونَ ﴿3﴾

३. हे या कारणास्तव की हे ईमान राखून पुन्हा काफिर झाले, तेव्हा त्यांच्या हृदयांवर मोहर लावली गेली आता त्यांना काहीही समजत नाही.

۞ وَإِذَا رَأَیۡتَهُمۡ تُعۡجِبُكَ أَجۡسَامُهُمۡۖ وَإِن یَقُولُوا۟ تَسۡمَعۡ لِقَوۡلِهِمۡۖ كَأَنَّهُمۡ خُشُبࣱ مُّسَنَّدَةࣱۖ یَحۡسَبُونَ كُلَّ صَیۡحَةٍ عَلَیۡهِمۡۚ هُمُ ٱلۡعَدُوُّ فَٱحۡذَرۡهُمۡۚ قَـٰتَلَهُمُ ٱللَّهُۖ أَنَّىٰ یُؤۡفَكُونَ ﴿4﴾

४. आणि जेव्हा तुम्ही त्यांना पाहाल तेव्हा त्यांची शरीरे तुम्हाला मनमोहक वाटतील आणि जेव्हा हे बोलू लागतील तेव्हा त्यांच्या गोष्टी (ऐकण्या) साठी कान लावाल, ज्याप्रमाणे ही लाकडे आहेत भिंतीच्या आधारे लावलेली (ते) प्रत्येक (उंच) आवाजाला आपल्याविरूद्ध समजतात. तेच वास्तविक शत्रू आहेत, त्यांच्यापासून सावध राहा, अल्लाह त्यांचा सर्वनाश करो. कोठे भरकटत जात आहेत?

وَإِذَا قِیلَ لَهُمۡ تَعَالَوۡا۟ یَسۡتَغۡفِرۡ لَكُمۡ رَسُولُ ٱللَّهِ لَوَّوۡا۟ رُءُوسَهُمۡ وَرَأَیۡتَهُمۡ یَصُدُّونَ وَهُم مُّسۡتَكۡبِرُونَ ﴿5﴾

५. आणि जेव्हा त्यांना सांगितले जाते की, या, अल्लाहच्या पैगंबराने तुमच्यासाठी क्षमा याचनेची प्रार्थना करावी, तेव्हा आपल्या माना फिरवतात आणि तुम्ही त्यांना पाहाल की ते गर्व (घमेंड) करीत थांबतात.

سَوَاۤءٌ عَلَیۡهِمۡ أَسۡتَغۡفَرۡتَ لَهُمۡ أَمۡ لَمۡ تَسۡتَغۡفِرۡ لَهُمۡ لَن یَغۡفِرَ ٱللَّهُ لَهُمۡۚ إِنَّ ٱللَّهَ لَا یَهۡدِی ٱلۡقَوۡمَ ٱلۡفَـٰسِقِینَ ﴿6﴾

६. तुम्ही त्यांच्याकरिता माफीची प्रार्थना करणे आणि न करणे सारखेच आहे. अल्लाहच्यांना कधीही माफ करणार नाही. निःसंशय, अल्लाह अशा दुराचारी लोकांना मार्ग दाखवित नाही.

هُمُ ٱلَّذِینَ یَقُولُونَ لَا تُنفِقُوا۟ عَلَىٰ مَنۡ عِندَ رَسُولِ ٱللَّهِ حَتَّىٰ یَنفَضُّوا۟ۗ وَلِلَّهِ خَزَاۤىِٕنُ ٱلسَّمَـٰوَ ٰ⁠تِ وَٱلۡأَرۡضِ وَلَـٰكِنَّ ٱلۡمُنَـٰفِقِینَ لَا یَفۡقَهُونَ ﴿7﴾

७. हेच ते लोक होत जे म्हणतात की जे लोक अल्लाहच्या पैगंबरासोबत आहेत, त्यांच्यावर काही खर्च करू नका, येथे पर्यंत की ते इतस्ततः व्हावेत वस्तुतः आकाशांचे आणि जमिनीचे सर्व खजिने अल्लाहच्याच मालकीचे आहेत, परंतु या दांभिकांना हे समजत नाही.

یَقُولُونَ لَىِٕن رَّجَعۡنَاۤ إِلَى ٱلۡمَدِینَةِ لَیُخۡرِجَنَّ ٱلۡأَعَزُّ مِنۡهَا ٱلۡأَذَلَّۚ وَلِلَّهِ ٱلۡعِزَّةُ وَلِرَسُولِهِۦ وَلِلۡمُؤۡمِنِینَ وَلَـٰكِنَّ ٱلۡمُنَـٰفِقِینَ لَا یَعۡلَمُونَ ﴿8﴾

८. हे म्हणतात की जर आम्ही आता परतून मदीना येथे गेलो तर प्रतिष्ठा बाळगणारा, अपमानितास तेथून बाहेर काढील. (ऐका) मान-प्रतिष्ठा तर केवळ अल्लाहकरिता आणि त्याच्या पैगंबराकरिता व ईमान राखणाऱ्यांकरिता आहे, तथापि हे दांभिक (मुनाफिक) जाणत नाहीत.

یَـٰۤأَیُّهَا ٱلَّذِینَ ءَامَنُوا۟ لَا تُلۡهِكُمۡ أَمۡوَ ٰ⁠لُكُمۡ وَلَاۤ أَوۡلَـٰدُكُمۡ عَن ذِكۡرِ ٱللَّهِۚ وَمَن یَفۡعَلۡ ذَ ٰ⁠لِكَ فَأُو۟لَـٰۤىِٕكَ هُمُ ٱلۡخَـٰسِرُونَ ﴿9﴾

९. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुमच्या धनसंपत्ती व संततीने तुम्हाला अल्लाहच्या स्मरणापासून गाफील न करावे१ आणि जे असे करतील, तेच लोक नुकसान उचलणारे (तोट्यात राहणारे) आहेत.

وَأَنفِقُوا۟ مِن مَّا رَزَقۡنَـٰكُم مِّن قَبۡلِ أَن یَأۡتِیَ أَحَدَكُمُ ٱلۡمَوۡتُ فَیَقُولَ رَبِّ لَوۡلَاۤ أَخَّرۡتَنِیۤ إِلَىٰۤ أَجَلࣲ قَرِیبࣲ فَأَصَّدَّقَ وَأَكُن مِّنَ ٱلصَّـٰلِحِینَ ﴿10﴾

१०. आणि आम्ही जे काही तुम्हाला प्रदान केले आहे, त्याच्यातून (आमच्या मार्गात) खर्च करा, यापूर्वी की तुमच्यापैकी एखाद्याला मरण यावे, तेव्हा म्हणू लागले की, हे माझ्या पालनकर्त्या! तू मला थोड्या उशिराची सवड का नाही देत? की मी दान-पुण्य करावे आणि नेक व सदाचारी लोकांपैकी व्हावे.

وَلَن یُؤَخِّرَ ٱللَّهُ نَفۡسًا إِذَا جَاۤءَ أَجَلُهَاۚ وَٱللَّهُ خَبِیرُۢ بِمَا تَعۡمَلُونَ ﴿11﴾

११. आणि जेव्हा एखाद्याची निर्धारित वेळ येऊन पोहोचते, मग अल्लाह त्याला काहीच सवड देत नाही आणि तुम्ही जे काही करता अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो.