Settings
Surah Banning [At-Tahrim] in Marathi
یَـٰۤأَیُّهَا ٱلنَّبِیُّ لِمَ تُحَرِّمُ مَاۤ أَحَلَّ ٱللَّهُ لَكَۖ تَبۡتَغِی مَرۡضَاتَ أَزۡوَ ٰجِكَۚ وَٱللَّهُ غَفُورࣱ رَّحِیمࣱ ﴿1﴾
१. हे पैगंबर! ज्या गोष्टीला अल्लाहने तुमच्यासाठी हलाल (वैध) केले आहे, तिला तुम्ही हराम (अवैध) का ठरविता? (काय) तुम्ही आपल्या पत्नींची प्रसन्नता प्राप्त करू इच्छिता, आणि अल्लाह मोठा माफ करणारा, मोठा दयाळू आहे.
قَدۡ فَرَضَ ٱللَّهُ لَكُمۡ تَحِلَّةَ أَیۡمَـٰنِكُمۡۚ وَٱللَّهُ مَوۡلَىٰكُمۡۖ وَهُوَ ٱلۡعَلِیمُ ٱلۡحَكِیمُ ﴿2﴾
२. निःसंशय, अल्लाहने तुमच्यासाठी (अशा) शपथांमधून बाहेर पडण्याचा मार्ग निर्धारित केला आहे, आणि अल्लाह तुमचा कार्यसाधक (मित्र) आहे आणि तोच (पूर्ण) ज्ञान बाळगणारा आणि हिकमतशाली आहे.
وَإِذۡ أَسَرَّ ٱلنَّبِیُّ إِلَىٰ بَعۡضِ أَزۡوَ ٰجِهِۦ حَدِیثࣰا فَلَمَّا نَبَّأَتۡ بِهِۦ وَأَظۡهَرَهُ ٱللَّهُ عَلَیۡهِ عَرَّفَ بَعۡضَهُۥ وَأَعۡرَضَ عَنۢ بَعۡضࣲۖ فَلَمَّا نَبَّأَهَا بِهِۦ قَالَتۡ مَنۡ أَنۢبَأَكَ هَـٰذَاۖ قَالَ نَبَّأَنِیَ ٱلۡعَلِیمُ ٱلۡخَبِیرُ ﴿3﴾
३. आणि (स्मरण करा) जेव्हा पैगंबरांनी आपल्या काही पत्नींना गोपनीयतेत एक गोष्ट सांगितली तर जेव्हा तिने त्या गोष्टीची वाच्यता केली, आणि अल्लाहने आपल्या पैगंबराला त्याबाबत अवगत केले, तेव्हा पैगंबरांनी काही गोष्ट तर सांगितली आणि काही सांगायचे टाळले, मग जेव्हा पैगंबरानी आपल्या त्या पत्नीला ही गोष्ट सांगितली, तेव्हा ती म्हणाली, याची खबर तुम्हाला कोणी दिली? सांगितले, सर्व काही जाणणाऱ्या, पूर्ण खबर राखणाऱ्या अल्लाहने मला याची खबर दिली आहे.
إِن تَتُوبَاۤ إِلَى ٱللَّهِ فَقَدۡ صَغَتۡ قُلُوبُكُمَاۖ وَإِن تَظَـٰهَرَا عَلَیۡهِ فَإِنَّ ٱللَّهَ هُوَ مَوۡلَىٰهُ وَجِبۡرِیلُ وَصَـٰلِحُ ٱلۡمُؤۡمِنِینَۖ وَٱلۡمَلَـٰۤىِٕكَةُ بَعۡدَ ذَ ٰلِكَ ظَهِیرٌ ﴿4﴾
४. (हे पैगंबराच्या दोन्ही पत्नींनो!) जर तुम्ही अल्लाहकडे माफी मागाल (तर फार चांगले आहे). निःसंशय, तुमची हृदये झुकली आहेत आणि जर तुम्ही पैगंबराच्या विरोधात एकमेकांची मदत कराल तर निःसंशय, त्यांचा मित्र संरक्षक अल्लाह आहे आणि जिब्रील नेक ईमान राखणारे आणि त्याच्याखेरीज फरिश्तेही मदत करणारे आहेत.
عَسَىٰ رَبُّهُۥۤ إِن طَلَّقَكُنَّ أَن یُبۡدِلَهُۥۤ أَزۡوَ ٰجًا خَیۡرࣰا مِّنكُنَّ مُسۡلِمَـٰتࣲ مُّؤۡمِنَـٰتࣲ قَـٰنِتَـٰتࣲ تَـٰۤىِٕبَـٰتٍ عَـٰبِدَ ٰتࣲ سَـٰۤىِٕحَـٰتࣲ ثَیِّبَـٰتࣲ وَأَبۡكَارࣰا ﴿5﴾
५. जर तो (रसूल) तुम्हाला तलाक देऊन टाकील तर लवकरच त्यांना, त्यांचा पालनकर्ता (अल्लाह) तुमच्याऐवजी तुमच्यापेक्षा चांगल्या पत्न्या प्रदान करील, ज्या इस्लाम (धर्म) बाळगणाऱ्या, ईमान राखणाऱ्या, अल्लाहसमोर झुकणाऱ्या, माफी मागणाऱ्या, उपासना करणाऱ्या, रोजे (व्रत) राखणाऱ्या असतील विधवा आणि कुमारिका.
یَـٰۤأَیُّهَا ٱلَّذِینَ ءَامَنُوا۟ قُوۤا۟ أَنفُسَكُمۡ وَأَهۡلِیكُمۡ نَارࣰا وَقُودُهَا ٱلنَّاسُ وَٱلۡحِجَارَةُ عَلَیۡهَا مَلَـٰۤىِٕكَةٌ غِلَاظࣱ شِدَادࣱ لَّا یَعۡصُونَ ٱللَّهَ مَاۤ أَمَرَهُمۡ وَیَفۡعَلُونَ مَا یُؤۡمَرُونَ ﴿6﴾
६. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुम्ही स्वतः आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना त्या आगीपासून वाचवा,१ जिचे इंधन मानव आणि दगड आहेत, जिच्यावर कठोर हृदयाचे सक्त फरिश्ते तैनात आहेत. ज्यांना अल्लाह जो आदेश देतो, त्याची ते अवज्ञा करीत नाहीत, किंबहुना जो काही आदेश दिला जातो त्याचे पालन करतात.
یَـٰۤأَیُّهَا ٱلَّذِینَ كَفَرُوا۟ لَا تَعۡتَذِرُوا۟ ٱلۡیَوۡمَۖ إِنَّمَا تُجۡزَوۡنَ مَا كُنتُمۡ تَعۡمَلُونَ ﴿7﴾
७. हे इन्कारी लोकांनो! आज तुम्ही (विवशता आणि) बहाणा दाखवू नका, तुम्हाला केवळ तुमच्या दुष्कर्मांचे प्रतिफळ दिले जात आहे.
یَـٰۤأَیُّهَا ٱلَّذِینَ ءَامَنُوا۟ تُوبُوۤا۟ إِلَى ٱللَّهِ تَوۡبَةࣰ نَّصُوحًا عَسَىٰ رَبُّكُمۡ أَن یُكَفِّرَ عَنكُمۡ سَیِّـَٔاتِكُمۡ وَیُدۡخِلَكُمۡ جَنَّـٰتࣲ تَجۡرِی مِن تَحۡتِهَا ٱلۡأَنۡهَـٰرُ یَوۡمَ لَا یُخۡزِی ٱللَّهُ ٱلنَّبِیَّ وَٱلَّذِینَ ءَامَنُوا۟ مَعَهُۥۖ نُورُهُمۡ یَسۡعَىٰ بَیۡنَ أَیۡدِیهِمۡ وَبِأَیۡمَـٰنِهِمۡ یَقُولُونَ رَبَّنَاۤ أَتۡمِمۡ لَنَا نُورَنَا وَٱغۡفِرۡ لَنَاۤۖ إِنَّكَ عَلَىٰ كُلِّ شَیۡءࣲ قَدِیرࣱ ﴿8﴾
८. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुम्ही अल्लाहपुढे (खरी आणि) निखालस माफी मागा. संभवतः तुमच्या पालनकर्त्याने तुमची दुष्कर्मे मिटवावित. आणि तुम्हाला अशा जन्नतमध्ये दाखल करावे जिच्या खाली प्रवाह वाहत आहेत. ज्या दिवशी अल्लाह पैगंबराला आणि ईमान राखणाऱ्यांना, जे त्यांच्यासोबत आहेत अपमानित करणार नाही. त्यांचे दिव्य तेज (नूर) त्यांच्या पुढे आणि त्यांच्या उजवीकडे धावत असेल. हे दुआ (प्रार्थना) करत असतील की हे आमच्या पालनकर्त्या! आम्हाला संपूर्ण तेज (नूर) प्रदान कर आणि आम्हाला क्षमा कर. निःसंशय, तू प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगणारा आहे.
یَـٰۤأَیُّهَا ٱلنَّبِیُّ جَـٰهِدِ ٱلۡكُفَّارَ وَٱلۡمُنَـٰفِقِینَ وَٱغۡلُظۡ عَلَیۡهِمۡۚ وَمَأۡوَىٰهُمۡ جَهَنَّمُۖ وَبِئۡسَ ٱلۡمَصِیرُ ﴿9﴾
९. हे पैगंबर! काफिरांशी आणि मुनाफिक (दांभिक) लोकांशी जिहाद करा आणि त्यांच्यावर सक्ती (कठोरता) करा. त्यांचे ठिकाण जहन्नम आहे आणि ते मोठे वाईट ठिकाण आहे.
ضَرَبَ ٱللَّهُ مَثَلࣰا لِّلَّذِینَ كَفَرُوا۟ ٱمۡرَأَتَ نُوحࣲ وَٱمۡرَأَتَ لُوطࣲۖ كَانَتَا تَحۡتَ عَبۡدَیۡنِ مِنۡ عِبَادِنَا صَـٰلِحَیۡنِ فَخَانَتَاهُمَا فَلَمۡ یُغۡنِیَا عَنۡهُمَا مِنَ ٱللَّهِ شَیۡـࣰٔا وَقِیلَ ٱدۡخُلَا ٱلنَّارَ مَعَ ٱلدَّ ٰخِلِینَ ﴿10﴾
१०. अल्लाहने काफिर लोकांकरिता नूहच्या आणि लूतच्या पत्नींचे उदाहरण दिले आहे. या दोघी आमच्या दासांपैकी दोन नेक सदाचारी दासांच्या कुटुंबात होत्या. मग त्यांनी त्यांच्याशी विश्वासघात केला, तेव्हा ते दोन्ही (दास) त्यांच्यापासून अल्लाहच्या (कोणत्याही शिक्षा - यातनेला) रोखू शकले नाहीत आणि आदेश दिला गेला की (स्त्रियांनो!) जहन्नममध्ये जाणाऱ्यांसोबत तुम्ही दोघीही जा.
وَضَرَبَ ٱللَّهُ مَثَلࣰا لِّلَّذِینَ ءَامَنُوا۟ ٱمۡرَأَتَ فِرۡعَوۡنَ إِذۡ قَالَتۡ رَبِّ ٱبۡنِ لِی عِندَكَ بَیۡتࣰا فِی ٱلۡجَنَّةِ وَنَجِّنِی مِن فِرۡعَوۡنَ وَعَمَلِهِۦ وَنَجِّنِی مِنَ ٱلۡقَوۡمِ ٱلظَّـٰلِمِینَ ﴿11﴾
११. आणि अल्लाहने ईमान राखणाऱ्यांकरिता फिरऔनच्या पत्नीचे उदाहरण सांगितले. जेव्हा तिने दुआ (प्रार्थना) केली की हे माझ्या पालनकर्त्या! माझ्यासाठी आपल्या जवळ जहन्नतमध्ये एक घर बनव आणि मला फिरऔनपासून व त्याच्या कर्मांपासून वाचव आणि मला अत्याचारी लोकांपासून मुक्ती दे.
وَمَرۡیَمَ ٱبۡنَتَ عِمۡرَ ٰنَ ٱلَّتِیۤ أَحۡصَنَتۡ فَرۡجَهَا فَنَفَخۡنَا فِیهِ مِن رُّوحِنَا وَصَدَّقَتۡ بِكَلِمَـٰتِ رَبِّهَا وَكُتُبِهِۦ وَكَانَتۡ مِنَ ٱلۡقَـٰنِتِینَ ﴿12﴾
१२. आणि (उदाहरण दिले) इमरानची कन्या मरियमचे जिने आपल्या शील-अब्रूचे रक्षण केले, मग आम्ही आपल्यातर्फे तिच्यात प्राण (आत्मा) फुंकला आणि (मरियम) ने आपल्या पालनकर्त्याच्या वचनांचे आणि त्याच्या ग्रंथांचे समर्थन केले आणि ती उपासना करणारीं पैकी होती.