Settings
Surah The Pen [Al-Qalam] in Marathi
نۤۚ وَٱلۡقَلَمِ وَمَا یَسۡطُرُونَ ﴿1﴾
१. नून. शपथ आहे कलम (लेखणी) ची,१ आणि त्या गोष्टीची, जी काही ते (फरिश्ते) लिहितात.
مَاۤ أَنتَ بِنِعۡمَةِ رَبِّكَ بِمَجۡنُونࣲ ﴿2﴾
२. तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कृपेने वेडे नाहीत.
وَإِنَّ لَكَ لَأَجۡرًا غَیۡرَ مَمۡنُونࣲ ﴿3﴾
३. आणि निःसंशय, तुमच्यासाठी कधीही न संपणारा मोबदला आहे.
وَإِنَّكَ لَعَلَىٰ خُلُقٍ عَظِیمࣲ ﴿4﴾
४. आणि निःसंशय, तुम्ही फार (उत्तम) स्वभावा (चारित्र्या) वर आहात. १
فَسَتُبۡصِرُ وَیُبۡصِرُونَ ﴿5﴾
५. तेव्हा आता तुम्हीही पाहाल आणि हे देखील पाहतील
بِأَییِّكُمُ ٱلۡمَفۡتُونُ ﴿6﴾
६. की तुमच्यापैकी उपद्रवग्रस्त कोण आहे.
إِنَّ رَبَّكَ هُوَ أَعۡلَمُ بِمَن ضَلَّ عَن سَبِیلِهِۦ وَهُوَ أَعۡلَمُ بِٱلۡمُهۡتَدِینَ ﴿7﴾
७. निःसंशय, तुमचा पालनकर्ता आपल्या मार्गापासून भटकणाऱ्यांना चांगल्या प्रकारे जाणतो आणि तो, मार्गदर्शन प्राप्त केलेल्यांनाही चांगल्या प्रकारे जाणतो.
فَلَا تُطِعِ ٱلۡمُكَذِّبِینَ ﴿8﴾
८. तेव्हा तुम्ही खोटे ठरविणाऱ्यांचे (म्हणणे) मान्य करू नका.
وَدُّوا۟ لَوۡ تُدۡهِنُ فَیُدۡهِنُونَ ﴿9﴾
९. ते तर इच्छितात की तुम्ही थोडे सुस्त पडावे तर हे देखील ढीले पडतील.
وَلَا تُطِعۡ كُلَّ حَلَّافࣲ مَّهِینٍ ﴿10﴾
१०. आणि तुम्ही अशा एखाद्या माणसाचेही म्हणणे मान्य करू नका, जो अधिक शपथ घेणारा तुच्छ (अपमानित) असेल.
هَمَّازࣲ مَّشَّاۤءِۭ بِنَمِیمࣲ ﴿11﴾
११. नीच (क्षुद्र), व्यंग दोष काढणारा, आणि चहाडी करणारा असेल.
مَّنَّاعࣲ لِّلۡخَیۡرِ مُعۡتَدٍ أَثِیمٍ ﴿12﴾
१२. भलेपणापासून रोखणारा, मर्यादेचे उल्लंघन करणारा, अपराधी असेल.
عُتُلِّۭ بَعۡدَ ذَ ٰلِكَ زَنِیمٍ ﴿13﴾
१३. घमेंडी, मग त्याचसोबत वंशहीन असेल.
أَن كَانَ ذَا مَالࣲ وَبَنِینَ ﴿14﴾
१४. (त्याची घमेंड) केवळ यासाठी आहे की तो धनवान आणि अनेक पुत्र बाळगणारा आहे.
إِذَا تُتۡلَىٰ عَلَیۡهِ ءَایَـٰتُنَا قَالَ أَسَـٰطِیرُ ٱلۡأَوَّلِینَ ﴿15﴾
१५. जेव्हा त्याच्यासमोर आमच्या आयती वाचून ऐकविल्या जातात, तेव्हा हा म्हणतो की या तर पूर्वी होऊन गेलेल्या लोकांच्या कथा-कहाण्या आहेत.
سَنَسِمُهُۥ عَلَى ٱلۡخُرۡطُومِ ﴿16﴾
१६. आम्हीही त्याच्या सोंडे (नाका) वर डाग देऊ.
إِنَّا بَلَوۡنَـٰهُمۡ كَمَا بَلَوۡنَاۤ أَصۡحَـٰبَ ٱلۡجَنَّةِ إِذۡ أَقۡسَمُوا۟ لَیَصۡرِمُنَّهَا مُصۡبِحِینَ ﴿17﴾
१७. निःसंशय, आम्ही त्यांची तशीच परीक्षा घेतली जशी आम्ही बागवाल्यांची घेतली होती, तेव्हा त्यांनी शपथ घेतली की सकाळ होताच त्या (बागे) ची फळे तोडून घेऊ.
وَلَا یَسۡتَثۡنُونَ ﴿18﴾
१८. आणि इन्शा अल्लाह (जर अल्लाहने इच्छिले) म्हटले नाही.
فَطَافَ عَلَیۡهَا طَاۤىِٕفࣱ مِّن رَّبِّكَ وَهُمۡ نَاۤىِٕمُونَ ﴿19﴾
१९. तेव्हा त्या (बागे) वर तुमच्या पालनकर्त्यातर्फे एक आपत्ती चारी बाजूंनी फिरून गेली आणि ते झोपतच राहिले.
فَأَصۡبَحَتۡ كَٱلصَّرِیمِ ﴿20﴾
२०. तर ती (बाग) अशी झाली, जणू कापणी केलेले शेत.
فَتَنَادَوۡا۟ مُصۡبِحِینَ ﴿21﴾
२१. आता सकाळ होताच त्यांनी एकमेकांना हाक मारली
أَنِ ٱغۡدُوا۟ عَلَىٰ حَرۡثِكُمۡ إِن كُنتُمۡ صَـٰرِمِینَ ﴿22﴾
२२. की जर तुम्हाला फळे तोडायची आहेत तर आपल्या शेतावर सकाळीच निघा.
فَٱنطَلَقُوا۟ وَهُمۡ یَتَخَـٰفَتُونَ ﴿23﴾
२३. मग हे सर्व हळू हळू बोलत निघाले
أَن لَّا یَدۡخُلَنَّهَا ٱلۡیَوۡمَ عَلَیۡكُم مِّسۡكِینࣱ ﴿24﴾
२४. की आजच्या दिवशी कोणा गरिबाने तुमच्याजवळ येऊ नये.
وَغَدَوۡا۟ عَلَىٰ حَرۡدࣲ قَـٰدِرِینَ ﴿25﴾
२५. आणि घाईघाईने सकाळीच पोहोचले (समजत होते) की आम्ही काबू मिळविला.
فَلَمَّا رَأَوۡهَا قَالُوۤا۟ إِنَّا لَضَاۤلُّونَ ﴿26﴾
२६. मग जेव्हा त्यांनी बाग पाहिली, तेव्हा म्हणू लागले की, निश्चितच आम्ही रस्ता विसरलो.
بَلۡ نَحۡنُ مَحۡرُومُونَ ﴿27﴾
२७. नव्हे, किंबहुना आम्ही वंचित केले गेलो.
قَالَ أَوۡسَطُهُمۡ أَلَمۡ أَقُل لَّكُمۡ لَوۡلَا تُسَبِّحُونَ ﴿28﴾
२८. त्या सर्वांत जो चांगला होता, तो म्हणाला की, मी तुम्हा सर्वांना सांगत नव्हतो का तुम्ही (अल्लाहची) तस्बीह (गुणगान) का नाही करीत?
قَالُوا۟ سُبۡحَـٰنَ رَبِّنَاۤ إِنَّا كُنَّا ظَـٰلِمِینَ ﴿29﴾
२९. (तेव्हा) सर्व म्हणू लागले की आमचा पालनकर्ता मोठा पवित्र आहे. निःसंशय, आम्हीच अत्याचारी होतो.
فَأَقۡبَلَ بَعۡضُهُمۡ عَلَىٰ بَعۡضࣲ یَتَلَـٰوَمُونَ ﴿30﴾
३०. मग ते एकमेकांकडे तोंड करून बरे-वाईट बोलू लागले.
قَالُوا۟ یَـٰوَیۡلَنَاۤ إِنَّا كُنَّا طَـٰغِینَ ﴿31﴾
३१. म्हणाले, अरेरे! निःसंशय, आम्हीच विद्रोही (अवज्ञाकारी) होतो.
عَسَىٰ رَبُّنَاۤ أَن یُبۡدِلَنَا خَیۡرࣰا مِّنۡهَاۤ إِنَّاۤ إِلَىٰ رَبِّنَا رَ ٰغِبُونَ ﴿32﴾
३२. काय नवल की आमचा पालनकर्ता आम्हाला यापेक्षा चांगला मोबदला प्रदान करील. निःसंशय, आम्ही आता आपल्या पालनकर्त्याशीच आशा राखतो.
كَذَ ٰلِكَ ٱلۡعَذَابُۖ وَلَعَذَابُ ٱلۡـَٔاخِرَةِ أَكۡبَرُۚ لَوۡ كَانُوا۟ یَعۡلَمُونَ ﴿33﴾
३३. अशाच प्रकारे अज़ाब येतो, आणि आखिरतचा अज़ाब फार मोठा आहे, त्यांना अक्कल असती तर (बरे झाले असते).
إِنَّ لِلۡمُتَّقِینَ عِندَ رَبِّهِمۡ جَنَّـٰتِ ٱلنَّعِیمِ ﴿34﴾
३४. निःसंशय, अल्लाहचे भय राखणाऱ्यांकरिता त्यांच्या पालनकर्त्याजवळ देणग्यांनी युक्त अशा जन्नती आहेत.
أَفَنَجۡعَلُ ٱلۡمُسۡلِمِینَ كَٱلۡمُجۡرِمِینَ ﴿35﴾
३५. काय आम्ही ईमान राखणाऱ्यांना, अपराधी लोकांसमान ठरवू?
مَا لَكُمۡ كَیۡفَ تَحۡكُمُونَ ﴿36﴾
३६. तुम्हाला झाले तरी काय, कसे निर्णय घेत आहात?
أَمۡ لَكُمۡ كِتَـٰبࣱ فِیهِ تَدۡرُسُونَ ﴿37﴾
३७. काय तुमच्याजवळ एखादा ग्रंथ आहे, ज्यात तुम्ही वाचता?
إِنَّ لَكُمۡ فِیهِ لَمَا تَخَیَّرُونَ ﴿38﴾
३८. किंवा त्यात तुमच्या मनाला पसंत अशा गोष्टी आहेत?
أَمۡ لَكُمۡ أَیۡمَـٰنٌ عَلَیۡنَا بَـٰلِغَةٌ إِلَىٰ یَوۡمِ ٱلۡقِیَـٰمَةِ إِنَّ لَكُمۡ لَمَا تَحۡكُمُونَ ﴿39﴾
३९. किंवा आमच्याकडून तुम्ही काही अशा शपथा घेतल्या आहेत, ज्या कयामत पर्यंत बाकी राहतील, की तुमच्यासाठी ते सर्व आहे, जे तुम्ही आपल्यातर्फे निर्धारित करून घ्यावे?
سَلۡهُمۡ أَیُّهُم بِذَ ٰلِكَ زَعِیمٌ ﴿40﴾
४०. त्यांना विचारा की त्यांच्यापैकी कोण या गोष्टीस जबाबदार (आणि दावेदार आहे?
أَمۡ لَهُمۡ شُرَكَاۤءُ فَلۡیَأۡتُوا۟ بِشُرَكَاۤىِٕهِمۡ إِن كَانُوا۟ صَـٰدِقِینَ ﴿41﴾
४१. काय त्यांचे काही भागीदार आहेत? (असे असेल) तर त्यांनी आपल्या आपल्या भागीदारांना घेऊन यावे, जर ते सच्चे आहेत.
یَوۡمَ یُكۡشَفُ عَن سَاقࣲ وَیُدۡعَوۡنَ إِلَى ٱلسُّجُودِ فَلَا یَسۡتَطِیعُونَ ﴿42﴾
४२. ज्या दिवशी पोटरी उघड केली जाईल, आणि सजदा करण्यासाठी त्यांना बोलाविले जाईल (परंतु ते सजदा) करू शकणार नाहीत.१
خَـٰشِعَةً أَبۡصَـٰرُهُمۡ تَرۡهَقُهُمۡ ذِلَّةࣱۖ وَقَدۡ كَانُوا۟ یُدۡعَوۡنَ إِلَى ٱلسُّجُودِ وَهُمۡ سَـٰلِمُونَ ﴿43﴾
४३. त्यांचे डोळे (नजरा) १ झुकलेले असतील, आणि त्यांच्यावर अपमान आच्छादित होत असेल, वस्तुतः यांना सजदा करण्याकरिता (त्या वेळीही) बोलाविले जात होते, जेव्हा ते धडधाकट होते.
فَذَرۡنِی وَمَن یُكَذِّبُ بِهَـٰذَا ٱلۡحَدِیثِۖ سَنَسۡتَدۡرِجُهُم مِّنۡ حَیۡثُ لَا یَعۡلَمُونَ ﴿44﴾
४४. तेव्हा मला आणि या गोष्टीस खोटे ठरविणाऱ्यांना सोडून द्या. आम्ही त्यांना अशा प्रकारे हळू हळू खेचून घेऊ की त्यांना खबरही नसेल.
وَأُمۡلِی لَهُمۡۚ إِنَّ كَیۡدِی مَتِینٌ ﴿45﴾
४५. आणि मी त्यांना ढील देईन (सैल सोडेन), निःसंशय, माझी उपाययोजना मोठी मजबूत आहे.
أَمۡ تَسۡـَٔلُهُمۡ أَجۡرࣰا فَهُم مِّن مَّغۡرَمࣲ مُّثۡقَلُونَ ﴿46﴾
४६. काय तुम्ही त्यांच्याकडून एखादे पारिश्रमिक इच्छिता, ज्याच्या ओझ्याने हे दबले जात असावेत?
أَمۡ عِندَهُمُ ٱلۡغَیۡبُ فَهُمۡ یَكۡتُبُونَ ﴿47﴾
४७. किंवा काय यांच्याजवळ परोक्ष ज्ञान आहे, ज्यास हे लिहीत असावेत?
فَٱصۡبِرۡ لِحُكۡمِ رَبِّكَ وَلَا تَكُن كَصَاحِبِ ٱلۡحُوتِ إِذۡ نَادَىٰ وَهُوَ مَكۡظُومࣱ ﴿48﴾
४८. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाची धैर्यपूर्वक प्रतीक्षा करा आणि मासेवाल्यासारखे होऊ नका, जेव्हा त्याने दुःखाच्या अवस्थेत (आपल्या पालनकर्त्यास) पुकारले.
لَّوۡلَاۤ أَن تَدَ ٰرَكَهُۥ نِعۡمَةࣱ مِّن رَّبِّهِۦ لَنُبِذَ بِٱلۡعَرَاۤءِ وَهُوَ مَذۡمُومࣱ ﴿49﴾
४९. जर त्यास त्याच्या पालनकर्त्या (अल्लाह) च्या कृपेने प्राप्त करून घेतले नसते, तर निःसंशय, तो वाईट अवस्थेत उघड्या जमिनीवर टाकला गेला असता.
فَٱجۡتَبَـٰهُ رَبُّهُۥ فَجَعَلَهُۥ مِنَ ٱلصَّـٰلِحِینَ ﴿50﴾
५०. मग त्याला त्याच्या पालनकर्त्याने निवडले आणि त्याला नेक सदाचारी लोकांमध्ये सामील केले.
وَإِن یَكَادُ ٱلَّذِینَ كَفَرُوا۟ لَیُزۡلِقُونَكَ بِأَبۡصَـٰرِهِمۡ لَمَّا سَمِعُوا۟ ٱلذِّكۡرَ وَیَقُولُونَ إِنَّهُۥ لَمَجۡنُونࣱ ﴿51﴾
५१. आणि निकट आहे की (या) काफिरांनी आपल्या (तीक्ष्ण) नजरेने तुम्हाला घसरून टाकले.१ हे जेव्हा जेव्हा कुरआन ऐकतात आणि म्हणतात की हा तर खात्रीने वेडा आहे!
وَمَا هُوَ إِلَّا ذِكۡرࣱ لِّلۡعَـٰلَمِینَ ﴿52﴾
५२. आणि वास्तविक हा (कुरआन) तर समस्त जगातील लोकांकरिता पूर्ण बोध-उपदेश आहे.