Settings
Surah The tidings [An-Naba] in Marathi
عَمَّ یَتَسَاۤءَلُونَ ﴿1﴾
१. हे लोक कोणत्या गोष्टीची विचारपूस करीत आहेत?
عَنِ ٱلنَّبَإِ ٱلۡعَظِیمِ ﴿2﴾
२. त्या मोठ्या खबरीची?
ٱلَّذِی هُمۡ فِیهِ مُخۡتَلِفُونَ ﴿3﴾
३. ज्याबाबत हे अनेक मत (विचार) राखतात.
كَلَّا سَیَعۡلَمُونَ ﴿4﴾
४. निश्चितपणे हे आताच जाणून घेतील.
ثُمَّ كَلَّا سَیَعۡلَمُونَ ﴿5﴾
५. पुन्हा निश्चितपणे त्यांना फार लवकर माहीत पडेल.
أَلَمۡ نَجۡعَلِ ٱلۡأَرۡضَ مِهَـٰدࣰا ﴿6﴾
६. काय आम्ही जमिनीला बिछाईत नाही बनविले?
وَٱلۡجِبَالَ أَوۡتَادࣰا ﴿7﴾
७. आणि पर्वतांना मेखा नाही बनविले?
وَخَلَقۡنَـٰكُمۡ أَزۡوَ ٰجࣰا ﴿8﴾
८. आणि आम्ही तुम्हाला जोडी जोडीने निर्माण केले.
وَجَعَلۡنَا نَوۡمَكُمۡ سُبَاتࣰا ﴿9﴾
९. आणि आम्ही तुमच्या झोपेला तुमच्या आरामाचे कारण बनविले.
وَجَعَلۡنَا ٱلَّیۡلَ لِبَاسࣰا ﴿10﴾
१०. आणि रात्रीला आम्ही पडदा (आवरण) बनविले.
وَجَعَلۡنَا ٱلنَّهَارَ مَعَاشࣰا ﴿11﴾
११. आणि दिवसाला आम्ही रोजी प्राप्त करण्याचा समय बनविले.
وَبَنَیۡنَا فَوۡقَكُمۡ سَبۡعࣰا شِدَادࣰا ﴿12﴾
१२. आणि तुमच्या वरती आम्ही सात मजबूत आकाश बनविले.
وَجَعَلۡنَا سِرَاجࣰا وَهَّاجࣰا ﴿13﴾
१३. आणि एक चकाकणारा तेजस्वी दीप निर्माण केला.
وَأَنزَلۡنَا مِنَ ٱلۡمُعۡصِرَ ٰتِ مَاۤءࣰ ثَجَّاجࣰا ﴿14﴾
१४. आणि ढगांद्वारे आम्ही मुसळधार पर्जन्यवृष्टी केली.
لِّنُخۡرِجَ بِهِۦ حَبࣰّا وَنَبَاتࣰا ﴿15﴾
१५. यासाठी की त्याद्वारे अन्न (धान्य) आणि वनस्पती उगवाव्यात.
وَجَنَّـٰتٍ أَلۡفَافًا ﴿16﴾
१६. आणि घनदाट बागाही (उगवाव्या).
إِنَّ یَوۡمَ ٱلۡفَصۡلِ كَانَ مِیقَـٰتࣰا ﴿17﴾
१७. निःसंशय, निर्णयाचा दिवस निर्धारीत आहे.
یَوۡمَ یُنفَخُ فِی ٱلصُّورِ فَتَأۡتُونَ أَفۡوَاجࣰا ﴿18﴾
१८. ज्या दिवशी सूर (शंख) फुंकला जाईल, मग तुम्ही सर्व झुंडच्या झुंड बनून याल.
وَفُتِحَتِ ٱلسَّمَاۤءُ فَكَانَتۡ أَبۡوَ ٰبࣰا ﴿19﴾
१९. आणि आकाश उघडले जाईल, तेव्हा त्यात दारेच दारे बनतील.
وَسُیِّرَتِ ٱلۡجِبَالُ فَكَانَتۡ سَرَابًا ﴿20﴾
२०. आणि पर्वत चालविले जातील, तेव्हा ते पांढरी वाळू बनतील.
إِنَّ جَهَنَّمَ كَانَتۡ مِرۡصَادࣰا ﴿21﴾
२१. निःसंशय, जहन्नम टपून बसली आहे.
لِّلطَّـٰغِینَ مَـَٔابࣰا ﴿22﴾
२२. विद्रोही (उदंड) लोकांचे ठिकाण तेच आहे.
لَّـٰبِثِینَ فِیهَاۤ أَحۡقَابࣰا ﴿23﴾
२३. त्यात ते युगानुयुगे (आणि शतके) पडून राहतील.
لَّا یَذُوقُونَ فِیهَا بَرۡدࣰا وَلَا شَرَابًا ﴿24﴾
२४. ना कधी त्यात शीतलतेची गोडी चाखतील, ना पाण्याची.
إِلَّا حَمِیمࣰا وَغَسَّاقࣰا ﴿25﴾
२५. गरम (उकळते) पाणी आणि वाहत्या पू-खेरीज.
جَزَاۤءࣰ وِفَاقًا ﴿26﴾
२६. (त्यांना) पूर्णपणे मोबदला मिळेल.
إِنَّهُمۡ كَانُوا۟ لَا یَرۡجُونَ حِسَابࣰا ﴿27﴾
२७. त्यांना तर हिशोबाची आशाच नव्हती.
وَكَذَّبُوا۟ بِـَٔایَـٰتِنَا كِذَّابࣰا ﴿28﴾
२८. ते निडरतेने आमच्या आयतींना खोटे ठरवित असत.
وَكُلَّ شَیۡءٍ أَحۡصَیۡنَـٰهُ كِتَـٰبࣰا ﴿29﴾
२९. आम्ही प्रत्येक गोष्ट लिहून सुरक्षित ठेवली आहे.
فَذُوقُوا۟ فَلَن نَّزِیدَكُمۡ إِلَّا عَذَابًا ﴿30﴾
३०. आता तुम्ही (आपल्या कर्मांचा) स्वाद चाखा. आम्ही तुमच्या शिक्षेतच वाढकरीत राहू.
إِنَّ لِلۡمُتَّقِینَ مَفَازًا ﴿31﴾
३१. निःसंशय, अल्लाहचे भय राखणाऱ्यांकरिता सफलता आहे.
حَدَاۤىِٕقَ وَأَعۡنَـٰبࣰا ﴿32﴾
३२. बागा आहेत आणि द्राक्षे आहेत.
وَكَوَاعِبَ أَتۡرَابࣰا ﴿33﴾
३३. आणि नवयुवती कुमारिका समवयस्क स्त्रिया आहेत.
وَكَأۡسࣰا دِهَاقࣰا ﴿34﴾
३४. आणि भरून वाहणारे मद्याचे प्याले आहेत.
لَّا یَسۡمَعُونَ فِیهَا لَغۡوࣰا وَلَا كِذَّ ٰبࣰا ﴿35﴾
३५. तिथे ना तर ते अश्लील गोष्टी ऐकतील आणि ना खोट्या गोष्टी ऐकतील.
جَزَاۤءࣰ مِّن رَّبِّكَ عَطَاۤءً حِسَابࣰا ﴿36﴾
३६. (त्यांना) तुमच्या पालनकर्त्यातर्फे (त्यांच्या सत्कर्मांचा) हा मोबदला मिळेल, जो फार मोठे बक्षीस असेल.
رَّبِّ ٱلسَّمَـٰوَ ٰتِ وَٱلۡأَرۡضِ وَمَا بَیۡنَهُمَا ٱلرَّحۡمَـٰنِۖ لَا یَمۡلِكُونَ مِنۡهُ خِطَابࣰا ﴿37﴾
३७. (त्या) पालनकर्त्यातर्फे मिळेल, जो आकाशांचा आणि जमिनीचा, आणि जे काही त्यांच्या दरम्यान आहे, त्या सर्वांचा स्वामी व पालनकर्ता आहे, आणि मोठा दयावान आहे. कोणालाही त्याच्याशी बोलण्याचा अधिकार नसेल.
یَوۡمَ یَقُومُ ٱلرُّوحُ وَٱلۡمَلَـٰۤىِٕكَةُ صَفࣰّاۖ لَّا یَتَكَلَّمُونَ إِلَّا مَنۡ أَذِنَ لَهُ ٱلرَّحۡمَـٰنُ وَقَالَ صَوَابࣰا ﴿38﴾
३८. ज्या दिवशी रुह (आत्मा) आणि फरिश्ते रांगा बांधून उभे असतील तेव्हा कोणी बोलू शकणार नाही, मात्र ज्याला अतिशय दयावान (रहमान) अनुमती देईल, आणि तो उचित गोष्ट तोंडातून काढील (बोलेल).
ذَ ٰلِكَ ٱلۡیَوۡمُ ٱلۡحَقُّۖ فَمَن شَاۤءَ ٱتَّخَذَ إِلَىٰ رَبِّهِۦ مَـَٔابًا ﴿39﴾
३९. हा दिवस सत्य आहे, आता ज्याची इच्छा असेल त्याने आपल्या पालनकर्त्याजवळ (सत्कर्मे करून) स्थान बनवावे.
إِنَّاۤ أَنذَرۡنَـٰكُمۡ عَذَابࣰا قَرِیبࣰا یَوۡمَ یَنظُرُ ٱلۡمَرۡءُ مَا قَدَّمَتۡ یَدَاهُ وَیَقُولُ ٱلۡكَافِرُ یَـٰلَیۡتَنِی كُنتُ تُرَ ٰبَۢا ﴿40﴾
४०. आम्ही तुम्हाला निकट भविष्यात घडून येणाऱ्या शिक्षा यातनेचे भय दाखविले (आणि सावध केले) ज्या दिवशी मनुष्य आपल्या हातांनी केलेल्या कमाई (कर्मा) ला पाहील आणि काफिर म्हणेल की, मी माती झालो असतो तर (बरे झाले असते)!