Main pages

Surah The Overthrowing [At-Takwir] in Marathi

Surah The Overthrowing [At-Takwir] Ayah 29 Location Makkah Number 81

إِذَا ٱلشَّمۡسُ كُوِّرَتۡ ﴿1﴾

१. जेव्हा सूर्य गुंडाळून घेतला जाईल.

وَإِذَا ٱلنُّجُومُ ٱنكَدَرَتۡ ﴿2﴾

२. आणि जेव्हा तारे निस्तेज होतील.

وَإِذَا ٱلۡجِبَالُ سُیِّرَتۡ ﴿3﴾

३. आणि जेव्हा पर्वतांना चालविले जाईल.

وَإِذَا ٱلۡعِشَارُ عُطِّلَتۡ ﴿4﴾

४. आणि जेव्हा गर्भधारक सांडणींना सोडून दिले जाईल.

وَإِذَا ٱلۡوُحُوشُ حُشِرَتۡ ﴿5﴾

५. आणि जेव्हा हिंस्र पशूंना एकत्रित केले जाईल.

وَإِذَا ٱلۡبِحَارُ سُجِّرَتۡ ﴿6﴾

६. आणि जेव्हा समुद्र भडकाविले जातील.

وَإِذَا ٱلنُّفُوسُ زُوِّجَتۡ ﴿7﴾

७. आणि जेव्हा प्राणांना (शरीराशी) जोडले जाईल.

وَإِذَا ٱلۡمَوۡءُۥدَةُ سُىِٕلَتۡ ﴿8﴾

८. आणि जेव्हा जिवंत गाडल्या गेलेल्या मुलींना विचारले जाईल.

بِأَیِّ ذَنۢبࣲ قُتِلَتۡ ﴿9﴾

९. की कोणत्या अपराधापायी त्यांची हत्या केली गेली.

وَإِذَا ٱلصُّحُفُ نُشِرَتۡ ﴿10﴾

१०. आणि जेव्हा कर्म-लेख उघडले जातील.

وَإِذَا ٱلسَّمَاۤءُ كُشِطَتۡ ﴿11﴾

११. आणि जेव्हा आकाशाची चामडी (आवरण) उतरविली जाईल.

وَإِذَا ٱلۡجَحِیمُ سُعِّرَتۡ ﴿12﴾

१२. आणि जेव्हा जहन्नम भडकविली जाईल.

وَإِذَا ٱلۡجَنَّةُ أُزۡلِفَتۡ ﴿13﴾

१३. आणि जेव्हा जन्नतला जवळ आणले जाईल.

عَلِمَتۡ نَفۡسࣱ مَّاۤ أَحۡضَرَتۡ ﴿14﴾

१४. तेव्हा त्या दिवशी प्रत्येक मनुष्य जाणून घेईल, जे काही (सोबत) घेऊन आला असेल.

فَلَاۤ أُقۡسِمُ بِٱلۡخُنَّسِ ﴿15﴾

१५. मी शपथ घेतो मागे हटणाऱ्या,

ٱلۡجَوَارِ ٱلۡكُنَّسِ ﴿16﴾

१६. चालणाऱ्या फिरणाऱ्या, लपणाऱ्या ताऱ्यांची.

وَٱلَّیۡلِ إِذَا عَسۡعَسَ ﴿17﴾

१७. आणि रात्रीची जेव्हा ती जाऊ लागेल.

وَٱلصُّبۡحِ إِذَا تَنَفَّسَ ﴿18﴾

१८. आणि सकाळची जेव्हा चकाकू लागेल.

إِنَّهُۥ لَقَوۡلُ رَسُولࣲ كَرِیمࣲ ﴿19﴾

१९. निःसंशय, हे एका सन्मानित संदेशवाहकाचे कथन आहे.

ذِی قُوَّةٍ عِندَ ذِی ٱلۡعَرۡشِ مَكِینࣲ ﴿20﴾

२०. जो मोठा शक्तिशाली आहे. अर्शचा स्वामी (अल्लाह) च्या ठायी उच्च दर्जाचा आहे.

مُّطَاعࣲ ثَمَّ أَمِینࣲ ﴿21﴾

२१. ज्याचे तेथे (आकाशांमध्ये) आज्ञापालन केले जाते, (तो) अमानतदार आहे.

وَمَا صَاحِبُكُم بِمَجۡنُونࣲ ﴿22﴾

२२. आणि तुमचा साथीदार वेडा नाही.

وَلَقَدۡ رَءَاهُ بِٱلۡأُفُقِ ٱلۡمُبِینِ ﴿23﴾

२३. त्याने त्या (फरिश्त्या) ला आकाशाच्या उघड्या किनाऱ्यावर पाहिलेही आहे.

وَمَا هُوَ عَلَى ٱلۡغَیۡبِ بِضَنِینࣲ ﴿24﴾

२४. आणि हा परोक्षाच्या गोष्टी सांगण्यात कंजूसही नाही.

وَمَا هُوَ بِقَوۡلِ شَیۡطَـٰنࣲ رَّجِیمࣲ ﴿25﴾

२५. आणि हा (कुरआन) धिःक्कारलेल्या सैतानाचे कथन नाही.

فَأَیۡنَ تَذۡهَبُونَ ﴿26﴾

२६. मग तुम्ही कोठे जात आहात?

إِنۡ هُوَ إِلَّا ذِكۡرࣱ لِّلۡعَـٰلَمِینَ ﴿27﴾

२७. हे तर समस्त विश्ववासीयांकरिता बोधपत्र आहे.

لِمَن شَاۤءَ مِنكُمۡ أَن یَسۡتَقِیمَ ﴿28﴾

२८. (खासकरून त्याच्यासाठी,) जो तुमच्यपैकी सरळ मार्गावर चालू इच्छितो.

وَمَا تَشَاۤءُونَ إِلَّاۤ أَن یَشَاۤءَ ٱللَّهُ رَبُّ ٱلۡعَـٰلَمِینَ ﴿29﴾

२९. आणि तुम्ही, सर्व विश्वांच्या पालनकर्त्या (अल्लाह) च्या (इच्छे) विना काहीच इच्छू शकत नाही.