Settings
Surah The Cleaving [AL-Infitar] in Marathi
إِذَا ٱلسَّمَاۤءُ ٱنفَطَرَتۡ ﴿1﴾
१. जेव्हा आकाश विदीर्ण होईल.
وَإِذَا ٱلۡكَوَاكِبُ ٱنتَثَرَتۡ ﴿2﴾
२. आणि जेव्हा तारे झडतील (गळून पडतील)
وَإِذَا ٱلۡبِحَارُ فُجِّرَتۡ ﴿3﴾
३. आणि जेव्हा समुद्र वाहून जातील.
وَإِذَا ٱلۡقُبُورُ بُعۡثِرَتۡ ﴿4﴾
४. आणि जेव्हा कबरींना (फाडून) उखडून टाकले जाईल.
عَلِمَتۡ نَفۡسࣱ مَّا قَدَّمَتۡ وَأَخَّرَتۡ ﴿5﴾
५. त्या वेळी प्रत्येक मनुष्य, त्याने जे काही पुढे पाठविले आणि मागे सोडले (अर्थात आपल्या पुढच्या मागच्या कर्मांना) जाणून घेईल.
یَـٰۤأَیُّهَا ٱلۡإِنسَـٰنُ مَا غَرَّكَ بِرَبِّكَ ٱلۡكَرِیمِ ﴿6﴾
६. हे मानवा! तुला आपल्या दयाळू पालनकर्त्याबाबत कोणत्या गोष्टीने बहकविले?१
ٱلَّذِی خَلَقَكَ فَسَوَّىٰكَ فَعَدَلَكَ ﴿7﴾
७. ज्या (पालनकर्त्याने) तुला निर्माण केले, मग यथायोग्य केले, मग (सुयोग्यरित्या) व्यवस्थित घडविले.
فِیۤ أَیِّ صُورَةࣲ مَّا شَاۤءَ رَكَّبَكَ ﴿8﴾
८. ज्या रूपात इच्छिले तुला बनविले आणि तुला घडविले.
كَلَّا بَلۡ تُكَذِّبُونَ بِٱلدِّینِ ﴿9﴾
९. मुळीच नाही, किंबहुना तुम्ही तर शिक्षा आणि मोबदल्याच्या दिवसाला खोटे ठरविता.
وَإِنَّ عَلَیۡكُمۡ لَحَـٰفِظِینَ ﴿10﴾
१०. निःसंशय, तुमच्यावर रक्षक (पहारेकरी)
كِرَامࣰا كَـٰتِبِینَ ﴿11﴾
११. सन्मानित लिहिणारे नियुक्त आहेत.
یَعۡلَمُونَ مَا تَفۡعَلُونَ ﴿12﴾
१२. जे काही तुम्ही करता, ते जाणतात.
إِنَّ ٱلۡأَبۡرَارَ لَفِی نَعِیمࣲ ﴿13﴾
१३. निःसंशय, नेक - सदाचारी लोक (जन्नतचे ऐषआराम आणि) देणग्यांनी लाभान्वित असतील.
وَإِنَّ ٱلۡفُجَّارَ لَفِی جَحِیمࣲ ﴿14﴾
१४. आणि निश्चितच वाईट (दुराचारी) लोक जहन्नममध्ये असतील.
یَصۡلَوۡنَهَا یَوۡمَ ٱلدِّینِ ﴿15﴾
१५. मोबदल्याच्या दिवशी तिच्यात प्रवेश करतील.
وَمَا هُمۡ عَنۡهَا بِغَاۤىِٕبِینَ ﴿16﴾
१६. ते तिच्यातून कधीही गायब होऊ शकणार नाहीत.
وَمَاۤ أَدۡرَىٰكَ مَا یَوۡمُ ٱلدِّینِ ﴿17﴾
१७. आणि तुम्हाला काही माहीतही आहे की मोबदल्याचा दिवस काय आहे?
ثُمَّ مَاۤ أَدۡرَىٰكَ مَا یَوۡمُ ٱلدِّینِ ﴿18﴾
१८. मी दुसऱ्यांदा (सांगतो की) तुम्हाला काय माहीत की मोबदल्याचा (आणि शिक्षेचा) दिवस काय आहे?
یَوۡمَ لَا تَمۡلِكُ نَفۡسࣱ لِّنَفۡسࣲ شَیۡـࣰٔاۖ وَٱلۡأَمۡرُ یَوۡمَىِٕذࣲ لِّلَّهِ ﴿19﴾
१९. (तो असा की) ज्या दिवशी कोणी मनुष्य, कोणा माणसाकरिता कसल्याही गोष्टीचा अधिकार बाळगणारा नसेल आणि समस्त आदेश त्या दिवशी अल्लाहचेच असतील.