Main pages

Surah The morning star [At-Tariq] in Marathi

Surah The morning star [At-Tariq] Ayah 17 Location Makkah Number 86

وَٱلسَّمَاۤءِ وَٱلطَّارِقِ ﴿1﴾

१. शपथ आहे आकाशाची आणि अंधारात प्रकट होणाऱ्याची.

وَمَاۤ أَدۡرَىٰكَ مَا ٱلطَّارِقُ ﴿2﴾

२. तुम्हाला काय माहीत की तो रात्री प्रकट होणारा काय आहे.

ٱلنَّجۡمُ ٱلثَّاقِبُ ﴿3﴾

३. तो एक तेजस्वी तारा आहे.

إِن كُلُّ نَفۡسࣲ لَّمَّا عَلَیۡهَا حَافِظࣱ ﴿4﴾

४. असा कोणीही नाही, ज्याच्यावर संरक्षक फरिश्ता (नियुक्त) नसेल.

فَلۡیَنظُرِ ٱلۡإِنسَـٰنُ مِمَّ خُلِقَ ﴿5﴾

५. माणसाने विचार केला पाहिजे की त्याला कोणत्या वस्तूपासून निर्माण केले गेले आहे.

خُلِقَ مِن مَّاۤءࣲ دَافِقࣲ ﴿6﴾

६. त्याला एका उसळत्या पाण्यापासून निर्माण केले गेले आहे.

یَخۡرُجُ مِنۢ بَیۡنِ ٱلصُّلۡبِ وَٱلتَّرَاۤىِٕبِ ﴿7﴾

७. जे पाठ आणि छाती यांच्या दरम्यानी भागातून निघते.

إِنَّهُۥ عَلَىٰ رَجۡعِهِۦ لَقَادِرࣱ ﴿8﴾

८. निःसंशय, तो (अल्लाह) त्याला परत आणण्यावर निश्चितच सामर्थ्य राखणारा आहे.

یَوۡمَ تُبۡلَى ٱلسَّرَاۤىِٕرُ ﴿9﴾

९. ज्या दिवशी गुप्त रहस्यभेदांची जांच-पडताळ केली जाईल.

فَمَا لَهُۥ مِن قُوَّةࣲ وَلَا نَاصِرࣲ ﴿10﴾

१०. तेव्हा त्याचा ना काही जोर चालेल आणि ना कोणी मदतकर्ता असेल.

وَٱلسَّمَاۤءِ ذَاتِ ٱلرَّجۡعِ ﴿11﴾

११. पर्जन्यवृष्टी करणाऱ्या आकाशाची शपथ.

وَٱلۡأَرۡضِ ذَاتِ ٱلصَّدۡعِ ﴿12﴾

१२. आणि दुभंगणाऱ्या जमिनीची शपथ.

إِنَّهُۥ لَقَوۡلࣱ فَصۡلࣱ ﴿13﴾

१३. निःसंशय, हा (कुरआन) काटेकोर फैसला करणारी भाषा आहे.

وَمَا هُوَ بِٱلۡهَزۡلِ ﴿14﴾

१४. ही हास्य-विनोदाची (आणि निरर्थक) गोष्ट नाही.

إِنَّهُمۡ یَكِیدُونَ كَیۡدࣰا ﴿15﴾

१५. तथापि इन्कारी लोक कट - कारस्थान करीत आहेत.

وَأَكِیدُ كَیۡدࣰا ﴿16﴾

१६. आणि मी देखील एक डाव चालत आहे.

فَمَهِّلِ ٱلۡكَـٰفِرِینَ أَمۡهِلۡهُمۡ رُوَیۡدَۢا ﴿17﴾

१७. तुम्ही या इन्कारी लोकांना सवड देऊन टाका, त्यांना काही दिवस मोकळीक द्या.