Settings
Surah The morning hours [Ad-Dhuha] in Marathi
وَٱلضُّحَىٰ ﴿1﴾
१. शपथ आहे चाश्त (सूर्य वर आल्या) च्या वेळेची.
وَٱلَّیۡلِ إِذَا سَجَىٰ ﴿2﴾
२. आणि शपथ आहे रात्रीची जेव्हा ती पसरते.
مَا وَدَّعَكَ رَبُّكَ وَمَا قَلَىٰ ﴿3﴾
३. ना तर तुमच्या पालनकर्त्याने तुम्हाला (एकटे) सोडले आहे, आणि ना तो तुमच्याशी बेजार झाला आहे.
وَلَلۡـَٔاخِرَةُ خَیۡرࣱ لَّكَ مِنَ ٱلۡأُولَىٰ ﴿4﴾
४. निःसंशय, तुमच्यासाठी आरंभापेक्षा शेवट अधिक चांगला आहे.
وَلَسَوۡفَ یُعۡطِیكَ رَبُّكَ فَتَرۡضَىٰۤ ﴿5﴾
५. तुम्हाला तुमचा पालनकर्ता फार लवकरच (इनाम) देईल आणि तुम्ही राजी (व खूश) व्हाल.
أَلَمۡ یَجِدۡكَ یَتِیمࣰا فَـَٔاوَىٰ ﴿6﴾
६. काय त्याने तुम्हाला अनाथ जाणून आश्रय दिला नाही?
وَوَجَدَكَ ضَاۤلࣰّا فَهَدَىٰ ﴿7﴾
७. आणि तुम्हाला, मार्ग विसरलेले पाहून मार्ग दाखविला नाही?
وَوَجَدَكَ عَاۤىِٕلࣰا فَأَغۡنَىٰ ﴿8﴾
८. आणि तुम्हाला निर्धन असलेले पाहून श्रीमंत बनविले नाही?
فَأَمَّا ٱلۡیَتِیمَ فَلَا تَقۡهَرۡ ﴿9﴾
९. तेव्हा अनाथावर तुम्हीही सक्ती (कठोरता) करू नका.
وَأَمَّا ٱلسَّاۤىِٕلَ فَلَا تَنۡهَرۡ ﴿10﴾
१०. आणि ना याचना करणाऱ्याला दाटून दरडावून बोलू नका.
وَأَمَّا بِنِعۡمَةِ رَبِّكَ فَحَدِّثۡ ﴿11﴾
११. आणि आपल्या पालनकर्त्याच्या कृपा-देणग्यांचे वर्णन करीत राहा.