Settings
Surah The Fig [At-Tin] in Marathi
وَٱلتِّینِ وَٱلزَّیۡتُونِ ﴿1﴾
१. शपथ आहे अंजीरची आणि जैतूनची.
وَطُورِ سِینِینَ ﴿2﴾
२. आणि सनायीच्या तूर (पर्वता) ची.
وَهَـٰذَا ٱلۡبَلَدِ ٱلۡأَمِینِ ﴿3﴾
३. आणि या शांतीपूर्ण शहराची.
لَقَدۡ خَلَقۡنَا ٱلۡإِنسَـٰنَ فِیۤ أَحۡسَنِ تَقۡوِیمࣲ ﴿4﴾
४. निःसंशय, आम्ही मनावाला अति उत्तम स्वरूपात निर्माण केले.
ثُمَّ رَدَدۡنَـٰهُ أَسۡفَلَ سَـٰفِلِینَ ﴿5﴾
५. मग त्याला खालच्या स्तरांपेक्षा खालच्या स्तराचा करून टाकले.
إِلَّا ٱلَّذِینَ ءَامَنُوا۟ وَعَمِلُوا۟ ٱلصَّـٰلِحَـٰتِ فَلَهُمۡ أَجۡرٌ غَیۡرُ مَمۡنُونࣲ ﴿6﴾
६. परंतु ज्या लोकांनी ईमान राखले आणि मग सत्कर्म करीत राहिले तर त्यांच्यासाठी असा चांगला मोबदला आहे जोकधी संपणार नाही.
فَمَا یُكَذِّبُكَ بَعۡدُ بِٱلدِّینِ ﴿7﴾
७. मग तुम्हाला आता, मोबदल्याच्या दिवसाला खोटे ठरविण्यास कोणती गोष्ट प्रवृत्त करते?
أَلَیۡسَ ٱللَّهُ بِأَحۡكَمِ ٱلۡحَـٰكِمِینَ ﴿8﴾
८. काय सर्वश्रेष्ठ अल्लाह (सर्व) शासकांचा शासक नाही.